शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन आणि ब्राऊन

By admin | Updated: March 5, 2016 14:56 IST

1. शून्यातून नवे बांधायचे. 2. जे आहे ते अजागळ शहर पाडून पुन्हा नवे रचायचे 3. जे आहे ते शक्य तिथे, शक्य तेवढे सुधारायचे - शहरे ‘स्मार्ट’ होण्याच्या जागतिक महामार्गावरले हे तीन उपरस्ते आहेत. जगभरातल्या वेगवेगळ्या शहरांनीे आपापल्या स्थानिक गरजांनुसार केलेले प्रयोग वेगळेच!

- अपर्णा वेलणकर
 
 रिओ-द-जानेरिओमधली सगळ्यात मोठी झोपडपट्टी मोर्रो अलेमाओ. ब्राझीलच्या भाषेत या ‘फवेला’च्या डोक्यावरून जाणा:या या केबल कार्स. शहर स्मार्ट झाले आहे, झोपडपट्टी तशीच आहे, पण मध्यममार्ग शोधला आहे!
 
जन कमी करण्याच्या जाहिराती असोत, मेकअपने चेह:यावरले व्रण झाकून सौंदर्य खुलवण्याचे दावे असोत, केसांची ठेवण बदलून एकदम तरुण आणि उत्साही दिसण्याची खात्री असो वा कपडय़ांच्या निवडीत एकदम बदल करून तुमचे वय खात्रीने कमी करून दाखवण्याची जादू; आपणा भारतीयांना ‘मेकओव्हर’ या प्रकरणाची भारी हौस आणि उत्सुकताही.
मेकओव्हर म्हणजे कसे जुने नकोसे असलेले सगळे फटाफट बदलून, झाकून, झटकून, दडवून एकदम नवाकोरा कायाकल्पच!
- तोही थेट आणि झटपट.
हे ‘थेट आणि झटपट’ दावेच भारतातल्या स्मार्ट नगरनियोजनाच्या प्रक्रियेतले मोठे अडथळे आहेत, असे तज्ज्ञ मानतात. 
मुंबई-पुण्यासारख्या बेसुमार वाढलेल्या भारतीय शहरांचे कोसळते डोलारे अनुभवत असलेल्या नागरिकांना अचानक आपले शहर स्मार्ट कसे, कोणत्या मार्गाने होईल, हेच समजत नाही. स्मार्टच्या व्याख्येत दिसणारे आधुनिक शहराचे झुळझुळीत, देखणो आणि अत्यंत कार्यक्षम रुपडे आपल्या शहरात अवतरायचे तर कागदावर बरबटलेले जुने चित्र पुसून काढावे, तसे आत्ताचे शहर त्यातल्या गल्ल्या-बोळ-इमारतींची जंगले-किचकिचाटाच्या वसाहती आणि वाहतूक मुरंब्यांसकट पुसूनच टाकावे लागेल, असे त्यांना वाटते.. आणि हे केवळ अशक्य आहे, हे तर उघडच दिसत असते.
प्रत्यक्षात हे असे जुने सरसकट पुसून, झटकून, मोडून टाकणो म्हणजे शहराने ‘स्मार्ट’ होणो नव्हे. भारताआधी आधुनिक नगरनियोजनाचे आव्हान पेलणो भाग झालेल्या देशांमध्येही हे प्रश्न आले. आहे ते तसे असणार आणि तरीही त्यावर स्मार्ट लेअर चढवता येणार, असलेल्या गैरसोयी किमान सुसह्य करता येणार या दिशेने झालेले बरेच स्मार्ट प्रयत्न जगभरच्या शहरांमध्ये दिसतात.
एकच उदाहरण घ्यायचे तर ब्राझीलमधल्या रिओ-द-जानेरिओचे पाहा. येत्या ऑगस्ट महिन्यात होणा:या ऑलिम्पिकचा यजमान असलेल्या या शहरातल्या डोंगर उतारांवर आजही झोपडय़ांची दाट वस्ती आहे. ब्राझीलमध्ये झोपडय़ांच्या वस्तीला फवेला म्हणतात. हे सारे फवेला अमली पदार्थाची तस्करी आणि गुन्हेगारीसाठी बदनाम आहेत, तरीही हे शहर ‘स्मार्ट’ नगरनियोजनामध्ये अग्रणी आहे. 
शहर विकासासाठी झोकून दिलेले या शहराचे महापौर एदुआदरे पेस यांनी एका टप्प्यावर जाहीर केले, की शहरातल्या सगळ्या झोपडपट्टीधारकांचा प्रश्न एकाचवेळी सोडवणो शहर प्रशासनाला शक्य नाही; पण जोवर तो सुटत नाही तोवर डोंगर उतारावरल्या झोपडपट्टीतील नागरिकांना उर्वरित शहराशी आणि नागरी सुविधांशी जोडण्यासाठी केबल कारची व्यवस्था केली जाईल. 
2क्11 मध्ये हा केबल कारचा प्रयोग प्रत्यक्षात सुरू झाला. एरवी श्रीमंत पर्यटकांना उंच डोंगरमाथ्यांवर विनासायास घेऊन जाण्यासाठी वापरली जाणारी ही सुविधा रिओने झोपडपट्टीतल्या अति-गरीब नागरिकांर्पयत तातडीच्या आरोग्यसुविधांपासून समुद्री वादळे, भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींप्रसंगीची मदत पोचवण्यासाठी उभारली आहे. सतत ये-जा करणा:या या केबल कार्समुळे एरवी शहरापासून तुटलेल्या फवेलांमधल्या नागरिकांचा वावर अधिक सुकर आणि स्वस्त झाला आहे. म्हणजे अन्य शहरात जशी मेट्रो, तशा या डोंगरावरच्या झोपडपट्टय़ांसाठी केबल कार्स.
या नव्या ‘कनेक्टिव्हिटी’मुळे इथल्या किचाटात राहणारे नागरिक अन्य शहरात उपलब्ध ‘स्मार्ट सुविधां’पासून वंचित राहत नाहीत. शिवाय रिओच्या या बदनाम वस्त्यांमधला ‘क्राईम रेट’ही गेल्या चार वर्षात खाली आल्याचे पुरावे मिळतात.
अनेक वर्षाच्या चुकीच्या विकास आराखडय़ांमुळे गंभीर आणि गुंतागुंतीचे बनलेले शहर व्यवस्थापनातले प्रश्न (तात्पुरत्या का असेना) स्मार्ट योजनेमुळे कसे सुसह्य करता येऊ शकतात याचे हे एक उदाहरण!
स्थानिक परिस्थिती आणि गरजांनुसार स्मार्ट शहरनियोजनाचे शास्त्र दोन प्रमुख प्रकारांमध्ये विभागले गेले आहे.
1. ग्रीनफिल्ड सिटी, 2. ब्राऊनफिल्ड सिटी 
(चौकट पाहा)
- स्मार्ट होणो हा सरसकट फटाफट मेकओव्हर नव्हे. या रस्त्याला निरनिराळे उपरस्ते आहेत, त्या उपरस्त्यांना फुटलेल्या वाटा आहेत आणि या वाटचालीत अनेक टप्पे आहेत! शिवाय जगभरातल्या वेगवेगळ्या शहरांनीे आपापल्या स्थानिक गरजांनुसार केलेले प्रयोगही.
त्याबद्दल यापुढल्या लेखांमध्ये.
 
