शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
3
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
4
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
5
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
6
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
7
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
8
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
9
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
10
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
11
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
12
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
13
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
14
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
16
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
17
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
18
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
19
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
20
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

टंचाईची सुगी

By admin | Updated: September 26, 2015 14:10 IST

दसरा आला की गोंडय़ांचा भाव दुप्पट होतो. गणेश चतुर्थीला दुर्वाना चाफ्याचा भाव मिळतो. प्रत्यक्ष टंचाई येण्याआधीच टंचाईचं भूत उभं केलं, की राजकीय धुरीणांसकट सगळ्यांना ‘किंमत’ येते. भूताची गोष्ट ऐकून भीतीयुक्त करमणूक होते. - आधी भूत उभे करायचे आणि मग ते उतरवायचे! या दोन्ही कला अवगत असलेल्या भगतांनाही मग मोठी मागणी येते. तहान लागल्यावर ‘रेडी टू यूज’ विहीर मिळावी अशी ही ‘टंचाई’.

 - मिलिंद थत्ते 
 
एखादा सण जवळ आला की त्या सणासाठी लागणा:या वस्तूंचे भाव वाढू लागतात. दस:याच्या एक दिवस आधी गोंडय़ाचा जो भाव असतो, तो दस:याला दुप्पट होतो. गणोश चतुर्थीला दूर्वांनाही चाफ्याचा भाव मिळतो. आयत्या वेळी जास्त किंमतसुद्धा वाजवी वाटणो हे आपल्याला सवयीचे आहे. यंदा पाऊस कमी झालाय, म्हणजे ‘पाणीटंचाई’ हा भरपूर खपणारा आयटम होणार आहे! टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा आणि टंचाईग्रस्त शहरांना नवीन धरणो - हे दोन्ही यंदा सुगीचे होणार. 
दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मला एका वाचकाचा फोन आला होता. ते म्हणाले, गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे आम्ही ऐकतो, आम्ही काही मदत करू इच्छितो. आमच्याकडे पुण्यात नळाला भरपूर पाणी येते. असे स्वच्छ पाणी बाटल्यांमध्ये भरून जर या गावांना पाठवले तर बिचा:यांना प्यायला तरी पाणी मिळेल. आणि हा उपाय अगदी नामी आहे, अशी त्यांची भावना होती. आपल्या परंपरेत अन्नदानाला जसे महापुण्य मानले आहे, तसेच हेही आहे. तीर्थक्षेत्री पाणपोया बांधणो, हे मोठे धर्माचे काम मानले गेले आहे. पूर्वी पाण्याच्या बाटल्यांची विक्र ी होत नसे, तेव्हा उन्हाळ्यात ट्रेनने प्रवास करताना मध्य भारतातल्या खण्डवा, रतलाम इत्यादि स्टेशनांवर काही पंथांचे लोक पाणपोया चालवत. ट्रेन थांबली की प्रवासी आपापल्या बाटल्या, छोटे माठ, पखाली या