शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

कुमार सप्तर्षी कुरुंदकरांवर का घसरले?

By admin | Updated: October 3, 2015 22:01 IST

मंथनमधील (13 सप्टेंबर 2015) डॉ. कुमार सप्तर्षी यांचा ‘बरे झाले, शेषराव बरळले’ हा लेख वाचला. ‘सत्याग्रही’ मासिकाचे संपादक आणि एके काळी

मंथनमधील (13 सप्टेंबर 2015) डॉ. कुमार सप्तर्षी यांचा ‘बरे झाले, शेषराव बरळले’ हा लेख वाचला. 
‘सत्याग्रही’ मासिकाचे संपादक आणि एके काळी शंकराचार्यासोबतचा वाद अत्यंत प्रभावीपणो मांडणारा गांधीवादी विचारवंत एवढय़ा खालच्या पातळीवर जातो यावर विश्वास बसत नाही. शेषराव मोरे भाट आहेत, करुंदकरांच्या कॉलेजात ते लेक्चरर म्हणून लागले हे खोटं आहे. याशिवाय ‘कुरुंदकरांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल, आंबेडकरांबद्दल व दलितांबद्दल सुप्त राग होता’. सप्तर्षी यांच्या लेखातील हे आरोप निर्थक व कुरुंदकरांबद्दल गैरसमज पसरविणारे आहेत. 
पुरोगामी विचारवंताचं हे वैशिष्टय़ आहे, की तो अत्यंत संयमी विचार समजून घेऊन, पचवून तेवढय़ाच परिपक्व विचारांचा प्रतिवाद करणारा ग्रंथ वाचकांच्या हाती देऊन प्रतिक्रिया घेतो. 
कुरुंदकरांच्या निधनाला आज 33 वर्षे पूर्ण झाली आहेत, तेव्हा कुमार सप्तर्षी यांनी कुरुंदकरांसोबत केलेल्या चर्चा, वाद-प्रतिवादाचा ग्रंथ प्रकाशित करावा. पूर्वीच प्रकाशित केला असेल तर तसे सांगून आमचे अज्ञान दूर करावे.
आमच्यासारखा सामान्य वाचक कोणाला विचारुन एखाद्याला विचारवंत ठरवत नसतो, तो त्या लेखकांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचा अभ्यास करुन आपले मत बनवतो. हमीद दलवाई यांच्या ‘मुस्लीम जातीयतेचे स्वरुप, कारणो व उपाय’ या साधना प्रकाशनाची प्रस्तावना नरहर कुरुंदकरांची आहे. त्याचाही शब्द न् शब्द वाचून अशी टीका करणा:या विचारवंतास सामान्य वाचकांनी काय सांगायचे?
सय्यदभाईंचा ‘दगडावरील पेरणी’ हा ग्रंथ वाचल्यास मुस्लीम सत्यशोधक चळवळ व मुस्लीम समाजाच्या प्रबोधनासाठी कुरुंदकरांची तळमळ लक्षात येते.
नरहर कुरु ंदकर हे अत्यंत परखडपणो धर्मचिकित्सा  करणारे समाजवादी विचारवंत होते. हे खरे की, कुरुंदकर कुणाचाही मुलाहिजा न ठेवता निर्भीडपणो भूमिका मांडत. लोकशाहीच्या दृष्टीने व्यक्तिपूजा घातक आहे म्हणून परभणीत जाहीर भाषणात कुरु ंदकरांनी सांगितले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हा ‘मराठा’ जातीच्या अभिमानाचा विषय नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय आहे.’ कोण धर्मनिरपेक्ष आहे हे ठरवायचे झाल्यास कुरु ंदकर एक व्यावहारिक कसोटी सांगतात- ज्यांची भारतीय संविधानावर निष्ठा आहे व त्या संविधानास जो श्रेष्ठ मानतो तो धर्मनिरपेक्ष समजावा. ही कसोटी लावल्यास मुसलमान धर्मनिरपेक्ष ठरत नाहीत. कदाचित यामुळेच सप्तर्षी अस्वस्थ झाले असावेत. 
‘नरहर कुरुंदकर - राजकीय भाष्यकार’ या लेखात रा. शा. मोरखंडीकर यांनी म्हटल्याप्रमाणो कुरु ंदकरांचे  मुस्लिमांबद्दलचे विवेचन मुसलमानांविषयी त्यांना वाटणा:या आपलेपणातून आलेले आहे हे लक्षात ठेवणो जरुरी आहे. 
