शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हिमालयात, 1400 फुटांवर हक्काचं घर!

By admin | Updated: November 28, 2015 18:09 IST

मानव आणि निसर्ग यांच्यातले नाते जसे गुंतागुंतीचे आहे, तसेच गमतीदारही आहे. म्हणजे माणूस निसर्गावर अवलंबून तर आहेच, पण अनेकदा तो भोवतालच्या निसर्गापेक्षा वेगळा वागतानाही आढळतो

- मकरंद जोशी                                                                                                     
 
मानव आणि निसर्ग यांच्यातले नाते जसे गुंतागुंतीचे आहे, तसेच गमतीदारही आहे. म्हणजे माणूस निसर्गावर अवलंबून तर आहेच, पण अनेकदा तो भोवतालच्या निसर्गापेक्षा वेगळा वागतानाही आढळतो. नेमकेपणानं सांगायचं तर निसर्ग जितका रौद्रभीषण, रुक्ष-रांगडा, असहिष्णू तितका त्या निसर्गातला माणूस अधिक स्नेहशील, उबदार आणि दिलदार असतो. राजस्थानच्या रखरखीत वाळवंटात निसर्गातली हिरवाई औषधालाही दिसत नसताना, ‘पधारो सा’ म्हणून जन्मोजन्मीची ओळख असल्याप्रमाणो येणा:या देशी-विदेशी पाहुण्यांचे स्वागत अगदी मनापासून करणारे आणि आपल्या पाहुणचारातून मैत्रीची हिरवळ जोपासणारे राजस्थानी हमखास भेटतात. निसर्गाच्या विरूद्ध वागण्याचा हा नियम मी नुकताच हिमालयाच्या कुशीत थेट चौदा हजार फुटांवर अनुभवला. निमित्त झाले ते हिमाचल प्रदेशाचा अनोळखी चेहरा असलेल्या ‘स्पिती व्हॅली’ला भेट देण्याचे. सर्वसाधारणपणो हिमाचल म्हटल्यावर शिमला-कुलु-मनाली फारतर धरमशाला-डलहौसी-खज्जियार या पलीकडे सहसा आपली यादी जात नाही. मी गेली वीस बावीस वर्षे निसर्ग सहली, जंगल सफरींचे संयोजन करत असूनही माझाही ‘स्पिती योग’ आला नव्हता. या ऑगस्टअखेरीस जेव्हा मोजक्या उत्साही मंडळींबरोबर ‘स्पिती वारी’ घडली तेव्हा पुन्हा एकदा पटले की निसर्ग जितका खडतर तितकी तिथली माणसे मृदू. आमच्या स्पिती दौ:यात आम्ही लांगझा या चौदा हजार फूटांवरील चिमुकल्या गावात राहिलो. इथे आमची सोय झाली होती ‘तान्झी होम स्टे’मध्ये. स्पितीच्या दौ:याची जबाबदारी घेणा:या त्सेरिंगजींनी आम्हाला आधी बजावले होते की, लांगझामधला होम स्टे खरोखरच घरगुती आहे. तुम्ही एका कुटुंबात राहणार आहात. ते काही हॉटेल नाही, तिथे ज्या सुविधा आहेत त्या स्थानिकांच्या घरात असतात तितक्याच आहेत. पण त्यांच्या या (धमकीवजा) सूचनांचा आमच्यावर काही परिणाम झाला नाही. आमच्या ठरलेल्या कार्यक्र मानुसार आधी जगातील सर्वात उंचावरचे - 14,5क्क् फुटांवरचे हिक्कीमचे पोस्ट ऑफिस पाहून, तिथून घरी पिक्चर पोस्ट कार्ड पाठवून आम्ही लांगझाकडे वळलो, लांगझाला जाण्याआधी आशियातले सर्वात उंचावरचे, जिथे मोटार रस्ता आहे असे खेडेगाव ‘कॉमिक’ पाहिले. ‘चार घरांचे गाव चिमुकले’ हे वर्णन