शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

द ग्रेट एस्केप

By admin | Updated: April 12, 2015 16:30 IST

आंतरराष्ट्रीय पेचप्रसंगात अडकून कोंडी झालेल्या आपल्या नागरिकांना सुखरूप सोडवून आणणो हे कोणत्याही सरकारचे कर्तव्यच असते. - ते भारताने केले, पण ते ज्या तडफेने आणि अचूकतेने केले, त्याने जगभरात देशाची मान उंचावली आहे.

ओंकार करंबेळकरआंतरराष्ट्रीय पेचप्रसंगात अडकून कोंडी झालेल्या आपल्या नागरिकांना सुखरूप सोडवून आणणो हे कोणत्याही सरकारचे कर्तव्यच असते. - ते भारताने केले, पण ते ज्या तडफेने आणि अचूकतेने केले, त्याने जगभरात देशाची मान उंचावली आहे.---------------------अरब स्प्रींगनंतर आफ्रिकेतील काही देश आणि मध्यपुर्वेतील काही देशांमध्ये गेली अनेक वर्षे अशांतता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये होणा:या बदलांखेरीज भारताचा या तणावाशी थेट संबंध आला नाही. इजिप्त, सीरिया अशा देशांमध्ये होणा:या घटनांप्रमाणोच येमेनमध्येही अंतर्गत यादवी आणि त्यामुळे तणावाचे वातावरण आहे इतकाच मर्यादीत अर्थ भारतीय घेत होते. बावीस वर्षे येमेनच्या राष्ट्राध्यक्षपदी असणा:या अली अब्दुल्लाह सालेह यांना पदावरून हटविले आणि नवे प्रशासन आले तेव्हाही भारतीयांचे त्याकडे फार लक्ष वेधले गेले नाही. गेल्या आठवडय़ात मात्र चित्र बदलले. भारताने राबविलेल्या एका मोहिमेने संपुर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. ती मोहिम होती ऑपरेशन राहत. साधारण आठवडय़ाभराच्या काळामध्ये भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रलय, वायूदल, नौदल आणि एअर इंडियाने संयुक्तपणो राबविलेल्या या मोहिमेत यादवीग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या 4क्क्क् हजारहून अधिक भारतीय आणि काही परदेशी नागरिकांचीही सुटका केली आहे. अत्यंत सूत्रबद्ध, शिस्तबद्ध आणि एकही गोळी न चालवता, कोणतीही जिवितहानी न होता इतकी मोठी मोहिम भारताने राबविल्यामुळे सर्व जग आश्चर्यचकित झालेच , पण त्याचबरोबर अनेक देशांनी भारताकडे त्यांच्या नागरिकांची येमेनमधून सुटका करण्यासाठी मदतही मागितली. येमेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांमध्ये ेकेरळमधील परिचारिका, बांधकाम क्षेत्रतील मजूर, वाहनचालक आणि हॉटेलांमध्ये काम करणा:या कामगारांचे प्रमाण लक्षणीय होते. येमेनमध्ये  परिस्थिती हाताबाहेर गेलेली असताना सौदी अरेबियाने हस्तक्षेप करत बॉम्बिंग सुरु केले. मायदेशामध्ये परतणो तर सोडाच, पण आपण जिवंत तरी राहू का असे प्रश्न भारतीयांच्या मनामध्ये येऊ लागले. सौदीच्या हस्तक्षेपानंतर  भारताने वेगाने पावले उचलली. भारताच्या परराष्ट्र मंत्रलयाचे राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी स्वत: सूत्रे हाती घेतली आणि मोहिमेच्या चमूबरोबर ते जिबोटीला गेले. पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र मंत्रलय यांच्या समन्वयामुळे आणि व्ही. के. सिंग हे माजी लष्करप्रमुख असल्याने युद्धजन्य स्थितीत घेण्याचे अनेक निर्णय तातडीने घेण्यात मदत झाली. सौदी अरेबिया आणि शेजारील सर्व देशांशी भारताचे मुत्सद्दी आणि इतर पातळ्य़ांवर चांगले संबंध आहेत. हे संबंधच उपयोगी पडले आणि भारतीयांना सुखरूप परत आणण्यात ही मोहीम यशस्वी झाली.  एअर इंडियाच्या जिबोटी-सना-जिबोटी उड्डाणांमधून मोठय़ा प्रमाणात नागरिकांची वाहतूक करण्यात आली. त्याचवेळेस भारतीय नौदलाच्या आयएनएस तर्कश, आयएनएस सुमित्र आणि आयएनएस मुंबई या नौकांनी समुद्रमार्गे भारतीयांना सोडवून जिबोटीला आणले गेले. गेल्या काही वर्षामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत व बचावकार्यात काम केल्याने भारताच्या सैन्यदलांमध्ये एकप्रकारची अनुभवाधारीत व्यवस्थाच तयार झाली आहे. नैसर्गिक आपत्तीत मदत करण्याची सवय व सरावही झालेला आहे. भारताने यापुर्वी अनेकदा नागरिकांना कठिण परिस्थितीतून सोडविले आहे. 