पाणपोयांवर भरून घेत. तहानलेल्याला पाणी पाजणो हे महापुण्य आहे, हा संस्कार आपल्या समाजमनात पक्का भिनलेला आहे. याच भावनेतून हे बाटल्यांमध्ये पाणी भरून पाठवण्याचे उपाय आपल्या लोकांना सुचतात. सामान्य माणसे बाटल्यांमध्ये विचार करतात, राजकीय पुढारी टँकरमध्ये विचार करतात. मी दहा गावांना फुकट टँकर पाठवतो, त्या टँकरवर बॅनरबिनर लावून जाहिरात करतो, माङया  मतदारसंघातल्या लोकांपुढे ‘केवढा हा पुण्यवान माणूस’ अशी शायनिंग होऊन जाते. आणि अशा पुण्यवान माणसाने चार ठिकाणी पैसे खाल्ले तर काय बिघडले - अशी सवलतही सामान्य मतदार देऊन टाकतो. इतर सर्व जीवनव्यवहारात वाट्टेल ते करणो आणि देवळात किंवा एखाद्या जागी जाऊन पुण्याचरण (पापधुलाई) करणो हे आपल्याला खटकत नाही. गावातला सावकार किंवा धान्यव्यापारी भावात किंवा व्याजात भरपूर फसवणूक करतो आणि मग गणोशोत्सवात किंवा नवरात्रीत महागडी मूर्ती प्रायोजित करून आपल्या काळ्या पैशाचे पांढरे करून घेतो. देव पापंबिपं धुवून देतो की नाही माहीत नाही, पण गावातले लोक मात्र त्याची पापे माफ करून मोकळे होतात. देवाची मूर्ती दिली म्हणजे केवढे महापुण्य! अगदी हेच तंत्रज्ञान मोठय़ा स्तरावर राजकीय नेते वापरतात. दर्शनी पुण्य म्हणजे दाखवायचे दात. समाजमनावर याच दाखवी दातांचा प्रभाव पडतो. 
म्हणून टँकर पाठवणो हे राजकीय आणि आर्थिक फायद्याचे ठरते. असेच शहरांच्या बाबतीत धरणांचे आहे. टंचाईचे भूत उभे राहीपर्यंत धरणांना राजकीय किंमत पुरेशी मिळत नाही. प्रत्यक्ष टंचाई येण्याआधीच किंवा ती न येताच टंचाईची भीती उभी करता येते. त्यात शहरातले लोक तर अधिकच अजाण असतात. गावातल्या माणसाला विहिरीत डोकावून पाणी खरेच किती आहे हे बघता तरी येते, शहरातला माणूस सांगोवांगीवर बिचारा अवलंबून असतो. धरणो किती टक्के भरली, या मोघम माहितीवर टंचाईचे भूत सहज उभे राहते. धरणात गाळ किती आहे, धरणाची क्षमता अमुक टीएमसी म्हणजे नेमकी किती आहे, क्यूसेक्स म्हणजे सेकंदाला किती हजार लिटर पाणी - यातलं काहीही बिचा:याला कळत नाही. वर्तमानपत्रे आणि टीव्ही माध्यमे नुसते आकडे फेकतात आणि हा ऐकून घाबरतो. 
कथित प्रगत देशांमधून मोटारगाडय़ांची सर्व मॉडेल्स आमच्या शहरांमध्ये आली आहेत. छोटय़ा शहरांमध्येही किती मर्सिडीज खपल्या, याची चर्चा सर्वत्र चालते. पण त्याच प्रगत देशामधल्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाणी वेगवेगळ्या कामांसाठी वापरले जाते, याची चर्चा मात्र कधी होत नाही. पिण्यासाठी महानगरपालिकांनी मोठा खर्च करून शुद्ध केलेले पाणी आमच्या शहरांमध्ये गाडय़ा आणि संडास धुवायलाही वापरले जाते. अंघोळीचे आणि कपडे-भांडी धुतलेले पाणी पुनर्वापर करून बागेसाठी, इतर स्वच्छतेसाठी पाश्चात्त्य शहरांमध्ये वापरले जाते. बागेतले अतिरिक्त पाणीही पुन्हा भरून पुन्हा वापरणो प्रचलित आहे. या फॅशनही पाश्चात्त्यांकडून घेतल्या तर बरे होईल. आपापल्या शहराची पाणी व्यवस्था समजणो हा नागरिकशास्त्रतला मूलभूत धडा असायला हवा. आताच्या धरणांमधला गाळ काढणो, पाणी वितरण व्यवस्थेतल्या गळत्या-चो:यांना आळा घालणो, पाण्याचे वर्गीकरण करून पेयजल आणि इतर पाणी वेगळे करणो, पावसाचे आणि इतर वाहते पाणी मानवी वापरात