शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

मैहर

By admin | Updated: February 27, 2016 14:19 IST

एका कलावंत मित्रला भेटायचं म्हणून मी काही वर्षापूर्वी मैहरला गेलो होतो. मैहर मध्य प्रदेशात. नवी खूण सांगायची तर पन्ना अभयारण्याच्या अगदी जवळ. राजामहाराजांच्या काळात कलाकर्तृत्वाचं नितांत सुंदर रूप असलेल्या मैहरचा वैभवी इतिहास ऐकून होतो

- सुधारक ओलवे
 
एका कलावंत मित्रला भेटायचं म्हणून मी काही वर्षापूर्वी मैहरला गेलो होतो. 
मैहर मध्य प्रदेशात. नवी खूण सांगायची तर पन्ना अभयारण्याच्या अगदी जवळ. राजामहाराजांच्या काळात कलाकर्तृत्वाचं नितांत सुंदर रूप  असलेल्या मैहरचा वैभवी इतिहास ऐकून होतो. प्रत्यक्षात मात्र धुराचे लोट उठणा:या गल्ल्यांनी,  राजवाडय़ाच्या भग्न अवशेषांनीच माझं स्वागत केलं. तो फुफाटा खाली बसला की मात्र वैभवी मैहरच्या एकेकाळच्या खुणा आपल्याला मोहात पाडू लागतात. ते भग्न अवशेष पाहूनही तेव्हाच्या राजेशाही जगण्याची कल्पना येते. मैहरच्या महाराजांच्या वंशजांनी माझं  राजेशाही परंपरेनं राजमहालात स्वागत केलं. मात्र राजेशाही वारसा सांगणा:या त्या वास्तूच्या भिंतीचे पोपडे पडत होते. गालिचे आणि रजयांना धस लागलेली होती.  सोफ्यांवर धुळीचे थर बसले होते आणि या सा:यात शतकभरापूर्वीच्या वैभवी खुणांचे साक्षीदार म्हणून काही फोटोफ्रेम पोपडेपडू भिंतीला लटकलेल्या होत्या. 
एकेकाळी या संपन्न राजघराण्याने संगीताला राजाश्रय दिला आणि मैहर हे गायन-वादन-संगीत कलावंतांसाठी अत्यंत महत्त्वाचं केंद्र बनलं. महान भारतीय संगीतकार बाबा अलाउद्दीन खान यांचं मैहर हे गाव. मैहरच्या राजांचे ते दरबारी गायक होते. प्रसिद्ध मैहर घराणं, त्या घराण्याच्या गायकीचा अंदाज आणि त्याचा बाज बाबा अल्लाउद्दीन खान यांनी बांधला. त्यांच्या गायनातील शिस्तीच्या, कलेप्रती समर्पणाच्या अनेक सुरस कहाण्या आजही प्रसिद्ध आहेत.  भारतरत्न पं. रविशंकर हे त्यांचेच शिष्य.  बाबांच्या उशाशी बसून त्यांनी संगीताचा रियाज केला आहे. पं. रविशंकर हे बाबांचे पुढे जावईही झाले.
इतिहासाचं आणि लोकसाहित्याचं असं बोट धरून मी मैहरमध्ये फिरत होतो. त्रिकुट पर्वतावरचं मॉँ शारदेचं मंदिर ही मैहरची आणखी एक ओळख. एक आख्यायिका अशी की, शिवजी सतीचा गतप्राण देह घेऊन प्रवास करत असताना तिच्या गळ्यातला हार इथे पडला. सती म्हणजे मॉँ, माई, आणि तिच्या गळ्यातला हार इथं पडला म्हणून ही जागा माई-हार-मैहर! खरंतर मध्यप्रदेशच्या इतिहासातल्या हारातलंच मैहर नावाचं हे एक मौल्यवान, अनोखं रत्न आहे.
काळाच्या वेगवान रेटय़ात ते रत्न विस्मृतीत गेलं आहे, त्याच्यावर धुळीचे थर बसले आहेत.
आता फक्त मैहरच्या फुफाटय़ाच्या गल्ल्यांमधून मैहर घराण्याचं वादन ऐकू येतं, काही संगीतवेडी माणसं त्या जुन्या चिजा वाजवत राहतात.
एकेकाळी राजामहाराजांच्या श्रीमंती सान्निध्यात बहरलेलं हे घराणं, आज निव्वळ काही चिजांची याद देत मैहरमध्ये भेटतं..
 
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल 
पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार 
‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)