शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

आमदार महोदय, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे..! अधिवेशनात पायरी सोडणाऱ्या आमदारांना खुलं पत्र

By अतुल कुलकर्णी | Updated: August 28, 2022 06:14 IST

Maharashtra Politics: राज्याचे पावसाळी अधिवेशन ‘न भूतो न भविष्यती’ झाले. यावेळी ज्या पद्धतीने काही सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धमाल केली, त्याला तोड नाही. ‘पायरी सोडणे’ हे विशेषण खूप दिवसांनी आपल्यामुळे वापरायला मिळाले... काय ती मारामारी.... काय ते अंगावर धावून जाणं... काय त्या घोषणा... एकदम ओक्के...!

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई सन्माननीय आमदार महोदय, नमस्कार. राज्याचे पावसाळी अधिवेशन ‘न भूतो न भविष्यती’ झाले. यावेळी ज्या पद्धतीने काही सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धमाल केली, त्याला तोड नाही. ‘पायरी सोडणे’ हे विशेषण खूप दिवसांनी आपल्यामुळे वापरायला मिळाले... काय ती मारामारी.... काय ते अंगावर धावून जाणं... काय त्या घोषणा... एकदम ओक्के...! या अधिवेशनाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली. सगळे जण मराठीसाठी भांडत असताना, आपण जे मोलाचे योगदान दिले, त्यासाठी कविवर्य कुसुमाग्रज स्वर्गात आनंदाने मोहरून गेले असतील..! पन्नास खोके - एकदम ओक्के, पन्नास खोके - चिडलेत बोके, गद्दारांना ताटवाटी - चलो चले गुवाहाटी..., गाजर देणं बंद करा - ओला दुष्काळ जाहीर करा..., खड्ड्यांचे खोके - मातोश्री ओके..., लवासाचे खोके - बारामती ओके... एक से बढकर एक यमक जुळवून केलेल्या ओळी मराठी साहित्यात पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील, यात शंका नाही.छोटे-मोठे सगळे नेते अधिवेशन काळात पूर्ण वेळ मराठी साहित्य समृद्ध करण्याच्या मागे लागले होते. (हात धुऊन मागे लागले होते, हे वाक्य वापरायचे की नाही, तेही तुम्हीच सांगा) कोणी म्हणाले, सुरतेवर स्वारी झाली - राज्याची बदनामी झाली... तर काहींनी, ‘थांबवा आता शब्दांचे वार - आमचे मित्र अजित पवार...’, अशी नवी घोषणाही जन्माला घातली. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याचा परिणाम तत्काळ दिसला. मुख्यमंत्र्यांनी देखील ‘देवेंद्र और हम है साथ साथ - मेरा नाम है एकनाथ...’, अशी चारोळी नाही, दुओळी ऐकवली.  पण महाराष्ट्राच्या लक्षात राहिली ती विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेली फ्री स्टाईल..! कोण घोषणा देत होतं... कोण कोणाच्या अंगावर धावून गेलं... कोणाच्या गळ्यात गाजराच्या माळा होत्या... हे सगळं पुढचे काही महिने तरी चर्चेत राहील. परवा दारावर भाजीची गाडी आली. गाजरं घ्यायला गेलो तर गाडीवाला म्हणाला, हातात देऊ की माळ करून देऊ...? इतका खोलवर परिणाम आजपर्यंत विधिमंडळातल्या कोणत्या गोष्टीचा झाला असेल... यावर संशोधन करावे, असे वाटत आहे..! कधी नव्हे ते अजितदादा, राजेश टोपे यांनी फिफ्टी - फिफ्टी बिस्किटांचे पुडे हातात धरून जाहिरात केली. तेव्हा त्यांचे माध्यम सल्लागार संजय खोडके यांनी बिस्किटांच्या कंपनीकडे जाहिरातीचे बिल पाठवून दिल्याची चर्चा रंगली...! ही माहिती टोपेंना कळाली तसे त्यांनी मलाही त्यातले पन्नास पुडे पाठवा, अशी गळ खोडकेंना घातल्याची वदंता आहे..!सगळेच आमदार असे नव्हते. काही आमदार सभागृहात बसत होते. कामकाजात भाग घेत होते. प्रश्न विचारत होते.अभ्यासू मंत्री, आपल्या विभागाने किती डास मारले..? त्यांचे शवविच्छेदन कसे केले..? हे खुलासेवार सांगत होते. तर काही अभ्यासू सदस्य, मारले गेलेल्या डासांपैकी किती नर व किती मादी प्रजातीचे होते..? त्यांच्या शवविच्छेदनातून कोण जास्त आक्रमक असल्याचे सिद्ध झाले..? असे प्रश्न विचारून विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण करत होते..! काही म्हणा, दोन आठवडे छान गेले. अधिवेशन संपून आपण आपापल्या मतदारसंघात गेलात... पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला... भविष्यातही आपल्याकडून मराठी साहित्यात आणि विज्ञानात अशीच भर पडावी, ही अपेक्षा..!             -  तुमचाच, बाबूराव

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVidhan Bhavanविधान भवनPoliticsराजकारण