शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा कणा अजूनही ताठ आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 07:06 IST

दिल्ली सरकारसारखी प्रेरणा घेऊन, उत्साही शिक्षकांना सोबत घेऊन, दबावतंत्र झुगारून काम करणे गरजेचे वाटते.

ठळक मुद्देअशैक्षणिक कामांनी वैताग आणला आहे. शिकवायला वेळच पुरत, मिळत नाही.

- रमेश सरोदे, पुणेमी पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक आहे. दि. ७ आॅक्टोबरच्या मंथन पुरवणीमध्ये ‘मुक्काम खिचडीपूर’ हा अमृता कदम यांचा लेख वाचून मनाला हुरूप आला. परंतु, या लेखाच्या निमित्ताने मनात साचून राहिलेली धगधग वर येऊ पाहातेय. कारण दिल्ली सरकार हे करू शकते तर मग इतर ठिकाणी का नाही? याचे उत्तरही अर्थात अमृता कदम यांनी दिले आहे, ‘राजकीय इच्छाशक्ती’!अनेक शिक्षक ही शिक्षणपद्धती सुधारू पाहतात, बदलू पाहतात, नवनवीन प्रयोग, पद्धती, कल्पना, संकल्पना आणू पाहतात; परंतु त्यांची कुचंबना होते. शाळेच्या अधिकाऱ्यांपासून राजकीय पुढारी, कार्यकर्ते, पगारापुरतेच काम करणारे मुख्याध्यापक (अपवाद वगळता) इ. सर्वांचाच वचक व भीतीयुक्त वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. त्यात अशैक्षणिक कामांनी तर वैताग आणला आहे. शिकवायला वेळच पुरत, मिळत नाही. एखादी नवीन संकल्पना शाळेत राबवावी म्हटलं तर सहकार्य कमीच परंतु उलट दबाव व जो करेल त्यानेच सर्व जबाबदारी घ्यायची. शाळेत शिस्त लावायची म्हटलं तरी पालकांचा दबाव वाढतो. परिणामी वाईट बोल, शिव्या ऐकाव्या लागतात.अशा एक ना अनेक समस्या. यामधूनही आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. दिल्ली सरकारसारखी प्रेरणा घेऊन, उत्साही शिक्षकांना सोबत घेऊन, दबावतंत्र झुगारून काम करणे गरजेचे वाटते. परंतु हे सर्व माझ्यासारख्या खेडेगावातून आलेल्या शिक्षकाला जमत नाही. फक्त इच्छाशक्तीवर काही होऊ शकत नाही. हे सर्व काही समजतं, पण इच्छा असूनही वळत नाही.अनेक मुलांना ६ वी, ७ वी ला असून, नीट लिहिता, वाचता, विचार करता येत नाही. काही शिक्षक अशा मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करतात तर मध्येच ही माहिती पाहिजे, ती माहिती पाहिजे, ही मीटिंग, ती मीटिंग... त्यात महानगरपालिका शाळेतील पालकांची मानसिकता वेगळीच. कधीही वर्गात, शाळेत येतात. नियम सांगितले शाळेचे तर स्थानिक नेत्यांकडून दबाव, उलट उत्तरे अशी परिस्थिती.. तरीही बघुया, अजून कणा ताठ आहे, बुद्धीची धार तेज आहे. नवीन शिकण्याची आणि करण्याची, घडविण्याची आस आहे, इच्छा आहे.