शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

ड्रोन

By admin | Updated: July 18, 2015 13:57 IST

दुकानातून ऑर्डर केलेला पिङझा ते आकाशातून उडत येत थेट तुमच्या घरी पोचवू शकतात, सिग्नल तोडून गाडी पुढे दामटलीत, तर ‘वरून’ तुमच्यावर ‘नजर’ ठेवू शकतात, पूर-भूकंपात अडकून पडलेल्यांची खबर ‘काढून’ आणू शकतात, शत्रूच्या प्रदेशातून उडत येत टेहळणी करू शकतात, आणि मान वर करून बघण्याचीही उसंत नसलेल्या महानगरांवर हवाई हल्लेही करू शकतात..त्यांचं काय करावं, या पेचात सध्या जग आहे!

उडत्या मौजेची दहशत
 
 
मजा, तुम्ही घराच्या दिवाणखान्यात बसला आहात, आणि तुम्ही ऑर्डर केलेल्या पिङझाची डिलिव्हरी द्यायला एक उडती तबकडी आकाशातून तुमच्या गॅलरीतच उतरली..
तुमच्या घरच्या अंगणात किंवा इमारतीच्या टेरेसवर काही समारंभ आहे, आणि चार पंखांची उडती खेळण्यासारखी वस्तू वरच्यावर भिरभिरत शूटिंग करते आहे..
भर वाहतुकीच्या रस्त्यावरून तुम्ही तुमचं वाहन दामटत गर्दीतून पुढे घुसवता आहात, आणि नेमकी तुमच्या डोक्यावरल्या आकाशात उडत्या  ‘पोलिसा’ची तुमच्यावर ‘नजर’ आहे..
पूर किंवा अतिवृष्टीने थैमान घातलं आहे, कुंभमेळ्यासारख्या धार्मिक ठिकाणी काबू न करता येणारी गर्दी उसळली आहे, एखादी अख्खी वसाहत आगीने वेढली आहे; अशा आणीबाणीच्या वेळी पोलीस, लष्कराच्या तुकडय़ा आणि इतर मदतपथकांना आकाशातून उडणा:या काही तबकडय़ा मदत करीत आहेत.. जिथे माणसाला जाता येणं अशक्य अशा  ‘स्पॉट’ची टेहळणी करून अत्यंत संवेदनशील अशी माहिती पुरवत आहेत..
- हे कुठल्या हॉलिवूड सिनेमातलं अतिरंजीत वर्णन वाटतंय? - तर मग तुमच्या आजूबाजूला आणि मुख्य म्हणजे इतके दिवस फक्त विमानंच उडतात असं माहीत असलेल्या आकाशात काय घडू (आणि उडू) घातलं आहे, याची तुम्हाला खबरच नाही म्हणायची!
- ही उडती जादू म्हणजेच ड्रोन !!
आजवर केवळ लष्करी तुकडय़ा आणि काही मोजक्या यंत्रणांसाठी वापरात असलेले हे उडते ड्रोन आता चक्क नागरी सीमेच्या आत येण्याच्या - म्हणजे जवळजवळ घुसण्याच्याच - तयारीत आहेत.
सर्वसामान्यांसाठी ही एक ‘उडती मौज’ आहे आणि आधीच अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने होत असलेल्या ‘घुसखोरी’ला आळा घालता घालता मेटाकुटीला आलेल्या जगभरच्या सुरक्षा यंत्रणांसाठी नवी डोकेदुखी!
‘ड्रोन’ म्हणजे लष्करासाठी वापरात असलेलं मानवरहित विमान. 
किंवा सर्वसामान्य वापरासाठी, टेहळणी   करण्यासाठी असलेलं छोटं मानवरहित चार पंखांचं हेलिकॉप्टर.  
हे छोटं चारपंखी हेलिकॉप्टर आज जगभरात मोठय़ा फायद्याचं ठरतंय. एखाद्या घटनास्थळाची पाहणी असो वा वस्तूंची डिलिव्हरी असो, किंवा काही किलोमीटर अंतरावरून टेहळणी करणं असो, हे सारं काम ड्रोन चोखपणो करतो. पण हे आता दहशतवाद्यांच्या हातचं खेळणंही बनलं आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी टेहळणी करणारं असंच ड्रोन उडताना दिसलं. चेंबूरजवळच्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या परिसरात दोन तरुण ड्रोन उडवत होते. केंद्राच्या एका कर्मचा:याला ते दिसलं आणि त्यानं पोलिसांना याची लगेच खबर दिली. नंतर चौकशीत असं निष्पन्न झालं, की हे दोन तरुण एका गृहप्रकल्पाच्या वेबसाइटसाठी काम करणारे होते आणि त्यासाठी परिसरातील बिल्डिंग्जचे फोटो काढण्यासाठी त्यांनी तो ड्रोन उडवला होता.
अतिसंवेदनशील परिसरात ड्रोन उडवण्याच्या या घटनेआधीच पोलिसांनी ड्रोनबंदी घातली होती़ गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून अशी बंदी भारतभरात लागू आहे. पण तरीही मुंबईच्या आकाशात ड्रोन उडालं. त्यामुळे पोलिसांची झोप उडाली आहे. 
कारण दहशतवादी हल्ल्याची भीती ! 9/11 हल्ल्यानंतर सागरी सुरक्षा चोख झाल्यानं आता हवाई हल्ल्याचा कट दहशतवादी रचू शकतात अशी शक्यता सुरक्षा यंत्रणांना वाटते आहे. त्यामुळंच ही ड्रोनबंदी पोलिसांच्या वतीनंही लागू करण्यात आली आहे. आकाशातून उडत उडत फोटो काढणं, टेहळणी करण्यापासून पिङझा आणि पुस्तकांच्या डिलिव्हरीर्पयत अक्षरश: काहीही करू शकण्याची क्षमता असलेले हे ‘ड्रोन’ महागडे असतील असं वाटतंय? - तर तसं नाही. काही अतिप्रगत तंत्रज्ञान वापरलेले आणि गुंतागुंतीच्या कृती करू शकणारे ड्रोन महाग आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असले, तरी प्राथमिक स्तरावरचे ड्रोन अगदी दोन हजार रुपयांपासून मिळू शकतात आणि परदेशात तर ते ऑनलाइनसुद्धा विकत घेता येतात. बरं, ते उडवण्यासाठी काही विशिष्ट प्रशिक्षण लागतं असंही नाही. त्यामुळे अगदी गमतीच्या खेळापासून तर शहरात काही विशिष्ट अंतरावर वस्तू पोचवणं हा कामाचा भाग असलेले कुरियरवाले, हॉटेलवाले आणि अगदी फळं-फुलंवालेसुद्धा या फंदात पडायचं ठरवलं तर पडू शकतात.
अमेझॉनसारख्या मोठय़ा कंपनीने तर आपल्या ग्राहकांकडे वस्तू पोचवण्यासाठी ड्रोनचं तंत्रज्ञान विकसित केलं असून, आता आम्ही फक्त अमेरिकेच्या कायद्यामध्ये आवश्यक त्या तरतुदी होऊन आम्हाला परवानगी मिळण्याची वाट बघतो आहोत, असं जाहीर केलं आहे.
वाहतूक, संदेशवहन, जोखमीच्या ठिकाणची माहिती मिळवणं अशा अनेक क्षेत्रत जादूई बदल करण्याची क्षमता असलेले हे ड्रोन.. या नव्या तंत्रज्ञानाने अनेक प्रश्नही निर्माण केले आहेत.

आणि भारतासारख्या देशात तर असल्या वस्तूंच्या वापराला परवानगी देण्याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.