शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

इथे किल्ले विकले जातात

By admin | Updated: July 19, 2014 19:12 IST

किल्ले हे शून्यातून उभे राहिलेल्या मराठी साम्राज्याचे वैभव तर आहेतच; पण आधुनिक महाराष्ट्राची ती मानचिन्हेही आहेत. मात्र, त्याकडे आपले म्हणावे तसे लक्ष नाही. त्यामुळेच त्यांची पडझड होत असतानाही आपण शांत असतो. त्यातूनच आता या किल्ल्यांची विक्रीही सुरू झाली आहे. आता तरी आपण जागे होणार आहोत की नाही?

- संदीप तापकीर

शिवरायांच्या यशवंतगडाची विक्री झाली. सर्व किल्ले राष्ट्राची मालमत्ता असतानाही - या किल्ल्याची विक्री कशी काय केली गेली? कोठे आहे हा यशवंतगड? तो नेमका कोणाच्या ताब्यात आहे? हे फक्त एकट्या यशवंतगडाचेच दुर्दैव आहे, की अशी परिस्थिती इतर गडांच्याही वाट्याला आली आहे? 
 रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या तालुक्याच्या ठिकाणापासून २0 किलोमीटर अंतरावर नाटे हे गाव आहे. या गावातून पश्‍चिमेकडे आंबोळगडाच्या दिशेने निघाल्यावर आपल्याला डाव्या हाताला भक्कम तटबुरुजांचा यशवंतगड दिसतो. गडावरील एका बुरुजावर नाटेच्या ग्रामस्थांनी भगवा झेंडा आणि ‘किल्ले यशवंतगड’ अशी पाटीदेखील लावलेली आहे. हा किल्ला साडेसात एकर परिसरामध्ये आहे. या किल्ल्याला समुद्रकिनार्‍याच्या बाजूने पडकोटही आहे. किल्ला आणि पडकोट मिळून अत्यंत मोक्याच्या ठिकाणी गडावर १७ बुरूज आहेत. गडाची संपूर्ण बांधणी जांभ्या दगडात केलेली असल्यामुळे दूरवरूनही त्याचा खणखणीतपणा आपल्या लक्षात येतो. यशवंतगडाच्या दक्षिणेला जैतापूर खाडी आहे, तर अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर मुसाकाजी हे प्राचीन बंदर आहे. या दोन्हींच्या संरक्षणासाठी आणि त्यातून चाललेल्या व्यापारावर देखरेख करण्यासाठीच यशवंतगड आणि जवळच ७     कि मी अंतरावर आंबोळगडाची निर्मिती करण्यात आली.  
कोणत्याही किल्ल्याच्या बुरुजावर सदर किंवा कचेरीची जागा आढळत नाही. परंतु, या किल्ल्याच्या मध्यावर दरवाजाच्या समोरच डावीकडे एक गोलाकार बुरूज दिसतो. या बुरुजावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या बुरुजावर आढळणारे मोठे जोते म्हणजेच कचेरीची जागा असावी. येथून किल्ला एका दृष्टिक्षेपात येतो. हे या किल्ल्याचे खास वैशिष्ट्य आहे. 
खाडीच्या काठावर पडकोट हे या गडाचे आणखी एक वैशिष्ट्य. पडकोटावरील भव्य बुरुजावर विश्‍वनाथ रघुनाथ पत्की यांचे घर. शेजारी विहीर आहे. त्यांनी पडकोटात कलमी आंब्यांची लागवड केलेली आहे. पडकोटातील दरवाजा थेट खाडीत निघतो. या दरवाजातून समुद्रीमालाचा व्यापार होत होता. म्हणूनच समुद्राच्या बाजूनेही भक्कम तटबंदी व बुरूज बांधून यशवंतगड अधिक बळकट केलेला दिसतो. 
किल्ल्यात आणि तेही एका बुरुजावर पत्कींचे घर कसे? याचा शोध घेण्यासाठी आपणाला इतिहासात डोकवावे लागते. जैतापूर, राजापूर, मुसाकाजी यांच्या संरक्षणासाठी व व्यापारावरील देखरेखीसाठी १६व्या शतकात जैतापूर खाडीच्या किनार्‍यावर विजापूरकरांनी हा यशवंतगड उभारला. राजापूर हे व्यापारी बंदर शिवरायांच्या ताब्यात होते. या बंदराच्या संरक्षणासाठी आणि जैतापूर खाडीतून राजापूरकडे जाणार्‍या बोटींवर नजर ठेवण्यासाठी यशवंतगड जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजीमहाराजांनी पडकोट आणि महादरवाजा ते खाडीपर्यंतची तटबंदी