शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

मकाम...

By admin | Updated: May 8, 2016 00:22 IST

संगीत कुठे भेटते नेमके आपल्याला? कोणत्या वाटेवर, वळणावर, मुक्कामावर?. मला वाटते, ते आपल्या जगण्यातून आपल्याला भेटत असते, भेटत राहते.

- त्रिलोक गुटरू
 
जगभरातील मान्यवर कलाकारांबरोबर मी वाजवतो, 
भले-भले सन्मान माङयार्पयत आले, 
विलक्षण निर्भय 
प्रयोगशील कलाकार.
- अशा शब्दांनी माझा परिचय होत असताना मला मात्र कायम आठवत असतात तुकाराम, शिवाजी महाराज आणि स्वरांच्या गाभ्यातील माधुर्याला थेट स्पर्श करणारे 
खळे काका.
मग कानाची पाळी पकडून मी पुन्हा रियाजाला लागतो, नव्या प्रयोगाचा विचार सुरू करतो. हे विचार, जगण्यातील भणंग भटकंती, 
तृप्ती-अतृप्ती हाच तर माझा रियाज.
 
संगीत कुठे भेटते नेमके आपल्याला? कोणत्या वाटेवर, वळणावर, मुक्कामावर?.
मला वाटते, ते आपल्या जगण्यातून आपल्याला भेटत असते, भेटत राहते. जगताना  ज्याच्या-त्याच्या वाटय़ाला येणारी मऊ माया, करकरीत एकाकीपण, भणंग भटकंती किंवा तृप्ती-अतृप्तीची ऊन-सावली यातून ते स्वर, ती लय तुमच्या जगण्यात कणाकणाने उतरत असते. जशी माङया आयुष्यात उतरत गेली. म्हणून तर घराच्या निवांत उबेत असताना मातब्बर कलाकारांसमोर मोठय़ा थाटात साथीला बसणारा हा छोटू घराच्या बाहेर पडला, आयुष्याचे अनिवार चटके सोसत रस्त्यावर कापड अंथरून तबला वाजवून पोट भरण्याची वाट बघू लागला तसा गाण्याकडे, त्यातून दिसणा:या जगाकडे अधिक प्रगल्भपणो बघू लागला. 
जगभरातील संगीताची एक भली मोठी रंगीबेरंगी चौकट संदर्भाला घेऊन जेव्हा मी स्वत:च्या कामगिरीकडे बघू लागलो तेव्हा जाणवले अजून खूप-खूप काही करणो शक्य आहे आपल्याला आणि ते करण्याचा प्रयत्न केला तरच या वादनाला शिळेपण येणार नाही. घराबाहेरच्या या जगाने, माङया देशाच्या सीमेपलीकडे असलेल्या नव्या संस्कृतीने मला संगीताचे अनेक नवे आयाम दाखवले. 
मी आमच्या बँडसह युरोपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा माङया खिशात केवळ खुर्दा होता आणि दिल्लीने दिली होती केवळ उपासमार. पण तरी मनात उमेद मात्र अव्वल दर्जाची होती. सोली दस्तूर नावाच्या एका भल्या माणसाने आमची चौघांची तिकिटे काढून दिल्यामुळे आमचा बँड मोठय़ा आशा घेऊन पॅरिसला रवाना झाला. कदाचित आणखी एक अवहेलना ङोलण्यासाठी, कारण मी अशा एका संकटाला कवटाळू बघत होतो ज्याचा पुरता चेहरा-मोहराही मी बघितला नव्हता. पण युरोपमध्ये तेव्हा जाझ-रॉकची चळवळ वेग पकडत होती. त्या वातावरणात आपला बँड आणि त्यातील प्रयोग मूळ धरू शकतील असे वाटत होते. त्याच भरवश्यावर तर मी निघालो होतो आणि तेही एकटाच नाही, तर स्वत:बरोबर आणखी तिघांचे ओङो घेऊन! युरोपमधील सांस्कृतिक जगाने आमच्या बँडला आणि त्यातील प्रयोगांना थंड नकार दिला. त्या नकाराकडे मागे वळून बघताना जाणवले ते एकच कारण- ज्या भारतीय संगीताचे संस्कार घेऊन आम्ही त्या भूमीत पाय ठेवला होता, त्या भारतीय संगीताबद्दल त्यावेळी गैरसमजाचे दाट धुके तेथील वातावरणात होते. 
भारतीय संगीतातील घराणी आणि त्यांचे कट्टर सोवळे-ओवळे, त्यांच्यामधील परस्पर संघर्ष, या संगीताचा निव्वळ मौखिक परंपरेवर असलेला अमाप विश्वास ही आणि अशी अनेक कारणो होती त्या गैरसमजामागे. 
या सगळ्याच्या पलीकडे असलेली त्यातील सुंदरता आणि प्रगल्भता अजून त्यांच्यापर्यंत पुरतेपणी पोचली नव्हती. या नकाराला आणि  त्यामुळे वाटय़ाला येणा:या अवहेलनेला कंटाळून माङो तिघे सहकारी भारतात परतले. मी मात्र पॅरिसमधून जर्मनी आणि मग इटली अशी भटकंती करीत आपले पाय रोवू बघत होतो. 
