शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
2
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
3
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
4
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
5
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
6
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
7
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
8
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
9
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
10
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
11
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
12
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
13
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
14
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
15
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
16
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
17
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
18
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
19
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
20
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक

फक्त हार्वर्ड.. आयआयटीही फॉरवर्ड

By admin | Updated: September 20, 2014 19:40 IST

आपल्याला कौतुक सगळं तिकडचंच.. मग उद्योग असो वा शिक्षण.. मात्र, ‘हम भी कुछ कम नहीं..’ असं वाटावं, अशी कामगिरी आपणही केली आहे. नवउद्योजक घडवण्यामध्ये हार्वर्डसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाला भारतीय ‘आयआयटी’नं मागे टाकलं आहे. त्यामुळे आता आपणही कॉलर ताठ करून जगातल्या गुणवत्तेच्या स्पर्धेत उतरायलाच हवं..

 डॉ. वरदराज बापट 

 
पदवी व पदव्युत्तर शिक्षण संपल्यानंतर कॅम्पस प्लेसमेंटमधून चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यामुळे स्वयंरोजगाराच्या क्षेत्राकडे वळून स्वत:चे कौशल्य आजमावून पाहण्याचे धाडस खूपच कमी विद्यार्थी करतात. एकीकडे, बेरोजगारीची समस्या वाढत असताना रोजगार निर्माण करणारे उद्योगक्षेत्र दुर्लक्षित राहिले आहे. त्यामागील कारणांचा ऊहापोह होणे आवश्यक आहे. प्रमुख कारणांमध्ये सांप्रत शिक्षणपद्धती, महाविद्यालयांतील वातावरण, विद्यार्थ्यांना मिळणारे प्रोत्साहन व योग्य मार्गदर्शन इत्यादी अनेक घटकांचा समावेश होतो. मात्र, या सगळ्याला देशातील अग्रणी अभियांत्रिकी शिक्षणसंस्था भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, अर्थात आयआयटी अपवाद ठरला आहे. भारतीय यशस्वी उद्योजकांमध्ये नंदन निलकेणी, कंवल रेखी, शैलेश मेहता, शशांक मेहता आदी झळकणारी नावे आयआयटीमधील उद्योजकतेची साक्ष देतात. आयआयटीमधील पोषक वातावरण, विविध संस्थांमार्फत  घेतले जाणारे अभिनव उपक्रम, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नवीन होतकरू उद्योजकांना आर्थिक साह्य इत्यादींमुळे आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये उद्योगक्षेत्राकडे वळण्याचे प्रमाण अधिक आहे. नुकत्याच पिचबुक या अमेरिकन संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केलेल्या अहवालानुसार, नवउद्योजक निर्मितीमध्ये आयआयटीने (एकत्रित) जगातील हार्वर्ड युनिव्हर्सिटीसारख्या अनेक नामांकित विद्यापीठांना मागे टाकून जागतिक क्रमवारीत चौथा क्रमांक पटकावला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये असणार्‍या सुप्त गुणांना व कौशल्याला वाव देण्यासाठी आयआयटीमध्ये विविध विभाग व संस्था कार्यरत आहेत. तांत्रिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्यातील उद्योजकतेला वाव मिळावा, यासाठी आयआयटीमधील र्रूी३८ ा१ कल्लल्ल५ं३्रल्ल ंल्ल िएल्ल३१ीस्र१ील्ली४१२ँ्रस्र (रकठए), ई-सेल आणि नवीनच