शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात पेटलेला जेठ

By admin | Updated: May 28, 2016 17:29 IST

‘ओघिनओ’ नावाचे अतिशय प्रखर कडकडीत ऊन फक्त राजस्थानातच पडते. याच काळात ‘बालटी’ या नावाने ओळखल्या जाणा:या वाळवंटात गरम झालेल्या वाळूमातीची वादळे -‘लूं’अंगाची लाही लाही करत असतात

विनय र. र.
(लेखक विज्ञान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)
 
राजस्थानात पाऊस येतोच कुठे?
येतो तोही पुष्कळ उशीरा!
इथे सगळी होरपळच! 
तरीही  इथली संस्कृती
पावसाला शिव्याशाप देत नाही.
इथल्या रणरणत्या उन्हात 
पोळून निघणारी माणसे 
पावसाच्या स्वागताची गाणी ओठावर घेऊन 
गरम वाळूमातीची 
वादळे सोसतात.
 
भारतात सर्वात मोठे वाळवंट असणारा प्रदेश म्हणजे राजस्थान. मरूभूमी असणारा निम्म्याहून अधिक भाग. नैऋत्य-ईशान्य पसरलेला अरवली पर्वत. महाराष्ट्रात उत्तर-दक्षिण पसरलेला, मोसमी पावसाला आडवा असणारा सह्याद्री कोकणात भरपूर पाऊस पाडतो. मध्य प्रदेशात पूर्व-पश्चिम पसरलेले विंध्य आणि सातपुडाही मोसमी पावसाला बरसायला लावतात. राजस्थानात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेले बाष्पयुक्त वारे पाऊस होऊन अरवली पर्वतापर्यंत पोचेस्तोवर कफल्लक झालेले असतात. अशा ढगांमधून अरवलीच्या आस:याने पडणारा पाऊस राजस्थानला मिळणार. त्यामुळे कदाचित राजस्थानच्या सर्वच भागात पाण्याच्या थेंबाथेंबाला किंमत आहे. पावसाला, सूर्याला, ढगांना, वा:याला म्हणूनच राजस्थानी भाषेत विविध छटांचे शब्द आहेत, संज्ञा आहेत. या मरूभूमीतल्या लोकांच्या भाषेत - ‘माटी’, ‘वर्षा’ आणि ‘ताप’ हे केवळ शब्द नाहीत, तर त्यांच्या संस्कृतीचे साधे सरळ असणारे विविध पदर आहेत. जीवनाचा सरळपणा आहे. ताप आहे तसा थंडावाही आहे. ‘फागुन’ (फेब्रुवारी-मार्च) महिन्यापासून त्याची तयारी चालू होते. सूर्याचे तापणो ही पावसाळ्याची सुरुवात मानली जाते. या काळात लोक एकमेकांच्या अंगावर पिवळाभक्क अबीर आणि लालभडक गुलाल उधळतात. वाळवंटाचा देव श्रीकृष्णदेखील गरमीच्या काळात पिवळी वाळू हवेत उडवतो असे मानतात. ‘चैत’ (मार्च-एप्रिल) येतो आणि सगळी जमीन तापायला लागते. सूर्य आग ओकत चटके बसायला लावत असतो. बाकी सारे लोक याला उकाडा, उन्हाळा म्हणतात. राजस्थानात त्यालाच ‘पीठ’ म्हणतात. 
 
 ‘आसाढ’ (जून-जुलै) आला की सूर्याभोवती एक खळे दिसत राहते, त्याला राजस्थानी भाषेत ‘जलकुंभो’ म्हणतात म्हणजे त्याला पाण्याचा साठा मानतात. तो जितका जास्त दिसेल तितके पाऊसमान जास्त. या काळात उगवतीच्या सूर्याकडे लक्ष ठेवतात. सूर्यापासून ‘मछलो’ म्हणजे माशाच्या आकाराचा किरण येताना दिसला की पाऊस येण्याची शक्यता असल्याचे अनुमान करतात. या बाबतीत चंद्राचाही वेध घेतात. ‘आसाढ’ महिन्यात चंद्रकोर उभी नांगरासारखी दिसली तर पावसाळा चांगला जाणार. मात्र ‘श्रवण’ महिन्यातली चंद्रकोर उभट नको आडवी - पडलेली असली पाहिजे, तर पावसाळा चांगला जाणार.
 