बांधली. पुढे मराठय़ांच्या ताब्यातील हा किल्ला इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे १८१८मध्ये इंग्रजांनी जिंकला. १८६२मधील एका पाहणीत यशवंतगडावर २८ तोफा आढळतात. १९व्या शतकात रघुनाथ पत्की यांनी इंग्रजांची प्रामाणिकपणे सेवा केली. त्यामुळे खूश होऊन इंग्रजांनी त्यांना हा किल्ला बक्षीस दिला. यालाच म्हणतात, ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’. तेव्हाच यशवंतगडाचे ते मालक झाले, तेव्हापासून आजपर्यंत यशवंतगड त्यांच्याच ताब्यात आहे. 
त्यामुळेच रघुनाथ पत्की यांचे चिरंजीव विश्‍वनाथ पत्की यांच्या नावे आजचा सातबारा आहे. आश्‍चर्य म्हणजे, पुरातत्त्व खात्याकडे या किल्ल्याची नोंदच नाही. तरीदेखील दोन वर्षांपूर्वी त्यांनी राज्य शासनाकडे यशवंतगड राज्यसंरक्षित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. किल्ला सरकारकडे नसतानाही किल्ल्यावर १५ ऑगस्ट, २६ जानेवारी रोजी सरकारतर्फे ध्वजवंदनही केले जाते. 
या विश्‍वनाथ पत्कींनी लावलेल्या आंबा कलम बागेच्या आणि त्यांच्या घराच्या देखभालीसाठी त्यांनी आंबोळगड येथील अरविंद तुकाराम पारकर यांच्याशी १८ ऑक्टोबर २0१२ रोजी ३५ लाख रुपये घेऊन ९९ वर्षांचा भाडेकरार केला आहे. त्यांच्या घराची मोडतोड होत होती आणि आंब्याच्या बागेत चोर्‍यांचे प्रमाण वाढले होते. म्हणून जमीन व कलमांचा हा भाडेकरार त्यांनी केला आहे.  आहे की नाही हा अजब प्रकार? इतका सुंदर किल्ला ३५ लाख रुपयांसाठी विकला जातो, तो शासनाच्या ताब्यात नसणे, त्याची पुरातत्त्व खात्याकडेही नोंद नसणे याला काय म्हणायचे ? बरे हे यशवंतगडाच्या बाबतीतच फक्त झाले आहे, असे नाही. असे दुर्दैव अनेक किल्ल्यांच्या बाबतीत घडले आहे, पुढेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण सर्वांनीच आता सज्ज झाले पाहिजे. 
रत्नागिरी जिल्ह्यातलाच गोपाळगड हा असाच आणखी एक दुर्दैवी किल्ला आहे. पश्‍चिम किनारपट्टीवरील सर्वांत जुने व प्रसिद्ध बंदर असणार्‍या दाभोळ बंदरावरील व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत अचूक जागी गोपाळगड बांधण्यात आला आहे. खाडीच्या मुखातून प्रवेश करणार्‍या सर्व जहाजांवर तोफांचा अचूक मारा करता येईल, अशा मोक्याच्या ठिकाणी अंजनवेल येथे हा किल्ला आहे. म्हणून याला ‘अंजनवेलचा किल्ला’ असेही म्हणतात. सरकारी अनागोंदी कशी असते, हे या किल्ल्यासंदर्भात प्रकर्षाने लक्षात येते. साडेआठ एकरांत असलेला हा किल्ला तटबंदी, बुरूज, दरवाजे, सदर, विहिरी असे सर्व दुर्गावशेष आजही शिल्लक असताना गवताळ कुरण म्हणून ३00 रुपयांना विकण्यात आला. बेवारस मालमत्ता म्हणून सातबारा उतार्‍यावरील ८२ क्रमांकाचा भूभाग विकला. ज्यांनी विकत घेतला, त्यांनी यावर १५ लाख रुपयांचे कर्जही काढले आहे. एका चुकीमुळे किल्ला बेवारस म्हणून विकला काय जातोय! आणि सातबारा नोंदीवर जिथे गोपाळगड आहे, तिथे प्रत्यक्षात ८ एकरांचा फक्त कातळ आहे. याला तुम्ही काय म्हणणार? 
चिपळूणकडून वाहत येणार्‍या वसिष्ठी नदीच्या मुखावरील टेकडीवर हा गोपाळगड आहे. त्याच्या तीन बाजूंनी पाण्याचा वेढा आहे. पूर्वेकडे गडाचे महाद्वार असतानाही २00८मध्ये गड विकत घेणार्‍या मालकाने दक्षिण तटाला मोठे भगदाड पाडून आंब्याच्या ट्रक वाहतुकीला सोपे जावे म्हणून ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला आहे. पश्‍चिमेकडील दरवाजालाही मालकाने लोखंडी गेट लावल्याने आपणाला त्यावर चढूनच किल्ल्यात जावे लागते. २२ फूट उंची व ८ फूट रुंदी असणार्‍या तटबंदीवर चढून आत जाताना खूप कसरत करावी लागते. गडाला १२ बुरूज, दोन प्रवेशद्वार आहेत. तरीही हे गवताळ कुरण, बेवारस मालमत्ता कशी काय होऊ शकते, हे फक्त शासनालाच माहीत! असाच हर्णे बंदराजवळचा गोवागड मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने काही वर्षांच्या कराराने सरकारकडून घेतलेला आहे. लवकरच या जागेवर हॉटेल होण्याची शक्यता आहे. 
वाई तालुक्यातील भोजराजाच्या काळातील पांडवगड हाही असाच आणखी एक दुर्दैवी किल्ला. मांढरदेवी जवळच्या या किल्ल्यावरील २२ एकर जागा शेर वाडिया या पारशी गृहस्थाने खरेदी केली आहे आणि त्याने गडावर ‘खासगी क्षेत्र, परवानगीशिवाय कोणी फिरू नये’ अशी पाटीही लावलेली आहे. तो त्याच्या घरात एकटाच किल्ल्यावर गेली १५-२0 वर्षे राहतो आहे. 
शासन एकीकडे काही किल्ल्यांवर करोडो रुपये दुर्गसंवर्धनासाठी खर्च करते आहे. उदा. भूदरगड-१ कोटी ५0 लाख, राजगड-१ कोटी ५0 लाख, सिंहगड-१ कोटी ३0 लाख, विशाळगड-१ कोटी, तोरणा १ कोटी इत्यादी आणि दुसर्‍या बाजूला ही अशी परिस्थिती आहे. अनेक किल्ले खासगी अतिक्रमणांमुळे नष्ट होतील की काय, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत तर झोपड्यांच्या आक्रमणांनी कहर केला आहे. वरळी, शिवडी, शीव, वांद्रे, धारावीचा काळा किल्ला, माहीम या किल्ल्यांची आजची परिस्थिती आपण कल्पना करू शकणार नाही, इतकी खालावली आहे. झोपड्यांआड लपलेली तटबंदीची भिंत आपणाला आज शोधावी लागते. आहे की नाही दयनीय अवस्था?
विशाळगड, मलंगगड यांच्यावर मुस्लिमांनी आक्रमणे केली आहेत. हे आता किल्ले न राहता बकरू, कोंबड्या मारण्याची, कापण्याची आणि दारू पिण्याची ठिकाणे बनली आहेत. या दोन्ही किल्ल्यांवर इतकी दुर्गंधी निर्माण झाली आहे, की खरा किल्लेप्रेमी अशा ठिकाणी जाण्याचे टाळू लागला आहे. 
काही किल्ल्यांवर मंदिर बांधण्यासाठी तटबंदी फोडून रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. यात शहाजीराजांनी जेथे ८ वर्षांच्या मुर्तजाला मांडीवर घेऊन स्वतंत्र राज्यकारभार केला, तो पेमगिरी आणि फिरंगोजीने ५५ दिवस शाहिस्तेखानाला जिंकून दिलेला संग्रामदुर्ग यांचा प्रामुख्याने समावेश होतो. विकासाच्या नावाखाली अशी तटबंदी फोडणे हे चुकीचेच आहे. 
अनेक किल्ल्यांवर आजही मोठय़ा प्रमाणात वस्ती असल्याने तेथे थेट वरपर्यंत एसटी जाते. यात भूदरगड, वारुगड, पारगड अशा किल्ल्यांचा समावेश होतो. गडांच्या पायर्‍यांपर्यंंत अनेक ठिकाणी घाटरस्ते फोडून गाडीमार्ग करण्यात आला आहे. यात शिवनेरी, सिंहगड, पुरंदर, लोहगड यांचा समावेश होतो. याने आपण नेमके काय साध्य केले आहे? पर्यटन वाढविणे हा उद्देश आहे, की मिळणारा निधी वापरायचा, हा दृष्टिकोन आहे? 
छत्रपती शिवराय हे जसे राजकर्त्यांच्या राजकारणाचा विषय झाले आहेत, तसेच आता किल्ल्यांचाही वापर राजकारणासाठी होऊ लागला आहे. खरी तळमळ यात कुठेच दिसत नाही. मोठी वैभवशाली परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात हे घडत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. म्हणूनच दुर्गसंवर्धनाच्या क्षेत्रातील प्रत्येकाने आता एकत्र येऊन हे रोखण्यासाठी संघटित पाऊल उचलण्याची त्रिवार गरज आहे.
(लेखक दुर्गप्रेमी आहेत.)