शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

इटलीत आज..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

माझ्या देशात- इटलीमध्ये काळ इतका कठीण असताना मी माझ्या लाइफ पार्टनरपासून गेले दहा दिवस लांब राहते आहे, कारण त्याला अस्थमाचा त्रास आहे.  माझ्या आई-वडिलांपासूनही मला दूर व्हावं लागलं,  कारण ते वृद्ध आहेत.  माझ्या खापर पणजीने सुरू केलेलं  116 वर्षं जुनं आमचं दुकान बंद ठेवावं लागलं आहे. 1943 मध्ये दुसर्‍या महायुद्धात मिलानवर बॉम्बहल्ला झाला, तेव्हा हे दुकान बंद होतं.. त्यानंतर तब्बल 77 वर्षांनी पुन्हा ! कारण - कोरोना !!

ठळक मुद्देकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास बंद पडलेल्या देशात राहाताना.

- फ्रान्चेस्का बांपीएरीइटलीतल्या काही भाग्यवान लोकांपैकी मी एक आहे. कारण एका ऐतिहासिक वारशाची मी हक्कदार आहे. इटलीच्या मिलान या शहरात ‘अँँटिका बार्बेरिआ कोला’ नावाचं आमचं एक ऐतिहासिक सलून आहे. 1904मध्ये स्थापन झालेल्या आणि परंपरेनं चालत आलेल्या या दुकानाला तब्बल 116 वर्षे झाली आहेत. हा वारसा आम्ही आजही जपला आहे.दुर्दैवानं हे दुकान आज आम्हाला बंद ठेवावं लागलं आहे. - कारण, कोरोना व्हायरस ! शतकाचा वारसा असलेलं हे दुकान आजपर्यंत कधीच बंद नव्हतं. अपवाद फक्त दुसर्‍या महायुद्धाचा. 1943मध्ये मिलान शहरावर बॉम्ब टाकण्यात आल्यानंतर काही काळासाठी आम्हाला हे दुकान बंद ठेवावं लागलं होतं. त्यानंतर तब्बल 77 वर्षांनी हा प्रसंग पुन्हा एकदा आला आहे.कोरोना व्हायरसच्या विळख्यात आमचा देश सापडला आहे. अनेक जणांना लागण झाली आहे. ‘आता काय?’ या भीतीनं सगळ्यांची गाळण उडाली आहे आणि आमचा देश जवळपास बंद झाल्याच्या बातम्या तर तुम्ही वाचल्याच असतील.चीनमध्ये या विषाणूनं हलकल्लोळ माजवायला सुरुवात करण्यापूर्वीच तज्ज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला होता; पण आम्ही त्याकडे दुर्लक्षच केलं. एक चिनी दांपत्य सुट्टीसाठी म्हणून रोममध्ये आलं होतं. इटलीतील कोरोनाबाधित हे पहिलं दांपत्य. ते वेळीच लक्षात आलं आणि त्यांच्यावर यशस्वी उपचारही करण्यात आले; पण तोपर्यंत कोरोना व्हायरसनं आपले पंजे आवळायला सुरुवात केली होती. जगभरच्या पर्यटकांचं आकर्षण असलेलं मिलान शहर आणि त्याभोवतीच्या उत्तर इटलीला तोपर्यंत कोरोनानं आपल्या विळख्यात घ्यायला सुरुवात केली होती. अनेकांना या व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर आमच्या देशाला सावरायला वेळच मिळाला नाही.कोरोनाचा पहिला बाधित आमच्याकडे सापडल्यानंतर तो केवळ एक ‘नॉर्मल फ्लू’ आहे, असाच आमचा समज झाला होता; पण ती आमची खूप मोठी चूक होती. हा संसर्गजन्य व्हायरस नंतर इतक्या झपाट्यानं सगळीकडे पसरला की सारेच हतबल झाले. इतकं की अचानक आलेल्या या टोळधाडीच्या बचावासाठी आमची आरोग्यव्यवस्थाही तयार आणि सक्षम नव्हती. त्याचा खूप मोठा फटका आम्हाला बसला. ज्या उत्तर इटली परिसरात आम्ही राहतो, तिथली आरोग्यव्यवस्था देशातली सर्वोत्तम मानली जाते; पण या हादर्‍यानं तीही मोडून पडताना दिसते आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. अतिदक्षता विभागातील व्यवस्था तोकड्या पडू लागल्या आहेत आणि तातडीच्या कामाचा अपवाद वगळता आमच्या देशातल्या सर्व नागरिकांना घरातच थांबण्याच्या सूचना आहेत..पण एक गोष्ट मात्र मला स्पष्ट केली पाहिजे. आमच्याकडची सर्व आरोग्यव्यवस्था सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. हजारो लोकांच्या तपासण्या केल्या जात आहेत. कोरोनाबाधितांना शोधून काढण्याचे प्रय} युद्धपातळीवर सुरू आहेत. पण ज्या देशांमध्ये आरोग्यव्यवस्था खासगी नियंत्रणाखाली आहे, त्यांचे काय होत असेल, झाले असेल, या नुसत्या कल्पनेनंही अंगाचा थरकाप उडतो.कोरोनाबाधित संशयिताना वेगळं काढून त्यांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं हा आजच्या घडीला सर्वोत्तम उपाय आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यास त्याचा मोठा उपयोग होईल. सध्या आमच्याकडे तेच सुरू आहे.