शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
2
Short Term Investment: केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
3
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
4
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
5
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
6
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
7
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
8
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
9
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
10
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
11
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
12
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
13
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
14
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
15
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
16
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
17
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
18
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
19
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
20
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
Daily Top 2Weekly Top 5

अनुभव

By admin | Updated: May 21, 2016 14:11 IST

आईवडिलांनी आपल्या मुलांना योग्य वयामध्ये कंटाळा आणि राग येत असेल तर येऊ द्यावा. त्यांना चार पैसे देऊन देशोधडीला लावावे म्हणजे मराठी कुटुंबातली वरणभात खाऊन पुष्ट झालेली गोरीगोमटी बाळे योग्य वेळेत नव्या चार गोष्टी शिकतील. त्यांना घराबाहेर पडायला, टक्केटोणपे खायला, चार ठिकाणी डोके आपटायला, दोन-तीन फसवणुका व्हायला मदत करावी.

आईवडिलांनी आपल्या मुलांना योग्य वयामध्ये कंटाळा आणि राग येत असेल तर येऊ द्यावा.
त्यांना चार पैसे देऊन देशोधडीला लावावे म्हणजे मराठी कुटुंबातली वरणभात खाऊन पुष्ट झालेली 
गोरीगोमटी बाळे योग्य वेळेत  नव्या चार गोष्टी शिकतील. त्यांना घराबाहेर पडायला, टक्केटोणपे खायला, चार ठिकाणी डोके आपटायला,  दोन-तीन फसवणुका व्हायला मदत करावी.  प्रमाणाबाहेर चुका करण्याचे  एक वय असते.  ज्या त्या वयात त्या-त्या चुका करायलाच हव्यात.  नाहीतर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय शिकवणार?
 
