शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

शहाणपणाच्या खजिन्याची पेटी (‘मन्क इन अ मर्स’- डॉ. अशोक पनगढ़िया यांचे वाचनीय पुस्तक)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 06:00 IST

सुख, मन:शांती मिळेल का? आपला मेंदू कसा काम करतो? अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी मेंदूला प्रशिक्षण देता येईल का? हे माहीत करून घ्यायचे आहे? मग वाचायलाच हवे..

ठळक मुद्देजीवनाशी निगडित प्रश्न हाताळताना भारतीय तत्त्वज्ञान, आधुनिक विज्ञान आणि व्यक्तिगत जीवनातील अनुभव यांचे बेमालूम मिश्रण डॉ. पनगरियांनी वाचकांसमोर ठेवले आहे.

- मेहा शर्मा (लोकमत टाइम्स)

‘मन्क इन अ मर्स’ हे मेंदूविकारतज्ज्ञ पद्मश्री डॉ. अशोक पनगढ़ियांचे पुस्तक अलीकडेच त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाले. डॉ. पनगढ़िया यांनी या पुस्तकात खऱ्याखुऱ्या शहाणपणाचा आणि मधुर स्मृतींचा खजिनाच खुला केला आहे. जीवनाशी निगडित प्रश्न हाताळताना भारतीय तत्त्वज्ञान, आधुनिक विज्ञान आणि व्यक्तिगत जीवनातील अनुभव यांचे बेमालूम मिश्रण डॉ. पनगढ़ियांनी वाचकांसमोर ठेवले आहे. मेंदूचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक कोणीही हस्तगत करू शकेल, अशी साधनेही त्यांनी पुरवली आहेत. डॉ. पनगढ़िया मानवी मनात खोल डोकावतात. माणसाचा मेंदू असाधारण का? आपल्या जीवनावर प्रभुत्व गाजवण्याची आंतरिक शक्ती त्याच्यात कशी आहे हे दाखवतात. जीवनाला आकार देण्यात नशीब, संधी यांचे महत्त्व काय हे उलगडताना त्यांनी याचाच आविष्कार घडवला आहे. आपली ऐहिक उद्दिष्टे साध्य झाल्याशिवाय सुख, मन:शांती मिळेल का? आपण जसे वागतो, कृती करतो ती तशी का करतो हे तो समजून घेईल का? रोज आपण जे अनेक निर्णय घेतो त्यामागे आपला मेंदू कसा काम करतो? केवळ आपल्यासाठी नव्हे तर समाजासाठी अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी मेंदूला प्रशिक्षण देता येईल का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात आहेत.

व्यावसायिक यश, ऐहिक संपत्ती यासह जीवनाचा आनंद घेऊनही एखाद्याला अंतिम सुख, शांती मिळेल का? यावर पुस्तक मार्मिक प्रकाश टाकते. आध्यात्मिक सुखाच्या शोधासाठी ऐहिक गोष्टींचा त्याग करावा लागतो, साधू बैरागी व्हावे लागते या जुन्या समजुतींचा लेखकाने समाचार घेतला आहे.

डॉ. अशोक हे अरविंद पनगढ़िया यांचे मोठे बंधू. डॉ. अशोक यांचे प्रदीर्घ आजारातच कोरोना होऊन निधन झाले. आपल्या व्यावसायिक कार्यकाळात त्यांनी असंख्य रुग्णांवर उपचार केले. त्यांचा मुलगा अरिहंत लंडनस्थित शेअर गुंतवणूकदार आहे. त्यांच्या उदारमनस्कतेचा परिचय गेली काही वर्षे ते लिहीत असलेल्या या पुस्तकातून होतो. लेखन पूर्ण होऊन पुस्तक प्रकाशनाला गेले असताना त्यांचे निधन झाले.

‘मन्क इन अ मर्स’ :

पद्मश्री डॉ. अशोक पनगढ़िया

प्रकाशक : ब्लूम्सबरी इंडिया