शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

ठहरिए, होश में आऊ तो चले जाईएगा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:05 IST

खय्याम यांनी तीन दशकांहून अधिक काळ  हिंदी चित्नपटसृष्टीवर आपली  अमीट छाप उमटवली.  आकाशवाणी इंदूरच्या स्टुडिओत खय्याम,  त्यांच्या गायिका पत्नी जगजीत कौर  आणि मुलगा प्रदीप यांच्याशी  अनौपचारिक बातचीत करण्याची संधी मला मिळाली.  त्यांच्याशी मनसोक्त गप्पा झाल्या.  त्या स्मृती अजूनही ताज्या आहेत.

ठळक मुद्देखय्याम यांनी आपल्या सुमारे पाच दशकीय सांगीतिक कारकिर्दीत साठ सत्तर चित्नपटच केले असावेत. याचे मुख्य कारण म्हणजे ते मनस्वी संगीतकार होते. स्वत:ला पटलेले चित्नपटच त्यांनी स्वीकारले. फारशी तडजोड केली नाही.

- नितीन सप्रे

तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्नपटसृष्टीत संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्नात मोहंमद झहूर खय्याम हाश्मी म्हणजेच खय्याम यांनी आपली अमीट छाप उमटवली. लहानपणापासूनच खय्याम यांना शिक्षणात विशेष रु ची नव्हती मात्न त्यांचा संगीताकडे ओढा होता. दिल्लीत काकांकडे पळून आलेल्या खय्याम यांना काकांनी शाळेत दाखल तर केलं, मात्न चित्नपटसृष्टीचं त्यांना असलेलं आकर्षण पाहता काकांनी त्यांना संगीत शिकण्याची मुभा दिली.पंडित अमरनाथ हे खय्याम यांचे गुरु. अभिनयाच्या संधीच्या शोधार्थ ते लाहोरला गेले. तिथे त्यांनी पंजाबी संगीत दिग्दर्शक बाबा चिस्ती यांच्याकडे संगीत साधना सुरू केली. एके दिवशी चिस्ती यांनी संगीत दिलेल्या रचनेचा मुखडा खय्याम यांनी गायला तेव्हा चिस्ती यांनी खूश होऊन त्यांना सहायक म्हणून स्वीकारलं. त्यांनी सहा महिने ते काम केलं. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी खय्याम काही काळ लष्करातही दाखल झाले होते.खय्याम यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीत सुमन कल्याणपूर, सुलक्षणा पंडित, येसुदास आदी गायकांकडून गीतं गाऊन घेतली. चित्नपट निर्मात्यांचा दबावही त्यांनी कधी फारसा सहन केला नाही. आशा भोसले मात्न त्यांच्यासाठी विशेष गायिका होत्या. आशाजींनी त्यांच्या पहिल्या चित्नपटासाठी (1953) पार्श्वगायन केले, त्यानंतर थेट 2012 पर्यंत त्या खय्याम यांच्याकडे गायन करत होत्या. आशा भोसले आणि मुकेश यांनी गायलेली वो सुबह कभी तो आयेगी, चीन-ओ-अरब आणि आसमा पे है खुदा ही चित्नपट गीतं आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.  शोला और शबनम या चित्नपटाच्या संगीत दिग्दर्शनामुळे संगीत दिग्दर्शक म्हणून चित्नपटसृष्टीत त्यांचं स्थान पक्कं झालं. अनेक लोकप्रिय गीतं त्यांनी दिली, मात्न चांदनी रात है (दिल-ए-नादान), बहारो मेरा जीवन भी सवारो (आखरी खत), आखों में हमने (थोडीसी बेवफाई), मोहब्बत बडे काम (त्रिशूल), ठहरिए होश में आ लुं (मोहब्बत), वो सुबह कभी तो (फिर सुबह होगी), दिल चीज क्या है (उमराव जान), कभी कभी मेरे दिल मे (कभी कभी) या काही गाण्यांमुळे आपण अजरामर झालो आहोत, अशी खय्याम यांची भावना आहे आणि ती रास्तही आहे. लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि आर. डी. बर्मन यांना राजेश खन्ना यांची प्रथम पसंती असे. मात्न मजनू चित्नपटाच्या वेळी खय्याम यांच्या बरोबर काम केल्यानंतर राजेश खन्ना यांनी थोडीसी बेवफाई, दिल-ए-नादान, दर्द या यशस्वी आणि संगीतासाठी नावाजलेल्या चित्नपटांसाठी खय्याम यांना घेण्याबाबत दिग्दर्शक, निर्मात्यांना खय्याम यांचे नाव सुचवले होते. तलत मेहेमूद, आशाताई आणि किशोर कुमार यांना खय्याम यांची विशेष पसंती होती. अर्थात मोहम्मद रफी, लतादीदी आणि मुकेश यांनीही खय्याम यांच्या संगीत दिग्दर्शनात गीतं गायली आहेत. राजेश खन्ना व राखी ही खय्याम यांची आवडती जोडी होती.