शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नाटक- सिनेमा!

By admin | Updated: May 28, 2016 18:54 IST

आपल्याला सगळे काही येते असे पुण्यात सगळ्यांना वाटायचेच, घरटी एक तरी नाटकवाला असायचाच. केबल टीव्हीनं नाटकांचे हे दिवस संपवले. आजकाल पुण्यात प्रत्येक घरात किमान एक तरी मराठी चित्रपट दिग्दर्शक असतोच

सचिन कुंडलकर
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
 
आपल्याला सगळे काही येते असे पुण्यात सगळ्यांना वाटायचेच, घरटी एक तरी नाटकवाला असायचाच. केबल टीव्हीनं नाटकांचे हे दिवस संपवले. आजकाल पुण्यात प्रत्येक घरात किमान एक तरी मराठी चित्रपट दिग्दर्शक असतोच. घरचे गरम जेवण न सोडता, सणवार सांभाळून, अनेक तरुण पुणोरी मुले, पुणोरी डॉक्टर, पुणोरी स्वतंत्र बाण्याच्या मुली रोज मनातल्या मनात शेकडो मराठी सिनेमे बनवतात. ही लागण इतकी मोठी आहे की मराठी चित्रपटाच्या वंशवृद्धीची काळजीच मिटली आहे !
 
आजकाल पुण्यात प्रत्येक घरात एक मराठी चित्रपट दिग्दर्शक असतोच. ‘आपल्याला नाही जमणार तर कुणाला जमणार?’ असे जे पुण्यातल्या लोकांना अनेक बाबतीत वाटत असते त्यापैकी मराठी सिनेमा बनवणे ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. सध्या पुण्यात तो प्रत्येकाला बनवता येतोच किंवा बनवायचाच असतो. आमच्या इथे वाडेश्वर आणि रूपाली नावाच्या दोन जागा आहेत. जिथे बसून कॉफी पीत अजिबातच पुणे न सोडता, घरचे गरम जेवण न सोडता, सणवार सांभाळून, अनेक तरुण पुणेरी मुले, पुणेरी डॉक्टर, पुणेरी स्वतंत्र बाण्याच्या मुली हे सगळे रोज शेकडो मराठी सिनेमे जवळजवळ मनामध्ये बनवतातच.
 
आमचे अतिशय नावाजलेले फिल्म प्रोफेसर, माझे अगदी जवळचे मित्र आहेत. माझा कान उपटून हातात देऊ शकतील असे समर नखाते. त्यांच्या घरची मोलकरीण आठ दिवस न सांगता गायब झाली. तर सगळे फार चिंतेत पडले होते की बया आता मराठी चित्रपट बनवूनच परत येते की काय? कारण अचानक सगळ्या बायकाही कामेधामे सोडून दिग्दर्शिका झाल्या आहेत. इतकी मोठी लागण झाली आहे की मराठी चित्रपटाच्या वंशवृद्धीची काळजीच मिटली आहे.
 
