शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

रोजच्या ‘खेळा’चा सूत्रधार

By admin | Updated: June 13, 2015 14:18 IST

सिरियल लिहिणे हे फार सोपे आहे, अशा गैरसमजाने या क्षेत्रत शिरलेले नवखे मावळे बघताबघता धारातीर्थी पडतात

त्यातले एकांकिका/दीर्घाक टी-ट्वेंटीसारखे, झटपट. नाटक/चित्रपट एकदिवसीय सामन्याप्रमाणो, ठरावीक अंत असलेले. मालिका मात्र टेस्ट मॅचसारख्या, लांबलचक.  त्यात लेखक म्हणजे तर ओपनरच. त्यामुळे त्याला तंत्र, फिटनेस  या सगळ्यांचाच सांभाळ करावा लागतो. नाहीतर अख्खी इनिंग गडबडण्याचा धोका. - भरीस भर म्हणून सेट व्हायला फार वेळ घेऊन चालत नाही. रनरेटप्रमाणो एपिसोडची गतीही राखावी लागते. रोजच्या रगाडय़ातून सुटका नाही!
 
- कौस्तुभ दिवाण
 
टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे,’ असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ‘या मनोरंजन इंडस्ट्रीला चांगल्या लेखकांची फार गरज आहे’, असा आक्रोशही सतत होत असतो. 
अगदी प्रांजळपणो सांगू का, ही ओरड चालूच राहणार. कारण ज्या प्रमाणात नवनवीन चॅनल्सची, मालिकांची निर्मिती होत आहे, त्या प्रमाणात सराईत लेखक तयार होणं अवघड आहे. नाही म्हणजे, म्हणायला नवीन लेखक शेकडय़ानं मिळतील. पण, टेलिव्हिजनच्या कार्यपद्धतीचा रगाडा यशस्वीरित्या पेलून दर्जेदार लेखन करू शकणारे कमीच.
गेल्या काही वर्षात टीव्हीची कार्यपद्धती लक्षणीयरीत्या बदलली आहे आणि निश्चितच त्याचा परिणाम कथामांडणीच्या पद्धतीवरही झाला आहे.
 बहुसंख्य चॅनल्सची चढाओढ, रोजच्या रोज रतीब घालावा लागणा:या मालिकांचा, म्हणजे रूढ भाषेत डेलीसोपचा दैनिक रगाडा ह्यांच्यामुळे कथाकथनात एकसुरीपणा येणं, विषय रटाळपणो सादर केला जाणं, कथानकात ‘पाणी घालणं’ असे प्रकार घडतातही. पण ह्या सगळ्यांवर मात करत मालिकेचा दर्जा टिकवून नावीन्य आणि सातत्य राखण्याची भिस्त असते ती लेखकावर. 
एवढा सगळा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या लेखकाला भरीस भर म्हणून  निर्मात्याचे बजेट, कलाकरांच्या तारखा (आणि कधीकधी त्यांच्या अभिनयक्षमतेच्या मर्यादाही), लोकेशनच्या मर्यादा आणि मुख्यत्वेकरून दर आठवडय़ाला हाती येणारी लोकप्रियतेची-टीआरपीची-रेटिंग्ज या सगळ्यांचा विचार करून कथानक त्या चौकटीत बसवावं लागतं. 
लेखकांचा एक चमूच कथामांडणीवर काम करत असतो. अर्थात, आम्ही लेखक मंडळी कधीच एकटी नसतो. 
निर्माते, त्यांनी नेमून दिलेले क्रिएटिव्ह हेड्स, चॅनलचे ईपीज आणि कधी कधी अनुभवी नट मंडळीही आमच्या कामात आम्हाला यथाशक्ती, यथाबुद्धी मदत करतच असतात. पण, अशाप्रकारच्या मदतीचा ओव्हरडोस होऊन ती लेखकाच्या कामातली लुडबुड बनण्याचे प्रकारही घडतात, कदाचित लेखकाचा निव्वळ लेखनिक होऊन उरतो. पण त्याला इलाज नाही. अखेर, आपली मालिका छान गाजावी, यशस्वी आणि लोकप्रिय व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं, नाही का?