ढगांच्या आकाशातील उंचीवरून त्यांचे वर्णन करणारी नावे आहेत तसेच त्यांच्या हालचालीच्या वेगावरूनही ढगांना नावे दिली आहेत. उंचावर असणा:या ढगांना ‘कास’ किंवा ‘कासवड’ म्हणतात. कमी उंचीवर असणा:या आणि नैऋत्येकडून ईशान्येकडे जाणा:या ढगांना ‘उंब’ म्हणतात. दिवसभर आकाश झाकोळून टाकणा:या आणि अधूनमधून पावसाचा शिडकावा करणा:या  ढगांना ‘सहद’ म्हणतात. पश्चिमेकडून वेगाने येणा:या ढगांना ‘लोरण’ म्हणतात आणि त्यांच्यातून पडणा:या पावसाला ‘लोरणझार’ म्हणतात. या ‘लोरणझार’चे गुणगान करणारी किती तरी लोकगीते आहेत. पाऊस पाडून झालेल्या म्हणजे आपली कर्तव्ये बजावलेल्या आणि विश्रंतीसाठी डोंगराच्या माथ्यावर विसावलेल्या ढगांना म्हणतात ‘रिंची’. कदाचित हे ¬षी मानले गेले असावेत.
‘जेठ’ महिन्यात (मे-जून) अकराव्या दिवशी ‘नौताप’ सुरू होतो. साधारणपणो मे महिन्यातल्या दुस-या आणि तिस-या आठवडय़ात तो येतो. ‘नौताप’ किंवा ‘नवताप’ म्हटल्या जाणा:या या काळात धरणी उन्हाने तापून निघते. ती तापली पाहिजे नाही तर पावसाळा चांगला येत नाही. हे दिव्य व्रतस्थपणो पार पाडले तरच पुढे पावसाने येणारा थंडावा प्राप्त होणार.
 
गरम वादळांचा ‘जेठ’
‘ओघिनओ’ नावाचे अतिशय प्रखर कडकडीत ऊन फक्त राजस्थानातच पडते. याच काळात ‘बालटी’ या नावाने ओळखल्या जाणा:या  वाळवंटात  गरम झालेल्या वाळूमातीची वादळे -‘लूं’अंगाची लाही लाही करत असतात.  मात्र इथले लोक हा सारा तापदायक प्रकारशांतपणो सोसतात. वाळवंटातले कोणीही रहिवासी ‘जेठ’ महिन्याला शिव्याशाप देत नाहीत. या काळात चेहरा वगळता बाकी सारे अंग लपेटून घेऊन इथले लोक वावरतात. चेह-यावर उडत येणा:या गरम वाळूचे चटके शांतपणो सहन करतात. एवढंच नाही तर गाई-गुरे, म्हशी, उंट, शेळ्या-मेंढय़ा पाळणारे समूह आपापल्या पद्धतीने ‘जेठ’ पाठवल्याबद्दल देवाचे आभार मानत गाणी गातात.
 
