शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हत्ती.

By admin | Updated: April 29, 2016 22:05 IST

भारतीय संस्कृतीच्या महाकाय पटलावर हत्तीचं महत्त्व हजारो वर्षे टिकून आहे. गणोशाचं महन्मंगल देखणं रूप, बौद्ध धर्मातलं मानसिक सामथ्र्याचं प्रतीक ते समुद्रमंथनातलं इंद्रदेवाचं

 - सुधारक ओलव

(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे फोटो एडिटर आहेत.)
 
हत्ती. 
प्रगती आणि चिरंतन समृद्धीचं प्रतीक!
भारतीय संस्कृतीच्या महाकाय पटलावर हत्तीचं महत्त्व हजारो वर्षे टिकून आहे. गणोशाचं महन्मंगल देखणं रूप, बौद्ध धर्मातलं मानसिक सामथ्र्याचं प्रतीक ते समुद्रमंथनातलं  इंद्रदेवाचं वाहन अशी हत्तींची कितीतरी रूपं भारतीय उपखंडात दिसतात. शक्ती आणि सामंजस्य, सहनशीलता हे हत्तींचे स्वभावविशेष. त्यामुळेच हत्ती शारीरिक आणि मानसिक शक्ती आणि सामथ्र्याचं प्रतीक मानले जातात. तुम्ही उपखंडात कुठंही प्रवास करा हत्ती सर्वत्र वेगवेगळ्या रूपात, प्रतीकांत तुम्हाला भेटतच राहतात.
या भूतलावरचा अत्यंत दयाळू आणि अति बुद्धिमान जीव म्हणून या महाकाय प्राण्याची गणना होते. त्यांच्या त्या देखण्या, दयाळू, बुद्धिमान रूपाचं मला अत्यंत जवळून दर्शन झालं ते कर्नाटकात, कावेरी नदीच्या तीरावर! कर्नाटकात कोडगू जिल्ह्यात डुबरे एलिफण्ट कॅम्प ही विलक्षण सुंदर जागा आहे. कर्नाटक वनविभागाच्या अधिपत्याखाली असलेली ही जागा. या जंगलात हत्तींचं चलनवलन पूर्ण थांबल्यानं हत्तींच्या कळपांची काळजी ही वनविभागाचीच जबाबदारी आहे आणि आता या जंगलात हे हत्ती पर्यटकांच्या आकर्षणाचाच विषय ठरत आहेत.
जगात हत्तींच्या फक्त दोन जाती आहेत. एक आशियाई हत्ती, दुसरे आफ्रिकन. पृथ्वीच्या पाठीवर सर्वाधिक काळ अस्तित्वात असलेली ही पशुजमात. मात्र हे हत्ती असतात कठोर शिस्तीचे. त्यांच्या कळपाची शिस्त तर अत्यंत काटेकोर असते. कळपातल्या प्रत्येक सदस्याची ते अत्यंत मायेनं काळजी घेतात. आपण माणसं जसे कुटुंबाला धरून राहतो तसे हे हत्तीही अनेक र्वष आपल्या कुटुंबासह एकत्र राहतात.
डुबरेच्या कॅम्पमध्ये गेलात तर हत्तींचे असे मायाळू कळप भेटतात. पर्यटकांना त्यांच्या जवळ जाता येतं, त्यांना खाऊ घालता येतं. या हत्तींचा सांभाळ करणारी स्थानिक माणसंही किती मायेनं त्यांची देखभाल करतात हे दिसतं. 
हत्तींचं शांत, मायाळू पण महाकाय रूप पाहून तिथं आलेल्या प्रत्येकाला या विशाल जिवांविषयी आदर वाटतोच. बलाढय़ प्राण्यांचं हे शांत, सच्छिल रूप पाहून खरंतर निसर्गाच्या किमयेपुढेही नतमस्तक व्हावंसं वाटतं. मात्र त्याचवेळी माणसाच्या क्रौर्याचीही जाणीव होतेच. हस्तिदंताच्या मोहापायी हत्तींच्या रहिवासावरच आक्रमण करून त्यांचं जगणं माणसानंच दुश्वर केलं आहे. खरंतर इतक्या प्रेमळ, इतक्या बुद्धिमान आणि विशाल प्राण्याविषयी माणसानं ममत्व बाळगायला हवं, त्यांना जपायला हवं. प्रयत्नपूर्वक!!