शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अन्नातूनच साकारलेला अन्नाचा सोहळा

By admin | Updated: May 9, 2015 18:49 IST

इटलीतील मिलान येथे सुरू झालेल्या इंटरनॅशनल फूड फोटोग्राफी फेस्टिव्हलच्या निमित्ताने एका रसरशीत दुनियेची स्वादिष्ट आणि तृप्त सफर

फूड फोटोग्राफर्सच्या प्लेटमध्ये काय नाही? .हिरवी शेतं, निळे समुद्र, खोल विहिरी, द्राक्षांचे मळे, मक्याची शेतं, वाळवंटातली कलिंगडं, संत्र्याच्या, पीचच्या बागा, समुद्रातले, काही पोहणारे, काहीं तेलप्रदूषणामुळे मृतावस्थेतले मासे. काही प्लेटमध्ये कबरे, कोरडे दुष्काळ आहेत, सुकलेली जमीन आहे, तर काहींमध्ये खाद्यपदार्थांची रेलचेल असलेले श्रीमंती प्रदेश! ग्लोबल वॉर्मिंगमुळे गोठलेले समुद्रकिनारे आहेत, अॅसिडचा पाऊस आहे. फूड फोटोग्राफर्सच्या प्लेटमध्ये सामावलेलं वसुंधरेचं हे त्रिमिती विश्व. 
कधी ती हरीभरी आहे, तर कधी भेगाळलेली!!
 
शर्मिला फडके
 
I love photography, I love food, and I love travelling, and to put these three things together would just be the ultimate dream 
- Jamie chung 
 
टलीतील मिलान शहरात दरवर्षी मे महिन्यात भरणारा फूड फोटोग्राफर्सचा मेळावा याही वर्षी भरला आहे. जगभरातल्या तमाम खाद्यप्रेमींच्या नजरांना सुखावणारी ही जत्र. खरं तर ही एक स्पर्धा. ज्यात व्यावसायिक फोटोग्राफर्सपासून हौशी किचन फोटोग्राफर्सपर्यंत जगभरातला कोणताही खाद्यप्रेमी भाग घेतो. निवड मोजक्याच फोटोग्राफर्सची होते. या वर्षी स्पर्धेची संकल्पना आहे  ऋी्िरल्लॅ 3ँी स्र’ंल्ली3, एल्ली1ॅ8ल्ल ा1 3ँी छ्री  
- तिचं प्लेटमधलं आविष्करण थक्क करून टाकणारं. फूड फोटोग्राफर्सच्या प्लेटमध्ये अवतरलेली हिरवी शेतं, निळे समुद्र, खोल विहिरी, द्राक्षांचे मळे, मक्याची शेतं, वाळवंटातली कलिंगडं, संत्र्याच्या, पीचच्या बागा.. समुद्रातले, काही पोहणारे, काहीं तेलप्रदूषणामुळे मृतावस्थेतले मासे.. काही प्लेटमध्ये कबरे, कोरडे दुष्काळ आहेत, सुकलेली जमीन आहे, तर काहींमध्ये खाद्यपदार्थांची ओसंडून वाहणारी रेलचेल असलेले श्रीमंती प्रदेश आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे गोठलेले समुद्रकिनारे आहेत, अॅसिडचा पाऊस आहे. 
फूड फोटोग्राफर्सच्या प्लेटमध्ये सामावलेलं वसुंधरेचं हे त्रिमिती विश्व. कधी ती हरीभरी आहे, तर कधी भेगाळलेली. अन्नातूनच साकारलेला हा अन्नाचा सोहोळा फोटोग्राफर्सच्या लेन्समधून टिपला जातो तेव्हा आपल्या नजरेचं पारणं अक्षरश: हजारो त:हांनी फिटतं.  हे कसं साध्य झालं कळतही नाही पटकन. मोलेक्यूलर गॅस्ट्रोनॉमीचं प्राबल्य अर्थातच मोठं असलं आणि याही फूड फोटोग्राफर्सच्या तैनातीला फूड स्टायलिस्ट, फूड डिझायनर्स असले तरी एरवी व्यावसायिक फूड फोटोग्राफीमध्ये असतो तसा खोटय़ा पदार्थांचा, पेपर मॅशे, कॅनव्हास, कृत्रिम रंग, लेदर, टिश्यू पेपर्स, केमिकल्स, डिटर्जन्ट्सचा वापर मात्र यात नाही. प्लेटमधले पदार्थ खाण्यायोग्य असतात. ही खरी फूड आर्ट.
खायचा पदार्थ आधी नजरेनं मग जिभेनी आस्वादायचा असतो- जगभरातल्या खाद्यप्रेमींचं हे तत्त्व फूड आर्टमध्ये किती टोकापर्यंत विस्तारलय.
फूड आर्ट किंवा फोटोग्राफी इतकी विस्तारली कारण जगभरात खाद्यप्रेमींचं जग कमालीचं विस्तारलं. किती प्रकारचे खाद्यप्रेमी. ते सगळीकडेच भेटणारे. देशोदेशी फिरणारे, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, पिंटरेस्टवर पडीक असणारे.. दर काही सेकंदांनी आपण काय खाल्लं, काय बनवलं, कोणत्या रेस्तरॉंॅमधली कोणती डिश, पेय, डिझायनर फूड, शेफचे प्रयोग, आईच्या, कोणत्याही नातेवाईक, मित्र-मैत्रिणीच्या हातचे, आठवणीतले.. देशाची, प्रांताची, जातीची, धर्माची, गल्लीची, घरातली अस्मिता खाद्यपदार्थांच्या इमेजेसमधून अपलोड करू पाहणारे.. आपली रसिकता, साहित्याची- कलांची जाण, आस्वादक वृत्ती खाद्यपदार्थांच्या माध्यमातून प्रदर्शित करू इच्छिणारे.. लाइक्स-कमेण्ट्सकरता घरचा डाळभाताचा, भाजी भाकरीचा मेनू अपलोड करणारे, व्हेज-नॉनव्हेज वाद घालणारे, स्वयंपाकघरात चुकूनही पाय न ठेवणारे खाद्यप्रेमी.
मात्र यात काही सिरियस फूड ब्लॉगर्स, यू-टय़ूबवर पाककृतींची प्रात्यक्षिकं करणारेही आहेत. खाद्यपदार्थांचा इतिहास धुंडाळणारे, इजिप्शियन, मायन, मोहेन्जोदडोकालीन खाद्यसंस्कृतीच्या खुणा शोधू पाहणारे.. खाद्यपदार्थांची मुबलकता, वानवा दोन्ही अनुभवलेले.. ऑरगॅनिक फूड, डाएट फूडचा प्रचार करणारे, फूड इकॉनॉमीवर अभ्यासू मतं व्यक्त करणारे. 
खाद्यप्रेमी कोणत्याही वयोगटातले. रस्त्यांवरच्या खाद्य पदार्थांच्या गाडय़ा ते स्पेशालिटी सुपर रेस्तरॉँपर्यंत सर्वत्र संचार करणारे. 
 
