शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

अभिव्यक्ती

By admin | Updated: September 19, 2015 14:42 IST

पुस्तक वाचत आरामात पहुडलेल्या त्या देखण्या श्रीगणेशाच्या मूर्तीकडे पाहता पाहता मनातल्या पुस्तकाची काही पानं फडफडली.

 चंद्रमोहन कुलकर्णी

पुस्तक वाचत आरामात पहुडलेल्या त्या देखण्या श्रीगणेशाच्या मूर्तीकडे पाहता पाहता मनातल्या पुस्तकाची काही पानं फडफडली.
श्रीगणेशाचं एकही चित्र काढलं नाही, असं निदान भारतातल्या चित्रकारांच्या बाबतीत तरी संभवत नाही. कित्येकदा तर चित्रकलेच्या शिक्षणाचा श्रीगणोशाच श्रीगणोशाच्या चित्रनं होतो. 
आर्ट स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना आपण एकूणच सगळ्याच चित्रकलेकडे एक ‘अभ्यास’ म्हणून बघत असतो. त्याआधीची चित्रकला थोडी वेगळी असते. शाळकरी. चित्रकलेचे वेगळे विशेष असे संस्कार न झालेली, भाबडी. साधी-सरळ रेषा, रंगलेपनही मोकळ्या हातानं केलेलं, आउटलाइनच्या बाहेर वगैरे गेलेलं! छान!
गणपती काढणं आणि गणपतीचं चित्र काढणं यात फरक आहे ! शाळेत असताना आपण गणपती काढत असतो, तर आर्ट स्कूलमध्ये गणपतीचं चित्र.
मोठा फरक आहे! 
गणपतीच्या देवत्व या भावनेशी आपण निगडित असतो, शाळेत, गणपती काढताना. त्यावेळी ड्रॉइंग, प्रपोर्शन्स, परस्पेक्टिव्ह वगैरे शब्द कानावरूनही गेलेले नसतात, इतकंच काय, गणपतीचं चित्र काढताना कान, डोळे, सोंड, मुकुट, वस्त्रप्रावरणं, अंगावरचे दागदागिने या सगळ्या गोष्टी आपण वेगळ्या लक्षात घेतलेल्या नसतात. त्यांचं आपण ड्रॉइंग करत नसतो, तर त्या ‘काढत’ असतो; चित्रत त्या सहज आणि आपसूकच उमटत असतात, आपल्या नकळत.
आर्ट स्कूलमध्ये गेल्यावर आपली चित्रकलेबद्दलची दृष्टी सुधारते आणि गणपतीचं चित्र बिघडू लागतं! आपण फार अभ्यास करू लागतो. विचार करू लागतो. एकेक गोष्ट न्याहाळून विचारपूर्वक मांडणी करू लागतो. गणपतीच्या चित्रतलं देवत्त्व मागे पडून त्यातलं त्याचं हत्ती आणि मनुष्य यांच्या रूपाचं जे मिश्रण, त्या रूपाचा जास्त अभ्यास होऊ लागतो. रेषेतली सहजता गळून पडते नि ती अभ्यासपूर्ण आणि थोडीशी कठोर होऊ लागते. वर्गात मागच्या बाकावर बसणा:या मुलाला पहिल्या, अभ्यासू आणि चष्मिष्ट मुलांच्या रांगेत नेऊन बसवल्यावर त्याची जी अवस्था होते, तशीच अवस्था रेषेची होऊ लागते. पुढे ब:याच वेळा या अभ्यासाचं रूपांतर घोकमपट्टीत होऊ लागतं.
