शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भूगोल ते खगोल

By admin | Updated: May 28, 2016 19:02 IST

क्षितिजापलीकडच्या अदृष्टाची ओढ माणसाला नेहमीच वाटत आली. गेल्या शंभर-दीडशे वर्षात त्या क्षितिजाने सारं आभाळ कवेत घेतलं. विमानांनी पृथ्वीकडे अलिप्तपणो पाहू दिलं. ग्रहता-यांबद्दल कुतूहल बाळगणा-या माणसाला मग अंतराळाचे वेध लागले

डॉ. उज्ज्वला दळवी
(लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये वास्तव्याला होत्या. ‘मानवाचा प्रवास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.)
 
ही वाट दूर जाते
 
क्षितिजापलीकडच्या अदृष्टाची ओढ माणसाला नेहमीच वाटत आली. गेल्या शंभर-दीडशे वर्षात त्या क्षितिजाने सारं आभाळ कवेत घेतलं. विमानांनी पृथ्वीकडे अलिप्तपणो पाहू दिलं. ग्रहता-यांबद्दल कुतूहल बाळगणा-या माणसाला मग  अंतराळाचे वेध लागले. 
 
अंतरिक्ष प्रवासात सुनीताला चालण्या-झोपण्या-खाण्यापिण्याच्या नव्या पद्धती शिकाव्या लागल्या. वजनरहित अन्नकण उडून महत्त्वाच्या यंत्रंत घुसले तर अनर्थ होऊ शकतो. निर्वजनी अवस्थेत जिभेची चवही जाते. बुद्धिमान यान-यात्र्यांनी त्या दोन्हीवर मिळून एकच रामबाण तोडगा काढला. मक्याच्या चपात्यांवर दाट-चिकट-चमचमीत चटण्या-सॉस चोपडून त्याच्यावर काकडी-टोमॅटो-चिकनचे तुकडे चिकटवून त्यांनी नाना चवीपरींचे घास बनवले. यान-यात्रेकरूंना पाणी बंद बाटल्यांतून नळीने ओढून प्यावं लागे.  प्रात:विधीसाठीही अभिनव ‘शोषक’ तंत्र सोसावी लागत. त्या अडचणींत भर म्हणून भिन्न देशांच्या-वर्णांच्या-स्वभावांच्या प्रवाशांना लहानशा जागेत कित्येक दिवस एकत्र राहावं लागलं. वैयक्तिक आयुष्यातही ‘वसुधैव कुटुम्बकम’ तत्त्व पाळणा:या सुनीताला त्यात आनंदच वाटला.
 