नवीन मालिका येताना दिसली की साहजिकच, प्रेक्षक कुतूहलापोटी तिचं मुखदर्शन तरी घेतातच. पहिल्या काही भागात कथा/पात्रे रोचक नाही वाटली तर ते चॅनेल बदलतात. 
ऐकायला किती सोपं वाटतंय ना? पण नवीन मालिकेच्या जडणघडणीची प्रक्रिया अत्यंत जटिल असते. चॅनलसमोर मांडलेली संकल्पना आणि मूळ कथा यांच्यासह लेखकाला सुरुवातीच्या काळात असंख्य परीक्षांना सामोरं जावं लागतं. ह्यात चॅनलचा मार्केट रिसर्च, ईपीजसोबतच्या चर्चा, विविध प्रेङोण्टेशन्स, निर्मात्याच्या बजेटनुसार कथासूत्रची बांधणी या आणि अशा असंख्य गाळण्यांना तोंड दिल्यानंतर चॅनलकडून हिरवा कंदील मिळाला की, मग एपिसोडिक लिखाणाला सुरुवात होते. साधारणत: कथाविस्तार, पटकथा आणि संवाद ह्या तीन पातळ्यांवर हा चमू कार्यरत असतो. 
रोजच्या रोज काम चालू ठेवायचं म्हटल्यावर अशाप्रकारे जबाबदा:यांची वाटणी केलेली बरी पडते. पण ब:याचदा कलाकारांच्या तारखा, सततच्या कामाने एखादजण आजारी पडल्याने त्याला विश्रंती देण्याची गरज, लोकेशनवरच्या गैरसोयी आणि महत्त्वाचं म्हणजे रेटीग्ज, या कारणांमुळे ब:याचदा लिखाणात बदल करत राहावं लागतं. मग पुढचा सगळा प्रवास प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून. प्रेक्षकांना मालिका आवडली तर त्यांच्या आवडी जपत त्यानुसार लिहीणं, एखाद्या ट्रॅकचं रेटिंग घसरलं तर रातोरात त्यात बदल करणं, एखाद्या कलाकारामुळे गैरसोय होत असेल तर त्याच्या पात्रला मारून टाकण्यापासून प्लॅस्टिक सर्जरीसारख्या मार्गानी त्याचा चेहराच बदलणं जेणोकरून नवीन नटाला त्याजागी आणता येईल, असे प्रकार घडवावे लागतात, त्याला इलाज नसतो. आणि ह्या सगळ्याचा (करविते धनी इतर असले) तरी कर्ता सूत्रधार लेखकच असतो. 
- या सगळ्या रगाडय़ात आपापला अहंभाव, तत्त्व यांना तात्पुरती मुरड घालत ‘शो मस्ट गो ऑन’ हा नियम पाळणं गरजेचं असतं. भरीस भर म्हणून ब:याचदा लादले जाणारे पेमेण्ट-क्रेडिट पिरियड (म्हणजे मानधन उशिराने देण्याबाबतची करारातीलच तरतूद), त्याहूनही उशिरार्पयत पेमेण्ट रखडणो, कष्टाचा व हक्काचा पैसा आधी लाचारीने आणि मग नाईलाजास्तव भांडून मिळवणो हेही प्रकार करावेच लागतात आणि हे सगळं सांभाळून वेळच्या वेळी आणि किमान दर्जा सांभाळणारे लिखाण करणं हे लेखकाचं आद्य कर्तव्यच असतं.
 ‘टीव्ही सिरीयल कुणीही लिहू शकतं’ हा सार्वत्रिक गैरसमज इथे गळून पडतो आणि त्या गैरसमजावर लेखनक्षेत्रत उडी घेतलेले निम्मेअधिक हौशी महावीरही. 
