शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

औषधांचा रोग

By admin | Updated: April 23, 2016 13:45 IST

‘लोकमत’ने उघडकीला आणलेल्या राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातल्या ‘औषध खरेदी घोटाळ्या’नंतर अधिकारी निलंबीत झाले, चौकश्यांचे सत्र सुरू झाले असले, तरी हा विषय इथे संपत नाही. ..तो इथून सुरू होतो आणि औषध-उपचारांसाठी वणवणत हिंडणोच नशिबी आलेल्या गोरगरीबांच्या दारात पोचतो. राज्यभरात खळबळ उडवून देणा:या या शोधमालिकेच्या निमित्ताने राज्यातल्या आरोग्य सेवेच्या अनारोग्याची चिकित्सा

 सरकारी दवाखान्यांमध्ये अगतिकतेने येणा:या गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळणारा

 
- अतुल कुलकर्णी
 
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला. त्यानुसार 11 कोटी लोकसंख्येच्या राज्यात 23.32 टक्के लोक झोपडीत राहणारे आहेत आणि 17.35 टक्के जनता दारिद्रय़रेषेखाली आहे. हेच लोक सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यभर पसरलेल्या यंत्रणोतून उपचार घेतात. या विभागाचे खरे लाभार्थी हेच गोरगरीब आहेत, जे कोणाचाही वशिला नसताना किमान उपचार मिळावेत ही अपेक्षा ठेवून राज्यातल्या सरकारी दवाखान्यात जातात. तिथे उपचार मिळाले नाहीत तर ही माणसे वर्तमानपत्रच्या कार्यालयात बातम्या द्यायला जात नाहीत; तिथेच समोर दिसेल त्या डॉक्टरच्या हातापाया पडत उपचार करण्याची अगतिक विनवणी करत राहतात. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचे हे विदारक वास्तव आहे. 
- मात्र मुंबईत बसून आरोग्याचा गाडा हाकणारे अधिकारी या वास्तवापासून कोसो दूर! एकीकडे गावोगावच्या रुग्णांना पाहिजे ती औषधे मिळत नाहीत, कुत्र चावल्याची लस असो की साप चावल्यावर द्यायचे औषध असो; प्रत्येक जिल्ह्यात तुडवडा आहे. दुसरीकडे ज्यांची काहीच गरज नाही अशी करोडो रुपयांची औषधे पडून राहतात, त्यांच्या दर्जाविषयी प्रश्न निर्माण होतात. 
औषधांची गरज खालून वर्पयत यायला हवी आणि त्यानुसार पुरवठा. मात्र आपल्याकडे गरजही मुंबईतच ठरते, खरेदीही मुंबईत होते आणि खालच्या अधिका:यांना मात्र (अनावश्यक) औषधे आलीच आहेत तर रुग्णांना देण्याशिवाय आणि आवश्यक औषधांवाचून त्यांना दवाखान्याबाहेर पिटाळण्याशिवाय पर्याय उरत नाही.
डॉ. अभय बंग यांनी एक प्राथमिक आरोग्य केंद्र चालवण्यास घेतले होते. त्यांनी न मागता त्यांना तापावरच्या पाच लाख गोळ्या पाठवण्यात आल्या. त्यांनी नकार दिला, तर सांगितले गेले की वरून आल्या आहेत, घ्याव्या लागतील. 
..काही महिन्यांनी त्या गोळ्यांची एक्सपायरी डेट उलटून गेली. डॉ. बंग यांनी गावातच एक खड्डा करून त्या गोळ्या त्यात पुरून नष्ट केल्या आणि नंतर स्वत:हून चालवायला घेतलेले प्राथमिक आरोग्य केंद्रही परत देऊन टाकले. या परिस्थितीत आज काहीही फरक पडलेला नाही. 
सार्वजनिक आरोग्य विभागाची ही हेळसांड मंत्र्यांनीच केलेली नाही, तर सचिव, संचालकांपासून सगळ्यांनीच केली आहे. आपण कसेही वागलो तरी आपणास कोणतीही शिक्षाच होत नाही ही भावना त्यातून बळावली आणि या विभागाला निष्क्रियतेचा, बेपर्वाईचा, अक्ष्यम्य असहिष्णुतेचा आजार कायमचा जडला आहे. ज्यांनी रुग्ण तपासायचे, उपचार करायचे ते खरेदीत मग्न आहेत. ज्यांनी खरेदीवर नियंत्रण ठेवायचे त्यांना या विषयाचा गंध नाही. 
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या दवाखान्यासमोर ट्रक उभे आहेत आणि त्यातली औषधे कुणी उतरवून घेत नाही, हा मिळालेला पहिला ‘धागा’. त्या आधाराने खोदकाम केल्यावर गरगरवून टाकणारे तपशील हाती आले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 297 कोटींच्या वारेमाप आणि मनमानी खरेदीचे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीला आणले. गदारोळ उडाला.  निलंबने झाली. चौकशा लागल्या.
..पण प्रकरण संपले नाही, ते सुरू झाले आहे.