शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवतींना हक्काचे ‘माहेर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 06:05 IST

जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच तालुके आदिवासीबहुल आहेत. तेथे कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अभिनव ‘माहेर’ ही योजना राबवली.

ठळक मुद्देगरोदर महिलांना घरी गेल्यावर आईच्या ममतेने सांभाळले जाते आणि आहार दिला जातो त्यामुळे या योजनेला ‘माहेर’ असे नाव दिले.

सुनील दुसाने (उपमुख्य कार्यकारी आधिकारी, एकात्मिक बालविकास योजना) ठिकाण : नाशिक शहरी विभाग (पूर्वी जळगाव)

काय केले?1. जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच तालुके आदिवासीबहुल आहेत. तेथे कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अभिनव ‘माहेर’ ही योजना राबवली.2. गरोदर मातांना जर त्या गर्भवती असताना योग्य पोषण आहार मिळाला आणि गर्भातच तो बालकाला मिळाला तर जन्मणार्‍या बाळाचे वजन वाढू शकते, त्यामुळे त्यावर भर दिला.3. त्यासाठी गर्भवतींना प्रशिक्षण दिले. नियमित आहार; विशेषत: दुपारच्या वेळी महिलांनी दुपारी आहार घेतल्यानंतर दोन तास डाव्या कुशीवर झोपल्यास नाळेतून गर्भातील बाळाला थेट आहार मिळतो, याबद्दल त्यांच्यात जागृती निर्माण केली.4. योजना चांगल्या पद्धतीने राबविण्याचे ठरविल्यानंतर महिलांना घरात विर्शांती घेणे काहीसे अडचणीचे होते. त्यामुळे त्यांना अंगणवाडीतील काम संपल्यानंतर दोन तास ही वेळ निश्चित करण्यात आली.5. गरोदर महिलांना घरी गेल्यावर आईच्या ममतेने सांभाळले जाते आणि आहार दिला जातो त्यामुळे या योजनेला ‘माहेर’ असे नाव दिले.

काय घडले?1. या योजनेसाठी एक हजार गरोदर मातांची निवड करण्यात आली त्या त्या अंगणवाड्यांमध्ये त्यांची सोय करण्यात आली.2. महिलांना घरून आहाराचे डबे आणण्यास सांगण्यात आले. त्यामुळे महिलांना एक अतिरिक्त आहार मिळाला.3. ज्या महिलांची आहार आणण्याची स्थिती नव्हती त्यांना लोकवर्गणीतून आहार उपलब्ध करून देण्यात आला.4. कुटुंबातील सासूसासरे, ज्येष्ठ सदस्यांमुळे तसेच कामामुळे महिलांना दुपारी विर्शांती मिळत नव्हती ती मिळाली.5. या योजनेमुळे 58 टक्के मुलांचे वजन 3 किलो आणि त्यापेक्षा अधिक झाले.6. 30 ते 35 टक्के मुले अडीच ते तीन किलो वजनाची जन्मली7. याच योजनेच्या यशस्वीतेमुळे राज्य सरकारने योजनेला विस्तृत स्वरूप दिले आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना आणली

..तर जन्माआधीच कुपोषण आटोक्यात!महिलांचे, विशेषत: गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले असले, त्यांना वेळेवर मार्गदर्शन, पोषक आहार, विर्शांती मिळाली, तर जन्माला येणारे बालक सुदृढ असते. ग्रामीण आणि आदिवासी भागात नेमकी याच गोष्टीची कमतरता आहे. त्यामुळे अनेक बालके जन्मत:चा कुपोषित असतात. गर्भवती महिलांना हक्काचे ‘माहेर’ मिळाले आणि तिथे त्यांची घरच्यासारखी काळजी घेतली गेली तर कुपोषणाची समस्या बालकांच्या जन्माआधीच आटोक्यात येऊ शकेल. - सुनील दुसाने 

(मुलाखत आणि शब्दांकन : संजय पाठक, लोकमत, नाशिक)

टॅग्स :Poshan Parikramaपोषण परिक्रमा