इथल्या कोणत्याही गावाला लागू पडते. लांगझाकडे जाताना आधी नजरेत भरला तो एका टेकाडावरचा उघडय़ा आकाशाखालचा ध्यानस्थ बुद्धा. स्पिती खो:यात बौद्ध धर्म हाच प्रमुख धर्म आहे, त्यामुळे लहानशा गावातही एखादा बौद्धविहार किंवा स्तुप असतोच. पण लांगझासारख्या उंचावरच्या, लहानशा गावात बसवलेली ही भव्य मूर्ती पाहून आश्चर्य वाटले. बहुदा भोवतालच्या असहिष्णू निसर्गामध्येही आनंदाने राहण्याचे बळ या लोकांना तथागतांच्या शिकवणुकीतूनच मिळत असावे.
संध्याकाळी 5-5.3क्च्या सुमारास आम्ही लांगझाला पोहोचलो. डोंगराच्या कडेला आमची गाडी थांबली, तिथे कुठे रस्ता दिसत नव्हता. गेल्या पाच-सहा दिवसांमध्ये आमचा चक्रधर काकुभाई याचे अफाट ड्रायव्हिंग कौशल्य अनुभवल्याने बहुतेक आता या उतारावरून गाडी जाणार या कल्पनेनं आम्ही डोळे घट्ट मिटून घेतले. पण काकुभाईंनी सांगितलं की ‘आता गाडीतून उतरा आणि त्या उतारावरच्या घराकडे जा, तेच ‘तान्झी होम स्टे’ आहे. समोरच्या उतारावर एक पुसट पाऊलवाट होती, लहान मुलाने पाटीवर मारलेली रेघ पुसल्यावर जसा तिचा अंधूक ठसा राहतो, तशा त्या वाटेवरून आम्हाला जायचे होते. सॅक पाठीवर आणि जीव मुठीत घेऊन आम्ही चालायला सुरुवात केली.
‘तान्झी होम स्टे’च्या दारात आमचं स्वागत एका सुरकुतलेल्या पण प्रसन्न चेह:याच्या आजीबाईंनी केलं. इथल्या सगळ्या घरांचे दरवाजे हे जेमतेम तीन फूट उंचीचेच असतात, त्यामुळे आपोआप घरात शिरताना नतमस्तक होऊन शिरावे लागते. आजीबाईंनी आम्हाला थेट घरातल्या डायनिंग हॉलमध्ये नेलं. मध्यभागी पारंपरिक बंदिस्त चूल, त्यातून छताकडे जाणारी चिमणी, भिंतीलगत भारतीय बैठक पसरलेली, टेकायला उशा आणि समोर छोटे छोटे डेस्क. घरात शिरताना बाहेर वाहणा:या थंडगार आणि जोरदार वा:यांनी आमची पार गठडी वळली होती. या डायनिंग हॉलच्या उबदार वातावरणात जरा बरं वाटलं, तेवढय़ात आमचे यजमान अवतीर्ण झाले. सडसडीत शरीरयष्टी, चेह:यावर हसू आणि वागण्या, बोलण्यात आत्मियता, वय असावे पंचेचाळीसच्या आत बाहेर. मग परस्पर परिचय झाला. यजमानांचे नाव ‘आंग्द्यु’, आमचे स्वागत करणा:या आजी (वय अवघे पंच्याहत्तर) ‘शिकीर’ या आंग्द्युच्या मातोश्री आणि ‘तान्झी’ ही इयत्ता सातवीत शिकणारी त्याची कन्या, सगळे आमच्या सरबराईत गुंतले. अध्र्या तासाने आंग्द्युची अर्धांगी शेतातले काम आटोपून आली आणि स्वयंपाकाला लागली. थंडीनं केलेली आमची अवस्था ओळखून आंग्द्यूने झटकन चहा केला. डायनिंग हॉलमधल्या बंदिस्त चुलीत दोन गोव:या टाकून ती पेटवली आणि त्यावर पाण्याचा हंडा ठेवला.