त्यांनी दाग, मिर्झा गालिब, वली साहेब, अली सरदार जाफरी, साहिर लुधियानवी, मजरूह सुल्तानपुरी, निदा फाजली, नक्स लायलपुरी, अहमद वसी, जान निसार अख्तर अशा समकालीन तसंच पूर्वसुरी दिग्गज कवी/ गीतकारांबरोबर काम केलं. गीतकारांच्या निवडीसंदर्भात ते फार चोखंदळ होते. म्हणूनच त्यांच्या संगीत रचनांमध्ये गायक आणि संगीताच्या बरोबरीने कवितेला/गीताला स्थान मिळालेल दिसतं. ते कवी/गीतकाराला पूर्ण स्वातंत्र्य देत. म्हणूनच त्यांच्या रचना अधिक काव्यात्मक, अर्थवाही, गेय आणि प्रासादिक वाटतात.खय्याम यांनी आपल्या सुमारे पाच दशकीय सांगीतिक कारकिर्दीत साठ सत्तर चित्नपटच केले असावेत. याचे मुख्य कारण म्हणजे ते मनस्वी संगीतकार होते. स्वत:ला पटलेले चित्नपटच त्यांनी स्वीकारले. फारशी तडजोड केली नाही. खरं पाहता बॉलिवूडच्या झगमगीत दुनियेत असा बाणेदारपणा काही वेळा घातकच ठरण्याची शक्यता जास्त, पण खय्याम साहेबांनी तो बखुबी निभावला. कारण पैश्यांची अडचण असली तरी त्यांनी आला तो चित्नपट स्वीकारला असं कधीच केलं नाही.  म्हणूनच संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी जे काही चित्नपट केले त्यात त्यांनी दिलेल्या संगीताचा दर्जा लाजवाब राहिला. त्यांचे निकटवर्तीय असं सांगतात की खय्याम स्वत: सर्वधर्म समभाव पाळत असत. त्यांच्या घरी जशी ईद साजरी होत असे, तसाच दिवाळीचा सणही साजरा केला जात असे. त्यांचा हा गुणविशेष त्यांच्या संगीत रचनांमध्येही आढळून येतो.खय्याम यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी कभी कभी (1977), उमराव जान (1982) तसंच जीवन गौरव पुरस्कार (2010) त्यांना प्रदान करण्यात आले. उमराव जानसाठी उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय चित्नपट पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. सृजनात्मक (क्रिएटिव्ह) आणि प्रायोगिक (एक्स्पेरिमेंटल) संगीतासाठी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. 1988-89 मध्ये त्यांना मध्य प्रदेश सरकारचा प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कार बहाल करण्यात आला. या पुरस्कार समारंभासाठी खय्याम कुटुंबीय इंदूरला आले होते. मीही त्यावेळी आकाशवाणीच्या सेवेत होतो आणि योगायोगाने त्याच वेळी कार्यालयीन कामासाठी इंदूर दौर्‍यावर होतो. त्यामुळे मला आकाशवाणी इंदूरच्या स्टुडिओत खय्याम, त्यांच्या गायिका असलेल्या पत्नी जगजीत कौर आणि मुलगा प्रदीप यांच्याशी समोरासमोर बसून अनौपचारिक बातचीत करण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी अनेक बाबींवर मनसोक्त गप्पा झाल्या. त्यांच्या मुलाचा एक चित्नपट त्या सुमारास येऊ घातला होता. त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी त्या बैठकीत सादर केलेल्या  तुम अपना रंज-ओ-गम या गीताने त्या गप्पांच्या मैफलीची पर्वणी साधली गेली.nitinnsapre@gmail.com(लेखक भारतीय सूचना सेवेचे अधिकारी असून ‘प्रेस इन्फर्मेशन ब्युरो’ (पीआयबी), मुंबई येथे उपसंचालक पदावर कार्यरत आहेत.)