शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

रहस्य, गूढ, भीती.

By admin | Updated: September 5, 2015 14:12 IST

त्या काळातल्या रहस्यकथा आजच्या मॉडेल तरुणींप्रमाणो असत. एकदम सडपातळ ! शे-सव्वाशे पाने म्हणजे डोक्यावरून पाणी. प्रचंड वेगवान कथानके, छोटी छोटी प्रकरणो, पानापानाला मुडदे, संकटातून सुटणा:या साहसी नायकांच्या मराठी रहस्य/साहस कथांचा तर रतीब ! आणि मेडिकल थ्रिलर?.

मानगुटीवर बसलेली रहस्यकथांची भुतं!
 
- निरंजन घाटे
 
मी साधारणपणे पाचवीत असताना म्हणजे 1955 च्या सुमारास पहिली रहस्यकथा वाचली असेल. रहस्यकथा वाचनाची सुरुवात मी जरी बाबूराव अर्नाळकरांपासून केली तरी त्या काळात द. चिं. सोमण, द. पां. खांबेटे, ग. रा. टिकेकर जे लिहीत होते तेही मी वाचत असे. ह्या सगळ्यांच्याच लेखनाचं मूळ ब्रिटिश- अमेरिकन साहित्यात असलं तरी प्रत्येकाची लेखनशैली त्या कथांना वेगळीच खुमारी आणत होती. 1966 पर्यंत बाबूरावांची मक्तेदारी चालू होती. त्यानंतर हळूहळू नवनवी नावे उदयास येऊ लागली.
एस. एम. काशीकर हे धूमकेतू कथा लिहू लागले होते. त्यांचं लेखन मला फारसं आवडत नसे याचं कारण ते फार बाळबोध तर होतंच पण त्यात तपशिलाच्या भरपूर चुका असत. बाबूरावांच्या पूर्वी ज्यांनी रहस्यकथा लिहिल्या त्यातल्या हरी नारायण आपटे यांच्या गूढरम्य कथांनी घातलेली मोहिनी उतरवायला बाबूरावांची लेखणी असमर्थ ठरली होती. गो. ना. दातारांनी रेनॉल्ड्सच्या कादंब:यांची केलेली भाषांतरंही अशीच भुतासारखी मानगुटीवर बसली होती.
ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीने माङयापुढे एक अद्भुत खजिना उघडला होता. तिथे अगाथा ािस्ती, जॉज्रेस सिमेनॉन, जे. जे. मॅरिक आणि आर्थर कॉनन डॉयलचा रहस्यकथांचा सम्राट शेरलॉक होम्स यांचा स्नेह जुळला. ह्या रहस्यकथांत ‘अॅक्शन’ कमी होती; पण रहस्याचा एकेक पदर हळुवारपणो उलगडून दाखवत अत्यंत संथपणो ह्या रहस्यकथा गुंगवून टाकत. हे पूर्वी भा. रा. भागवत, बाबूराव अर्नाळकर वाचताना होत होतं. 
शेरलॉक होम्स मॉरिआर्टीशी झालेल्या झटापटीत रायशेनलाख धबधब्यात पडून नाहीसा झाला तेव्हा त्या काळातल्या असंख्य वाचकांच्या इतकाच सुमारे 6क्-65 वर्षानंतर मीसुद्धा अस्वस्थ झालो होतो. त्यावेळी असंख्य वाचकांनी कॉनन डॉयलच्या घरासमोर निदर्शनं केली. ‘द स्ट्रँड’चा खप निम्म्याहून कमी झाला तेव्हा शेरलॉक होम्सला जिवंत करणं कॉनन डॉयलला भाग पडलं हे मला खरं तर आधीपासून ठाऊक होतं; कारण एकतर मी शेरलॉक होम्सच्या एका अभ्यासकानं लिहिलेलं शेरलॉक होम्सचं चरित्र वाचलेलं होतंच पण डॉ. आर्थरकॉनन डॉयलचं चरित्रही वाचलं होत. तरीही वाचनालयातून जेव्हा ‘रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स’ आणून वाचलं त्यावेळी माङयातील वाचकाचा अंतरात्मा शांत झाला होता.
ब्रिटिश कौन्सिल ग्रंथालयाचा मी 1977 साली पुण्याला तात्पुरता रामराम करेर्पयत सदस्य होतो. त्या काळात मला रहस्यकथेच्या आणखी एका प्रकाराची ओळख झाली. त्या कथा वाचताना डोकं फार शाबूत ठेवावं लागत असेच पण त्या कथा खूप लक्षपूर्वक वाचाव्या लागत असत. एक एक शब्द नीट समजून उमजून वाचावा लागत असे. पुढे पी. जी. वुडहाऊस यांची एक मुलाखत वाचण्यात आली. इंग्रजी भाषेला हवं तसं वाकवून शब्दांचे अनेक खेळ करणा:या ह्या माझ्या आवडत्या लेखकानं ‘चांगलं इंग्रजी कसं