तराळ प्रवासाची संधी मिळाली तर सरळ जागा पकडायची! 
तिथे सीटसाठी घासाघीस कसली? पहिली अंतरिक्ष प्रवासी शिक्षिका म्हणून ख्रिस्टा मॅकॉलिफची निवड झाली होती. अकरा हजार स्पर्धकांमधून फक्त दोघींनाच निवडलं होतं. ख्रिस्टाच्या विद्याथ्र्यासोबत सगळा देशच मोठय़ा उत्कंठेने तिचं उड्डाण टीव्हीवर बघत होता. तिची दोन मुलं अंतरिक्षतळावर तिला पोचवायला गेली होती. यान वेळच्या वेळी उडालं. ते दिसेनासं होईपर्यंत डोळे भरून पाहायला मुलं थांबून राहिली. आणि अवघ्या दोन मिनिटांतच सा-यांच्या डोळ्यांदेखत मोठा स्फोट झाला. यानाच्या ठिक-या झाल्या. सात प्रवाशांपैकी कुणीही बचावलं नाही.
त्यानंतर सात वर्षांनी, 2003 साली कोलंबिया नावाच्या यानाची अशीच शोकांतिका झाली. आपली कल्पना चावला त्यातच होती. अंतराळ प्रवासाच्या इतिहासात एकूण विसाहून अधिक देदीप्यमान मानवी रत्नं प्राणाला मुकली आहेत. कशासाठी केला होता तो जीवघेणा खटाटोप?
पृथ्वी हा मानव्याचा पाळणा आहे. म्हणून काय जन्मभर पाळण्यातच राहायचं? 
पहिलं विमान 19क03 साली उडालं. तेव्हापासूनच देशोदेशीच्या गणितज्ञ-तंत्रज्ञांनी अंतरिक्ष भरारीसाठी गुरु त्वाकर्षणाचं जोखड झुगारायचं गणित मांडलं, रॉकेट्सचे आराखडे बनवले, अधिकाधिक प्रगत रॉकेट्स बनवली, उडवली. त्या संशोधनांचा खर्च विद्यापीठांना आणि खासगी संस्थांना परवडत  नव्हता. त्या शोधांचं लष्करी महत्त्व जाणून हिटलरने त्यांना प्रोत्साहन दिलं. बेचाळीस साली पहिलं जर्मन रॉकेट अंतरिक्ष सीमेवर पोचलं. दुस-या महायुद्धानंतर अनेक राज्यसत्तांनी अंतरिक्ष विज्ञानाला पाठबळ दिलं. त्या बळावर विज्ञानाने पृथ्वीच्या वातावरणाचं कवच भेदून आधी यंत्र, मग प्राणी अंतरिक्षात पाठवले. त्यानंतर माणसाची पाळी आली. अंतरिक्षयान, अंतराळयात्री, अवकाशनाविका अशा सा-यांतले पहिले नंबर रशियाने पटकावल्यावर शीतयुद्धकाळात अमेरिकेच्या पोटात दुखलं. चंद्रावरची स्वारी केवळ अहमहमिकेमुळे झाली. त्यानंतरच्या अंतराळवा-या मात्र  विज्ञान संशोधन आणि लष्करी वर्चस्व एवढय़ाच हेतूंनी झाल्या. शीतयुद्ध संपल्यापासून अंतरिक्ष प्रकल्प आंतरराष्ट्रीय सहकार्यानेच चालला. इतर ग्रहगोलांवर ऊर्जा, पाणी आणि उपयुक्त खनिजांचा शोध सुरू झाला. मानवनिर्मित उपग्रहांनी पृथ्वीवर  मोबाइल, आंतरजाल, जीपीएससारख्या दूरसंवाद-सुविधा रु जवल्या. परग्रहावर दोस्त मिळायची आशा पालवली. त्यांना साद घालायला अंतराळकुपीतून सूरश्री केसरबाईंची भैरवी अवकाशात, सूर्यमालिकेच्या पार पाठवली गेली. त्याशिवाय अंतराळातल्या हानिकारक किरणांचा अभ्यास झाला. चंद्रावरच्या स्वारीनंतरचे सगळे प्रदीर्घ मानवी अंतराळ प्रवास पृथ्वीभोवतीच झाले. स्पेसलॅब-स्कायलॅबसारखे उपग्रह आणि मीरसारखे तरंगते विज्ञानतळ संशोधनासाठी काही वर्षं पृथ्वीच्या भ्रमणकक्षेत ठिय्या देऊन बसले. त्र्याऐंशी सालापासून नानादेशींच्या अंतराळ-गवंडय़ांनी अनेक चकरा मारून, तुकडय़ातुकडय़ांनी सांधून एक नवं संशोधनतळ उभारलं. सतरा देशांच्या सहकार्याने घडवलेल्या त्या विज्ञानतळावर साधारण तेरा शास्त्रज्ञांच्या राहण्याचीही सोय आहे. तो तळ निदान 2क024 पर्यंत कार्यरत राहावा अशी शास्त्रज्ञांची अपेक्षा आहे.   
भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स जवळजवळ वर्षभर त्या संशोधनतळावर राहिली. संशोधनासाठी वेगवेगळ्या वेळी मिळून ती सुमारे एकावन्न तास यानाबाहेर अंतराळात चालली. ते सगळे अनुभव तिने नोंदून ठेवले आहेत. त्यांच्यावरून अंतरिक्षातल्या प्रवाशांच्या दिनचर्येची कल्पना येते. अंतराळात गुरु त्वाकर्षणाचा अभाव असतो.  स्नायूंचा दुबळेपणा, हाडांचा ठिसूळपणा हे त्याचे दूरगामी परिणाम टाळायला सुनीताला रोजच्या रोज धावण्या-चालण्या-वजनं उचलण्याच्या व्यायामाची दोन तास सक्त‘मजुरी’च करावी लागली. ते अंगवळणी पडायला तिने उड्डाणापूर्वीपासून  महिनाभर प्रशिक्षण घेतलं. 
उड्डाणाच्या वेळी आठ मिनिटं यानाच्या आतला दाब प्रचंड वाढला. अवजड वाहनाखाली दामटल्यागत अवस्था झाली. अनावर ओरडणा:या प्रवाशांचा पोटावरचा ताबा सुटला. त्यासाठी त्यांनी आधीपासून डायपर्स लावलेलेच होते. त्यानंतर दाब घटत-घटत गेला. एका क्षणी सुनीताचं पेन उडालं, मग सुनीता स्वत:च तरंगायला लागली आणि तरीही तत्परतेने कामाला लागली. अंतराळतळावर दिवसाचं वेळापत्रक आखीव होतं. सोबत आणलेलं टनावारी सामान जागच्या जागी लावून राहण्या-झोपण्याइतपत जागा करणं हे पहिलं काम होतं. ठरवून दिलेले वैज्ञानिक प्रयोग, व्यायाम, जेवण हे तर होतंच पण कच:याची-मलमूत्रची पद्धतशीर विल्हेवाट लावायची वेळखाऊ जबाबदारीसुद्धा होती. कामासाठी ‘खाली डोकं, वर पाय’ उडत जाताना सुनीताला सारखं गरगरत-मळमळत राहिलं. डोकेदुखीनेही सतावलं. दुस:या दिवशी मात्र उलटय़ा-सुलटय़ा-उडत्या शरीराचं डोकं ठिकाणावर आलं. त्या उलथ्यापालथ्या काळातही अनपेक्षित तांत्रिक आणीबाणीचे प्रसंग ज्ञान आणि  अनुभव पणाला लावून थंड डोक्याने निस्तरावे लागले. म्हणूनच अंतराळ प्रवास ये:यागबाळ्याचं काम नाही. तिथला प्रवासी यानाच्या गुंतागुंतीच्या यंत्रणोचा जाणकार, धीराचा आणि धडधाकट असावा लागतो. आजवर निवड झालेले बहुतेक अंतरिक्ष प्रवासी लष्करी वैमानिक किंवा कुशाग्रबुद्धी शास्त्रज्ञ होते. दीर्घकाळाच्या मोहिमांमध्ये डॉक्टरांचाही समावेश होता. 
गागारिन दोनच तास अंतराळात होता. खिडकीबाहेरचं काळंभोर नक्षत्रखचित अंतराळ त्याला त्याच्या गावच्या काळ्या शेतासारखं दिसलं. त्यानंतरच्या काही सवा:या वर्षाहून अधिक काळ चालल्या. रोजच्या प्रदक्षिणांमध्ये चोवीस तासांत अनेकदा सूर्योदय दिसे. पण तो पाहायलाही अंतरिक्ष-नाविकांना फुरसत नसे! सुनीता विल्यम्सला अंतरिक्षातून दिसला तो ‘सरहदें इन्सानोंने बनाई’ हे सांगणारा राष्ट्रातीत भूगोल. सगळ्या राष्ट्रांनी एकजुटीने राबवलेला अंतराळ प्रकल्प नक्की विधायक, मानवधार्जिणा होईल याची तिला खात्री वाटली.    
संशोधन प्रवासी शास्त्रज्ञांखेरीज बिल नेल्सन, जेक गार्नसारख्या राजकारण्यांना आणि देशोदेशींच्या काही मोजक्या नागरिकांनाही अंतरिक्ष वारीची संधी लाभली आहे. त्याशिवाय 2क्क्1 मध्ये डेनिस टिटो नावाचा करोडपती हिकमतीने आणि हिमतीने, प्रशिक्षण घेऊन, उताराचे दोनचारशे कोटी रुपये भरून अंतरिक्षातल्या विज्ञानतळावर गेला, घसघशीत भाडं भरून तिथे आठवडाभर ‘सक्तमजुरी’ करून आला. तेव्हापासून त्याच्यासारखे इतरही काही लक्ष्मीपुत्र केवळ पर्यटनासाठी आठवडा-पंधरवडा अंतराळात जाऊन आले.  तशा पर्यटकांसाठी अंतरिक्षात ‘तरत्या-फिरत्या’ खाणावळी काढायची अनेक बडय़ा कंपन्यांची धडपड चालू आहे. झणझणीत पिठलं-भाकरीचा तिथे उत्तम खप होईल. त्या यशाचा धनी व्हायला कुणी मराठी गडी पुढे येईल का?