फूड स्टायलिंगची सुरु वात अमेरिकेत चाळीसच्या दशकात झाली तरीही 5क्-6क् च्या दशकापर्यंत खाद्य पदार्थांची रेखाचित्रं,  रंगचित्रंच मासिकांमध्ये जास्त दिसायची. मग अमेरिकेच्या गुर्मे मासिकात सवर्ि्हग वेअर्स, टेबलावरची सजावट, फुलांची मांडणी, रंगीत, देखणी पाश्र्वभूमी असलेले फोटो छापले जायला लागले. जागतिक युद्धानंतरचा हा काळ. नुसतं खाण्यावर, पोट भरण्यावर कंटाळलेली लोकं, त्यांच्याकरता नुसते खाद्यपदार्थच नाही तर एक देखणी लाइफस्टाइल देण्याच्या हेतूमधून फूड फोटोग्राफी विकसित होत गेली याच काळात. स्वयंपाकघरात, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये यांत्रिक, स्वयंचलित उपकरणांचा वापर, कृत्रिम रंग, फ्रोझन खाद्यपदार्थांचाही वापर सुरू झाला होता. पदार्थ जास्तीतजास्त सुबक, झटपट, आकर्षक बनवणं सोपं होतं गेलं. 6क् च्या दशकात ख:या अर्थाने फोटोग्राफ्सकरिता खाद्यपदार्थांना सजवणं सुरू झालं आणि मग फूड स्टायलिंग. आईस्क्र ीम करता उकडलेल्या बटाटय़ांचा लगदा, चिकनच्या जागी पेपर मेशिअरपासून बनवलेल्या प्रतिकृती वापरणंही सुरू झालं ते आजतागायत. फोटोग्राफर्सना स्टुडिओतल्या दिव्यांची उष्णता, फिल्म स्पीड, हवामान सांभाळायला हे गरजेचं होतं. नंतर फूड फोटोग्राफीत वापरली जाणारी फोटोग्राफीची साधनं अद्ययावत होत गेली आणि 2क्व्या शतकाच्या मध्यावर कुक बुक्सची लोकप्रियता वाढत होती. 
7क्-8क् दरम्यान रंगीत फोटोग्राफी तंत्रत कमालीची सुधारणा, आमूलाग्र बदल झाले. जॅपनीज कलर प्रिंटिंगमुळे सुस्पष्ट इमेजेस आल्या. खाद्यपदार्थांना वाहिलेली मासिकं याच काळात मोठय़ा संख्येत आली आणि वेगाने लोकप्रिय झाली. त्यांचं मुखपृष्ठ आकर्षक असणं गरजेचं होतं. लोकांनी काय खायला हवं, कसं खायला हवं हे ही मुखपृष्ठं ठरवत होती. गरजा भागून लोकांच्या खिशात पैसा खुळखुळू लागला होता. भपकेबाज लाइफस्टाइल, ग्लॉसी डेबोनेर डिशेसचे डबल स्प्रेड फोटो, रंगीत प्लेट्सची रेलचेल असली कुकरी बुक्स, या सगळ्यातून आलिशान अॅम्बिअन्स आणि लाइफ स्टाइलवर फोकस दिला गेला. एकाच खाद्यपदार्थापेक्षा अनेक वेगवेगळ्या रंग, पोतांचे पदार्थ एकत्र आणून त्यांची केलेली टेबलस्केप्स बीबीसी फूड अॅन्ड ड्रिंक्स किंवा गुड फूड अशा मॅगेङिान्समधून इतर प्रिण्ट मीडियातही ङिारपायला लागली.
 
