शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
6
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
7
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
8
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
9
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
10
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
11
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
12
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
13
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
14
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
15
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
16
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
17
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
18
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
19
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
20
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”

पुढची ८६ वर्षे

By admin | Updated: January 17, 2015 17:28 IST

एकविसाव्या शतकातील १४ वर्षे ‘इतिहास’जमा झाली, तरी त्या इतिहासाचे ओझे आपण वाहात आहोत. या शतकाच्या अखेरीस आणि बाविसाव्या शतकाच्या पहाटेला हे जग कसे

-कुमार केतकर

- टाइम मशिन

एकविसाव्या शतकातील १४ वर्षे ‘इतिहास’जमा झाली, तरी त्या इतिहासाचे ओझे आपण वाहात आहोत.  या शतकाच्या अखेरीस आणि बाविसाव्या शतकाच्या पहाटेला हे जग कसे असेल? इतिहासापासून सुटका नाही आणि भविष्याचा नक्की अंदाज नाही, असले दिवस आले आहेत.

 
हा म्हणता एकविसाव्या शतकातील चौदा वर्षे इतिहासजमा झाली. म्हणजे आपण त्या इतिहासाच्या ओझ्यातून मुक्त झालो, असे अजिबात नाही. किंबहुना इतिहासाचा बोजा वाढला आहे. इतिहासाच्या अभ्यासामुळे भविष्यात पुन्हा त्याच चुका आपण करणार नाही, असे मानले जाते. प्रत्यक्षात मात्र आपण त्याच आत्मघातकी चुका करीत आहोत.
गेल्या वर्षाचा शेवट पेशावरमधील शालेय मुलांच्या हिंस्त्र हत्त्याकांडाने झाला आणि या वर्षाची सुरुवात पॅरिसमधील दहा पत्रकार-व्यंगचित्रकारांच्या महाभयंकर हत्त्येने झाली. आपण वर्षाची सुरु वात ‘नवे वर्ष सुखाचे जावो’ अशा शुभेच्छा देऊन केली असली, तरी २0१५ हे वर्ष कसे जाईल, याबद्दल भयशंका निर्माण व्हावी, असे वातावरण देशात आणि जगभर आहे. कुणीही ज्योतिषी वा भविष्येवेधी तज्ज्ञ निश्‍चितपणे काहीच सांगू शकणार नाही, अशी स्थिती आहे.
दहा महिन्यांपूर्वी खनिज तेलाचे भाव जागतिक स्तरावर इतके गडगडले (१३0 डॉलर्सवरून ५0 डॉलर्स) हेसुद्धा कुणी सांगू शकले नव्हते. भाव वाढले तेव्हा जागतिक अर्थव्यवस्था संकटात आली होती. आता भाव पडले म्हणून जग अरिष्टात आले आहे! इतिहासापासून सुटका नाही आणि भविष्याचा नक्की अंदाज नाही.
फ्रान्सिस फुकुयामा या जपानी-अमेरिकन विचारवंताचे १९८९मध्ये ‘इतिहासाचा अंत-एण्ड ऑफ दि हिस्ट्री’ या मथळ्याचा एक प्रबंध ग्रंथ लिहिला होता. बर्लिनची भिंत पडून शीतयुद्ध संपल्यावर आता जगभर उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रस्थापित होईल आणि  ‘इतिहास’  इतिहासजमा होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले होते. ज्या लोकशाही मूल्यांसाठी जगभर संघर्ष होत होते, तो संघर्षमय इतिहास संपणार, असे भाकीत फुकुयामा यांनी वर्तिवले होते. कारण इतिहास मुख्यत: त्या संघर्षांनीच भारलेला होता, असे त्यांचे मत होते.
