शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई!

By admin | Updated: June 17, 2016 17:57 IST

लहानपणी मी मुंबईला गेलो की उंच इमारती, रस्त्यावरून फिरणारी सुंदर कपड्यातली माणसे पाहून घ्यायचो, जुनी ब्रिटिशकालीन रस्त्यांची नावे वाचायचो. हे शहर माझ्याशी बोलायचे. तिथे स्मगलर होते, सिनेमातले नट होते, पोलीस तर आमच्या घरातच होते. हे शहर मला त्याकाळी खूप ऊर्जा द्यायचे आणि मोठी स्वप्ने रंगवायला मदत करायचे..

 सचिन कुंडलकरमी मुंबई शहरामध्ये राहायला आलो तेव्हा ह्या नव्या शहरातील प्रत्येक नवी गोष्ट नि जागा अनुभवायला आणि प्यायला आसुसलेला होतो. लोकल ट्रेनच्या डब्यातून प्रवास करताना मी हिरीरीने खिडकीची जागा पटकावून बाहेरची दृश्ये पाहत बसायचो. टॅक्सी किंवा कुणाच्या कारमधून प्रवास केलाच कधी तर शेजारी कोण काय बोलतंय ह्याकडे माझे लक्ष नसायचे, इतका मी ह्या नव्या शहराच्या प्रेमात होतो. लहानपणी मी पुण्याहून येणार असे ठरले की माझी काकू तिची फियाट गाडी काढून मला व्हीटी स्टेशनवर न्यायला येत असे. ती स्वत: उत्तम ड्रायव्हर होती. मला काकूचे ते रूप फार म्हणजे फार आवडते आणि काही केल्या व्हीटी स्टेशन पाहिले की मला सर्वप्रथम तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती. फक्त मोठ्या काकांकडे होती. पण काकू कधीही गाडीला ‘आमची गाडी’ म्हणत नसे. ती ‘आपली गाडी’ असे म्हणायची. त्यामुळे मला काही काळ आपल्याकडेही गाडी आहे असे ह्या शहरात वाटायचे आणि खूप मस्त गुदगुल्या व्हायच्या. काकू तिच्या नीट नेसलेल्या सुंदर पाचवारी साडीचा पदर डोक्यावरून ओढून घ्यायची आणि व्हीटी स्टेशनबाहेर सुसाट गाडी हाणायची. मी एखाद्या सुपरवूमनकडे पाहावे तसे तिच्याकडे पाहून घ्यायचो आणि कुलाब्यातील आमच्या घराच्या वाटेवर दिसणारे ब्रिटिशकालीन जुन्या आर्किटेक्चरमध्ये घडलेले हे अद्भुत, भव्य आणि ताकदवान शहर पाहत बसायचो. माझे काका तेव्हा आधी कुलाबा पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर आणि मग दक्षिण मुंबईचे सहायक पोलीस कमिशनर होते. त्यामुळे रस्त्यावरचे सगळे ट्रॅफिक पोलीस काकूची गाडी ओळखून रिगल सिनेमाजवळील आणि त्यापुढील सिग्नलला सॅल्यूट मारायचे आणि मला काकू अजूनच सुपरवूमन वाटायची.मी उंच इमारती पाहून घ्यायचो, रस्त्यावरून फिरणारी सुंदर कपड्यातली माणसे पाहून घ्यायचो, जुनी ब्रिटिशकालीन रस्त्यांची नावे वाचायचो. माझ्या शहरातला छोटा गोड आटोपशीरपणा जाऊन इथे मला एखाद्या ताकदवान धबधब्यासमोर आपण उभे आहोत असे वाटायचे. हे शहर माझ्याशी बोलायचे. मला ह्या शहराची कधीही भीती वाटली नाही. लंडन शहराविषयी मी थोडेफार वाचले होते. त्याची प्रतिकृती असल्यासारखे होते तेव्हा हे शहर. माझ्या अनुभवातील मुंबई तेव्हा मरीन लाइन्सच्या पलीकडे जायची नाही. पुढच्या उपनगरांची