कोरोना संशयिताना वेगळं काढायला सुरुवात झाल्याबरोबर दुर्दैवानं आमच्याकडे लोकांची पहिली प्रतिक्रिया अत्यंत तीव्र होती. लोकांमध्ये एकदम भीती पसरली. मेडिकल स्टोअर्स आणि किराणा दुकानांवर लोकांनी हल्ले करून लुटालूट केली.सुदैवानं ही परिस्थिती लवकरच निवळली. लोकांना परिस्थितीचं गांभीर्य कळलं आणि आता ते स्वत:च काळजी घेऊ लागले आहेत. लोकांनी स्वत:हून घराबाहेर पडणं बंद केलं आहे. शहरांतली रस्त्यांवरची गर्दी कमी होते आहे. लोक स्वत:हून तपासण्या करवून घेताहेत. परिस्थिती लवकरात लवकर मूळ पदावर येण्यासाठी हे सारं गरजेचं आहे. याबाबत सरकारनं तर लोकांना आवाहन केलं आहेच; पण लोकांनी, कंपन्यांनीही एकतर ‘स्मार्ट वर्क’चा अवलंब करायला सुरुवात केली आहे, नाहीतर आपापली दुकानं, कंपन्या काही काळासाठी बंद ठेवली आहेत. येत्या काळात आणखीही अनेक कर्मशिअल अँक्टिव्हिटीज् बंद होतील. फक्त मेडिकल स्टोअर्स आणि किराणा दुकानं तेवढी उघडी राहतील. ‘कोरोना’ संशोधनासाठी लोक स्वत:हून निधी देताहेत. ‘क्राउड फंडिंग’ सुरू आहे. सेलिब्रिटीही त्यात पुढे आहेत. युद्धपातळीवर हॉस्पिटल्स उभारली जात आहेत. चीनप्रमाणेच आमच्याकडेही व्हच्यरुअल क्लासरूम्सद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रय} सुरू आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थेला खूप मोठा फटका बसणार आहे; पण माणसाचं जगणं आणि त्याचं आरोग्य यांना केव्हाही पहिलं प्राधान्य. हा कसोटीचा काळही लवकरच जाईल आणि आम्ही पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करू, असा आमचा विश्वास आहे. आमचा लोकशाही देश आहे. अर्थातच कोणालाही सक्तीनं वेगळं काढणं (क्वारण्टाइन करणं) ही गोष्ट लोकशाही मूल्यांच्या विरुद्धच; पण प्रतिबंधात्मक उपाय योजणं ही गोष्टही तेवढीच महत्त्वाची आहे.सुरुवातीला आम्ही बर्‍याच चुका केल्या; पण आमच्या देशानं त्यातून खूप मोठा धडाही घेतला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे सर्वोत्तम प्रय} आम्ही करीत आहोत. पण लोकांमध्ये घबराट आहे, हे मात्र मी अमान्य करणार नाही.आपल्या प्रेमाच्या, जवळच्या व्यक्तींपासून दूर राहणं ही खरोखरच अतिशय कठीण गोष्ट आहे. ‘कोरोना’ची साथ पसरल्याबरोबर माझ्या सलूनमधील एका जुन्या सहकार्‍याला वेगळं ठेवलं गेलं, कारण इटलीत ज्या ठिकाणी पहिल्यांदा कोरोना व्हायरसनं शिरकाव केला, त्या ठिकाणचा; ‘रेड झोन’मधला तो रहिवासी आहे. माझ्या लाइफ पार्टनरपासूनही दहा दिवस मला लांब राहावं लागलं, कारण त्याला अस्थमाचा त्रास आहे. माझ्या आई-वडिलांपासून दूर व्हावं लागलं, कारण ते वृद्ध आहेत. हे सर्व अतिशय दु:खदायक आहे; पण अंतिमत: ही काळजी, खबरदारी तुमच्या अतिप्रिय लोकांसाठीचं प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची आजच्या घडीला सर्वोत्तम कृती आहे आणि कदाचित तेवढंच तुमच्या हातातही आहे.ध्यानीमनी नसताना कोरोना व्हायरसनं आमच्या आयुष्यालाच अचानक विळखा घातला आणि आपलं आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची अत्यंत  विदारक अशी जाणीवही करून दिली. निराशा आणि अनिश्चिततेनं आता सगळ्यांचं आयुष्य भरलेलं आहे; पण आयुष्यात कोणत्या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे याचा धडा आम्ही यातून घेतला आहे. यातून मिळालेला नवा दृष्टिकोन नव्या मूल्यांना जन्म देईल.मानवी आयुष्यच बर्‍यावाईट घटनांनी भरलेलं असतं. कसोटीचे कठीण प्रसंग येतात, तसंच निराशाही वाट्याला येते, त्याच्याशी धैर्यानं सामना करत आपल्याला पुढे जावंच लागतं.या प्रवासात आपण सगळेच एकमेकांचे सोबती आहोत!

francesca.bompieri@anticabarbieriacolla.it(लेखिका इटलीतील मिलानच्या रहिवासी असून, ‘अँँटिका बार्बेरिआ कोला’ या सलूनच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत.)

(शब्दांकन : समीर मराठे)