स्थापन करण्यात येणारे एल्ल३१ीस्र१ील्ली४१२ँ्रस्र उील्ल३ी१ हे विभाग कार्यरत आहेत. ई-सेल हा विद्यार्थिसमूह विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला वाव देण्यासाठी १२ वर्षांपासून अथक परिश्रम घेत आहे. कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना (बिझनेस आयडिया) व तिचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी कल्पकता अत्यावश्यक असते. ई-सेलतर्फे दर वर्षी स्टार्टअप बूटकॅम्प आयोजित केला जातो. चार महिने चालणार्‍या या कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येते. आपल्याकडील संकल्पनेचे व्यवसायात रूपांतर करण्यापासून आवश्यक भांडवल उभे करण्यापर्यंत व्यवसायाशी निगडित विविध मूलभूत बाबींचे तांत्रिक शिक्षण दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या डोक्यातील नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात साकारणे शक्य होते. ई-सेलतर्फे दर वर्षी ई-समीटचे आयोजन केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या बिझनेस आयडिया उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी व भांडवलदार यांच्यासमोर सादर करण्याची सुवर्णसंधी मिळते. व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल उभारणे, हे महत्प्रयासाचे काम ई-समीटच्या व्यासपीठामुळे अत्यंत सुलभ होते. ई-सेलतर्फे ‘युरेका’ ही बी-प्लॅन स्पर्धा घेण्यात येते. तीत देशभरातील विद्यार्थी सहभागी होतात. या स्पर्धेला आशिया खंडातील सर्वांत मोठी बी-प्लॅन स्पर्धा होण्याचा बहुमान मिळाला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसासोबतच विविध व्यावसायिक सल्लागार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या स्पर्धेमार्फत गेल्या १५ वर्षांत तब्बल ४0 उद्योग यशस्वी ठरले आहेत. आयआयटी- मुंबईने  र्रूी३८ ा१ कल्लल्ल५ं३्रल्ल ंल्ल िएल्ल३१ीस्र१ील्ली४१२ँ्रस्र (रकठए)ची स्थापना २00४मध्ये केली. उद्योजक होऊ पाहणार्‍या विद्यार्थ्यांना फक्त कोरडे प्रोत्साहन न देता भरभक्कम आधार देण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. नवजात बालकाला निरोगी व सशक्त  बनविण्यासाठी जीवनावश्यक घटकांचा पुरवठा केला जातो, त्याला इनक्युबेशन म्हणतात. त्याचप्रमाणे एखाद्या नवजात उद्योगाला सशक्त करण्यासाठी ‘इनक्युबेशन’ योजनेअंतर्गत विविध सुविधा ‘साईन’तर्फे पुरवल्या जातात. या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना आर्थिक मदतीबरोबरच इतर अनेक सुविधा पुरवल्या जातात. अनेकदा आर्थिक समस्या ठरणारी कार्यालयीन जागा (ऑफिस स्पेस) अत्यंत नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिली जाते. त्याचसोबत दूरध्वनी, संगणक, इंटरनेट, मीटिंग रूम इत्यादी सुविधा पुरवल्या जातात.
उद्योजकांना आपले उत्पादन ग्राहकांसमोर सादर करता यावे, यासाठी विविध व्यावसायिक प्रदर्शनांचे आयोजन साईनतर्फे केले जाते. नवीन उद्योजकांकरिता विविध क्षेत्रांतील अनुभवी व यशस्वी उद्योजकांचे प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. या नवउद्योजकांना आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा भरघोस पाठिंबा व भरभक्कम आर्थिक साह्य मिळत आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून ‘साईन’च्या साह्याने आजवर ३0हून अधिक उद्योग यशस्वी ठरले आहेत. 