कोणत्याही संस्कृतीत बनलेला खायचा पदार्थ कधीच एकेकटा येत नाही. आपल्या अंगभूत रंग पोतासहितच तो येतो. शिजवण्याचे, कापण्या चिरण्याचे, तळण्याचे, परतण्याचे, घोळवण्याचे प्रकार फक्त वेगळे. कधी कधी तो या सगळ्या पाय:या पार करून मोलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमीच्या मार्गानेही प्लेटमध्ये येतो. 
फूड फोटोग्राफर जेमी चुंगला प्रवास आवडतो, पेंटिंग करायला आवडतं आणि अर्थातच खायला आवडतं म्हणून त्याचा छंद आणि व्यवसाय फूड फोटोग्राफीचा. कोणत्याही फूड फोटोग्राफर अथवा स्टायलिस्टचे हेच मिशन स्टेटमेण्ट होऊ शकते. अनेक कलांची, रंगा-पोतांची सखोल जाण असल्याशिवाय उत्तम फूड फोटोग्राफर बनूच शकत नाही. 
जेवणाच्या टेबलावरचं किंवा ताटातलं अन्न आपल्याला जसं दिसतंय तसं दाखवणारी फोटोग्राफी कधीच इतिहासकाळात जमा झाली. खाणा:यांना रोमॅण्टिक मूडमध्ये घेऊन जाणारे अॅँगल्स, लायटिंग!!..  आपण नेमकं काय खाणार आहोत तेही धूसरच दाखवणारी डोना हे स्टाइल ज्यात खाद्य पदार्थ कोणता, कुठे हे शोधावा लागतो! स्विडिश स्टाइलची हाय डिझाइन्स, जापनिज मिनिमलिझम फोटोग्राफीही मागे पडली. त्यानंतर आला फूड पोर्नचा जमाना. गेल्या काही वर्षांमध्ये फूड पोर्न हा शब्द नेटजगातल्या फूड लव्हर्समधे सहजगत्या  रुळलाय. 
मास्टर शेफ आवडीने बघणारे, खाना खजाना, मेजवानी, आम्ही सारे खवैयेचे उत्साही प्रेक्षक ज्यात बायकांइतकेच पुरु ष, मुलं असतात, ही फूड पॉर्न अॅडिक्ट जनरेशन. 
फूड रिअॅलिटी शो पाहणारे कित्येक.  मेजवानी किचन किंगपासून मार्कोचा हेल्स किचन, टॉप शेफ, मास्टर शेफचे सगळे सीझन्स त्यातल्या स्पर्धकांची नावं आणि त्यांनी बनवलेल्या, नावाजलेल्या, नाकारल्या गेलेल्या डिशेसपर्यंत सर्वकाही तोंडपाठ असतं कित्येकांना. रेचल रे शो मधलं उन्मादक अन्न, गॉर्डन रॅमसेचा किचन नाइटमेअर्स, जुली अॅण्ड जुलिआतलं पॅशनेट फूड, टेम्पोपो, रॅटटुईमधलं आनंददायी अन्न.. ‘द लंच बॉक्स’मधली भरली कार्ली आणि रिकाम्या झालेल्या डब्यातून भरलेलं अनामिक प्रेम,  ‘चिनी कम’मधली हैद्राबाद बिर्याणी, बरजात्यांच्या जेवणाच्या टेबलावरचं अश्लील श्रीमंती अन्न आणि आपल्या बीए पास थोराड मुलाला भल्या मोठय़ा पातेल्यांमध्ये खडखड आवाज करत वाढलेलं अन्न हे व्हाया गाजर का हलवा आणि हिंदी सिनेमा-मालिकेतल्या मराठी घरांमधले हल्ली दिसायला लागलेले पोहे.  
आता साध्या, स्वच्छ, नैसर्गिक स्वरूपातलं अन्न, कमीतकमी सजावटीच्या पसा:यात, काहीही भावना चाळवणारे गिमिकी प्रकार, खोटे रंग, केमिकल्सच्या खोटय़ा वाफा, आकार न दाखवता, अन्नाला थेट घशात घुसवणारे क्लोजअप्स नसलेले फोटोग्राफ्स येऊ घातलेत हा सुखावह बदल. 
 प्लेटच्या कॅनव्हासवर चितारलेली खाद्यपदार्थांची कला ही एक वेगळीच दुनिया आहे, त्याबद्दल पुढच्या रविवारी.
 