2क्क्3साली अमेरिकेने इराकवर हल्ले केल्यावर, त्यानंतर 2क्क्6साली लेबनॉन व 2क्11मध्ये लिबियातून भारताने नागरिकांना सुखरूप सोडवून आणले होते. युध्दजन्य परिस्थितीत परदेशात अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका करणारी सर्वात मोठी मोहिम भारताने 199क्मध्ये राबवली होती. त्यावेळेस दोन महिन्यांच्या कालावधीत इराक व कुवैतमधून एक लाख दहा हजार नागरिकांना परत आणले होते. आंतरराष्ट्रीय पेचप्रसंगात अडकून कोंडी झालेल्या आपल्या नागरिकांना सुखरूप सोडवून आणणो हे सरकारचे कर्तव्यच असते. ऑपरेशन राहत यशस्वी झाले ते सैन्यदलांचे अविश्रंत परिश्रम, नेमके नियोजन आणि लाल फितीला दूर ठेऊ शकलेल्या वेगवान निर्णय प्रक्रियेमुळेच!येमेन : परिस्थिती का चिघळली?काही तज्ज्ञांच्या मते हौती बंडखोरांचे मूळ 9क्च्या दशकात वायव्य येमेनमध्ये प्रभावी असणा:या शबाब-अल-मुमानीन संघटनेमध्ये आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली 2क्क्3साली इराकवर हल्ला करण्यात आल्यानंतर या संघटनेचा एक नेता हुसैन-अल-हौती याने विरोध प्रकट केला होता. त्याने अमेरिका आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सालेह यांच्याविरोधात निदर्शने केली. मात्र येमेनी संरक्षणदलाच्या हल्ल्यात त्याला ठार मारण्यात आले. त्याच्या नावावरून या बंडखोराच्या गटाला हौती असे नाव पडले आहे. सध्या 33 वर्षाचा अब्दुलमलिक अल-हौती या गटाचे नेतृत्व करत आहे. हौती बंडखोरांच्या मते आताचे हादी सरकार भ्रष्ट असून अधिकारांचे विभाजन योग्यरित्या झाले नसल्याचे कारण पुढे करत हौती बंडखोरांनी यादवी सदृ्श्य स्थिती निर्माण केली.  त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर राष्ट्राध्यक्ष अब्द्राबुह मन्सूर हादी यांनी सौदी अरेबियाचा रस्ता धरला. येमेनमधील बंडखोरांना आटोक्यात आणण्यासाठी सौदीने सरळ हस्तक्षेप करत बंडखोरांवर हल्ले सुरु केले. त्यामुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आणि सामान्य येमेनी नागरिक व इतर देशांतील नागरिकांच्या जिविताचा प्रश्न निर्माण झाला. येमेनमधील लढाईमध्ये आता वेगाने घडामोडी घडत असून बॉम्बमुळे अनेक ठिकाणी इमारती, शाळा उद्धवस्त होण्याच्या घटना घडल्या आहेत. हौती हा शियांचा गट असल्याने इराणही यामध्ये उतरण्याची शक्यता आहे.येमेन आणि वासुदेव बळवंतयेमेन हा तसा पाहायला गेल्यास मध्यम आकाराचा देश आहे. भूभागाच्या बाबतीत जगात त्याचा क्रमांक 5क्वा आहे. मात्र त्याचे स्थान आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्वाच्या ठिकाणी आहे. एडनचे आखात (अरबी समुद्र) आणि तांबडा समुद्र यांना जोडणा:या चिंचोळ्य़ा पट्टीची जागा या येमेनजवळ आहे. या चिंचोळ्य़ा जलपट्टय़ाला बाब-अल-मनुदाब असे नाव आहे. याच मार्गावरून  मोठय़ा प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार होतो. तेलाची वाहतूकही येथूनच होते. इतकेच नव्हे तर तांबडय़ा समुद्रातील काही बेटांवरही येमेनचा अधिकार आहे. त्यामुळे येमेनचे महत्व अनन्यसाधारण आहे. भारतीयांसाठी एडनची आणखी एक व अत्यंत महत्वाची आठवण आहे, ती म्हणजे आद्य क्रांतीकरक वासुदेव बळवंत फडके यांची. ब्रिटीश सरकारने त्यांना हद्दपार करून एडनच्या तुरुंगात शिक्षेसाठी ठेवले होते. एडनच्या तुरुंगातून ते बाहेर पडण्यात यशस्वीही झाले होते, मात्र त्यांना पुन्हा पकडण्यात आले. (लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीमध्ये उपसंपादक आहेत)