सचिन कुंडलकर
 
स्वत:च्या आनंदासाठी काम करणारे आणि त्यात परिपूर्ण वाटणारे लहानपणी आमच्या आजूबाजूला कुणीही नसावे ही फार मोठी दुर्दैवी अशी गोष्ट होती. एकाही शहाण्या माणसाला तेव्हा असे वाटले नाही की आपल्या मुलांना त्यांच्या कोवळ्या वयात हे सांगावे की आपण जे काम आयुष्यभर करण्यासाठी निवडतो त्यात आपला आनंद असायला हवा. काम करायचे ते पैसे मिळवायला, पोटाची खळगी भरायला, संसाराचा गाडा ओढायला अशीच आणि फक्त अशीच उदाहरणो आमच्या डोळ्यासमोर होती. 
आपल्याला अनेकवेळा आपल्यापेक्षा मोठय़ा माणसांना खूप कळते असे वाटत असते. पण आपण थोडे मोठे झाल्यावर आपल्या लक्षात येते की आपल्या भोवतालची वयाने ज्येष्ठ माणसांची पिढी ही घाबरट, सरधोपट आणि शून्य दूरदृष्टी असलेली होती. पण आपल्याला हे कळते तेव्हा उशीर झालेला असतो आणि त्या पिढीने आपले खेळण्यातले माकड बनवून झांजा वाजवत नोकरीच्या आणि लग्नाच्या बाजारात विकायला काढलेले असते आणि त्यांचा वंश आणि कुळाचार चालवण्याची सोय करून घेतलेली असते. 
आईवडिलांना आणि एकूणच वयाने मोठय़ा माणसांना काहीही कळत नसते. ती अतिशय साधी, भित्रट आणि चारचौघांसारखे वागणारी माणसे असतात. ज्या-ज्या मुलांनी प्रमाणाबाहेर जाऊन आपल्या आईवडिलांचे ऐकले आहे त्यांना पुढे आयुष्यात कंटाळा, नैराश्य आणि स्वत:वरचा राग या भावनांना सामोरे जावे लागले आहे. आणि आईवडिलांना फाटय़ावर मारायला आपल्याला कधीच, कुणीच, कुठेच शिकवत नाहीत. ते आपले आपल्याला समजून उमजून वेळेतच करावे लागते. 
स्वत:च्या घराविषयी आणि स्वत:च्या परिसराविषयी आलेला राग आणि कंटाळा तुम्हाला नवे काहीतरी करायला प्रवृत्त करत असतो. त्यामुळे आईवडिलांनी आपल्या मुलांना योग्य वयामध्ये तो कंटाळा आणि राग येत असेल तर येऊ द्यावा आणि मुलांना चार पैसे देऊन सरळ देशोधडीला लावावे. म्हणजे मराठी कुटुंबातली वरणभात खाऊन पुष्ट झालेली गोरीगोमटी बाळे रखडत पडत झडत योग्य वेळेत नव्या चार गोष्टी शिकतील. 
असे जर केले नाही तर घराच्या अंगणात वाढवलेली अशी मुले आईच्या मांडीवरून बायकोच्या मांडीवर जातात आणि तिने बनवलेले उपवासाचे पदार्थ भरवून घेतात. आणि अशा मुली इतके दिवस वडिलांचे पैसे खर्च करीत असतात त्या आयुष्यातला उरलेला वेळ नव:याचे पैसे खर्च करतात आणि तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून गावभर उंडारत बसतात. आणि महर्षी कर्वे रोडवरचे ट्रॅफिक उगाच वाढवतात. आमचे बहुतेक सगळे पुणो हे अशाच माणसांनी भरलेले आहे. 
माङया कुटुंबातील लोकांनी माङो आडवयात तयार होणारे राग, संताप आणि एखाद्या सांस्कृतिक डबक्याप्रमाणो वाटणा:या पुणो शहराविषयी येणारा कंटाळा सहन केला आणि मला घर आणि शहर सोडून जायची परवानगी दिली त्यामुळे माङो किती भले झाले हे मी सांगूच शकत नाही. 
जन्मगावाचा कंटाळा येणो आणि कुटुंबातील लोक अतिशय नकोसे होणो ही एका ठरावीक वयात सहजपणो उद्भवणारी चांगली भावना आहे. ती मुलांच्या मनातून मारून टाकू नये. त्यांना घराबाहेर पडून प्रवास करायला, टक्केटोणपे खायला, चार ठिकाणी डोके आपटून फुटायला, दोन-तीन फसवणुका व्हायला मदत करावी. मग मुले त्यांना जे करायचे आहे ते करून, चार अनुभव घेऊन घरी परत येतात किंवा येत नाहीत. पण निदान एका ठरावीक वयात त्यांनी ज्या गोष्टी करायला हव्यात त्या ते करतात. प्रमाणाबाहेर चुका करण्याचे एक वय असते. त्या वयात त्या केल्या नाहीत तर आयुष्यभर फार मोठी चुटपूट मनाला लागून राहते. ज्या त्या वयात त्या-त्या चुका करायलाच हव्यात. नाहीतर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय शिकवणार?
काहीतरी मजेशीर घडते आहे सध्या. हल्ली पुन्हा तरुण मुलांमध्ये विशीतच लग्न करायची फॅशन आलेली दिसतेय. मध्ये निदान तिशीपर्यंत लग्न थांबवायचा विचार रुजू लागला होता. गेल्या महिन्यात आमच्या ओळखीतल्या दोन लहान लहान मुलांनी एकदम दोन लहान मुलींशी लग्नेच करून टाकली. एकदाही बाहेर कुठे अफेअर नाही, चारदोन प्रेमभंग नाहीत. लग्नाआधी शरीरे हाताळायला शिकलेले नाहीत. वाटले- झाले- केले. अशी लहान लहान बाळे हल्ली लग्न करताना मी पाहतोय तेव्हा मला काळजीच वाटते. चुका करायच्याच राहून गेल्या बिचा:यांच्या. आता बसा बोंबलत. बाईला एकच बुवा आणि बुवाला एकच बाई. एकमेकांच्या कमरेचे घेर आयुष्यभर मोजत बसावे लागणार यांना कायमचे. बसा आता एकमेकांची तोंडे पाहत. 