ग्रीनफिल्ड सिटी
शून्यापासून सुरुवात करून (मोकळ्या जमिनीवर) पूर्णत: नव्याने वसवलेले शहर म्हणजे ग्रीनफिल्ड सिटी.
फायदे - 1. या प्रकारच्या शहरनियोजनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुनियोजित, परस्परांमध्ये गुंफलेला आणि सुसूत्र वापर करता येऊ शकतो.
तोटे - 1. मोठय़ा प्रमाणावर भूसंपादनाचे प्रश्न, त्यातले अडथळे  स्थानिक पर्यावरणाचे प्रश्न.  2. शहर निर्माणासाठी लागणारा अवाढव्य निधी उभारण्याचे आव्हान. 
3. सगळीच योजना नव्याने आखावी लागणार असल्याने नियोजनकारांची दूरदर्शी क्षमता हा कळीचा मुद्दा. ते बिनसल्यास सगळेच नियोजन फसण्याची शक्यता.
 
ब्राऊनफिल्ड सिटी
अस्तित्वात असलेल्या महानगरांचे संपूर्णत: अगर भागश: आधुनिकीकरण करणो, प्राप्त शहरनियोजनाच्या व्यवस्थेमधले शक्य ते (निदान तेवढे) घटक ‘स्मार्ट’ तंत्रज्ञानाच्या वापराने अद्ययावत करणो म्हणजे ब्राऊनफिल्ड सिटी. 
यामध्ये दोन प्रकार असतात.
1. रिडेव्हलपमेण्ट
शहरातले काही निवासी/व्यापारी भाग पाडून पुन्हा नव्याने बांधणो. 
जुन्या घरांच्या जागी उभ्या राहात असलेल्या  टोलेजंग इमारतींच्या अनुभवातून या प्रकाराशी आपण परिचित आहोत. पुनर्विकासाच्या अशा योजना मोठय़ा भागासाठी एकाचवेळी राबवणो यात अपेक्षित आहे.
2. रेट्रोफिटिंग
शहरातले काही भाग निवडून त्यांच्या व्यवस्थेमध्ये ‘स्मार्ट सोल्यूशन्स’चे अस्तर तयार करणो म्हणजे रेट्रोफिटिंग. 
सोप्या शब्दात सांगायचे तर पाडापाडी अगर नवे बांधकाम न करता अस्तित्वात असलेल्या रचनेमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिकच्या सुविधा निर्माण करणो.
उदाहरणार्थ फ्री वाय-फाय झोन्स, वाहतूक-पार्किंग-कचरा व्यवस्थापन आदि प्रक्रिया ‘स्मार्ट’ करणो, ई-नियंत्रणातून पाणी-विजेच्या वितरण/वापराला शिस्त लावणो इ.
भारतातल्या संकल्पित स्मार्ट सिटीजमध्ये हा मार्गच मोठय़ा प्रमाणावर वापरला जाणार आहे.
 
 
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com