असे म्हणतात, की वर्षाचे बारा महिने जेव्हा एकत्र जमतात आणि बोलत असतात, आपणच निसर्गाचे कसे श्रेष्ठ पुत्र आहोत असे सांगत असतात अशा कोणत्याही बैठकीत शेवटी एकच महिना श्रेष्ठ ठरतो तो म्हणजे ज्येष्ठ. तो सर्वांचा ‘असेजेतु’ म्हणजे दादा ठरतो. जेठ पेटला नाही, तापल्या वाळूच्या वादळांनी सगळे झाडले नाही, तर ‘जमानो’ म्हणजे पावसाळा येणारच नाही. ‘औगळ’ हे पावसाचे पहिले लक्षण. ‘दिदोरिया’च्या आवाजाने लहान मुले आपापल्या द:या घेऊन पसरतात आणि मग मोठे लोक त्या साफ करायला पुढे येतात. पाऊस येण्याआधी घराची छपरे, अंगणो आणि पाणी साठण्याच्या सगळ्या जागांची सफाई करतात. या काळात ‘जेठ’ सरत असतो आणि ‘आसोद’ यायचा असतो. पावसाळा अजून लांबच असतो. ‘आसाढ’च्या अकरा दिवसांनंतर ‘वर्साली’ किंवा ‘चौमासा’ येणार असतो. राजस्थानात पाऊस तुरळक असला तरी लोकांनी त्या लाडक्यासाठी वर्षातले चार महिने दिले आहेत. ढगांना इतके जवळून ओळखणा:या, त्यांची जाण आणि त्यांच्याबद्दल आस्था असणा-या; नावाने, कामाने आणि अगदी विश्रंतीनेही ओळखणा:या या लोकांमध्ये पावसाच्या थेंबांनाही वेगवेगळी लाडाकोडाची नावे आहेत.
 
पावसाच्या पहिल्या थेंबाला ‘हरी’ म्हणजे देवाच्या नावे ओळखतात. ढगाचे फूल म्हणजे ‘मेघफुआ’ म्हणून ओळखतात. ‘वृष्टी’ आणि ‘बिरखा’, ‘व्रखा’ अशा शब्दांमधून निघालेली अनेक नावे आहेत. खूप वेळ पाऊस पडत असेल तर त्याला म्हणतात ‘झारमंडन’. श्रवण-भाद्रपदात पडणारा सर्वसाधारण पाऊस असतो ‘हालूर’. थंड वातावरणात छोटय़ा थेंबांनी भुरभुरतो तो ‘रोहार’. ‘वर्षावली’ किंवा ‘वरखावल’ हाही पावसाचा एक प्रकार. जोरात आणि घनघोर पडणा:या पावसाला म्हणतात ‘महाझार’. जोरात पण थोडाच काळ पडणारा पाऊस म्हणजे ‘झपको’. 
 
‘तुथनो’ या क्रि यापदाचा अर्थ आहे - बरसणो आणि ‘उब्रेलो’ म्हणजे पाऊस संपत येण्याची क्रि या, ‘चौमासा’ संपत येण्याची खूण. 
 पहिल्या थेंबापासून शेवटच्या थेंबापर्यंतचा थेंब अन् थेंब पकडून घेण्यासाठी प्रत्येक वस्तीत, गावात, खेडय़ात, पाडय़ात पावसाळ्यात छपरावर, अंगणात चादरी पसरून ठेवलेल्या असतात. अगदी चौकाच्या कडेला, शेतात आणि मोकळ्या मैदानातही. या विविध प्रकारांनाही ढग आणि थेंब यांच्यासारखीच अनेक नावे आहेत. हे सगळे सुंदर धडे कोणत्या शाळेच्या पुस्तकात पाहायला मिळत नाहीत, पण सामाजिक सामूहिक स्मृतीत जतन करून ठेवलेले असतात. त्यातूनच श्रुती निर्माण होतात. हे सारे काम कोणी सुरू केले कोणाला माहिती नाही. म्हणूनच ते सांगोसांगीतून म्हणजेच श्रुतींतून पिढय़ान्पिढय़ा सतत सरकत आले आहे.  आपल्या श्रमातून, कष्टातून आणि मेहनतीतून केलेले निजी कार्य मग सर्वांसाठी सर्वांनी केलेली सर्वांसाठीची ‘पिंडवारी’ ठरते. घामाचे थेंब गाळल्यानंतर पाण्याच्या अमृताचे थेंब सर्वांना चाखायला मिळतात.
(संदर्भ अनुपम मिश्र - ‘राजस्थान की रजत बूंदे’)