आधी हत्तीचा अभ्यास सुरू होतो. सोंड, दात, छोटे डोळे-मोठे कान इथं जास्त लक्ष दिलं जातं. एका बाजूनं दिसणारा त्याचा चेहरा, दुस:या बाजूनंही अभ्यासला जातो. समोरनं स्केचेस केली जातात. त्यासाठी प्रत्यक्ष हत्ती बघायला, स्केचेस करायला स्केचबुक घेऊन पेशवेपार्कात आपल्या फे:या मारणं सुरू होतं. पुस्तकांमधनं, मासिकांमधनं, वर्तमानपत्रंमधून छापून आलेली हत्तीची चित्रं कापून ठेवली जातात. कात्रणं जमा होतात. हत्तीच्या चित्रंची कॅलेंडरं, डाय:या, ग्रीटिंग करडधुंडाळली जातात. रद्दी साठते. 
गणपतीच्या चेह:यासाठी हत्तीचा अभ्यास करायचाय, हे डोक्यात पक्कं असतं, त्यामुळे स्केचबुकातली पानंच्या पानं नुसती हत्तीच्या चेह:यानं भरलेली! मघाशी म्हटलं तसं समोरून, या बाजूनं, त्या बाजूनं, कधी नुसतीच सोंड तर कधी फक्त डोळ्यांचाच अभ्यास, तर कधी पानभर सुपाएवढे कानच कान!
हत्तीचे डोळे एवढे बारीक, की मला ते जेमतेम दिसत फक्त. त्यांचा अभ्यास करता यायचा नाही. डोळ्यांचा अभ्यास कमी पडायचा आणि प्रत्यक्ष गणपतीच्या चित्रत ते आणताना ‘नाही तरी हत्ती आणि माणूस यांच्या मिश्रणातनं निर्माण झालेल्या रूपाचंच चित्र काढायचंय’, हे लक्षात असायचं म्हणून माणसाचे वाटले तरी चालतील असे हत्तीचे डोळे काढून मी स्वत:ची समजूत घालून सोडवणूक करून घेत असे. इतकं सगळं होऊन, गणपतीसाठी म्हणून हत्तीचा अभ्यास करताना खरं तर तो हत्तीचा पूर्ण असा अभ्यास व्हायचाच नाही. अभ्यास व्हायचा, तो फक्त गजमुखाचा. गजदेहाचा नाही! 
हत्तीचा तो अवाढव्य देह बघून अभ्यास करताना जीव दडपायचा. इतका मोठा आकार एका वेळी एका नजरेत भरून घेणं कठीण वाटायचं, ते स्केचमध्ये कुठून येणार? त्यामुळे हत्तीचा, मुखापासून (खरं तर सोंडेपासून) शेपटीपर्यंत सलग असा अभ्यास झालाच नाही, कधीच. किंबहुना ‘श्रीगणोशाच्या मुखासाठी’ असा त्या अभ्यासाचा फोकस असल्यानं, पूर्ण उभ्या हत्तीच्या सबंध शरीराचा अभ्यास करावा, हे लक्षातच आलं नाही. बसलेल्या आणि निरनिराळ्या पोझमधल्या हत्तीच्या अभ्यासाची तर बातच सोडा! 
हे झालं हत्तीच्या अभ्यासाबद्दल. मानवी देहाचं काय? आर्ट स्कूलमधील दिवसांत मानवी देहाचा अभ्यास झालाच नाही काय? 
याचं उत्तर आहे : झाला!
नक्की झाला.
पण समोर बसलेल्या फाटक्या शरीराच्या, सर्वसाधारण कपडे घातलेल्या, तंबाखू खाऊन तंद्रीत बसलेल्या मॉडेल म्हणून बसलेल्या माणसाचा! नाही तर एकदम रोमन शिल्पांच्या बलदंड शरीराच्या आणि कमनीय देहाच्या स्त्री-पुरुषांच्या शिल्पांच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या प्रतिकृतींचा आणि ग्रीक देवदेवतांचा! श्रीगणोशाच्या शरीराचा आणि मी ज्या शरीरांचा अभ्यास केला होता, त्याचा कुठे मेळ बसेना. मग श्रीगणोशाच्या तुंदिलतनूचा, त्या विशेष प्रकारची मांडी घातलेल्या पायांचा, भारतीय देहबोलीचा अभ्यास फार क्लिष्ट वाटू लागला. 
शिवाय, चार हात!
