शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

मन तृप्त करणारा 'कान'

By admin | Updated: May 31, 2014 17:36 IST

‘कान’ म्हणजे सिनेमावाल्यांचं काशी विश्‍वेश्‍वर! जगभरच्या दिग्दर्शकांना आपला चित्रपट सर्वप्रथम ‘कान’मध्ये दाखविला जावा, असं मनापासून वाटतं. नुकत्याच पार पडलेल्या ‘कान’ महोत्सवात झळकलेल्या आणि ठसा उमटवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा मागोवा थेट कानमधूनच..

 अशोक राणे

तर एकदाचा मी कानला म्हणजे कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात येऊन पोहोचलो. जन्माला येऊन चारधाम यात्रा माणसाने करायलाच हवी, अशी आपल्याकडे एक धारणा आहे. सिनेमातली माझी चारधाम यात्रा कान महोत्सवात येताच पूर्ण झाली. कान म्हणजे सिनेमावाल्यांचं काशी विश्‍वेश्‍वर! त्याआधी बर्लिन, मॉस्को, सेंट पीटसबर्ग, कालरेव्ही व्हारी, लोकार्नो, रॉटरडॅम, माँट्रीयल, टोरांटो, सनडान्स, फ्लोरिडा, सॅन फ्रॅन्सिस्को आदी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत हजेरी लाऊन आलो होतो.. आणि आता कान! तृप्त वाटलं..!
मुळात कान हे छोटेखानी शहर आणि त्याची अवघी पंचक्रोशी देखणी आहे. निसर्गाने या गावाला मुक्तहस्ते सौंदर्य बहाल केलंय. कान हे फ्रान्सच्या दक्षिणेला समुद्राजवळ आहे आणि महोत्सवाचा सारा परिसर समुद्राला लागूनच आहे. कानचं हे आणि एवढंच भौगोलिक वैशिष्ट्य नजरेसमोर ठेऊन भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गेली दहा वर्षे- भारताचं कान म्हणून गोव्यात भरविला जातो आहे; परंतु केवळ या एका गोष्टीने गोवा कान होणार नाही. तिथलं निसर्गदत्त आणि एकूणच त्यांच्या सांस्कृतिक पर्यावरणात असलेलं अँस्थेटिक्स गोव्यात येऊ शकत नाही. मुळात गोव्याचं कान करण्याचा अट्टहास का? मुंबईचं शांघाय करता-करता मुंबईचं मुंबईपण आपण गमावत चाललोय, हेच आपल्या लक्षात येत नाही. कारण, शांघाय किंवा कान केवळ वरवरच्या गोष्टींनी होत नाही. त्या संकल्पना जन्माव्या लागतात.. आणि त्या तशा जन्मायला तिथे एक प्रकारचं पोषक वातावरण असतं. तात्पर्य काय, तर कान म्हणजे कान आहे, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.
अनेक महोत्सवांना उपस्थित राहिलेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांच्या वारकर्‍यांनीही हे मान्यच केलं आहे. यंदा मीही तो अनुभव घेतला.
जगभरच्या दिग्दर्शकांना आपला चित्रपट सर्वप्रथम कानमध्ये दाखविला जावा, असं मनापासून वाटतं. स्पर्धा विभागात दाखविला गेला, तर उत्तमच; परंतु ‘अ सर्टन रिगार्ड’, ‘आऊट ऑफ कॉम्पिटिशन’, ‘डिरेक्टर्स फोर्टनाईट’, ‘क्रिटिक्स वीक’ यांपैकी कुठल्याही विभागात जरी त्यांच्या चित्रपटांची वर्णी लागली, तरी ते खूश असतात. कारण, कान महोत्सवात चित्रपट दाखविला जाणं म्हणजेच एक मोठा सन्मान असतो. कारण, कान जगातला पहिल्या क्रमांकाचा आणि अर्थातच प्रतिष्ठेचा महोत्सव आहे.
कानमधील सर्वच विभागांविषयी मला पुरेपूर कुतूहल होतं आणि शक्यतो तिथले पाहता येतील तेवढे चित्रपट मला पाहायचे होते; परंतु ते तितकं सहजशक्य नसतं, हे माझ्यातल्या वारकर्‍याला माहीत होतं. साधारणपणे दिवशी चार/ पाच चित्रपट पाहणे, पत्रकार परिषदा, चर्चासत्रांना, तसेच मास्टर्स क्लासना उपस्थित राहणे आणि शिवाय इतर वारकर्‍यांच्या भेटी घेणे हा इतका धावपळीचा कार्यक्रम असतो, की ठरविलेलं सगळंच पदरात पडेल, याची शाश्‍वती नाही. गेल्या काही वर्षांत मी या आघाडीवर चांगलाच समजूतदार झालोय.. आणि तरीही कानच्या या महोत्सवातले दोन मास्टर्स क्लास हुकल्याची रुखरुख जबरदस्त आहे. हे दोन वर्ग घेतले होते इराणचे दिग्दर्शक अब्बास किरोस्तामी आणि ख्यातनाम इटालीयन अभिनेत्री सोफिया लॉरेन! कुठला तरी चित्रपट पाहून धावतपळत किरोस्तामींच्या वर्गावर पोहोचलो; परंतु वर्गात शिरताच आलं नाही. दोघांचेही वर्ग ओसंडून वाहिले.