मुळात एपिसोडिक लिखाणाचं तंत्र, संवादांमध्ये बोलीभाषेचा (व्याकरण सांभाळून) योग्य वापर, कथाकथनातलं अमर्याद सामथ्र्य या गोष्टी सांभाळताना त्यांची तारांबळ उडते आणि मग केवळ साक्षर असल्यानं लिहिता येतं म्हणून लेखक व्हायचा प्रयत्न करणारे मावळे इथे धारातीर्थी पडतात. 
ह्या सगळ्या समस्या ध्यानात घेऊन आता टेलिव्हिजन लिखाणाचे तंत्र शिकवणा:या कार्यशाळाही आयोजित केल्या जात आहेत, त्यांचा अगदीच नवख्या लेखकांना नक्कीच फायदा होऊ शकतो.
मुळात टीव्ही हे प्रेक्षकांर्पयत पोहोचण्याचं अत्यंत उत्तम आणि सोपं माध्यम आहे, कारण ते आपल्याला थेट प्रेक्षकांच्या घरात आणि हळूहळू त्यांच्या मनात घेऊन जातं. चित्रपटापेक्षा प्रभावीपणो संवाद साधणं इथं शक्य असतं. निर्मितीचा खर्चही चित्रपटाच्या तुलनेत कमी असतो. त्यात मराठी प्रेक्षकमनावर साहित्याचा, नाटकांचा, लोककलांचा सांस्कृतिक ठसा असल्यामुळे मराठी प्रेक्षक अत्यंत चाणाक्ष आहे, त्याला खूश करणं म्हणजे आव्हानच. मग प्रेक्षकांची ही मानसिकता, कार्यपद्धतीच्या मागण्या या सगळ्यांवर मात करत सातत्याने, नवनवीन कथानकं सादर करण्याचा वाव ज्याला असतो त्या लेखकाच्याच ठायी हे माध्यम एकवटलेलं आहे, यात नवल काय, नाही का? 
- म्हणूनच म्हटलं जातं, हे लेखकाचं माध्यम आहे! त्याला खेळायला मैदान मोकळं आहे. टेस्ट मॅच खेळलेला खेळाडू वन-डे किंवा टी-ट्वेंटीही सहज खेळू शकतो. पण फक्त टी-ट्वेंटी खेळणा:याला बाकी प्रकार ङोपतीलच असं नाही. तसंच काहीसं टीव्ही लेखनाच्या बाबतीत म्हणावं लागेल. एकांकिका/दीर्घाक टी-ट्वेंटीसारखे, झटपट. नाटक/चित्रपट एकदिवसीय सामन्याप्रमाणो, ठरावीक अंत असलेले. मालिका मात्र टेस्ट मॅचसारख्या, लांबलचक. त्यात लेखक म्हणजे तर ओपनरच. त्यामुळे त्याला तंत्र, फिटनेस या सगळ्यांचाच सांभाळ करावा लागतो. नाहीतर अख्खी इनिंग गडबडण्याचा धोका. - भरीस भर म्हणून सेट व्हायला फार वेळ घेऊन चालत नाही. रनरेटप्रमाणो एपिसोडची गतीही राखावी लागते. खेळच आहे तो रोजचा. रोजच्या रगाडय़ातून सुटका नाही! 
टेलिव्हिजन रायटिंग का एक ही उसूल, 
‘द शो मस्ट गो ऑन’. कारण, थांबला.. तो संपला!
 
‘तोच’ कर्ता करविता
 
बहुसंख्य चॅनल्सची चढाओढ, 
रोजच्या रोज रतीब घालावा लागणा:या मालिकांचा,
म्हणजे रूढ भाषेत डेलीसोपचा दैनिक रगाडा 
ह्यांच्यामुळे कथाकथनात एकसुरीपणा येणं, 
विषय रटाळपणो सादर केला जाणं, 
कथानकात ‘पाणी घालणं’ 
असे प्रकार घडतातही. 
पण, ह्या सगळ्यांवर मात करत 
मालिकेचा दर्जा टिकवून नावीन्य आणि 
सातत्य राखण्याची भिस्त असते 
ती लेखकावर.
 
(‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘देवयानी’ आदि टीव्ही मालिका आणि ‘जेता’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘मितवा या चित्रपटांमध्ये अभिनय आणि लेखन केलेले लेखक  ‘मानाचि’ या संघटनेच्या सुकाणू समितीचे सदस्य आहेत.)