शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
2
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
3
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं करण कळताच पती हादरला!
4
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
5
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
6
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
7
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
8
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
9
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
10
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
11
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
12
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
13
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
14
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
15
Mumbai: विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेची जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव
16
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
17
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
18
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
19
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
20
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

हनीट्रेक

By admin | Updated: January 10, 2015 12:35 IST

अँन आणि जॉर्डनच्या अनलिमिटेड हनिमूनचा रोमान्स

केनियातील ‘मसाई मारा’मध्ये साहस, धाडस, चित्तथरार यांना मर्यादा नाही. नदीच्या एका काठावरून पलीकडे जाण्यासाठी धडपडणारे हरिण किंवा झेब्य्राचे कळप, पलीकडच्या काठावर शिकारीसाठी त्यांची वाट बघत बसलेला एखादा बिबट्या आणि नदीच्या पात्रात आ वासून दबा धरून बसलेल्या मगरी असं चित्र मसाई मारामध्ये हमखास पहायला मिळतं. एका शांत दुपारी झाडीच्या गर्द छायेखाली एक चित्तीण आपल्या पिल्लासोबत पहुडली होती. पण अचानकच तिने झेप घेतली. दूर कुठे शिकार दिसते का ते पाहण्यासाठी ती उंचावर चढली. आम्ही अवाक होऊन पाहतच राहिलो. खरं तर बघण्यापलीकडे आम्ही काही करूच शकत नव्हतो. कारण ती ज्या उंच ठिकाणावर चढून सावज शोधत होती, ते ठिकाण म्हणजे आमच्या गाडीचं छत! तिच्या हालचाली पाहत अगदी स्तब्धपणे आम्ही गाडीत बसलो होतो. पण मनात एकच विचार डोकावत होता. भक्ष्याच्या शोधात असलेल्या या ‘माते’ची नजर आमच्यावर पडली तर?
- हा चित्तथरारक अनुभव आहे माईक आणि अँन  हॉवर्ड या दोघा ‘जिप्सीं’चा.  
लग्न होताच नोकर्‍या सोडून, घर विकून आणि साठवलेली पुंजी घेऊन अनलिमिटेड हनिमून ट्रॅव्हलसाठी निघालेले माईक आणि अँन हॉवर्ड. लग्नानंतर मुलाबाळांची आणि संसाराची काळजी गळ्यात पडण्याआधी जग भटकण्याच्या इराद्याने घराबाहेर पडले, त्याला आता दोन वर्षं उलटून गेली आहेत. 
सहा खंडातले तब्बल ५२ देश आणि तीनशेहून जास्त ठिकाणं पालथी घालण्याचा त्यांचा बेत इतका क्लिक झालाय, की आपण कधीतरी घरी परत जाऊ का, असंच आता त्यांना वाटतं. हे सगळं वाचून कुणालाही प्रश्न पडेल, हा एवढा लांबलचक प्रवास करायला या तरुण जोडप्याकडे पैसे कुठून आले? अँन आणि माईक या दोघांनी आपापली व्यावसायिक पार्श्‍वभूमी वापरून मोठय़ा हिकमतीने आपल्या या जगावेगळ्या हनिमून सफरीसाठी पैसा जमवण्याची शक्कल शोधून काढली आहे.
अँन एका मासिकाची संपादक होती तर माईक सोशल आणि डिजिटल मीडियाशी संबंधित होता. या हटके हनिमूनला असलेली ‘न्यूज व्हॅल्यू’ ओळखून त्यांनी आपल्या प्रवासाची वर्णनं, छायाचित्र प्रिंट-इलेक्ट्रॉनिक माध्यमांना विकण्यास सुरुवात केली. आपल्या प्रवासाची माहिती देणारा हनिट्रेक नावाचा ब्लॉगही  सुरू केला. त्याच्यावर जाहिराती झळकू लागताच पुढल्या प्रवासासाठी पैसे जमू लागले. शिवाय फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल साइट्सच्या माध्यमातूनही ते लोकांच्या संपर्कात राहू लागले. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या ब्लॉग आणि फेसबुकच्या माध्यमातून पर्यटकांना मार्गदर्शनही करायला आता सुरुवात केलीय. त्यात स्वस्त-महागड्या राहाण्याच्या सोयी, भटकंती करताना घ्यायची काळजी, आवश्यक असलेलं सामान, भटकंतीदरम्यान कमीत कमी खर्च व्हावा यासाठीच्या ट्रिक्स अशा कितीतरी गोष्टींचा समावेश आहे. 
त्यांनी आपल्या संपूर्ण प्रवासाचं बजेट ‘लो’ ठेवलं असलं तरी कमी पैसे खर्च केल्याने या प्रवासातलं थ्रील, एक्सायटमेंट तीळभरही कमी झालेलं नसल्याचं अँन आणि माईकचं म्हणणं आहे. या दोघांची ही सफर पुढेही सुरूच राहाणार आहे. मालदीव, जॉर्डन, इजिप्त, अंटाक्र्टिका असा प्रवास करत ही दोघं भारतातही येणार आहेत. त्यांच्या या अनलिमिटेड हनिमूनची अखेर कधी होईल तेव्हा होईल. पण ज्या दिवशी ते आपल्या घरी परततील तेव्हा आयुष्यभराचं समाधान नक्कीच त्यांच्या गाठीशी असेल.