मी मुख्यत: भर दिला तो ‘कॉम्पिटिशन’ आणि ‘अ सर्टन रिगार्ड’ या दोन विभागांतील चित्रपट पाहण्यावर! ‘आऊट ऑफ कॉम्पिटिशन’मधील एकच चित्रपट मुद्दाम वाट वाकडी करून पाहिला - ‘इन द नेम ऑफ माय डॉटर’ हा आंद्रे टेशीनी दिग्दर्शित फ्रेंच चित्रपट! कारण त्यात माझी आवडती अभिनेत्री कॅथरीन दनेव्ह होती. युरोपातील बहुतेक सर्व बड्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांत तिने काम केलंय आणि त्यातील बहुतेक सर्व मी आवर्जून पाहिलेत. ‘कॉम्पिटिशन’ आणि ‘अ सर्टन रिगार्ड’ या दोन प्रमुख विभागांतले चित्रपट ‘ग्रँड थिएटर ल्यूमिए’ आणि ‘देबुसी’ या एकमेकाला लागूनच असलेल्या चित्रगृहांत दाखविले गेले. हे एक प्रचंड असं सांस्कृतिक संकुलच आहे. ही दोन मोठी आणि भव्य थिएटर्स, शिवाय आठएक छोटी थिएटर्स, महोत्सवाची सर्व कार्यालयं, तीन प्रकारचे मोठाले पत्रकार कक्ष, दोन मजले व्यापून असलेलं भव्य फिल्म मार्केट, शिवाय आणखी बरंच बरं काही या संकुलात आहे. दिवसभर या सर्व ठिकाणी जातयेत इतकं चालणं व्हायचं, की मॉर्निंग वॉकची गरजच नव्हती. कानचं सगळंच भव्य! रांगादेखील भव्यच म्हणायच्या. जगभरचे पाच हजार पत्रकार, तितकेच जगभरच्या चित्रपटसृष्टीतील व्यावसायिक आणि असेच देशविदेशांतून आलेले चित्रपट रसिक! रांगा न लागतील, तरच नवल! परंतु, कुठेही कसली गडबड नाही, गोंधळ नाही, आरडाओरडा नाही. सगळं कसं एका शिस्तीत! मी दहा दिवसांत तीस चित्रपट पाहिले; परंतु त्यासाठी रांगेत प्रत्येकी किमान अर्धा तास याप्रमाणे जवळपास पंधरा तास घालविले; परंतु ही प्रतीक्षा आणि उभं राहून आलेला थकवा हे सारे चित्रपट पाहताना जाणवलंदेखील नाही. चित्रपट संपला, की पुन्हा धावतपळत रांग गाठायला एक प्रकारचा उत्साहच यायचा. हे व्हायचं कारण, तसे चित्रपट काळजीपूर्वक इथे निवडले जातात. या आघाडीवर कानने कायम आपला दर्जा राखला आहे. मी पाहिलेल्या तीसपैकी जवळपास पंचवीस चित्रपट हे अविस्मरणीय होते. हे समीकरण इतरत्र जुळून येत नाही. पाहिलेल्यांपैकी निम्मे जरी लक्षणीय ठरले, तरी खूप काही पदरात पडले, असे वाटते.
या तीस चित्रपटांत विविध प्रकारचे चित्रपट पाहता आले. विशेष म्हणजे यात मेलोड्रामाही होते; परंतु ते उगाचच भावुक, हळवे असे नव्हते. कालवाकालव होई खरी; मात्र ते पाहताना डोळे भरून आले, असे घडले नाही. या चित्रपटांतील करुण कहाण्या पाहताना त्याला जबाबदार असणार्‍या कौटुंबिक किंवा सामाजिक/ राजकीय कारणांकडे विशेष लक्ष गेले. अशा प्रकारचा संयमित मेलोड्रामा पाहायला सहसा मिळत नाहीत. नावोमी कावासे दिग्दर्शित ‘स्टिल द वॉटर’ (जपान), अँलीस रोहरवाकाचा ‘द वंडर्स’ (इटली), ज्याँ पिएर आणि ल्युक या दारदेन बंधूंचा ‘टू डेज वन नाईट’ (बेल्जियम), झेव्हियर दोलानचा ‘मॉमी’ (कॅनडा), आंद्रे झ्यागिनस्तेव्हचा ‘लेवीथन’ (रशिया), जेमे रोझालेसचा ‘ब्युटीफूल यूथ’ (स्पेन), जुली जुंगचा ‘अ गर्ल अँट माय डोअर’ (साऊथ कोरिया), वांग चाओचा ‘फँटासिया’ (चीन), आसिआ आरगेंतोचा ‘मिस अंडरस्टूड’ (इटली) या सर्व चित्रपटांतून त्याचा प्रत्यय आला. जगण्यातली अपरिहार्यता नातेसंबंधांना कसे वेगळे परिमाण देते, याचंही दर्शन या चित्रपटांतून घडले.
