शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

हिटलरी प्रवृत्ती!

By admin | Updated: April 25, 2015 14:25 IST

हिटलरने आपल्या कारकिर्दीत 60 लाख ज्यूंचे शिरकाण केले. अमेरिकेने 30 लाख व्हिएतनामी मारले, शिवाय गेल्या दहा वर्षात अमेरिकेने घडवलेल्या युद्धात 15 लाख माणसे मेली. ‘इसीस’चे शिरच्छेदकांड, तालिबान्यांचा अत्याचार, मूलतत्त्ववाद्यांची हुकूमशाही, इस्त्रयलकडून अरबांचे शिरकाण. वणवा अजूनही भडकतोच आहे.

  - कुमार केतकर
 
रात्र अजूनही वै:याचीच आहे. जागेच राहायला हवे!
 
 बरोबर 70 वर्षांपूर्वी याच आठवडय़ात, म्हणजे 30 एप्रिल 1945 रोजी अॅडॉल्फ हिटलरने स्वत:च्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्त्या केली. त्याच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे 6क् लाख ज्यूंची नियोजितपणो हत्त्या केली गेली. फक्त ज्यू लोकच नव्हे तर अनेक पुरोगामी लेखक, कवी, नव्या विचारांचे शिक्षक-प्राध्यापक, पत्रकार, कामगार, कार्यकर्तेसुद्धा छळछावण्यांमध्ये ठार केले गेले. ज्यूंना ठार मारण्याचे कारण हिटलरला व नाझी जर्मनांना फक्त त्यांच्या ‘आर्य  वंशाचा अतिरेकी अभिमान होता आणि ज्यू हे ‘सेमिटीक  (अरब, असिरियन्स, हिब्रूभाषक-मुख्यत: मध्यपूर्व आशियातील) वंशाचे असल्याने त्यांचा नि:पात केल्याशिवाय मानवजात शुद्ध, पवित्र, उच्चभ्रू होणार नाही, असे त्यांचे मत होते.
हिटलरने केलेले हत्त्याकांड किती हिंस्र होते आणि सामूहिकरीत्या माणसे मारण्याची त्याने एक प्रचंड यंत्रणाच कशी उभी केली होती, याचे यथार्थ आणि चित्तथरारक वर्णन कुमार नवाथे यांनी अलीकडेच लिहिलेल्या त्यांच्या ‘नरसंहार  या पुस्तकात केले आहे. ग्रंथालीने नुकतीच या पुस्तकाची सहावी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. हिटलरने आत्महत्त्या केल्यानंतर हिटलरी प्रवृत्ती नष्ट झाली नाही, हे तर आपण पाहतो-अनुभवतोच आहोत. अमेरिकेने मध्यपूर्व आशियात जे आक्र मण केले वा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष यादवी युद्धे घडवून आणली, त्यात गेल्या दहा वर्षांत किमान 15 लाख माणसे मरण पावली असावीत वा कायमची जायबंदी, अपंग झाली असावीत. इराक, लिबिया, सिरिया, इजिप्त, लेबेनॉन या व त्या परिसरातील राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी, त्या भागातून पसरणारा दहशतवाद नष्ट व्हावा आणि जागतिक शांतता निर्माण व्हावी म्हणून आपण मध्यपूर्व आशियात लष्करी व हवाई हस्तक्षेप केला, असे अमेरिकेचे स्पष्टीकरण होते. वस्तुत: हे 14-15 लाख लोक अमेरिकेने घेतलेले बळी आहेत.
प्रत्यक्षात आपण हे पाहत आहोत की, तो सर्व प्रदेश (पूर्वीचा विशाल अरबस्तान) अधिकाधिक हिंस्र आणि यादवीग्रस्त झाला आहे. ‘आयएसआयएस’ने सुरू केलेले ‘शिरच्छेदकांड  असेल किंवा स्त्रिया, मुले व वृद्ध यांचे केलेले हत्त्याकांड, अफगाणिस्तानात तालिबान्यांनी चालविलेले बेभान अत्याचार असोत वा इराणमधील मूलतत्त्ववाद्यांनी त्यांच्याच जनतेवर लावलेली धार्मिक हुकूमशाही असो- अमेरिका कुठेही आधुनिक लोकशाही आणू शकलेली नाही आणि खुद्द त्या देशातील जनतेलाही सुसंस्कृत राष्ट्र निर्माण करता आलेले नाही.
