शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

अंधारलेल्या वाटेवर एकलव्याची पणती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:11 IST

ना अनुदान, ना सरकारी पगार ! तरीही काटेरी वाटेवरून मुलांना हमरस्त्यावर आणण्यासाठी धडपडण्याच्या या शाळेचे नाव आहे ‘एकलव्य एकल विद्यालय.’

शिक्षण सर्वांच्या हक्काचे असले तरी ते सर्वांच्या वाट्याला येते कुठे ? शाळेची वाटही न तुडविणारी अनेक मुले आजही अंधारलेल्या वाटेवरून चालताहेत. या खाचखळग्यांची वाट बालवयात अवखळ पण लई न्यारी वाटत असली तरी पुढे नशिबी येतो तो काळाकुट्ट अंधारच! या अंधारात बालकांची पिढी काळवंडून जाऊ नये, जगण्याचा सन्मानजक हक्क त्यांच्याही वाट्याला यावा, यासाठी एक शाळा धडपडतेयं. रानावनातील काटेरी वाट तुडवित या शाळेतील शिक्षक मुलांना घडविताहेत. ना अनुदान, ना सरकारी पगार ! तरीही काटेरी वाटेवरून मुलांना हमरस्त्यावर आणण्यासाठी धडपडण्याच्या या शाळेचे नाव आहे ‘एकलव्य एकल विद्यालय.’या शाळांचे काम निट चालण्यासाठी ट्रस्टने गावोगावी ग्रामशिक्षा समितीच्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. सातही जिल्ह्यात मिळून सहा हजार ९७ ग्रामशिक्षा समिती सदस्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनासाठी १०८ प्रवासी कार्यकर्ते आहेत. १० शाळांवर एक पर्यवेक्षक, तीन पर्यवेक्षकांवर एक विभाग प्रमुख आणि त्यावर जिल्हा प्रमुख अशी ही कामाची रचना असते. या विद्यार्थ्यांचे वार्षिक बालक -पालक मेळावे होतात. बक्षिसे दिली जातात.गडकरी झाले एकलव्यांचे पालक 

४केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून या कामाला बळ आले आहे. १९९६ मध्ये त्यांच्यासह अरविंद शहापूरकर आणि विलास फडणवीस यांनी या ट्रस्टची स्थापना केली. २०१० पासून गडकरी यांनी या ट्रस्टच्या कामात स्वत:ला झोकून दिले. दिल्लीतीत व्यस्ततेतही ते एकलव्य एकलच्या कामाकडे लक्ष ठेवून असतात. नियमित आढावा घेतात. मदतीसाठी तत्पर असतात. ट्रस्टच्या कामासाठी पूर्णवेळ कार्यकर्ता नाही हे लक्षात येताच त्यांनी प्रशांत बोपर्डीकरांकडे ही जबाबदारी सोपविली. शाळेच्या कामासाठी एक वाहनही उपलब्ध करून दिले. अलिकडेच त्यांनी सामाजिक कार्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यातील ५१ लाख रूपये या ट्रस्टला मिळणार आहेत. या ट्रस्टचे अध्यक्ष अरूण लाखाणी आणि सचिव राजीव हडप आहेत. या सेवायज्ञात गडकरी यांच्या पाठोपाठ या दोघांचेही मोठे योगदान आहे.

