शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
2
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
3
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
4
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
5
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
6
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
7
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
8
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
9
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
10
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना
11
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
12
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज! महागाई भत्त्यात ३ ते ४% वाढ होण्याची शक्यता, किती पगार वाढणार?
14
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
15
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
16
"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग
17
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
18
साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक कुटुंबांचे आधारवड हरपले; पीडितांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी
19
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
20
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का

लोक विज्ञान युती

By admin | Updated: August 29, 2015 15:01 IST

सामान्य लोकांमध्ये अफाट ताकद आणि ज्ञान दोन्ही असते.अर्थात हे ज्ञान पारंपरिक असते, त्याला दिशा आणि वैज्ञानिक भान द्यावे लागते. आधुनिक काळात अतिमहत्त्वाचे झालेले ‘नेमकेपण’ (प्रीसिजन) द्यावे लागते. थोडय़ा प्रयत्नांनी हे जमते याचा प्रत्यय देणारे तीन प्रयोग.

मिलिंद थत्ते
 
कोलीत उजेडासाठी उपयोगाचे असते, पण मग ते माकडाच्याच हाती  का राहावे..?
 
माझ्या ‘रानबखर’ या पुस्तकात शेवटी मी मला खुणावणारी उत्तरे म्हणून काही कल्पना मांडल्या होत्या. त्यातल्या काहींची प्रत्यक्ष उदाहरणोही दिली होती. तरीही प्रत्यक्षात हे घडवणो आम्हाला वयम चळवळीच्या कार्यकत्र्याना हवेसे वाटत होते. तशी सुरुवात आम्ही केलीही.. 
‘विज्ञान खूप कठीण आहे, तुम्हा पामरांना कळणार नाही’, 
‘आर्ट्स कॉमर्सवाल्यांनासुद्धा विज्ञान कळत नाही, तिथे अर्धवट शिकलेल्या किंवा दहावी नापास लोकांना काय विज्ञान समजणार?’, 
‘पेटंट घेता येते तेच खरे विज्ञान’ - असे ग्रह दृढ असण्याच्या काळात आम्हाला असे वाटले की माणसाचे जगणो अन् निसर्गाचे असणोच विज्ञानाशिवाय असू शकत नाही, तर मग विज्ञान इतके कठीण कसे असेल? 
आणि तसे नसेल, तर ते आधुनिक ब्रrावृंदांच्या कब्जात कशाला ठेवायचे? जर ते तसेच राहिले, तर विषमता वाढत जाण्यालाच विज्ञानाचा हातभार लागेल. 
कोलीत उजेडासाठी उपयोगाचे असते, पण ते माकडाच्याच हाती राहिले तर..?
सामान्य लोकांमध्ये अफाट ताकद आणि ज्ञान दोन्ही असते. राजेंद्र सिंहांच्या तरुण भारत संघाने राजस्थानात नद्या जिवंत करण्याचा पराक्रम करून दाखवला, तो सामान्य लोकांच्याच ताकदीवर आणि पारंपरिक ज्ञानावर. दक्षिणोकडे सर्पतज्ज्ञ व्हिटेकरने सुरू केलेली सर्पविष गोळा करणारी प्रसिद्ध सहकारी संस्थाही याच लोकज्ञान आणि लोकशक्तीच्या जोरावर निम्म्या भारत देशाला सर्पदंशावर आवश्यक प्रतिविष पुरवते आहे. लोकज्ञान आणि शक्तीची आणखी ढीगभर उदाहरणो देता येतील, इतकी ती सिद्ध सत्य आहे. 
- पण लोकांच्याही काही मर्यादा असतात. 
लोकांकडील ज्ञान पारंपरिक असते, त्यात ते संशोधनही करत असतात. त्याला दिशा आणि वैज्ञानिक भान द्यावे लागते. आधुनिक काळात अतिमहत्त्वाचे झालेले ‘नेमकेपण’ (प्रीसिजन) द्यावे लागते. 
पारंपरिक ज्ञान निर्माण झाले त्या काळातली निसर्गस्थिती आणि आताची यात फरक आहे. त्यात बदल करण्यासाठीही वैज्ञानिकांची मदत लागते. आताच्या अपेक्षांनुसार लाभ मिळण्यासाठीही आधुनिक विज्ञानाची जोड देणो भाग असते. यासाठी वैज्ञानिक आणि सामाजिक कार्यकर्ते या दोघांनी जागृत समाजघटकांपर्यंत पोचणो आणि त्यांच्या प्राधान्याच्या विषयात विज्ञान-लोकज्ञानाची योग्य सांगड घालून उत्पादनक्षम समाज घडवणो गरजेचे आहे. यालाच आम्ही ‘लोक विज्ञान युती’ असे म्हणतो. 