वापरावं हे शार्तरीजच्या कादंब-या वाचून कळतं म्हणून मी सेंटची पुस्तकं वाचतो आणि त्याच्या सहवासात रमतो’, असं लिहिलं तेव्हा मी धन्य झालो. कारण मलाही त्या कादंब-या आणि कथा त्याच कारणासाठी आवडत असत. ह्याशिवाय इतरही बरेच रहस्यकथालेखक ह्या काळात परिचयाचे बनले. ही पुस्तकं वाचताना बाबूराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांमागचं रहस्यही सुटत गेलं. पण बाबूराव त्याबाबत निर्मळ मनानं कबुली देत. एवढंच नव्हे तर ‘अहो, ती कथा मूळची याची’ असंही सांगत, हेही मी अनुभवलंय. 
माझ्या रहस्यकथा वाचनाला पुष्टी देणारी आणखी एक घटना घडली. माझा मित्र धनंजय डोळेकडे मी एकदा गेलो होतो. त्याच्या टेबलावर एक पुस्तक होतं. ‘द केस ऑफ द..’ अर्ल स्टॅन्ली गार्डनरचं. मी ते उचललं आणि त्यात गुंगून गेलो. त्याच्या घरी अर्ल स्टॅन्ली गार्डनरची बरीच पुस्तकं होती. मी त्यांचा अल्पावधीतच फडशा पाडला.
दरम्यानच्या काळात किताब मिनार वाचनालयातून रहस्यकथा आणून वाचणे चालूच होते. त्यात मामा वरेरकरांच्या ‘महंत कथा’ जरा वेगळ्याच वाटत. त्या वाचायला लागलो. त्यामुळे पुढे लेस्ली शार्तरीजच्या ‘सेंट कथा’ वाचताना त्या न अडखळता वाचू लागलो. ह्याचे कारण मामांनी सेंटचे नुस्ते बोधचिन्हच नाही, तर कथांचा गाभा मुंबईत आणून सेंटला मुंबईकर बनवला होता. अर्नाळकरांचा झुंझारही सेटवरच बेतलेला होता. पण त्याचे बोधचिन्ह ‘तोफ’ हे असे. नरेंद्र सेनापती हे झुंझारचे पाळण्यातले नाव.
पुढे रेमंड चँडलर, जे. जे. मॅरिक, सेक्स्टन ब्लेक अशा लेखकांच्या आणि पात्रंच्या रहस्यकथा वाचत गेलो. अजूनही वाचतो. इयान फ्लेमिंगच्या बाँडकथांमध्ये फारसे रहस्य नसे, तर साहस आणि प्रणय यांचीच रेलचेल असे. पण ह्या सर्व इंग्रज अमेरिकी लेखकांचे एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांची भाषा.
भाषेचा साधेपणा हा त्यांच्या बाबतीत एक समान धागा होता. ह्याला अर्थात एक अपवाद होता तो म्हणजे लेस्टी चार्तरीज. त्याची पुस्तके वाचताना कथेपेक्षाही भाषेचे सौंदर्य अधिक लक्ष वेधून घ्यायचे. आपल्याकडेदेखील रहस्यकथा लेखकांची साधी सोपी सरळ भाषा हीच वाचकांना आकृष्ट करण्याचे सामथ्र्य बाळगून होती. त्या काळातल्या इंग्रजी अमेरिकन रहस्यकथा ह्या आजकालच्या दूरचित्रवाणीवरच्या मॉडेल तरुणींप्रमाणो कमी जाडीच्या असत. 12क् ते 15क् पाने म्हणजे डोक्यावरून पाणी. प्रचंड वेगवान कथानके, छोटी छोटी प्रकरणो, पानापानाला मुडदे, संकटातून सुटणारे साहसी नायक असलेल्या मराठी रहस्य/साहस कथा तर दरमहा 64 आणि दिवाळीला डोक्यावरून पाणी म्हणजे 96 ते 120 पाने. इंग्रजीतल्या रहस्यकथांत रहस्य आणि साहस जरा विस्तृतपणो रंगवलेले असायचे; तर मराठीत तसे क्वचितच आढळे. अर्थात कुठल्या लेखकाच्या कुठल्या नायकाच्या कुठल्या पुस्तकावरून लेखकाने आपली कथा घेतली आहे, ह्यावर बरेच काही अवलंबून असे. बरेचदा सोप्या मराठीत इंग्रजी वाक्य आणताना ‘देन ही टर्नड अॅण्ड स्टार्टेड क्लाअिंबिंग’चे भाषांतर ‘तो वळला आणि चढू लागला’ ह्या धर्तीचे असे; पण त्याला मराठी लेखकाचा नाईलाज असे. 