सर्व समाजहिताच्या, विकासाच्या तळमळीतून  कुरुंदकर त्यांच्या ‘अन्वय’ ग्रंथातील ‘धर्म आणि मन’ या लेखात म्हणतात, सेक्युलर राजकारणाची प्रचंड स्पर्धा  मुस्लीम अंधश्रद्धा कुरवाळण्यासाठी, गोंजारण्यासाठी चालू  असते. पण याखेरीज महत्त्वाच्या आणि मूलभूत आघाडीवर अर्थरचना बदलण्याची गरज आहे. अर्थरचना बदलल्याविना समाजरचना बदलत नसते. दोन्ही आघाडय़ांवर जोर धरावा तेव्हा मंद गतीने मन बदलत असते. मानवी दास्यपरंपरेत मानसिक दास्य हे सर्वात शेवटी लय पावणारे असते. कुरुंदकरांनी धर्मनिरपेक्षतेसाठी केलेली धर्मचिकित्सा विकासासाठीच केलेला प्रपंच आहे. यदुनाथ थत्ते संपादित ‘निवडक तवारिख’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत कुरुंदकर म्हणतात, मुसलमानांच्याच प्रगतीसाठी हा परंपरावाद उद्ध्वस्त करणो आवश्यक आहे. 
धर्मनिरपेक्ष आधुनिक राष्ट्रनिर्माणासाठी कुरुंदकर निर्भीडपणो जी रोखठोक धर्मचिकित्सा करतात त्यासंदर्भात वि. ल. धारु रकर म्हणतात, ‘‘धर्माध वृत्तीचा समाचार घेताना ते जसे हिंदूंचा समाचार घेतात तसाच ते मुसलमानांचाही घेतात. सत्याचे विश्लेषण करताना कुणाचाही मुलाहिजा ठेवायचा नाही असाच त्यांचा कटाक्ष होता. याच जाणिवेतून त्यांनी सोबत वृत्तपत्रचे व्यासपीठ वापरून मुक्त चिकित्सा केली.’’ 
कुरुंदकर हिंदू धर्म राज्याबाबत अत्यंत मार्मिक व महत्त्वपूर्ण विवेचन करतात. ते म्हणतात, हिंदू धर्म राज्यात अस्पृश्यांना, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क असणार नाही. म्हणजे हिंदू धर्मराज्यात हिंदूच गुलाम होतो. बाकी धर्मीयांचा तर प्रश्नच नाही. हाच नियम अन्य धर्मराज्यांना लागू आहे. तुम्ही कोणत्याही धर्माच्या कक्षेखाली असा. मग तो ईसाई धर्म असो की शांततावादी इस्लाम असो, बौद्धांचे जग असो की हिंदूंचे जग असो माणसाची जात शतकानुशतके गुलाम राहत आली आहे. 
हा धर्मबंधनातून मुक्त होण्याचा लढा म्हणजेच धर्मनिरपेक्षतेचा लढा आहे. कुरु ंदकरांचे त्यांच्या आकलन या ग्रंथातील ‘पू. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने’ हा लेख वाचून मी अत्यंत प्रभावित झालो. त्यापूर्वी आम्ही धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र व अन्य दोन ग्रंथ वाचले होते. पण कुरुंदकरांनी मांडलेला राष्ट्रवादी आंबेडकर अफलातून. त्यानंतरही अनेक ग्रंथ वाचले पण एवढी अभ्यासपूर्ण मांडणी नाही वाचली. कुरुंदकरांची त्यांच्या ‘भजन’ या ग्रंथातील दलितांबद्दलची मांडणीदेखील प्रभावित करते. 
कुरु ंदकरांचा ‘हैदराबाद :  विसर्जन आणि विमोचन’ हा ग्रंथ वाचून नामांतर  आंदोलनाविषयीची त्यांची भूमिका समजून घेऊन थोर समाजवादी नेते एसेम जोशींसंबंधी नांदेड व उदगीर येथे घडलेला प्रसंग पूर्ण अभ्यासून सांगतो, यात कुरुंदकरांची  भूमिका दलितविरोधी नसून मराठवाडय़ाच्या अस्मितेची आहे. 
 
- डॉ. दत्ताहरी होनराव, 
राज्यशास्त्न विभागप्रमुख, 
हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर