शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

आनंद परतणारच..

By admin | Updated: November 29, 2014 14:53 IST

अपेक्षेप्रमाणे नॉर्वेच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने विश्‍वनाथन आनंदला पराभूत करून विश्‍वविजेतेपद राखले. गेल्या वेळी आव्हानवीर म्हणून आलेल्या कार्लसनने विश्‍वविजेतेपदावरची दावेदारी कायम राखली. या वेळची लढत अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होती. चौसष्ट घरांच्या या खेळातील विविध बाजूंचा हा लेखाजोखा..

 पवन देशपांडे

 
'कॅच विन मॅच’ ही क्रिकेटची थिअरी. एखाद्या फलंदाजाचा एक ‘कॅच’ सोडणेही प्रतिस्पर्धी संघाला महाग ठरू शकते; कारण ती संधी गमावणे म्हणजे विजयाची एक संधी दवडण्यासारखेच असते. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने २६४ धावांचा विश्‍वविक्रम केला. त्या सामन्यात श्रीलंकन संघाने त्याच्या तीन ‘कॅचेस’ सोडल्या होत्या. कोणत्याही खेळाला ‘कॅच विन मॅच’ ही थिअरी लागू होते. बुद्धिबळातही तेच असते. बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या ११ लढतींत हेच दिसून आले.  आनंदने केलेल्या चुका ‘कॅच’ करण्याची एकही संधी कार्लसनने सोडली नाही. दुसरीकडे आनंद मात्र चुका हेरण्यात - ‘कॅच’ करण्यात कमी पडला.
पहिला सामना बरोबरीत सुटला; पण त्यातही आपण मिडल गेममध्ये फारशा चांगल्या चाली रचल्या नसल्याची कबुली आनंदने दिली होती. त्यानंतर दुसराच सामना कार्लसनने जिंकला. याही सामन्यात आनंदने एक ब्लंडर केली आणि ती संधी कार्लसनने सोडली नाही. आनंदने टाकलेल्या वजिराच्या चालीवर त्याने खूप विचार केला आणि सामनाच जिंकला. त्या रात्री आनंद कदाचित झोपला नसावा. आनंदने दुसर्‍या सामन्यातील चूक लगेच सुधारली. त्याने कार्लसनला तिसर्‍याच सामन्यात जमिनीवर आणले. तिसर्‍या सामना हारल्यानंतर कार्लसनने म्हटले होते, ‘‘सामन्याआधी खरं तर मी खूप तयारी केली होती; पण आनंद सरस ठरला.’’ ते खरेच होते. आनंदने केलेला सराव त्या दिवशी कार्लसनवर भारी ठरला. एका प्याद्याभोवतीच हा सामना फिरला. कार्लसनला शेवटपर्यंत बरोबरीही गाठता आली नव्हती. त्यानंतरच्या प्रत्येक सामन्यात कार्लसन खूप नेटाने लढण्याचा प्रयत्न करीत होता. चौथा आणि पाचवा सामना बरोबरीत सुटला; पण सहाव्या सामन्यात आनंदने हातची संधी दवडली. एवढेच नाही, तर तो नंतर घोडचूकही करून बसला. त्याचा फायदा कार्लसनने घेतला आणि एका गुणाने आघाडी घेत सामना जिंकला. काळ्या मोहर्‍या असूनही सहाव्या सामन्यात जिंकण्याची संधी आनंदकडे होती. सामन्यानंतर कार्लसननेही आपण घोडचूक केली होती, अशी कबुली दिली होती; पण आनंदला हे ‘गिफ्ट’ स्वीकारता आले नाही. त्यानंतरचे चार सामने बरोबरीत सुटले. अनेकदा आघाडी घेण्याची संधी हाती येऊनही आनंदला ती हेरता आली नाही. अगदी दहाव्या सामन्यातही आनंदला कार्लसनला पराभूत करून गुणांमध्ये बरोबरी साधण्याची हातची संधी साधता आली नाही. बर्लिन बचावात काळ्या मोहर्‍या घेऊन खेळणे आणि जिंकणे हे तसे अशक्य कोटीतले काम आहे. अकराव्या सामन्यात बर्लिन बचावाने खेळणे आनंदसाठी म्हणूनच फायद्याचे ठरले नाही. शिवाय, त्याने डावाच्या अखेरीस कार्लसनच्या उंटाच्या बदल्यात हत्तीची मारामारी करून मोठी चूक केली. तसे केले नसते, तर कदाचित हा सामना बरोबरीत सुटून जगज्जेतेपदाची अखेरची आणि १२वी लढत ही सर्वांसाठी उत्सुकतेची ठरली असती; पण कार्लसनने अकराव्या लढतीतच आनंदला चूक करण्यास भाग पाडले. 
कार्लसन हा एंडगेमचा बादशाह मानला जातोय. कोणताही डाव अखेरपर्यंत घेऊन जायचा आणि प्रतिस्पध्र्याला आपल्या जाळ्यात अडकवायचे, ही त्याची रणनीती. जगज्जेतेपदाचा अखेरचा सामना पराभूत झाल्यानंतर आनंदनेही हे कबूल केले. गॅरी कॉस्पोरोवच्या मते, कार्लसनचा गेम हा कॉर्पोव आणि बॉबी फिशरसारखा आहे. तो अभिजात खेळतो. तो डावातील ‘पोझिशन’वर विश्‍वास ठेवतो आणि डाव अखेरपर्यंत घेऊन जायला त्याला आवडते. आनंदही २0१२मध्ये एका मुलाखतीत म्हटला होता, ‘कार्लसन खरेच काहीही करू शकतो.’ त्याच्या याच ‘काहीही’ खेळण्याची प्रचिती आनंदला जगज्जेतेपदाच्या गेल्या दोन मालिकांमध्ये आली असेल. 
सोचीमध्ये झालेल्या जगज्जेतेपदासाठीच्या लढतीत कार्लसन पुन्हा एकदा सरस ठरला. विश्‍वविजेतेपद पटकावयाची संधी गेल्यानंतर आनंदला एका पत्रकाराने अनेक भारतीयांच्या मनातील प्रश्न विचारलाच.. ‘आता तू बुद्धिबळ सोडणार का?’ खरे तर खेळाडूच्या बाबतीत असा प्रश्न विचारणो किंवा तसा मनातही येणो गैर.  त्याने एकाच शब्दात उत्तर दिले. ‘नाही.’ आनंदचे हे उत्तर ऐकल्यानंतर सोचीचा ‘तो’ अखेरचा सामना पाहायला आलेल्या सर्वांनी आनंदला ‘स्टँडिंग ओव्हेशन’ दिले, ते उगाच नाही. आनंदचा स्वभाव शांत; पण तो एक बलाढय़ लढवय्या. तो पुन्हा एकदा उभा राहील. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये जगज्जेतेपद गमावल्यानंतर तो उभा राहिला. पुन्हा नव्या दमाने मॅग्नसला झुंज दिली. ती अयशस्वी ठरली असली, तरी आनंद उभा राहील, ही बुद्धिबळ जगातील त्याच्या तमाम चाहत्यांना खात्री आहे. 
(लेखक लोकमत मुंबई आवृत्तीमध्ये 
उपमुख्य उपसंपादक आहेत.)