मराठी आणि इंग्रजीही रहस्यकथांचे स्वरूप हळूहळू बदलले. 197क् च्या सुमारास जसा बाबूराव अर्नाळकर युगाचा अंत झाला त्याचप्रमाणो इंग्रजी भाषिक रहस्यकथांमधून अमेरिकेतील नव्या दमाच्या लेखकांनी चित्र पालटले. ह्यातले बहुतेक लेखक व्हिएतनाममध्ये लढलेले होते. सीआयएच्या अवैध उद्योगांशी त्यांचा परिचय होता. अमेरिकेच्या राजकारणातील उच्चपदस्थ स्वत:ची प्रतिमा उज्ज्वल राहावी म्हणून तसेच ती आणखी चकचकीत व्हावी म्हणून प्रसंगी आघाडीवर लढलेल्या आणि शौर्यपदक मिळवलेल्या सैनिकांचा कसा वापर करतात, मग हे प्रकरण अंगाशी येत आहे असे वाटू लागले की ह्या वीरांना कसे बळीचे बकरे बनवतात हे त्यांनी जवळून बघितले होते. व्हिएतनाम युद्धाची निर्थकताही त्यांनी जोखली होती. ह्या लेखकांनी अमेरिकी रहस्य-साहसकथांचा चेहरामोहराच बदलला. ह्याच सुमारास ब:याच अमेरिकी महिला अॅगाथा ािस्तीच्या तोर्पयतच्या राखीव कुरणात शिरल्या आणि त्यांनी पुरुष लेखकांपेक्षा वेगळ्या वाटेने जात रहस्य जास्त अशा रहस्यकथा लिहायला सुरुवात केली.
खरोखर चांगल्या रहस्यकथा/साहसकथा आणि गुढकथा इतक्या गुंगवून टाकतात की आपण खरोखरच देहभान विसरतो आणि काही क्षण नायक बनतो. नायकावर आलेले संकट हे आपल्यावरच आले आहे किंवा नायकाला कोडे सुटत नसेल तर ते कोडे आपण सोडवायचा प्रयत्न करू लागतो. सर्वात त्रस देणा:या रहस्यमय नसलेल्या रहस्यकथा ह्या तर फारच त्रसदायक असतात. त्या आपल्या दृष्टीने रहस्यमय नसतात ह्याचे कारण कुणी गुन्हा केला हे लेखक पहिल्याच प्रकरणात सांगतो किंवा पुस्तकाची सुरुवातच मुळी गुन्हेगार खून करताना किंवा जगाला हादरवून सोडणारे एखादे कृत्य करताना होते. त्यामुळे आपल्याला खलनायक कोण हेही सुरुवातीपासून ठाऊक असतेच पण नायकासाठी लावलेले सापळे आणि खोदून झाकून ठेवलेले खड्डे आपल्याला आधीच माहीत असतात. त्यामुळे नायक ज्यावेळी ह्या खलनायकी डावात फसतो त्यावेळी ‘हा असा कसा फसला’ हे आपल्याला कळत नाही. काहीवेळा आपण त्याला साधव करू शकत नाही, ह्याची हळहळ वाटते. पूर्वी बरेचदा हिंदी चित्रपट पाहताना पिटातले प्रेक्षक पडद्यावरच्या नायकाला ‘तो पिंपाआड दडलाय बघ’ असे ओरडून सांगत तशी आपली अवस्था असते. पण आपण तसे सांगू तर शकत नाही पण त्यामुळे आपण त्यात गुंगून जातो.
रहस्यकथांमधला एक प्रकार सांगायलाच हवा, तो म्हणजे मेडिकल थ्रिलर किंवा वैद्यकीय पाश्र्वभूमीवरच्या रहस्य/साहसकथा. डॉ. जेकिल अँड मिस्टर हाईड ही अशा प्रकारची आद्य कथा असावी. खरे तर हा मान मेरी शेलीच्या फ्रँकेन्स्टाईनचा. पण ह्या कादंबरीला आता आद्य विज्ञान कथा मानण्यात येते. त्यामुळे रॉबर्ट लुई स्टीव्हन्सनच्या डॉ. जेकिल अँड मिस्टर हाईडला आद्य वैद्यकशास्त्रीय रहस्य/साहस कथा मानायला काही हरकत नसावी. 
फ्रँकेन्स्टाईनची लेखिका आणि ह्या कादंबरीचा लेखक हे दोघेही ब्रिटिश होते. त्यामुळे या लेखकांच्या कादंब:या अगदी सुरुवातीलाच माङया वाचनात आल्या. काऊंट ड्राकुलाचा शोधही त्या कादंबरीचा लेखक ब्रिटिश असल्यामुळेच लागला. पुढे त्याची ‘वर्म’ किंवा अशाच काही नावाची एक कादंबरी वाचल्याचे आठवते पण तिची कथा आठवत नाही. ड्राकुला मात्र विसरणो शक्य नाही. ब्रॅम स्टोकरने इतरही अनेक कथा-कादंब:या लिहिल्या पण आज ब्रॅम स्टोकर म्हटले की ‘ड्राकुला - द प्रिन्स ऑफ डार्कनेस’च आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो.
ब्रिटिश ग्रंथालयामुळे रहस्य, गूढ आणि भीतीकथांचे एक अद्भुत दालन माङयापुढे उघडे झाले हे खरे; पण ब्रिटिश ग्रंथालयानेच मला वेगळ्या वाटेने जाणा:या इतरही साहित्याचे दर्शन घडविले.
 
(लेखक प्रसिद्ध विज्ञानलेखक आहेत.)