मानवी देहाच्या दोनच हातांचा अभ्यास करताकरता तारांबळ उडत होती; तिथे चार हातांचा अभ्यास ही फारच अवघड बाब. आशीर्वादाचा एक हात, त्यामुळे त्याची पोङिाशन वेगळी. मोदकवाल्या हाताची पोङिाशन तर सर्वात अवघड. हाताची बोटंही दिसायला हवीत आणि मोदकही! कळ्यांसकट. एका हातातल्या या मोदकाच्या कळ्या आणि तिस:या हातातल्या कमळाच्या पाकळ्या! पहिलं बोट आणि अंगठा या दोन बोटांत धरलेल्या, किंचित वाकलेल्या देठासहीत त्या कमळाच्या फुलाचा अभ्यास कमी पडू लागला. चौथ्या हातातलं शस्त्र. ते नेमकं  कोणतं, याचा अभ्यास निराळा. शिवाय डोईवरचा नक्षीदार मुगुट, अंगाखांद्यावरची वस्त्रं, शेला, दागदागिने, माळा, डाव्या खांद्यावरून मांडीवर विसावून पुढे उजव्या कटीर्पयत जाणारं जानवं, कर्णफुलं, कपाळावरचं रेखीव गंध, हातापायातले पैंजण, अंगठय़ा, घुंगरं, विळखा घातलेला पोटावरचा नाग, मोदकाच्या आशेनं श्रीगणोशाच्या डाव्या हाताकडे पाहणारा लंबकर्ण मूषक, एक ना दोन.. अनेक गोष्टी. इतक्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता करता श्रीगणोशाबद्दल वाटणा:या देवत्वाची भावना हळूहळू लुप्त होऊन, तो एक अभ्यासाचा असा रूक्ष विषय होऊ लागला. श्रीगणोशाच्या चेह:यावरचं मंद स्मित हळूहळू मला दिसेनासं होऊ लागलं.
श्रीगणोश ही विद्येची देवता असली आणि अभ्यास करणं हा विद्याप्राप्तीचा एक प्रमुख मार्ग असला, तरी हा अभ्यास अंमळ जास्तच होऊ लागला होता. सहजत्वाला अभ्यासाचं ओझं होऊ लागलं नि रेषेचा प्रवाह खंडित होऊ लागला. शाळेतली ती भाबडी उत्स्फूर्त रेषा जडावली. बोजड होऊ लागली.
श्रीगणोशानं मेसेज पाठवला : ‘अभ्यास गुंडाळून खुंटीवर ठेवून द्यावा.’
मेसेजप्रमाणो अभ्यास गुंडाळून खुंटीवर टांगून ठेवला. डोळे झाकून घेतले. मनात, आत खूप खोलवर डोकावून पाहिलं तर शाळकरी जीवनातली ती श्रीगणोशाची मूर्ती तशीच्या तशीच तिथं विराजमान होती. तीच थोडी वर उचलून घेतली नि कागदावर उतरवली. अनावश्यक अभ्यासाच्या ओङयाखाली वाकलेल्या, जड झालेल्या कॉलेजजीवनातल्या मूर्तीपेक्षा हिचा चेहरा खुललेला होता, पूर्वीसारखाच प्रसन्न! आश्वस्त.
एक हात आशीर्वादासाठी उंचावलेला, मोदकाचा प्रसाद एका हाती. कमळपुष्प धरलेल्या त्या मोहक हातांची नाजूक, वळणदार बोटं आणि चौथा हात शस्त्रंकित. हसरी, आश्वासक मुद्रा, विद्येची देवता. घोकमपट्टी, अभ्यास, निरीक्षण आणि अभिव्यक्ती या गोष्टींचे अर्थ भिन्न भिन्न असतात आणि आपण ते समजून घ्यायचे असतात, याचं उच्च शिक्षण देणारी देवांची देवता, बुद्धीची, प्रथम देवता!
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)
chandramohan.kulkarni@gmail.com