शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

स्वत:च्या मनाशी तुम्ही कधी बोलता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 06:05 IST

सतत काळ्या ढगाच्या छायेत वावरणाऱ्या मनाला आपली इच्छा काय आहे, ते निर्विवादपणे सांगणे हे फार-फार आवश्यक असते.

ठळक मुद्देआपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात स्वतःबद्दल काहीतरी अशा इच्छा असतात ज्या प्रत्यक्षात येत नाहीत, येऊ शकत नाहीत. त्या जाणण्याची आत्ता संधी आहे.

- वंदना अत्रेलखनौहून देहराडूनला रेल्वेने निघालेल्या अरुणीमा सिन्हाच्या गळ्यातील साखळी आणि सामानचोरण्याच्या इराद्याने तिघेजण डब्यात शिरले. सावध झालेल्या अरुणीमाने झटकन साखळीखेचली पण पुढे काय घडते आहे ते समजायच्या आत त्या तिघांनी तिला गाडीच्या डब्याबाहेरफेकून दिले होते ! वेगाने धावणारी गाडी रुळावर पडलेल्या अरुणीमाच्या पायावरून गेली आणितिला आपला एक पाय गमवावा लागला.. ! ही घटना घडली १२ एप्रिल २०११ या दिवशी. त्यानंतरदोनच वर्षांनी, २१ मे २०१३ या दिवशी अरुणीमा जगातील सर्वोच्च शिखरावर, एव्हरेस्टवर होती.एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी ती पहिली भारतीय विकलांग महिला ठरली ...!सहजासहजी विश्वास बसू नये अशीच ही कथा. अशक्यवाटणाऱ्या गोष्टी करणारी अशी माणसे फक्त बातम्यांमध्येच नसतात. आपल्या अवतीभोवती सुद्धा कितीतरीदिसतातच की. या माणसांबद्दल आपण ऐकतो, वाचतो तेव्हा आपण काय विचार करतो? अप्राप्यवाटणाऱ्या गोष्टी करून दाखवणाऱ्या या लोकांना देवत्व बहाल करून टाकतो आणि त्यांची पूजाकरायला लागतो. हे फार सोपे असते. पण कधीतरी, काही प्रश्न स्वतःला विचारून बघितले तर?अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करणारी अशी काही वेगळी शक्ती असते का? असेलतर, काही विशेष माणसांनाच ती मिळालेली असते का? कोण करते या माणसांची निवड? आपल्यातही शक्ती आहे याचा शोध त्यांना कसा लागतो? हे प्रश्न आपल्याला अशा एका टप्प्यावर आणतातजिथे, एकच खणखणीत उत्तर आपल्याला मिळते. स्वतःकडेच बोट दाखवणारे. लख्खकन प्रकाशपडावा तसे जाणवते, जी इच्छाशक्ती पुराणातील हनुमानात आणि आजच्या अरुणीमामध्ये आहे,इच्छाशक्तीचा तोच जोमदार प्रवाह आपल्या प्रत्येकात आहे. किंबहुना, या पृथ्वीतलावर राहणाऱ्या आपल्याप्रत्येकाला निसर्गाने इच्छाशक्तीचे एक अद्भुत वरदान दिले आहे. जे-जे असाध्य आणि अशक्य, ते साध्यकरण्यासाठी मदत करणारी शक्ती.. !- फक्त ही शक्ती देणाऱ्या निसर्गाचा चतुरपणा असा की, याइच्छाशक्तीला आपोआप कार्यरत करणारी, जागृत करणारी व्यवस्था मात्र आपल्या शरीरात नाही.. ! समोरअसलेली परिस्थिती बघून जाणीवपूर्वक तिचा वापर करावा लागतो, तिला आवाहन करावे लागते !अगदी सध्या सुरु असलेल्या कोरोनाचेच उदाहरण घेऊन सांगायचे तर काय करू शकतो आपण?आजारापासून दूर, निरोगी राहण्याची आपल्या सर्वांची इच्छा आहे पण मला निरोगी आणि सुदृढ राहायचेआहे या इच्छेचा रोज स्वतःशी उच्चार तरी आपण करतो? दिवसभरात आपल्या मनात भीतीचे, चिंतेचे,स्वतःच्या आरोग्याबद्दल शंका घेणारे असे कित्येक विचार येऊन गेलेले असतात. विशेषतः, अशाआव्हानांच्या काळात तर भय आणि काळजी या विचारांचा एक गडद काळा ढग सतत मनावर रेंगाळतअसतो. आपल्याला अस्वस्थ करीत असतो. सतत या काळ्या ढगाच्या छायेत वावरणाऱ्या मनाला आपलीइच्छा निर्विवादपणे सांगणे हे फार-फार आवश्यक असते. त्यामुळे दिवसातून किमान एकदा का होईना“आज मी निरोगी आणि सुदृढ आहे, आणि तसेच राहू इच्छितो / ते ” हे स्पष्टपणे स्वतःलाच सांगायला हवे..!त्याचा उच्चार करायला हवा.- अर्थात अशी केवळ इच्छा व्यक्त करणे म्हणजे इच्छाशक्ती जागृत करणेनाही. कोणत्याही इच्छेला प्रयत्नांची जोड नसेल तर ती इच्छा म्हणजे स्वप्नाचा बुडबुडा ठरू शकतो ! “ मीलता मंगेशकर इतके उत्तम गाते आहे ” अशी निव्वळ इच्छा करून कसे चालेल? त्यासाठी मला उत्तमाकडेनेणारा रियाझ करायला नको का? त्यामुळे कोणतीही इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला विचारांची आणिकृतीची जोड द्यावी लागते. ती कशी देता येईल? ते पुढील लेखात...जाता-जाता रिकामपणातील एक उद्योग-आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात स्वतःबद्दल काहीतरीअशा इच्छा असतात ज्या प्रत्यक्षात येत नाहीत, येऊ शकत नाहीत. त्या जाणण्याची आत्ता संधी आहे.कशी? घरात जी कोणी माणसे आहेत त्या प्रत्येकाने स्वतःच्या इच्छांची आधी आपल्यापुरती यादीकरायची. त्यानंतर कुटुंबात जी कोणती सार्वजनिक जागा आहे ( अनेक कुटुंबांमध्ये असणारा व्हाईट बोर्डकिंवा पाटी ) त्यावर प्रत्येकाने आपल्या मनातील आजवर अपूर्ण राहिलेल्या दोन इच्छा लिहायच्या.घरातील सर्वांना त्या वाचता आल्या पाहिजेत. त्याने काय होईल? आपल्याच कुटुंबातील माणसांच्यामनातील, आजवर न कळलेल्या, अपूर्ण इच्छा तर कळतील ! त्यातून खूप काही घडू शकेल. काय?तुम्हीच विचार करा...(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)vratre@gmail.com