‘वल्र्ड ट्रेड सेंटर  आणि ‘पेन्टॅगॉन’च्या अमेरिकेतील अजस्त्र इमारतींवर अरब दहशतवाद्यांनी जो ‘हवाई हल्ला’  केला, त्याचा सूड म्हणून अमेरिका मध्यपूर्व आशियात सशस्त्रपणो घुसली, असे सांगितले जाते. खरे म्हणजे त्या भागातील खनिज तेलाच्या खाणी, उत्पादन यंत्रणा व जागतिक बाजारपेठ कब्जात घेण्यासाठी अमेरिका त्या प्रदेशात अगोदरच घुसली होती. अमेरिकेचे त्या प्रदेशात दोन हस्तक आहेत-जे परस्परविरोधी आहेत. सौदी अरेबिया हा मक्का-मदिनेचा ‘पवित्र भूमी  असलेला इस्लामी देश. सौदी अरेबियाचा इस्त्रयल या ज्यू राष्ट्राच्या अिस्तत्वालाच विरोध आहे. परंतु 1948मध्ये पॅलेस्टाइनची फाळणी करून इस्त्रयल नावाच्या देशाची तेथे सक्तीने उभारणी सुरू केली गेली, तेव्हापासून पॅलेस्टाइनचा स्वातंत्र्यलढा हा तमाम अरब लोकांचा अस्मिताबिंदू झाला आहे. विशेष म्हणजे, इस्त्रयल अमेरिकेच्याच पाठिंब्यावर उभा आहे! 
हिटलरने ज्यूंचे हत्त्याकांड केले, पण त्याच ज्यूंच्या इस्त्रयलकडून आता अरबांचे शिरकाण चालू आहे! म्हणजेच हिटलरच्या क्रौर्यापासून धडा घेऊन करुणा शिकण्याऐवजी इस्त्रयली ज्यू सत्ताधारी आता तसाच छळ पॅलेस्टिनींचा करत आहेत.
या हिटलरी प्रवृत्तीच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष करणारा जर्मन लेखक गुंथर ग्रास गेल्याच आठवडय़ात मरण पावला. हिटलरच्या जर्मनीत जन्माला आलेल्या गुंथरवर त्याच्या शालेय जीवनात प्रभाव होता तो त्या हिंस्र नाझीवादाचाच! पण पुढे शालान्त परीक्षेनंतर त्याने जेव्हा खरा अभ्यास सुरू केला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, जर्मनीने एका महाराक्षसाला जगभर थैमान घालू दिले होते.
गुंथर ग्रास यांचे साहित्य युद्धानंतरचे असले तरी त्याचा कॅनव्हास त्या युद्धाचा आहे. युद्ध संपून फक्त 13 वर्षे झाली होती. जर्मन समाज पराभवाच्या जखमेतून पूर्णपणो बरा झाला नव्हता. अनेक जणांना जर्मनीवर, नाझींवर, हिटलरवरच अन्याय झाला आहे, असे वाटत होते. पराभव व दोस्त राष्ट्रांनी घातलेली बंधने, यामुळे जर्मनीत एक न्यूनगंडाची भावना पसरली होती. जर्मनीतील साहित्यिक व कलावंत दिशाहीन झाले होते. युद्धोत्तर जर्मनीतील समाजाचे, मनाचे चित्र साहित्यात कसे रंगवावे, याबद्दल संभ्रम होता. लोकांच्या चित्तवृत्ती स्थिरावलेल्या नव्हत्या. त्या वेळेस गुंथर ग्रास यांनी ‘द टिन ड्रम’ ही कादंबरी लिहिली आणि काही महिन्यांतच साहित्यविश्वातला माहोल पालटू लागला. 
गुंथर ग्रास यांचा जन्म झाला तेव्हा, म्हणजे 1927मध्ये, जर्मनीतील वातावरण नाझीमय होऊ लागले होते. हिटलरकडे सत्तेची सूत्रे आली नव्हती, पण हवा स्वस्तिकाची होती. ज्या डॅन्ङिाग या शहरात त्यांचा जन्म झाला, ते शहर आज पोलंडमध्ये आहे. ग्रास स्वत: आईच्या बाजूने पोलिश स्लाविक आणि वडिलांच्या बाजूने जर्मन, परंतु तरीही मातृभाषा जर्मनच. शाळेत प्रवेश घेतल्याबरोबर त्यांची ‘हिटलर यूथ’ नावाच्या शालेय मुलांच्या शाखेत भरती केली गेली. प्रत्येकाला ते बंधनकारक असे. हिटलरने युरोपात आक्रमणाला सुरुवात केल्यानंतर शाळा, महाविद्यालये, सांस्कृतिक संस्था असे सर्व युद्धमय झाले होते. सुरु वातीला, म्हणजे 1939 ते 1941 ही दोन वर्षे युरोपात असे वातावरण होते की, चार-पाच वर्षांत रशियासहित आजूबाजूचे सर्व देश पादाक्रांत केले जातील. जेथे जेथे ब्रिटिश वा फ्रेंचांच्या वसाहती आहेत, त्या सर्व जर्मन साम्राज्याच्या घटक होतील. हिटलर यांची ‘विश्वसम्राट’ म्हणून घोषणा केली जाईल. शाळेतल्या लहान मुलांची मनेही त्या विजिगीषू वृत्तीने भारावलेली होती. त्यामुळे वय वर्षे 14 ते 16 या गटातील मुलांना युद्धावर जावे लागले, तेव्हा त्यांना काहीसा अभिमानच वाटत होता. परंतु 1942 नंतर युद्धाचे रंग पालटले होते. स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील रशियन लाल सेनेने फौजांवर प्रतिहल्ले सुरू करून त्यांना माघार घ्यायला भाग पाडले होते. ग्रास यांना 16व्या वर्षी, म्हणजे 1943मध्ये युद्धावर पाठविले गेले. दोन वर्षांनी युद्ध संपले आणि गुंथर ग्रास हे अमेरिकेचे युद्धकैदी झाले. युद्धाच्या अनुभवातून व जर्मनीच्या पराभवातून मन मुक्त करू न शकलेल्या गुंथर यांना महाविद्यालयात करमेना. त्यांनी शिक्षण सोडून दिले आणि एका खाणीत कामगार म्हणून ते काम करू लागले. परंतु त्यांच्या संवेदनशील मनाचा कल साहित्य-कलेकडे होता. चित्र व शिल्पशाळेत ते रुजू झाले आणि त्याच वेळेस त्यांनी लेखनाला सुरु वात केली. परंतु ते म्हणतात की, त्यांचा कादंबरी-लेखनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एखाद्या शिल्पकाराप्रमाणो आहे. ते बराच काळ त्यांच्या कथानकावर ‘छिन्नीकाम’ करीत असतात. कोणत्या दगडातून शिल्प उभे करायचे, हे ठरवणारा शिल्पकार जसा योग्य दगडाच्या शोधात असतो, तसेच आपणही कथानकाच्या शोधात असतो, असे ग्रास म्हणतात.
योगायोग हा की, हिटलरच्या आत्महत्त्येला, म्हणजेच या भस्मासुराच्या विनाशाला ज्या आठवडय़ात 7क् वर्षे होत आहेत, त्याच सुमाराला त्या हिटलरी वृत्तीच्या विरोधात साहित्यातून व कृतीतून विरोध करणारा लेखक-विचारवंत-कार्यकर्ता आपल्यातून गेला आहे. परंतु जोपर्यंत हिटलरी प्रवृत्ती जिवंत आहेत, तोपर्यंत गुंथर ग्रासचे काम आपल्याला पुढे चालू ठेवायचे आहे. कारण अजूनही ग्रास यांच्या साहित्यिक विचारसरणीत पण आपल्या परिभाषेत सांगायचे तर- अगदी आपल्या देशातही- त्या पाशवी विचारांचे आविष्कार आहेतच! म्हणूनच हिटलरी वै:याची रात्र आहे-आपल्याला जागेच राहायला हवे!
      भस्मासूर!
1960 ते 1990 या 30 वर्षांच्या काळात हिटलरी प्रवृत्तीचे अमानुष दर्शन आपल्याला व्हिएतनाम, कंबोडिया या प्रदेशात त्याचप्रमाणो इराण-इराक आणि अफगाणिस्तानमध्ये दिसले. व्हिएतनाम कम्युनिस्ट होऊ नये, म्हणून अमेरिकेने त्या देशावर घनघोर बॉम्बिंग केले. बहुतांश नि:शस्त्र व्हिएतनामी जनतेने गनिमी पद्धतीने अमेरिकेचा प्रतिकार केला. अखेरीस अमेरिका जेरीस आली आणि अक्षरश: त्यांना व्हिएतनाममधून पळ काढावा लागला. त्या पाठोपाठ कंबोडियात पोल पॉट नावाचा एक (स्वत:ला कम्युनिस्ट म्हणविणारा) भस्मासूर जन्माला आला. त्याने सुमारे 2क् लाख कंबोडियन लोक छळ करून ठार मारले. त्यानंतर वर्षभरातच इराण-इराक यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले आणि तेही दहा वर्षे चालले. ज्याप्रमाणो सोविएत युनियनचे अफगाणिस्तानातील आक्र मणही दहा वर्षे टिकले. हा सर्व काळ 1960 ते 1990 आहे. 1989च्या नोव्हेंबरमध्ये बर्लिनची भिंत लोकशाही आंदोलनाच्या रेटय़ामुळे कोसळली आणि अनेकांना वाटले की, आता शीतयुद्ध संपून जग शांततेच्या मार्गाने जाणार. परंतु मध्यपूर्व आशियातील वणवा त्यानंतरच भडकला. अजूनही त्या ज्वाला दहशतवादाच्या रुपाने जगभर फैलावताना दिसत आहेत.