फूड पोर्न
नजरेला ‘तृप्त’ 
करणारा 
रसरशीत खेळ
 
फूड ट्रेन्ड हे समाजातल्या बदलांचं प्रतिनिधित्व करतात. आता ट्रेन्ड आहे फूड पॉर्नचा. या शब्दाचा उगम खाद्यपदार्थांच्या फोटोंद्वारे बघणा:यांच्या मनातल्या आदिम अशा भूक, अभिलाषा, असूया, आसक्ती अशा तीव्र भावनांना चाळवण्याच्या प्रयत्नातून झाला. 
खाद्यपदार्थांना ग्लॅमरस रु पात, रसरशीत, रंगतदार स्वरु पात पेश करणो हा मुख्य हेतू. तयार खाद्यपदार्थांच्या, फूड शोच्या जाहिराती, फूड शो, डायेट शो, डिझायनर रेस्तॉं स्पेशालिटी फूड बनवणारे सगळेच फूड पोर्नोग्राफीत सामील असतात. अन्नाचे आकर्षक, व्यवासायिक फोटोग्राफस काढून ते जाहिरातींमधे, बुकलेट्सवर, होर्डिंग्जमधे, मासिकांवर, पॅकेजिंगवर, कुकरी बुक्समधे झळकवणारे, त्याकरता डोकं लढवणारे फूड आर्ट डायरेक्टर्स, फूड स्टायलिस्ट. मग स्टुडिओच्या तप्त उजेडात गारेगार सरबत ओतलेल्या फेसाळत्या ग्लासाचे फोटो दाखवायला डिटर्जंटच कामाला येणार. दाट, क्रिमी, चकाकत्या दुधाचा ग्लास दाखवायला पांढरी शुभ्र, चिकट खळ गरजेची. कसाही असो पण खाद्यपदार्थ रसरशीत, टवटवीत, उन्मादकच दिसायला हवा. हेल्थ फूड, डायेट फूडही रटाळ, कंटाळवाणं दिसायला नको, घरगुती खाणंही एकसुरी नको, ग्लॅमरस हवं. रसरशीत फळं, टवटवीत भाज्या, सौंदर्यपूर्ण, त्यांचे लाल, पिवळे, केशरी, हिरवे, जांभळे रंग उठून दिसायला हवे. 
फोटोग्राफ्समधला खोटेपणा ख:यात उतरायला वेळ लागणार नव्हताच. मग मेणाची चकाकी दिलेली सफरचंद, लाल रंग इंजेक्ट केलेली कलिंगडं, शेंदरी आणि गुलाबी रंगाच्या द्रावणात बुडवून ठेवलेली गाजरं, स्ट्रॉबेरीज, लस्सी, आइस्क्रीमधले टिश्यूपेपर्स, कृत्रिम हार्मोन्स पाजून टपटपीत केलेली धान्य, टपोरलेली फळं. फूड पोर्नची अश्लीलता सोशल साइट्समधून बाजारात किंवा उलट मार्गानेही असू शकेल पण थेट आपल्या घरातल्या प्लेटमध्ये उतरली, गरती झाली. 
 
 
 
( लेखिका ख्यातनाम कलासमीक्षक आहेत)