पण पूर्वी असे नव्हते. म्हणजे आपल्याला सगळे काही येते असे पुण्यात सगळ्यांना वाटायचेच. पण माणसे चित्रपट बनवत नव्हती, तर मिळेल तशी मिळेल तेव्हा मराठी नाटके बसवत होती. त्याला रंगभूमीची सेवा करणो असे साजरे नाव असे. आणि नाटकात कामे करणा-या कोणत्याही माणसाला ‘रंगकर्मी’ असे भारदस्त नाव असे. प्रत्येक घरात एकजण तरी नाटकात असायचाच. त्याला पर्याय नव्हता. शिवाय नाटकाच्या संस्था मोप असत. स्पर्धासुद्धा किलोभर. शिवाय गो-या गुबगुबीत मुली त्यानिमित्ताने गप्पा मारायला, सोडायला- आणायला मिळत. सावळ्या मुलींना स्मिता पाटीलचे एवढे करिअर झाले तर आपलेही भले होईल असे वाटत असे. डॉक्टर मुलांना आपल्या रटाळ आयुष्याची भडास काढायची असे. जब्बार- सतीशला जमते तर आपल्याला का नाही? असे त्यांना प्रत्येकाला वाटत असे. नंतर नंतर सिनेमा- नाटकात येण्यासाठीच मुले बीजे मेडिकल कॉलेजला जातात अशी अफवा होती. जरा दाढी वाढली की आपल्यात तेंडुलकर आले आहेत असे वाटे. बाथरूममध्ये नाहताना ‘त्या मोडकला चाली देणे जमते तर मला का जमू नये?’ असे वाटे. ‘तो चंदू काळे उंचीला इतका कमी, पण काय हलवून सोडतो राव स्टेज, मी पण दाखवतोच आता आमच्या बँकेच्या नाटकात कमाल!’ अशी ईष्र्या वाटे. त्यामुळे जमेल तशी जमेल तेव्हा नाटके लिहिली, बसवली आणि पाहिली जात. रात्री शहरभर, अगदी संपूर्ण शहरभर कुठे न कुठे वेगवेगळ्या नाटकांच्या तालमी चालू असत. 
ळअ आणि ढऊअ हे नाटकातले दोन सर्वात मोठे माफिया लोक. सर्वात जुन्या आणि मोठय़ा संस्था. शिवाय काळाच्या अतिशय पुढे आणि सतत प्रयोगशील. या नावांचे फुलफॉर्म माहीत नसले तरी प्रत्येक नवा रंगकर्मी या संस्थांना घाबरून असे. तरुण असायचे असेल तर ळअ आणि ढऊअतल्या लोकांचे अपमान करायचे म्हणजे आपण फार नवे प्रतिभावंत साबित होतो असे कॉलेजातल्या मुलांना वाटे. सगळे सगळ्यांना दबून किंवा धरून राहत. पण या दोन संस्थांमधील माणसांनी मराठी प्रायोगिक नाटकाची आणि सिनेमाची कालची आणि आजची अख्खी पिढीच्या पिढी घडवली. प्रत्येकाला तुमचा अपमान करावा वाटतो तेव्हा तुम्ही किती महत्त्वाचे झालेले असता याचे उदाहरण म्हणजे ह्या दोन मोठय़ा संस्था. त्या महाराष्ट्राच्या जणू दंतकथाच बनून राहिल्या होत्या. 
 
अगदी सगळे आणि सगळे पुणोकर नाटक करीत असत. माङो मामा, बहिणी, माम्या, आत्या या सगळ्यांनी एकदा दोनदा तरी मराठी नाटकात कामे केली आहेत. बँकेत नोकरी करायची आणि संध्याकाळी नाटक करायचे ही बहुतांशी माणसांची आयुष्याची घडी होती. नाटकावर आपले पोट भरणार नाही हे ती करणा:या माणसांना अगदी चांगले माहिती होते आणि त्यामुळे आपल्या आयुष्याच्या व्यवहाराची घडी सांभाळून कितीतरी साध्या घरातली माणसे हट्टाने नाटक करीत. 
 
प्रत्येक घरात मोठय़ा झालेल्या काही बायका असत. ज्यांच्याकडे जुन्या प्रियकरांचे नाटकाच्या तालमीच्या वेळचे फोटो असत. नंतर उसवून जुने झालेले भलतीकडे केलेल्या लग्नाचे आयुष्य जगताना त्या बायकांना हे कॉलेजातले तालमीचे  फोटो मोठा आधार देत. अशा कितीतरी बायका आणि मुली माङया ओळखीच्या आहेत ज्यांच्या आयुष्यातले नाटक संपले. संपले म्हणजे संपूर्ण संपले आणि त्या कुठल्यातरी श्रीमंत घराच्या सुना झाल्या. आपल्या कर्तबगार मैत्रिणी मोठय़ा नटय़ा झालेल्या पाहून त्या रोज टीव्ही पाहत हळहळत बसून राहिल्या. मुलांना आपल्या जुन्या नाटकांच्या आठवणी सांगू लागल्या आणि ‘डॉक्टर लागू मला ओळखायचे’ किंवा ‘मी काम केले आहे सोनाली कुलकर्णीबरोबर’ या आठवणीवर धीर वाटून घेऊ लागल्या. आमच्या घरात नाटकांची पुस्तके लहानपणीपासून वाचायला आजूबाजूला असत. शाळा-कॉलेजात नाटय़ स्पर्धांचे पीक होते. नाटक शहराच्या रक्तात सळसळत वाहत होते. नाटक करणा-या माणसाला पूर्वी आमचे शहर एक प्रतिष्ठा आणि भरपूर प्रेम देत असे. त्या प्रेमापायी आणि त्या प्रतिष्ठेपायी कसलेही हिशेब न करता माणसे आपले आयुष्य नाटकाला देत असत. नाटक करून, प्रयोग संपून गेले की त्याच्या आठवणीची ऊब ते नाटक करणा:यांना अजून अजून पुढचे काम करायची ऊर्जा देत असे. एकमेकांशी बांधून ठेवत असे. 
 
