शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘शहाणपणा’ शिकण्यात उशीर कसला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 06:05 IST

बऱ्याचदा आपण निराशावाद जोपासतो, तोच तोच विचार करून स्वत:चंच डोकं उठवतो, पण आशावादही शिकता येतो, आनंदी राहता येतं, हे ठाऊक आहे?

ठळक मुद्देमनात निराशावादी विचार आले की, स्वत:ला एकच प्रश्न विचारायचा, या विचारामुळे मला निरुत्साही आणि नाउमेद वाटतंय ना? मग ते त्याज्य आहेत.

- डॉ.राजेंद्र बर्वेआता असं म्हणणं बरोबर नाही आणि मनापासून तसं वाटतही नाही, पण खरं सांगतो, माझ्या बायकोच्या स्वभावाचा कंटाळा आलाय. माझं तिच्यावर प्रेम आहे. आम्ही एकमेकांना साथ देतो. तीही भरपूर प्रेम करते, मला सपोर्ट करते. तरीही मूळ स्वभाव अतिशय नकारात्मक आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट घडली की, त्याचा नकारात्मक अर्थ काढायचा आणि निराश राहायचं.मी तर गंमतीने म्हणतो, राजकारणात जसे साम्यवाद, समाजवाद इ. असतात, तसा हिचा पक्ष निराशावाद, चिन्ह मावळता सूर्य! किरण निराशेने म्हणाला.त्याच्या चेहऱ्यावर स्मित होतं, पण मनात मात्र हरण्याची भावना होती.- आणि तुझा स्वभाव कसा आहे?मीही तसा खूप आशावादी नव्हतो, पण इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात एटीकेटीची अटीतटीची झुंज द्यावी लागली, तेव्हा एक प्रोफेसर म्हणाले, ‘हे बघ, या एटीकेटीचा तुझ्या हुशारीशी संबंध जोडू नको. तुझी तयारी आणि मेहनतीशी जोड. आपण काय करू शकतो, याचा विचार कर. तेव्हापासून मी ‘काय शक्यता आहे?’ याचा विचार करतो, किरण आनंदाने म्हणाला, पण तिला हे सांगितलं ना की ती म्हणते, मला कॉमनसेन्स शिकवू नकोस. मला माहिती आहे. ‘असा विचार करू नकोस, तसा विचार कर,’ हे सांगणं सोपं आहे. तुला काय होतं सांगायला? त्रास मला होतो. जाऊ दे, हा नकारात्मक विचार माझ्याबरोबरच संपणार,’ असं म्हणून रडते.आणि या कोविडच्या काळात तर नुसता वैताग आलाय. कोविड मावळला, तरी त्याच्या पाऊलखुणा खोलवर रुतल्या आहेत. कोविड परवडला, पण बायकोच्या निराशावादाचं रडगाणं नको झालंय!घरोघरी मातीच्या चुली, तशा घरोघरी निराशाबादाचे चटके देणारे निखारे अजून फुललेले आहेत.किरणची बायको एव्हाना रडत होती. ‘सगळा कॉमनसेन्स आहे, मला मूर्ख समजू नका. कॉमनसेन्स शिकवू नका. तिनं मलाही स्पष्ट सुनावलं.’थोड्या वेळाने रडण्याची भरती ओसरली, तेव्हा म्हटलं, मी शिकवू शकतो, पण कॉमनसेन्स नाही. त्यापेक्षा अधिक महत्त्वाची दोन विधाने करणार आहे.पहिला मुद्दा कामनसेन्स ही बौद्धिक बाब आहे. कॉमनसेन्स ही कॉमन प्रॅक्टिस जोवर होत नाही, तोवर कॉमनसेन्स आणि नॉनसेन्स यात फरक राहात नाही. म्हणजे शहाणपणाचे चार शब्द आणि तोंडाची वटवट यात फरक नाही.मी तुकोबांना फार मान देतो, कारण त्यांनी तीनशे वर्षांपूर्वीच म्हटलंय की, ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले.’ कॉमनसेन्सला कॉमन प्रॅक्टिस करायची आहे.‘आणि दुसरा मुद्दा?’ - किरणच्या बायकोने विचारलं. तिच्या डोळ्यात किंचित चमक दिसली.तुम्ही निराशावाद जोपासलाय, म्हणजे तोच-तोच विचार करून त्याला खतपाणी घातलंय, पण आशावादही शिकता येतो, हे ठाऊक आहे का?किरणची बायको दचकली.‘होय, आशावाद विचारपद्धती शिकता येते. आशावाद शिकणं यालाच ‘प्रशिक्षित आशावाद’ म्हणतात.किरणच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मित होतं. किरणही तुझ्यासारखा होता, पण निराशेच्या विशिष्ट क्षणी त्याच्या प्राध्यापकांनी त्याला दोन शब्दांत आशावादाचं प्रशिक्षण दिलं.‘मला कुठे जमणारेय? किरणची बायको हे वाक्य म्हणणार, तोच किरणच तसं म्हणला. ‘हो, आला खरा असा विचार!!’ ती मान खाली घालून म्हणाली.‘हे बघ, प्रत्येक व्यक्तीची ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती वेगवेगळी असते. तू क्षमतेची गोष्ट करू नकोस. तू आशावादी होण्यास समर्थ आहेच, तुझ्यात ती क्षमता आहे. फक्त ती प्रशिक्षित नाही. शिकावी लागणार आहे.’किरणची बायको विचारात पडून म्हणली, मला तुमचा हा फंडा नव्यानं कळला. म्हणजे आपण आपआपली विचार करण्याची पद्धती बदलू शकतो!! मला हे कोणी सांगितलेलंच नव्हतं. ‘खरंय, आपल्या शाळा, कॉलेजात अशी जीवनाश्यक कौशल्ये कोणी शिकवत नाहीत. घोकंपट्टीच्या अभ्यासक्रमात उपयुक्त व्यवहारज्ञान शिकवताच येत नाही, पण शहाणपणा आणि आशादायी विचारपद्धती शिकायला वेळेचं आणि वयाचं बांधन नसतं. आनंदानं आणि उत्साहात जगायला कधीही उशीर झालेला नसतो.किरणच्या बायकोच्या चेहऱ्यावर स्मित हेातं, तर किरणचा चेहरा आनंदानं फुलला होता!!

आशावादी विचार शिकायचे कसे?१) निराशावादी विचार लाटेसारखे असतात, एकदा तडाखा देतात आणि आपण त्यात वाहून जातो. कारण आपण त्यांना ‘सत्य’ मानतो.२) पण हे तथाकथित सत्य स्वाभाविक नसतं. आपले विचार आपण निर्माण करतो आणि त्यावर विश्वास ठेवतो, म्हणून ते खरे वाटतात.३) आपल्याकडे असल्या निराशावादी विचारांचे कसलेच पुरावे नसतात.४) उलट त्यामुळे आपली उमेद नाहीशी होते.५) मनात निराशावादी विचार आले की, स्वत:ला एकच प्रश्न विचारायचा, या विचारामुळे मला निरुत्साही आणि नाउमेद वाटतंय ना? मग ते त्याज्य आहेत.६) आणि निराशावादी विचार गेले की उरतात आशावादी विचार!!(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)drrajendrabarve@gmail.com