येईल अशा व्यवस्था करणो - ही सारी प्रगत शहरांची लक्षणो आहेत. जिथले पाणी वापरता येईल अशा ठिकाणी केवळ सुंदरीकरण करणो (उदा. अहमदाबादेतली साबरमती, नाशकातली गोदापार्कवाली गोदावरी, ठाण्यातले तलाव) हे म्हणजे गावातल्या सावकाराच्या पुण्यकर्मासारखेच आहे. आणि गावकरी जसे त्या पुण्याला भुलतात तसेच शहरातले लोक नदी-तलावांच्या लिपस्टिकला भुलतात. नदीकाठी मंद उजेडात बसून कॉफी पिऊन किंवा भेळ खात खात शहराचा असा विकास करणा:या   पुण्यात्म्यांना धन्यवाद देतात. अशा लोकांना ‘पाणीटंचाई’च्या नुसत्या बातमीनेच धक्का बसतो यात नवल नाही. बांधा बुवा एकदाची धरणो काय ती, त्याशिवाय आमचे काही खरे नाही - असे त्यांना अगदी मनापासून वाटते. 
गावात टंचाई म्हटले की मोर्चांना ऊत येतो. नंतर सरकारने काहीही दिले, तरी ते आमच्याच मोर्चामुळे झाले, असे म्हणायला एखादा मोर्चा तरी काढून ठेवलेला बरा असतो. त्यामुळे लवकर एकदाची टंचाई जाणवू दे, म्हणजे मोर्चाला लोक येतील, आणि आपला त्यात तरी पहिला नंबर लागेल - अशी वेगळीच चुरस असते. सत्तापक्षातल्या लोकांना बिचा:यांना मोर्चा काढता येत नाही. त्यामुळे ते त्यातल्या त्यात समाधान मानून मंत्र्यांना निवेदने देऊन आपले फोटो पेपरात येतील याची काळजी घेत असतात. टँकर ज्यांच्या मालकीचे आहेत, ती मंडळी कुठल्याही पक्षाची असली तरी फायद्यात असतात. नेमेचि येते मग टंचाई - या भावनेने ते आश्वस्त येतात. इतर लोक पावसाची वाट बघतात, तेव्हा हे उलटय़ा दिशेला डोळे लावून बसलेले असतात. 
गावात पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प असतो. यात केंद्र शासन आणि राज्य शासनाने मोरीत ओतावेत असे पैसे यात ओतलेले असतात. भरपूर पावसाच्या क्षेत्रत तर या प्रकल्पाकडे कोणीच गांभीर्याने बघत नाही. इतके की, आताही कोकणपट्टय़ातल्या किंवा पूर्व विदर्भातल्या गावांना पाणलोट विकासाचे आदर्श काम दाखवायला नगर जिल्ह्यातल्या गावांमध्ये आणले जाते. भरपूर पावसाच्या भागात एकही पाणलोट विकास आदर्श वीस वर्षांनंतरही सापडत नाही. गावातला एक पाणलोट समितीचा लोकनियुक्त सचिव आणि कृषी सहायक यांनी मिळून काहीही करावे असा हा प्रकल्प आहे. आमच्या तालुक्यातल्या काही गावांमध्ये या प्रकल्पात एंट्री पॉइंट अॅक्टिव्हिटी म्हणून शहाण्णव हजार रुपयांची सतरंजी घेतली आहे. गावातून ज्या व्यवसायांना मागणी नाही असे व्यवसाय केवळ प्रकल्प आराखडय़ात आहेत, म्हणून कागदोपत्री चालू आहेत. पाणी अडवण्या- जिरवण्यापेक्षा पैसा जिरवण्याचा हा प्रकल्प गावोगावी चालू आहे. आणि तो प्रकल्प होऊनही नंतर गाव पुन्हा टंचाईग्रस्त व्हायला मोकळे असते. गावात वेळेवर टँकर आणणारा पुढारी ताबडतोब पुण्यात्मा होतो, त्याने पाणलोट प्रकल्पाची माती केली असली म्हणून काय बिघडले? 
तहान लागल्यावर रेडी-टू-यूज विहीर मिळावी अशी ही टंचाईची सुगी आहे. भुताची गोष्ट ऐकून किंवा भूतचित्रपट पाहून जशी एक भीतीयुक्त करमणूक होते, तसेच हे आहे. आधी भूत उभे करायचे आणि मग ते उतरवायचे - या दोन्ही कला अवगत असलेल्या भगतांसाठी टंचाईची सुगी अत्यंत फायद्याची आहे.
 
(लेखक ‘वयम’ या समावेशक विकासाच्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)
 
milindthatte@gmail.com