अठराव्या शतकातील ब्रिटिश चित्रकार जे. एम. डब्ल्यू. टर्नर याच्या कलाकारकिर्दीवरचा ‘मि. टर्नर’ हा ऐतिहासिकपटांच्या साचेबंदपणाला छेद देणारा चित्रपट होता. तसाच काहीसा अनुभव ‘ग्रेस ऑफ मॉनॅको’ या हॉलिवूडच्या ग्रेस कॅली या अभिनेत्रीच्या जीवनावर आधारित चित्रपटाने आणि बुजुर्ग ब्रिटिश दिग्दर्शक केन लोच यांच्या ‘जिमीज हॉल’ या दोन चित्रपटांनी दिला. ऐतिहासिक चित्रपटांत मुख्यत: सारा भर त्या-त्या विशिष्ट काळाची निर्मिती करण्यावर असतो. या तीनही चित्रपटांत मात्र दिग्दर्शकांनी आपापल्या कथानायकाच्या वा कथानायिकेच्या भावावस्थांवर, सभोवतालच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक पर्यावरणातून बनलेल्या त्यांच्या जाणीव-नेणिवेवर दिला आहे. त्यामुळे ‘काळा’ची निर्मिती त्यांच्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून होताना दिसते.
अबदरानमाने सिसाकोने ‘तिम्बक्तू’मध्ये कट्टर धर्मवाद्यांच्या क्रूर कारवाया आणि त्याला बेडरपणे भिडणार्‍या सर्वसामान्यांचं चित्र रेखाटलं आहे, तर फिलीप  लाकोतेने ‘रन’मध्ये आफ्रिकेतील तथाकथित स्वातंत्र्य चळवळीतला फोलपणा दाखविला आहे.
नुरी बिल्गे सिलान दिग्दर्शित ‘विंटर स्लीप’ (टर्की), ओलिव्हर आसायाचा ‘क्लाउड्स ऑफ सिल्स मारिआ’ (फ्रेंच), केरॅन येदायाचा ‘दॅट लव्हली गर्ल’ (इस्रायल), मॅथ्यू अमलरीकचा ‘द ब्ल्यू रूम’ (फ्रेंच), कोर्नेल मुंद्रोझचा ‘व्हाईट गॉड’ (हंगेरी), रॉल्फ डी हीरचा ‘चार्लीस कंट्री’ (ऑस्ट्रेलिया) हे सारेच चित्रपट विविध पठड्यांतील आणि नानाविध विषय हाताळणारे लक्षणीय चित्रपट होते. एकच भारतीय चित्रपट यंदा कानमध्ये होता- कनू बहेल दिग्दर्शित ‘तितली’! त्याचा तो पहिलाच चित्रपट! आशय आणि आविष्कार या दोन्ही पातळ्यांवर या सर्वच चित्रपटांनी विलक्षण अनुभव दिला.
आणखी तीन चित्रपटांचा वेगळा आणि खास उल्लेख मला करावासा वाटतो. पैकी दोन होते दोन बुजुर्गांचे, तर तिसरा होता एका नवख्या दिग्दर्शकाचा! अज्रेंटिनाच्या दामीयान सिफ्रॉनचा ‘वाईल्ड टेल्स’ हा तिसरा चित्रपट. मला तो खूप आवडला. खास आवडण्याचं कारण म्हणजे तो एका पातळीवर विनोदी म्हणता येईल, असा होता आणि तरीही मुख्य स्पर्धा विभागात होता.
‘द सॉल्ट ऑफ द अर्थ’ ही एक वेगळ्याच प्रकारची कलाकृती होती आणि तिचे दिग्दर्शक दोन होते. पैकी एक होते र्जमनीचे वीम वेंडर्स आणि त्यांचे सहकारी सॅबेस्तीन सालगाडो या जगप्रसिद्ध फोटोग्राफरचे चिरंजीव ज्युलियन रिबेरो सालगाडो. जगभर हिंडून सॅबेस्तीन सालगाडो यांनी आपल्या कॅमेर्‍यातून आपल्याला जग दाखवलंय. ते एकाच वेळी प्रसन्न करणारं आणि भयानक अस्वस्थ करणारं आहे.
तिसरा महत्त्वाचा चित्रपट म्हणजे फ्रेंच न्यू वेव्हचे एक उद्गाते ज्याँ ल्यूक गोदार यांचा ‘गूडबाय टू लँग्वेजेस’! आणि तो होता स्पर्धा विभागात! अवघ्या कानला त्याविषयी कुतूहल होतं. वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी या अवलियाने आपला हा चित्रपट थ्री डीमध्ये केलाय. त्यातही काही वेगळी गंमत त्याने केली आहेच. सबंध कारकीर्दभर ज्याने पारंपरिक चित्रपट भाषेला शह दिला, तोच हा भला माणूस भाषांनाच गूडबाय म्हणतोय.. 
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)