परंतु, फुकुयामांच्या ‘सिद्धांताचा अंत’ वर्षभरातच झाला.
शीतयुद्ध संपल्यानंतरचा काळ, म्हणजे १९८९-१९९१ नंतरची सुमारे २५ वर्षे ही अधिक उग्र, अराजकी आणि हिंस्त्र झाल्याचे आपण अनुभवत आहोत. सोविएत युनियनचे विघटन १९९१च्या डिसेंबरमध्ये झाले आणि अवघ्या जगाचा सत्ता समतोलच कोसळला. अमेरिकेला वाटले की, आपण आता एकमेव महासत्ता उरलो आहोत; परंतु त्यांचा तो भ्रम ९/११च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.
अगदी त्याच दोन वर्षांमध्ये म्हणजे १९८९-९१ या काळात युगोस्लावियाचे विघटन होऊ लागले. त्या देशाचे सात तुकडे तर झालेच, पण आपापसात अतिशय हिंसक अशी यादवी माजली, छळछावण्या पुन्हा बांधल्या गेल्या, सर्बिया आणि बोस्निया, सर्बिया आणि क्र ोएशिया अशी भयंकर युद्धे सुरू झाली. खुद्द सोविएत युनियनमधील पंधरापैकी किमान आठ प्रजासत्ताक राष्ट्रे सशस्त्ररित्या परस्परांविरोधात ठाकली. रशियाअंतर्गत चेचन्यावर तर घनघोर बॉम्बिंग खुद्द रशियालाच करावे लागले. त्याच वर्षी, म्हणजे १९९१ मध्येच कुवेत मुक्त करण्याच्या मिषाने लक्षावधी इराकी ठार मारले गेले. आता त्याच प्रदेशात इसिस ऊर्फ इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सिरियाची स्थापना केली गेली असून, त्या सशस्त्र, दहशतवादी दलाने अवघ्या जगाला वेठीस धरले आहे. गेल्या दोन महिन्यांत दहा जणांचा शिरच्छेद केला गेला आणि इसिसचे ते क्रौर्य जगभर टीव्हीच्या माध्यमातून दाखिवले गेले.
गेली २५ वर्षे, म्हणजे १९९0पासून आजपर्यंत अवघा अरब मुलुख हिंस्त्रपणे धुमसतो आहे. जी उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्था निर्माण होण्याची शक्यता फुकुयामा यांनी व्यक्त केली होती, ती जगाच्या बहुतेक देशांमध्ये आलेली नाही. ‘मानवी चेहरा असलेली भांडवलशाही’ उदयाला आली नाही आणि मुक्त बाजारपेठेच्या माध्यमातून नव्या समृद्धीबरोबर उग्र विषमता निर्माण झाली.
जेफ्री सॅक्स या जगप्रसिद्ध विचारवंत-अर्थतज्ज्ञाने म्हटले आहे, की सर्वंकष दारिद्रय़ (म्हणजे अन्न, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण, वातावरण या कशाचीच पुरेशी उपलब्धता वा सोय नाही) अशी स्थिती ही दहशतवादाची सुपीक भूमी आहे. हे सर्वंकष दारिद्रय़ हाच दहशतवाद आहे, असे त्यांनी म्हटले आहे. एका अण्वस्त्रसज्ज युद्धनौकेच्या वा एखाद्या जंगी बॉम्बर विमानाच्या खर्चात आफ्रिकेतील एखादा देश कायमचा दारिद्रय़मुक्त होऊ शकतो. पण जवळ-जवळ सर्व देश अधिकाधिक खर्च युद्धसज्जतेवर करीत आहेत.
जर आजच्या बहकलेल्या स्थितीत अशीच आग भडकत गेली, तर महायुद्धाची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, हे महायुद्ध विसाव्या शतकातील पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांपेक्षा पूर्णत: वेगळे असेल. जगातील आठ देशांकडे आज अण्वस्त्रसज्जता आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात अणुविभाजनाचे शास्त्र उपलब्ध नव्हते. दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस फक्त अमेरिकेकडे अण्वस्त्रे होती. (हिरोशिमा-नागासाकी या जपानी शहरांवर अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने आपल्या महासत्तेचा अश्‍वमेध जगभर सोडला होता. पण कम्युनिस्ट रशियाने १९४९मध्ये स्वत:च्या अण्वस्त्र चाचण्या केल्या आणि  तो अश्‍वमेध अडविला. तेव्हापासून जग अणुयुद्धाच्या छायेत आहे.)