चहाबरोबर गप्पा रंगायला वेळ लागला नाही. आम्ही सारे गेले पाच, सहा दिवस स्पिती व्हॅलीत फिरत होतो. रस्त्यांचा अभाव, इलेक्ट्रिसिटीची टंचाई, नेटवर्कचा अभाव आणि यावर तडका म्हणून की काय रांगडा- कठोर निसर्ग. पण या सगळ्यातही समाधानाने, आनंदाने राहणारे स्थानिक पाहत होतो, त्यामुळे या लोकांच्या जीवनशैलीबद्दल, जगण्याच्या प्रेरणांबद्दल कुतूहल मनात होते. आंग्द्युबरोबर गप्पा मारताना त्याला वाट मिळाली. 
नागपूरहून फिजिकल ट्रेनिंगचा डिप्लोमा घेऊन आल्यानंतर आंग्द्यू लांगझाच्या शाळेत पि.टी. शिक्षक म्हणून नोकरी करत होता, जोडीला गेली पंधरा वर्षे हा होम स्टे चालवत होता. हिमाचल टूरिझमचे अधिकृत सभासदत्व घेऊन आंग्द्यू आपल्याच घरात हा घरगुती निवास चालवत होता. शिवाय सरकारकडून भूमिहीनांना वाटलेल्या पाच बिघा जमिनीचा तुकडा ही त्याला मिळाला होता; मात्र ही हक्काची जमीन कसण्यासाठी त्याला गावातल्या बडय़ा धेंडांविरूद्ध जी न्यायालयीन आणि वैयक्तिक लढाई लढावी लागली होती, ती ऐकल्यावर आम्ही सारे अवाक झालो. शिवाय आंग्द्यू हिवाळ्यात- उन्हाळ्यात ट्रेकिंगसाठी येणा:या परदेशी ट्रेकर्सबरोबर गाइड म्हणूनही जातो. त्याच्याकडून ऐकलेले ट्रेकिंगचे अनुभव अंगावर काटा आणणारे होते.
आमच्याशी बोलता बोलता आंग्द्यू आणि परिवाराचे हात ही चालत होते. तान्झी आणि तिच्या आईने चार खेपा करून बाहेरून पाणी आणून स्वयंपाकघरात भरले. आजीबाईंनी ताजे मटार सोलायला घेतले होते, स्वत: आंग्द्यू थुक्पासाठीच्या भाज्या चिरत होता आणि आम्ही सारे सासुरवाडीला आलेल्या जावयांप्रमाणो आरामात बसून गप्पा हाणत होतो. 
आमच्या गप्पांत आंग्द्यूची पत्नी अगदी काठा काठावरून सहभागी होत होती. विचारलेल्या प्रश्नाला मात्र उत्तरे देत होती. पण आमच्या स्नेहाचा स्मार्टफोन पाहून मात्र तिची स्त्री सुलभवृत्ती जागी झाली आणि तिने आंग्द्यूचे त्या फोनकडे लक्ष वेधलं. त्यानंतर त्या नवरा- बायकोमध्ये जे संभाषण झाले त्याची भाषा आम्हाला कळली नसली तरी भावना सार्वत्रिक असल्याने आमच्यापर्यंत अचूक पोहोचल्या. ‘किती दिवस मी सांगतेय, असा फोन घेऊन द्या, पण तुम्ही लक्षच देत नाही..’, ‘हे बघ इथे रेंज नसते मग कशाला हवा स्मार्टफोन उगाच डोक खाऊ नकोस. ’ अशा धर्तीचा तो प्रेमळ(!) संवाद ऐकून हिमालयात 14क्क्क् फुटांवरसुद्धा नवरा-बायकोचं नात ‘सेम असतं’ याची खात्री पटली.
या कुटुंबाच्या उबदार छायेतून बाहेर पडावेसे वाटत नव्हते, पण चंद्रतालची वाट पुकारत होती. ‘जुलै’ (बाय बाय) म्हणून आम्ही निघालो. येताना मनात उत्सुकता आणि थोडी साशंकता होती, पण जाताना मन उबदार पाहुणचाराने तुडुंब भरलं होतं आणि लांगझासारख्या पिटुकल्या गावात 14क्क्क् फुटांवर एक हक्काचं घर जोडल्याची भावना मनाला सुखवीत होती. हेच तर प्रवासाचं ईप्सित असतं. दूरचे प्रदेश जवळ येतात. अनोळखी लोक ओळखीचे होतात आणि आपलं जग थोडं अधिक मोठं होतं.
 
makarandvj@gmail.com