जे नाटके करत नसत ते प्रेमाने पाहत असत. नाटकाच्या मोठय़ा जिवंत प्रवाहाने माङयासारख्या त्यातले काही न समजणा:या मुलालासुद्धा सोडले नाही. तीन-चार वर्षाचा काळ मोहित या माङया अतिशय गुणी आणि बुद्धिमान मित्रसाठी मी सपासप नाटके लिहित होतो यावर माझा आता विश्वास बसत नाही इतकी मोठी ताकद त्या ऊर्जेत आणि वातावरणात होती. आणि ती नैसर्गिक होती.  त्यापासून वेगळे राहणो शक्य नसावे असे वातावरण पुण्यात होते. 
 
आमच्या आजूबाजूच्या जवळजवळ सर्व तरुण मुलामुलींची लग्ने नाटय़संस्थांमुळे झाली. या एका वाक्यात सगळे कळावे इतक्या प्रमाणात पुण्यात नाटकाचे वातावरण होते. सिनेमा पूर्वीही उत्तम, पण मोजका बनत असे. प्रेक्षक तो पाहत असत. हिंदी सिनेमेही पुष्कळ पाहत. पण त्या कशानेच नाटकाच्या वातावरणाला नख लागले नव्हते, ते टेलिव्हिजनमुळे लागले. केबल टीव्ही आला आणि मराठी नाटकाचे दिवस संपले. करणा:यांचेही संपले आणि बघणा:या प्रेक्षकांचेही संपले. 
 
आज इतक्या मोठय़ा शहरात फक्त दोन चार चांगली माणसे उरली आहेत ज्यांना काळाचे भान आहे. मुख्य म्हणजे ती मोजकी माणसे वयाने लहान आणि संपूर्ण आजची आहेत. त्यांना आठवणींचा धाक नाही. विजयाबाई, दुबे वगैरे माणसांचे अनावश्यक गुरु पण ओढवून घेतलेले नाही. खूप जुने माहीत नसल्याचा चांगला फायदा त्यांना आहे. ती माणसे प्रवास करतात, बाहेर जातात, इतरांमध्ये मिसळतात आणि सातत्याने आणि कष्टाने त्यांचे नाटक करत राहतात. ‘नाटक कंपनी’ आणि ‘आसक्त’ या त्या दोन महत्त्वाच्या संस्था. मोहित टाकळकर आणि अलोक राजवाडे ही ती दोन उरलेली बहुधा शेवटचीच माणसे. भूतकाळाचे धाक नसले की जो फायदा होतो तो या संस्थांमधील दमदार मुलामुलींनी पुरेपूर कमावला आहे.
 
बाकी आता पुण्यात फक्त खूप प्रगल्भ की काय म्हणतात तशी पन्नाशीची बुद्धिमान, पण दमलेली माणसे उरलेली आहेत. तीच दहा पंधरा माणसे सगळीकडे दिसतात, वाद घालतात, आठवणी काढतात आणि पुन्हा दुस:या दिवशी दुस:या एका कार्यक्र माला भेटतात. मराठी पुस्तकांच्या दुकानात गेले की जशी तीच तीच पाच-पन्नास जुनी चांगली पुस्तके असतात तशी आता पुण्यात तीच ती दहा पंधरा माणसे आहेत. मला ती माणसे फार आवडतात. ती मूक झाली असली तरी फार महत्त्वाची माणसे आहेत. आमच्या शहराचे नशीब त्यांच्या समजुतीवर आणि जाणिवेवर उठले आहे. सगळे काही शांत होत चालले आहे.