आयआयटीमध्ये असणार्‍या पोषक वातावरणामुळे अधिकाधिक विद्यार्थी गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍यांचे आमिष धुडकावून उद्योगक्षेत्रात आपले कसब अजमावण्यास तयार आहेत. मात्र, तांत्रिक र्मयादेमुळे ‘साईन’तर्फे दर वर्षी ठराविक उद्योगांना साह्य देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांंच्या वाढत्या उत्साहामुळे आयआयटीमध्ये एल्ल३१ीस्र१ील्ली४१२ँ्रस्र उील्ल३ी१ ची स्थापना होत आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल. या सेंटरतर्फे विविध अल्पकालीन प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येतील. यामुळे विद्याथ्यार्ंंना उद्योगाशी निगडित अनेक तांत्रिक बाबी शिकता येतील. व्यवसायासाठी भांडवल उभरण्याकरिता अनेकदा उद्योजकांना ढ१ा डा उल्लूीस्र३ (ढडउ) सादर करावे लागते. पीओसी कसे तयार करावे, त्यात आर्थिक गणिते कशी मांडावीत, इत्यादी अनेक तांत्रिक मुद्दय़ांबाबत नवउद्योजक अनभिज्ञ असतात. अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी सेंटरतर्फे विद्यार्थ्यांंना खास प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच, विद्यार्थ्यांंना नवउद्योजकांकडे (स्टार्टअप कंपनी) इंटर्नशिप करण्याची संधी सेंटरमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांंना व्यवसायातील बारकावे व सूक्ष्म गोष्टी प्रत्यक्ष शिकण्याचा लाभ मिळेल. सेंटरद्वारे एक विशेष मेंटोरशिप प्रोग्रॅम राबविण्यात येणार आहे. आयआयटीचे माजी विद्यार्थी, जे आता यशस्वी उद्योजक बनले आहेत, ते मेंटोर म्हणून विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करतील. उद्योजक होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या पदवी, पदव्युत्तर तसेच पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांकरिता विशेष प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांंकडे एखादी व्यावसायिक कल्पना असल्यास त्यांना ती प्रकल्प स्वरूपात तज्ज्ञांसमोर मांडण्याची संधी मिळेल व तज्ज्ञांनी निवडलेल्या प्रकल्पांना विशेष अनुदान देण्यात येईल. उद्योजकता या विषयावर संशोधन करण्यात येईल, अशी माहिती ‘साईन’ च्या प्रा. आनंद कसुरे यांनी दिली. आयआयटीच्या विद्यार्थ्यांंचे परदेशी जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. अनेक विद्यार्थी भारतातच स्थायिक होऊन उद्योगक्षेत्रात पदार्पण करण्यास उत्सुक आहेत. आयआयटीमधील विविध विभाग व संस्थांमुळे विद्यार्थ्यांंना अधिकाधिक प्रोत्साहन मिळत आहे.
अनादिकाळापासून इ.स. १४00 पर्यंंत भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जगात सर्वाधिक होते. प्राचीन काळी भारत कापड, धातू, जहाजनिर्मिती अशा अनेक उद्योगांत अग्रेसर होता. शेती व उद्योग अशा दोन्ही क्षेत्रांत प्रगत असल्याने जागतिक उत्पन्नाच्या तब्बल २८ टक्के वाटा भारताचा होता. उद्योजकता हा भारतीयांचा स्थायी स्वभाव आहे. मात्र, इंग्रज राजवटीमध्ये लागू करण्यात आलेल्या मेकॉले शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांंंमध्ये नोकरदार प्रवृत्ती निर्माण होऊ लागली. भारतातील सांप्रत शिक्षण पद्धतीसुद्धा बव्हंशी  मेकॉले पद्धतीवर अवलंबून असल्याने विद्यार्थी नोकरीच्या मागे धावत आहेत. अयोग्य शिक्षणव्यवस्थेने उद्योजकतेवर विपरित परिणाम केला आहे. आजही भारताच्या लोकसंख्येच्या १५ टक्के व्यक्ती स्वयंरोजगारातून उपजीविका चालवतात. हे प्रमाण जगातील इतर बहुतांश राष्ट्रांच्या तुलनेत अधिक आहे. दुर्दैवाने यामध्ये कमी शिक्षित उद्योजकांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करणे महत्त्वाचे ठरते. तसेच गुजराती, मारवाडी, सिंधी इत्यादी समाज स्वयंरोजगार क्षेत्रात पुढे आहेत. मात्र, मराठी माणसामध्ये स्वयंरोजगाराबद्दल अजूनही बरीच उदासीनता दिसते.
व्यवसाय सुरू करून आर्थिक जोखीम पत्करण्याची मानसिक तयारी मराठी विद्यार्थ्यांंमध्ये कमी आहे. उद्योगक्षेत्र देशात रोजगार निर्माण करते व ही रोजगारनिर्मिती देशाच्या दीर्घकालीन विकासाला उपयुक्त ठरते. शिक्षणसंस्था, जातिसंस्था, स्वयंसेवी संघटना यांनी या विषयात पुढाकार घ्यावा. देशातील वातावरण हळूहळू उद्योगांना पोषक बनत आहे. बदललेली मानसिकताच या देशात सकारात्मक बदल घडवू शकेल आणि देशाचे भवितव्य उज्‍जवल करू शकेल. असे झाल्यास भारताचा प्राचीन सुवर्णकाळ पुन्हा येण्यास फार वेळ लागणार नाही!  
(लेखक आयआयटी मुंबईमध्ये प्राध्यापक आहेत.)