नोकरी आणि लग्न या दोन दगडांवर उभे राहून आनंदात आयुष्य घालवण्याचे शिक्षण आम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणो मराठी मध्यमवर्गीय समाजात राहून मिळाले. शिवाय दोन्ही एकच करायचे हे सांगणो न लगे. हळूहळू काळ बदलला तशी माणसे निदान एकापेक्षा जास्त नोक:या तरी करू लागली. नोकरी मिळवणो, कुणीतरी ती आपल्याला उपकार केल्यासारखी देणो, ती टिकवण्यासाठी लाळघोटेपणा करत राहणो, जर ती गेली तर दुसरी मिळण्यासाठी जीव मुठीत घेऊन खटपट करत राहणो, हे करताना आम्ही लहानपणापासून सगळ्या वयाने मोठय़ा माणसांना पाहत आलो. त्यामुळे आपल्याला आवडणारे काम करणो, ते काम करण्यासाठी योग्य शिक्षण घेणो, त्या कामासाठी, त्या शिक्षणासाठी प्रवास करणो या महत्त्वाच्या गोष्टी आमच्या आजूबाजूला आमच्याशी कुणी बोलेचना. मला तर लहानपणी हे खरे वाटत असे की आपल्याला पण नोकरी करून लग्न करायचे आहे. बापरे. आज आठवले तरी अंगावर काटा येतो. आणि हेसुद्धा खरे वाटत असे की त्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. किती भयंकर असेल ते. आवड, प्रेम आणि स्वभाव या तिन्ही गोष्टींविषयी तर बोलायची सोयच आमच्या शहरात नव्हती. 
त्यानंतर एक नवीन प्रकार जन्माला आला, तो म्हणजे नोकरी करणा:या मुलींची स्थळे. एखाद्या मोठय़ा भावाचे लग्न ठरणार असेल तर या विषयावर श्रीखंड खात चाललेली मोठय़ा माणसांची चर्चा आम्ही मुले ऐकत असू. कुणाला नोकरी प्लस लग्न हे मुलीचे डबल सॅण्डविच चालणार असे किंवा कुणाला ते चालणार नसे. त्या नोकरी करणा:या सगळ्या मुली ‘सर आमच्याकडे चैत्रगौर आहे, तर हाफडे सुटी मिळेल का?’ या प्रकारच्या असत. खरे काम आणि कष्ट करून काही स्वत:चे मिळवायचे असेल तर त्या मुली पुणो सोडून मुंबई लंडन किंवा अमेरिकेत वेस्टकोस्टला जात.
 पुण्यातल्या मुली ‘श्रीमंत नवरा मिळाला तर कशाला मरायला ही नोकरी करू’ या मताच्या असत. बराचश्या मुली लग्नानंतर सासरचा होरा जोखून मस्त राजीनामे वगैरे देऊन प्रेग्नंट होत. अनेक वर्षांनी मला पुण्यात फेमिनिस्ट या प्रकारच्या बायका भेटल्या. त्या मला सांगत की, स्त्रीला घराबाहेर पडून काम, स्वाभिमान, स्वत:चे उत्पन्न वगैरे अमुक तमुक लागते. पण आमच्या घरीदारी असले काही नव्हते. आमच्या कोण्याही काकवा, माम्या, वहिन्यांना कुणालाही काम- स्वाभिमान वगैरे काहीही नको होते. घर, बुडाखाली गाडी, पोरे आणि नोकर मिळाले की कशाला मरायला लागतोय स्वाभिमान? मुले जन्माला घालून त्यांना वेळच्यावेळी नोक:यांसाठी अमेरिकेत पाठवणो ही घरच्या सुनेची मोठी जबाबदारी होती. 
 आम्ही मोठे झालो तेव्हा आमच्या आडनावाच्या लोकांना सरकारी आणि बँकेच्या नोक:या मिळणो बंद झाले होते. हा देश आपल्या बुद्धीची आणि कुवतीची कदर यापुढे करणार नाही हे सगळ्यांना लक्षात आले होते. जुने आणि मळकट झालेले, गोंगाटाने भरलेले पुणो शहर हे बाहेरच्या खेडय़ातल्या आणि इतर छोटय़ा शहरातल्या लोकांचे घर बनू लागले होते. लोंढय़ाने माणसे पुण्यात राहायला येऊ लागली. मूळ पुणोकरांची तरु ण पिढी पटापट देश सोडून जाऊ लागली. काहीच वर्षात सॅनफ्रान्सिस्कोजवळ नवे पुणो उभे राहणार होते. त्याची ही सुरु वात होती.
या सगळ्यासोबत आमच्या शहराला एक गोडगोजिरी सांस्कृतिक बाजू पण होती, ती म्हणजे रंगभूमीवर काम करण्याची. ते मात्र सगळ्यांना करावेच लागत असे. पर्यायच नसे. 
नोकरी असो वा लग्न, रंगभूमी ही हवीच. अनेक लग्ने तर मराठी प्रायोगिक रंगभूमीमुळेच जमत असत. आमच्या पुण्याच्या या सांस्कृतिक भरजरी रंगभूमीमय वातावरणाविषयी पुढील रविवारी.
 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com