पाठोपाठ ब्रिटन आणि फ्रान्सने त्यांच्या अण्वस्त्रचाचण्या केल्या. कम्युनिस्ट चीनने १९६४मध्ये स्वत:चे अणुतंत्रज्ञान विकसित केले. इंदिरा गांधींनी १९७४मध्ये भारताची अण्वस्त्रक्षमता सिद्ध केली. पुढे अटलबिहारी वाजपेयींनी १९९८मध्ये इंदिरा गांधींच्या पावलावर पाऊल टाकून भारताच्या पाच अण्वस्त्रचाचण्या केल्या. भारताच्या आव्हानाचा स्वीकार करून १५ दिवसांतच पाकिस्तानने त्यांच्या सहा चाचण्या केल्या. रशिया आणि अमेरिका हे तर गेल्या ७0 वर्षांत किमान तीन वेळा आपापल्या अण्वस्त्रक्षमतेने एकमेकांना आव्हान देत आले आहेत. काही वर्षांपूर्वी उत्तर कोरियाने त्यांच्या अण्वस्त्रचाचण्या केल्या. इराणही अण्वस्त्रे बनवू इच्छितो. इस्त्राएल तर अण्वस्त्रसज्ज आहेच. (जरी त्यांनी तसे जाहीर केलेले नाही.)
खुद्द अमेरिका व रशिया या दोघांकडे मिळून किमान ४0 हजार महाबलशाली अशी अण्वस्त्रे आहेत. या सर्व देशांची ही अण्वस्त्रसज्जता अवघ्या जगाचा १00वेळा पूर्ण विनाश करण्याची क्षमता असलेली आहे. परंतु, १00 वेळा पृथ्वीचा विध्वंस करण्याची गरजच असणार नाही. एकदा पृथ्वी पूर्णपणे बेचिराख झाली की, दुसरा अणुबॉम्ब टाकायला कुणी उरणारच नाही. आणि समजा, एका प्रचंड क्षमतेच्या बॉम्बने अवघ्या पृथ्वीचा विनाश झाला नाही, तर आणखी चार बॉम्ब ते काम ‘पूर्णत्वास’ नेतील.
हे अणुयुद्ध किंवा सार्वत्रिक ‘आण्विक विध्वंस’  नक्की केव्हा आणि कुठून सुरू होईल (की फक्त धमक्याच दिल्या जातील आणि अणुयुद्ध प्रत्यक्षात रोखले जाईल?), हे निश्‍चितपणे कुणीच सांगू शकणार नाही! सध्या भारत आणि पाकिस्तान परस्परांच्या विरोधात ज्या विषारी आणि विखारी पद्धतीने प्रचार करीत आहेत, ते पाहता या अणुयुद्धाला भारतीय उपखंडातही तोंड फुटू शकेल. पाकिस्तानची लोकसंख्या १६-१७ कोटी आणि भारताची १३0 कोटी. ‘पाकिस्तानला एकदा कायमचा धडा शिकविला पाहिजे!’-  असे म्हणणार्‍यांना या आण्विक विध्वंसाचा पुरेसा अंदाज आला नसावा. पण, ‘गर्व से कहो’ ने डोके भडकले की, परिणामांची पर्वा करायची मन:स्थिती नसते. जे भारत-पाकिस्तानमधील कट्टर धर्मवादी मंडळींना लागू आहे, तेच इस्राएलमधील  ‘झायोनिस्ट’  ज्यूंनाही लागू आहे. आज इस्राएलमध्ये असे अनेक धर्माभिमानी-राष्ट्राभिमानी आहेत, की ते संपूर्ण अरब-इस्लामी देश बेचिराख झाले पाहिजेत, असे मानतात. त्या प्रक्रियेत इस्राएलही पूर्ण नष्ट होईल, याचीही त्यांना पर्वा नाही.   ‘‘आमच्याबरोबर आम्ही संपूर्ण जगाचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही’’ अशा अर्थाचे उद्गार इस्राएलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मेयर यांनी बीसीसीला दिलेल्या मुलाखतीत काढले होते. जर  ‘इसिस’च्या इस्लामी दहशतवाद्यांच्या हातात अण्वस्त्रे पडली तर त्यांनीही तसाच इशारा जगाला दिला आहे.
अजून या शतकाची ८६वर्षे बाकी आहेत. पण कुणी सांगावे, विनाशकाल जवळही असू शकतो.
 
 
(लेखक ज्येष्ठ पत्रकार-संपादक आणि जागतिक घडामोडींचे भाष्यकार आहेत.)
(हे सदर दर १५ दिवसांनी प्रसिद्ध होईल.)