नावेसुद्धा मला माहीत नव्हती. ‘गिरगाव नंतर मुंबई संपते’ असे मला वाटायचे. ह्याचे कारण काकूची मुंबई हीच माझी मुंबई होती. ती नेईल तितकी. काकू वाहतुकीचे नियम नीट पाळायची आणि गाडी वळण्याआधी हात बाहेर काढून गोल फिरवायची तेव्हा तर मला आश्चर्याने भोवळ यायची बाकी असायची. कसं काय बुवा जमतं हिला असं वाटायचं. हे शहर मला त्याकाळी खूप ऊर्जा द्यायचे आणि मोठी स्वप्ने रंगवायला मदत करायचे. मला इथले विविध प्रकारचे अनेक मजेशीर आडनावाचे आणि खूप भाषा बोलणारे लोक आवडायचे. आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही ह्याचा एक त्वेष मनात हे शहर उत्पन्न करायचे. मला हे माहीत होते की एक दिवस मी इथे कायमचा राहायला येणार आहे. कुठे राहणार आहे, काय करणार आहे हे कळत नव्हते. पण मला इथल्या बहुभाषिक वातावरणाचे जितके आकर्षण तयार झाले होते, तितके अजून कुठल्याही गोष्टीचे झाले नव्हते. मला भाषा मोहात पाडतात ह्याचा मला लहानपणापासून अनुभव आहे. एखादा माणूस परकी भाषा सहजपणे बोलला की त्या व्यक्तीविषयी एक सेक्स अपील तयार होते. त्याचा शारीरिकतेशी संबंध नसतो.हे माझे म्हणणे त्यांनाच कळेल ज्यांना सेक्स अपील ह्या शब्दाचा अनुभव आणि अर्थ जगून माहीत आहे. परक्या भाषेकडे माझे मन आसुसून धाव घेत असे हा माझा लहानपणापासूनचा अनुभव आहे. कारण परक्या भाषेत दोन माणसे बोलतात आणि आपल्याला ते कळत नाही तेव्हा खूप मोठी गुपिते आपल्या अंगावरून वाहून जात असतात. आणि मला गुपिते निर्माण करायला खूप आवडतात. आपण गुपिते निर्माण करायची आणि इतर लोकांपुढे ओल्या चाऱ्यासारखी फेकून आपण मजा पाहत बसायचे हे करायला मला इतके आवडते की काय सांगू ! माझ्या गोड, साध्या एकपदरी ऐतिहासिक शहरातली गुपिते संपत चालली होती. हे नवे शहर इतक्या नवनव्या भाषा बोलणाऱ्या माणसांनी भरलेले होते की इथे गुपितांना तोटा नसणार हे मला कळून चुकले होते. खऱ्या अर्थाने त्यावेळी मला मुंबई शहर सेक्सी वाटत होते. तिथे स्मगलर होते. सिनेमातले नट होते. पोलीस तर आमच्या घरातच होते. त्यामुळे लहान वयातच सुरू होणारा आणि प्रत्येकाच्या मनात दीर्घकाळ चालणारा चोर-पोलिसाचा खेळ मला ह्या शहरात बसून खेळायला फार आवडायचे. माझा स्वभावच बैठा. मला खायला-प्यायला घालून, हातात एक पुस्तक देऊन एका ठिकाणी बसवले की मी विचार करत, गोष्टी रचत, कुणाला त्रास न देता पुन्हा भूक लागेपर्यंत तासन्तास बसून असायचो. अशी बैठ्या स्वभावाची माणसे चोर-पोलीस फार चांगले खेळतात. लपाछपीसुद्धा. मुंबई शहरात मी सैरावैरा धावत आरडओरडा करत असे खेळ खेळत बसायचो. मग संध्याकाळ व्हायची आणि काकू गाडीतून चक्कर मारायला जाऊया असे म्हणून आम्हाला घराबाहेर काढायची. मला लहानपणापासून, म्हणजे माझा धाकटा भाऊ जन्माला आला तेव्हापासून, मी सावत्र मुलगा आहे असे वाटायचे. तेव्हा दुपारच्या