कित्येक रात्री अंधा:या पुलाखाली, उपाशीपोटी काढल्या. पोट भरण्यासाठी सबवेमध्ये तबला/ड्रम वाजवून दाखवायचो आणि मिळेल ती चिल्लर जमा करून परवडेल तेवढे पोट भरायचो. पण पराभूत होऊन मायभूमीत परतणो मला मंजूर नव्हते. ज्या गुणवत्तेच्या संगीतावर माङो पोषण झाले होते त्यावर माझा विश्वास होता. या दरम्यान जगभरातील संगीताचे प्रवाह आपल्या सीमा ओलांडून एकत्र येण्यासाठी निमित्त शोधत होते आणि त्याच वेळी अल्लारखा साहेब आणि पंडित रविशंकर यांच्यासारखे बुजुर्ग कलाकार जगाची भारतीय संगीताबद्दलची समज वाढवण्याची मोलाची कामगिरी करीत होते. जगाच्या नकाशावर वर्ल्ड म्युङिाक नावाची संगीताची तरु ण, बंडखोर चळवळ सळसळू लागली..! 
जगभरातील संगीताच्या या विविधरंगी प्रवाहात मी उतरलो तेव्हा देशोदेशीचे असे कलाकार माङयाभोवती होते, जे संगीत एक नव्या भाषेत आणि नव्या पद्धतीने मांडू बघत होते. त्यात केवळ नावीन्याचा सोस नव्हता, तर जगभराच्या संगीतातील सुंदर घटक एकत्र गुंफून नवे अधिक सुंदर घडवण्याची आकांक्षा होती. त्यात इंग्लंडमधील गिटारवादक जॉन मॅक्लाऊग्लीन होता, अमेरिकेतील पियानिस्ट बिल इव्हान्स होता, नॉर्वेचा सेक्सोफोनवादक जॉन गारबारेक होता आणि होता आपला झाकीरभाई. या प्रयोगांमध्ये मी पाय रोवून उभा राहू शकलो कारण माङयावर झालेले अभिजात भारतीय संगीताचे घोटीव संस्कार. स्वरांमधील श्रुती आणि तालामधील मात्रेचा सूक्ष्म विचार करणारे, शास्त्रची रेखीव चौकट असलेले आणि तरीही मांडणीचे अमाप स्वातंत्र्य देणारे हे गाणो. या प्रयोगाच्या निमित्ताने जाणवले, हे संगीत शिकलेला कलाकार जगभरातील कोणत्याही संगीतासमोर ठामपणो उभा राहू शकतो. 
माङया वाद्यांच्या ताफ्यात जगभरातील ड्रम्स, सिम्बल, कोंगो, गाँग्ज अशा त:हेत:हेच्या वाद्यांचा समावेश होता आणि या वाद्यांना मी भारतीय तालवादनात असलेले कायदे, रेले, तिहाई या भाषेत बोलायला लावत होतो. झाकीरभाईच्या प्रयत्नातून भारतात होणा:या जाझ यात्रसारख्या कार्यक्र मातून माङो वादन पालघट रघूजीनी ऐकले. मृदुंगवादनातील दोन भिन्न शैलींचा समन्वय घडवून आपली स्वत:ची शैली, रघुबानी, निर्माण करणा:या या जाणत्या कलाकाराने माङया वादनातील वेगळेपण आणि प्रयोगशीलता टिपली आणि आपला शिष्य म्हणून माझा स्वीकार केला. 
आधी माझी आई, मग अमीर हुसेन साहेब यांचे चिरंजीव अब्दुल सत्तार साहेब आणि आता पलघट रघूजी यांनी गाण्याकडे, वादनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला. बाकी माझा रियाज म्हणजे माङो वाद्यांबरोबर किंवा माङया भोवताली असलेल्या गोष्टींबरोबर अखंड चालणारे प्रयोग असतात. हे करीत असताना मी सतत एका शैलीच्या मर्यादा ओलांडून त्यात भिन्न शैलीचे असे काही सामावून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. 
ट42्र्रूंल्ल2 ें‘ी ु1्रॅिी2 ल्ल3 ु1ीि12, 3ँं32 6ँं3 61’ ि1ीक्4्र1ी ही माझी निष्ठा आहे. सगळ्या माणसांचा देव जर एक असू शकतो तर त्यांचे संगीत कशाला वेगळे हवे, असा माझा साधा प्रश्न आहे. आपले सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून मोकळ्या मनाने संगीताला सामोरे गेले तर आपल्याला आपल्या मातीतील संगीताचा बाज आणि आफ्रिका, सुरीनाम किंवा मालेमधील लोकसंगीताचा बाज यांच्यामध्ये असलेले आंतरिक नाते सहजपणो दिसू शकते.
जगभरातील मान्यवर कलाकारांबरोबर मी वाजवतो, संगीताच्या क्षेत्रतील भले-भले सन्मान माझी वाट शोधत माङयापर्यंत आले, विलक्षण निर्भय प्रयोगशील कलाकार म्हणून समीक्षक माझा उल्लेख करतात अशा गोष्टी माझा बायोडाटा भले वजनदार करणा:या असतील; पण हे वाचत असताना मला आठवत असतात तुकाराम, शिवाजी महाराज आणि स्वरांच्या गाभ्यात असलेल्या माधुर्याला थेट स्पर्श करणारे खळे काका.. आणि मग कानाची पाळी पकडून मी पुन्हा रियाजाला लागतो, नव्या प्रयोगाचा विचार सुरू करतो.. 
 
1973 साली अक्तुआला नावाच्या इटालियन बँडसाठी मला तालवाद्य वाजवण्याचे आमंत्रण मिळाले तेव्हा मी हातात कोणतेच वाद्य न घेता तिथे गेलो होतो. सर्वांच्या चेह:यावरचे आश्चर्य बघून मी म्हटले, मला जे काही वाजवायचे आहे ते आत, माङया मनात, कल्पनेत आहे. 
मग ते तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मला कोणतेही वाद्य किंवा काहीही 
साधन चालेल..!  
 
मुलाखत आणि शब्दांकन
- वन्दना अत्रे