याची आताच प्रत्यक्षात आलेली दोन उदाहरणो सांगतो. 
कर्जत येथील जलवर्धिनी प्रतिष्ठान ही पाऊसपाणी साठवणीच्या विविध तंत्रज्ञानाचा प्रचार करणारी संस्था. त्यांचा तंत्रज्ञानाचा पाया उत्तम आहे. वयम चळवळीचे काम सजग-सक्रिय समाजनिर्मितीचे. विकासासाठी उत्सुक आणि सक्रिय असे लोकसमूह या चळवळीतून उभे राहतात. 
- अशाच उभ्या राहिलेल्या डोयाचापाडा या गावात वयम आणि जलवर्धिनी प्रतिष्ठान यांनी एकत्र प्रयोग केला. आर्थिक भार ‘सायबेज आशा ट्रस्ट’ ही संस्था आणि स्वत: ग्रामस्थांनी उचलला. फेरोसीमेंट हे नवे तंत्र वापरून कमी खर्चातली पाऊसपाणी साठवण टाकी कशी बांधायची याचे प्रशिक्षण झाले. यावेळी रेती चाळण्याचे पारंपरिक तंत्र लोकांनी वापरले. सीमेंट-रेतीचे प्रमाण, स्टीलजाळ्यांची विणणी या गोष्टी तंत्रज्ञांनी शिकवल्या. माल लिंपण्याची पद्धत मात्र तिथल्या गवंडय़ांनी स्वत:ची अनुभवसिद्ध अशी वापरली. या टाक्या बांधण्याचा पक्का आत्मविश्वास लोकांना आला. यापुढच्या शंभर टाक्या बांधताना बाहेरच्या मदतीची गरज कमी होत जाणार आहे. याच लोकांनी नदीत नेमकी जागा हेरून फक्त सहा जणांनी एक दिवसात वळण बंधारा घातला आहे. तिथे आता फेरोसीमेंटचे तंत्र वापरू, असे चक्र  आता त्यांच्या डोक्यात फिरू लागले आहे.  
दुसरा प्रयोग कोकणपाडा गावात झाला. बायफ-मित्र संस्थेचे सिव्हिल इंजिनिअर आणि वयम यांनी कोकणपाडा ग्रामसभेच्या मदतीने हा प्रयोग केला. गावाने निवडलेले आठ तरुण आणि चार तरु णी यात सहभागी होते. डोंगरउतारावर पाणलोट विकासाच्या (म्हणजे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’) कामाचे तांत्रिक नियोजन कसे करायचे याचे प्रशिक्षण झाले. डोंगराचा उतार कसा मोजायचा, समपातळी रेषा कशा काढायच्या, दगडी बांध आणि समपातळी चराचे घनमीटर कसे मोजायचे, या सा:याचे मोजमाप आणि एस्टीमेट कसे काढायचे - या सर्व गोष्टी हे तरुण शिकले. आता त्यांच्या सामूहिक हक्काच्या क्षेत्रत पाणी व माती वाचवण्यासाठी करण्याच्या कामाचा तांत्रिक आराखडा ते स्वत: करणार आहेत. त्यासाठी लागणारा निधी शासनाने रोहयोमधून पुरवावा यासाठी ग्रामसभा प्रयत्न करणार आहे. हे बेअरफूट इंजिनिअर कोणत्याही गावाला या कामासाठी तांत्रिक सेवा पुरवू शकतील. हे सर्व तरुण मजूर कुटुंबातले आहेत. त्यांनी अनेकदा या कामांवर मजूर म्हणून काम केले आहे. आता ते इंजिनिअर म्हणून काम करू शकतील. 
सातपुडय़ाच्या धडगाव तालुक्यात बिजरी गावात लोकज्ञानाचा एक चमत्कार आहे. जुन्या काळातला एक विस्तीर्ण तलाव या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. तलाव गावापासून थोडा उंचावर आहे. तलावातले पाणी ‘सायफन’ तंत्रने लोकांनी उचलले आहे. यासाठी फक्त थोडे पाइप आणि एक चेंबर एवढेच लागले आहे. पंप नाही, वीज नाही, तिथून पाणी वाहत असते. या पाण्याला एक छोटी दरी ओलांडून पलीकडे नेले आहे. या दरीवर निमुळते होत जाणारे पत्रे वापरून पलीकडच्या तीरावर पाणी पुन्हा वर चढवले आहे. याला रिव्हर्स सायफन का काहीसे म्हणतात हे लोकांना माहीत नाही, पण त्यांनी ते वापरले आहे. पाणी वर चढून मग गुरुत्वाकर्षणाने अनेक शेतक:यांच्या जमिनी भिजवते. बिजरी गावचे लोक पारंपरिक वृत्तीचे आहेत. त्यांनी आपल्याला पुरेसे पाणी झाल्यावर बाकीचे पुढच्या गावाला सोडले आहे. पाणी वाहून आणण्याची सारी मेहनत त्यांनी केली आहे, पण ‘आपण पाण्याचे मालक नाही’ या भावनेने त्यांनी ते पुढच्या गावालाही सहज दिले आहे. असे अनेक ठिकाणी घडू शकते. पण बिजरीच्या ज्ञानाला अशा अनेक ठिकाणी नेऊन ठेवण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. लोकविज्ञान युतीतून अशा ज्ञानाचा प्रसारही सहज होऊ शकेल. 
आताच्या उदाहरणांत वयम चळवळीचा वाटा फार थोडा आहे. वेगवेगळे तुकडे जुळवणो आणि सुरुवातीपुरते चार्जिंग देणो एवढेच फार तर चळवळीचे श्रेय आहे. खार इतके करू शकते, तर महाबली आणि विद्यानिधी यात उतरले तर किती मोठे परिवर्तन घडेल? हा जगन्नाथाचा रथ आहे, सर्वांनी मिळून ओढला तर परिवर्तनाचे चक्र सहज फिरेल.
 
(लेखक ‘वयम’ या समावेशक विकासाच्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)
milindthatte@gmail.com