टीव्ही मालिका अस्तित्वात नव्हत्या तरीही असे विनोदी आणि नाट्यमय विचार माझ्या मनात सतत यायचे. मला वाटायचे की आता आपल्या आईवडिलांना आपली गरज नाही तर आपण घरातून पळून जाऊ. मी तासन्तास घरातून पळून मुंबईला येऊन इथे मोठा स्मगलर किंवा काकांपेक्षा मोठा पोलीस बनायचा विचार करत बसायचो. अमिताभचे सिनेमे फार लहान वयात प्रमाणाबाहेर पाहिल्याचा तो परिणाम असावा. पण मला मुंबई माझी वाटू लागली होती. पुणे शहर हे गोड गोड बालोद्यान होते आणि खरे आयुष्य इथे होते. आज हे सगळे आठवण्यामागचे कारण हे की गेला एक तास मी गाडीत बसून पुस्तक वाचत होतो आणि एकदाही मी ढुंकूनही बाहेर ह्या शहराकडे पाहिले नाही. मला रोजचे तेच ते रस्ते पाहावेसे वाटत नाहीत. मी स्मगलरांच्या आणि पोलिसांच्या ब्रिटिश मुंबईपासून खूप लांब एका उपनगरात राहतो. मी मुंबईत राहतो असे मी म्हणत असलो तरी मुंबईतल्या लोकांना ती मुंबई वाटत नाही. मला पिंपरी-चिंचवड, तळेगावविषयी जे वाटते तसे मूळ मुंबईकरांना माझ्या उपनगराविषयी वाटत असावे. मी मध्येच मुंबईत आहे हे विसरूनच जातो. राबत बसतो. मागे रणजितने, माझ्या निर्मात्याने गौतम राजाध्यक्षांना आमच्या सिनेमासाठी अंधेरीत यायला फोन केला. ते गिरगावात राहायचे. ते मोठा उसासा टाकून म्हणाले, ‘अहो, तिथे अंधेरीत कुठे येऊ हो? इथे मुंबईत शो असेल तेव्हा सांगा’. म्हणजे मी मुंबईत राहतच नाही तर ! इतके काम करतो मी आणि सतत धावत असतो तेव्हा मधेच असे वाटते की हेच करायला तू ह्या शहरात आलास का? - मला अचानक भान येते.. आपला चोर-पोलिसाचा खेळ चालू आहे की नाही? तो चालू राहायला हवा. बाकीचे सगळे होत राहील. खूप दिवस चोरपोलीस खेळले नाही तर मग मुंबईत कशाला राहायचे? साबरमती आश्रमात नसतो गेलो? मी स्वत:ला बजावतो. आपल्याला मूळ काम काय करायचे होते? तर मनातला चोरपोलिसाचा खेळ जिवंत ठेवायचा होता. म्हणून तर आपण आपले गाव सोडले. बस आता निवांत आणि सुरू कर तो खेळ. एक- दोन- तीन..ह्या शहरात चोर, पोलीस, स्मगलर, घर सोडलेला लहान मुलगा, त्याला ट्रेनमध्ये भेटणारी वेश्या, व्हीटी स्टेशनवर उतरल्यावर त्याचे कुणी कुणी नसणे, नळावरचे पाणी पिऊन राहणे, हमाली करणे, बूट पॉलिश शिकणे, मग एक दिवस फियाट गाडीतून एक सुंदर देखणी बाई गाडीतून उतरून येते आणि त्या मुलाला इंग्रजीत विचारते, ‘तुम मेरे लिये काम करोगे?’ - हो, मला आत्ता इंग्रजी येत नाही म्हणून हे हिंदीत आहे. पण ती इंग्रजीतच विचारणार आहे, ‘मेरे लिये काम करोगे?’ मग तो मुलगा म्हणतो, ‘क्यू नही मॅडम? हम तो आयाइच है याहा काम करके नाम कमाने.’ मग आपल्या पाचवारी साडीचा पदर डोक्यावरून गच्च ओढून घेऊन ती बाई कुलाब्याच्या दिशेने सुसाट गाडी सोडते. रस्त्यावरचे पोलीस तिला सॅल्यूट करतात तेव्हा तो मुलगा म्हणतो, ‘एक दिन ये सारे पोलीस्लोग हमकोभी सॅल्यूट मारेंगे...’