शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त श्वासाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 06:05 IST

जी गोष्ट सांगायची ती सांगणारे सांगत आहेत, जी गोष्ट पहावीशी वाटली ती पाहणारे पाहू लागले आहेत.

ठळक मुद्देवेबसिरिज हे मनोरंजनाचं वेगानं विस्तारत जाणारं माध्यम आहे. पाहणाऱ्या प्रत्येकासाठी या माध्यमात काहीतरी आहे.

- मिथिला पालकर

वेबसिरिज हे माझं पहिलं घर !वेबसिरिज हे मनोरंजनाचं वेगानं विस्तारत जाणारं माध्यम आहे. यात तर काही शंकाच नाही. माझ्या कामाची सुरुवातच वेबसिरिजमधून झाली, म्हणून माझ्यासाठी ते पहिलं माध्यम आहे, आपलं पहिलंवहिलं घर असतं तसं ! पाहणाऱ्या प्रत्येकासाठी या माध्यमात काहीतरी आहे. प्रत्येक जॉनरचं, प्रत्येक घाटाचं, वेगवेगळ्या पोताचं त्या माध्यमात काही ना काही आहे. ज्याला छोटंंंसं काही पहायचं नाही, सलग काही पहायचं नाही त्याच्यासाठी सिनेमेही आहेत.या माध्यमात काम करणाऱ्या प्रत्येकाला हे माध्यम एक खास गोष्ट देतं - स्वातंत्र्य !कला तशीही स्वतंत्र असते, मुक्तपणे व्यक्त होण्याचंच माध्यम असते. आता तंत्रज्ञानानं, इंटरनेटनं त्याला नवीन आयाम दिला आहे. या माध्यमांत तर कलेला काळवेळेचंही बंधन नाही. त्यापासूनही हे मुक्त आहे. आणि हे मुक्त स्वातंत्र्यही दुहेरी आहे. हे माध्यम कलाकाराला जसं मुक्त स्वातंत्र्य देतं, तसं निर्मात्यांनाही देतं. तसंच ते प्रेक्षकांनाही देतं. किती मिनिटांचे, तासांचे कार्यक्रम करायचे याचं काही बंधन कलाकारांवर, निर्मात्यांवर नाही. त्याचे किती भाग करायचे, कसे करायचे, भाषा कोणती, म्हणजे अभिव्यक्तीची रीत कोणती असे प्रश्न हे माध्यम विचारत नाही.प्रेक्षकांचंही तेच. आपल्याला आवडेल ते कधी पहायचं, अमुकच वेळी पहायचं, तमुकच वेळी रीटेलिकास्ट असेल, ठरल्याजागेवर बसूनच पहायचं असंही काही प्रेक्षकांवर बंधन नाही.जी गोष्ट सांगायची ती सांगणारे सांगत आहेत, जी गोष्ट पहावीशी वाटली ती पाहणारे पाहू लागले आहेत.भारतीय संदर्भात म्हणायचं तर या नव्या माध्यमांनी कलाकार आणि कला निर्मात्यांना ‘धाडस’ करण्याचंही बळ दिलं. एक चर्चा अशीही असते की, इथल्या मुक्त स्वातंत्र्याचा गैरवापर होईल. लोक काय वाट्टेल ते करतील, पण ज्यांना स्वातंत्र्याची किंमत कळते, ते ‘काहीही’ करतील इतके ‘बावळट’ नसतात. नाहीत. स्वातंत्र्यासह जबाबदारी येते, त्या जबाबदारीसह व्यक्त होणं, सकस अभिव्यक्ती असणं आणि ते लोकांना आवडणं हे सारं कलाकारांनाही ‘जबाबदार’ बनवेल असं मला वाटतं !बदलत राहणं, हा या माध्यमाचा स्वभावच आहे.. ते सुरू राहील !(लेखिका वेब माध्यमात आपला ठसा उमटवणारीख्यातनाम अभिनेत्री आहे.)

manthan@lokmat.com