शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हे प्रेमाचे संगीत आहे...हृदयाशी संबंधित आहे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 09:15 IST

सखी माझी : माझ्या कवीहृदयाच्या हळुवार कप्प्यात गोड, सुंदर व लोभस सखीचे आकर्षक रूप दडलेले आहे.

- कवी योगिराज माने

माझ्या कवीहृदयाच्या हळुवार कप्प्यात गोड, सुंदर व लोभस सखीचे आकर्षक रूप दडलेले आहे. हा कप्पा मात्र मला जिवापाड प्रिय आहे. मी एकांतातच हा कप्पा उघडतो व माझ्या  सखीची भेट घेतो. तिच्याशी संवाद साधून मी आनंदी होतो, मोहरतो, बावरतो व रोमांचितही होतो. सखीची लाडिक अदा माझ्या जीवाला भूल पाडते. सखीनामाच्या उच्चाराने दिवसाचा प्रारंभ झाल्यावर माझ्या आनंदाला उधाण येते. सखीशी साधलेला क्षणभराचा लाडिक संवादही मला प्रचंड ऊर्जा देतो. मी नव्या जोमाने व उमेदीने आयुष्याला सामोरे जाण्यास तयार होतो.  समोर येणारे प्रश्नही मला सोपे वाटतात आणि उत्तरे सापडू लागतात.

सखीच्या भक्कम साथीने जगण्याचे कोडे सुटू लागते. तिच्या धुंद सहवासामुळे अवघ्या चराचरातून संगीत ऐकू येऊ लागते. पंचेंद्रिये तृप्त होतात. संपूर्ण भोवताल सुंदर दिसू लागतो. मनाचे फुलपाखरू आभाळात गिरक्या घ्यायला लागते. साऱ्या आसमंताला गुलाबी छटा प्राप्त होते. प्रेमाची धून अहर्निश वाजू लागते. तसे संगीताचे अनेक प्रकार आहेत. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, पाश्चात्य संगीत यासोबतच नितांत सुंदर असलेले प्रेमाचे संगीत. प्रेमाच्या संगीताची महती व नशा प्रेमवीरांनाच ठाऊक. प्रेमाच्या संगीताचे सूर, ताल व बोल वेगळे असतात.

आपल्या सखीला न बोलताही सारे कळू लागते. इशाऱ्याला बोल फुटतात. प्रेमाच्या संगीताची जादू काही औरच असते. हे संगीत केवळ आणि केवळ हृदयाशी संबंधित असते. हे संगीत ऐकताच प्रेमिकांना प्रेमज्वर चढतो; परंतु काही केल्या तो उतरत नाही. त्यासोबतच माझ्या सर्वांगावर प्रेमाचा रंगही सांडल्यामुळे माझ्या आयुष्याला सुंदर इंद्रधनूचे रूप प्राप्त झाले आहे. प्रेमरंगामुळे मला इतर सर्व रंग फिके वाटत आहेत. माझ्या जीवाला सखीची एक अनावर ओढ प्रत्येक क्षणी लागलेली असते. 

तिच्या आठवणींनी माझ्या मनावर मोरपीस फिरते व तिच्या निकटच्या दर्शनाने माझ्या कवीमनाला वेड लागते. या वेडामुळेच मला माझे जगणे सुसह्य व आनंददायी होते. आजकाल मी कोणाच्या अंकित आहे, हे माझ्या श्वासांनाही कळू लागले आहे, एवढे मात्र खरे़

हे प्रेमाचे संगीत आहे..हृदयाशी संबंधित आहे....क्षेत्र गुलाबी केवळ आमुचे..परक्याला प्रतिबंधित आहे....तिचा सांडला रंग मनावर..माझी दुनिया रंगीत आहे....श्वासांनाही कळू लागले..मी कोणाच्या अंकित आहे....या जन्मी ती सखी भेटली..किती पिढ्यांचे संचित आहे...

टॅग्स :literatureसाहित्य