या शाळेत लोकभाषा असल्याने मुलांना ती आपली वाटते. या मानसिकतेचा फायदा येऊन त्यांच्या अभ्यासाचा आणि संस्काराचा पाया पक्का करण्याचा प्रयत्न येथून होतो. केवळ अध्यापनच नव्हे तर समाजात चांगली रूजूवात करण्याचे काम ट्रस्टच्या माध्यामातून सुरू आहे. समाजातील सकारात्मक बदलासाठी आमची ही धडपड आहे.- प्रशांत बोपर्डीकर, पूर्णकालिन कार्यकर्ता, नागपूरस्व. लक्ष्मणराव मानकर गुरूजी यांच्या यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या स्मृतिसाठी सुरू झालेली ही शाळा म्हणजे जणु ज्ञानयज्ञच! हल्ली शाळा म्हटल्यावर डोळ्यापुढे येते ती शाळेची भव्य इमारत. पाठीवर दफ्तराचे ओझे लादून गणवेशात निघालेली मुले. मुख्याध्यापकांपासून तर शिक्षकांपर्यची फौज. पण या एकलव्य एकल विद्यालयात असे मुळीच नाही. या शाळांना ना स्वत:ची इमारत आहे, ना सरकारी पगाराचे शिक्षक. तरीही विदर्भातील सात जिल्ह्यात एकलव्य एकल विद्यालयाच्या ८७१ शाळा आणि तेवढेच शिक्षकही आहेत. २३ हजार ३१५ विद्यार्थी या शाळांमधून दररोज शिकतात. एवढेच नाही तर सहा हजार ९७ ग्राम शिक्षा समितीचे सदस्य या शाळांच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात.गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे जन्मलेले लक्ष्मणराव मानकर गुरूजी यांच्या आयुष्यात शिक्षणासाठी आलेली वंचना त्यांना सतत अस्वस्थ करीत राहिली. याच अस्वस्थेतून पुढे भवभुती शिक्षण संस्थेची स्थापना झाली. त्यांच्या मृत्यूनंतर कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती ट्रस्टची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून १९९६ पासून विदर्भात आणि विदर्भाबाहेरील दुर्गम भागामध्ये ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे.विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील ८७१ आदिवासी दुर्गम गावांमध्ये या शाळा सुरू आहेत. ही शाळा असते फक्त तीन तासांची ! ती सुद्धा पालक आणि विद्यार्थी म्हणतील त्याप्रमाणे सकाळी किंवा सायंकाळी भरणारी! गावातील मंदीर, एखाद्या घराची पडवी, गोटूल, समाजमंदिर किंवा शाळेची वर्गखोली मिळाली तरी या एकलव्य एकल शाळेला पुरेशी आहे. शिक्षकही बाहेररून आणलेले नसतात. गावातीलच बारावी किंवा पदवीपर्यंत शिकलेल्या तरूण-तरूणीला शिक्षकाची जबाबदारी दिली जाते. संस्थेकडून दरमहा मानधन दिले जाते. या शाळेत मुलांना बोलवावे लागत नाही. कारण अभ्यासक्रम पूर्ण करणे हे या शाळेचे उद्दीष्ट कधीच नसते. खेळ, व्यायाम, संस्कारकथा, रमत गमत, गाणी म्हणत, गोंडी, तेलुगू, माडिया अशा लोकभाषांतून चालणारी ही शाळा मुलांनाही हवीहवीशी वाटते. गावच्या शाळेत मराठीतून गळी न उतरणारे गणित आणि पाढेही या एकल शाळेत स्वभाषेतून पटकन समजतात, ही खरी किमया आहे. या शाळेचे सत्रही वर्षभर नसते. १ सप्टेंबर ते ३१ मार्च अशी ७ महिन्यांची ही शाळा ! उरलेले दिवस शिक्षक रोज एक-दीड तास मुलांना गोळा करून खेळ, व्यायाम शिकवतात.शिक्षकाला ग्रामीण संस्कृ तीमध्ये आजही मान आहे. लग्न असो की बारसे, गावचे गुरूजी हवेच. या शिक्षकांच्या माध्यमातून गावात सामूहिक शेती, जलसंवर्धन, दारुबंदी, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, शौचालय बांधकाम, एक गाव एक गणपती या सारख्या अनेक उपक्रमासोबतच केंद्र व राज्य सरकारच्या योजना सांगण्याचे आणि त्या पोहचविण्याचे कामही हे शिक्षक करतात. अर्थात हे सर्व नि:शुल्क ! केवळ सेवाभावी वृत्तीतून !समाजात रचनात्मक बदल घडविणे हे या संस्थेचे काम. यातून घरकूल योजना, शौचालय निर्मिती, विहीर बांधणी, गटशेती, समाजिक उपक्रम, आरोग्य शिबीर, घेतले जातात. हजारोंना याचा लाभ झाला आहे.गोंदिया आणि गडचिरोलीतून ३० आदिवासी मुलींना नागपुरात आणून त्यांना शालेय शिक्षण आणि अ‍ॅथलेटिक्सचे प्रशिक्षण दिले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, कुरखेडा तालुक्यातून आणलेली १० मुले मैत्री परिवाराच्या माध्यमातून नागपुरात शिकत आहेत. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाच्या छात्रावासात राहून मेळघाट, आकोट, जळगाव जामोद या भागातील पाचवी ते सातव्या वर्गातील कोरकु आणि भील्ल समाजातील मुले शिक्षण घेत आहेत. संस्काराची पाऊलवाट किती सुंदर असते, याचाही प्रत्यय आता येत आहे. गोंदियातील बामणी (ता. सडक अर्जुनी) या गावात उषा ब्राह्मणकर या तरूणीने लोकवर्गणीतून अभ्यासिका उभारली. मेळघाटातील घटांग या गावातील शिक्षकानेहीे अशीच अभ्यासिका उभारली आहे. ३२ गावांमध्ये युवकांनी हा प्रयोग साकारला आहे. परिवर्तनाची एक नवी पहाट या पिचलेल्या अंधारवाटेवर आता उमलायला लागली आहे.शेवटी हे सर्व बघताना एकच मनात येते,‘इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे,सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतीक रम्य ,शुभंकर हे..सत्य, शिवाहूनी, सुंदर हे...’

  • गोपाळकृष्ण मांडवकर
टॅग्स :Schoolशाळा