शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

मानभंग

By admin | Updated: March 19, 2016 14:59 IST

मल्ल्यांवर विविध आरोप झाल्यावर माध्यमांवरच त्यांनी ताशेरे ओढले. त्याचा प्रतिवाद कसा आणि कोण करणार? पत्रकारितेवर केलेल्या या आरोपांचा एकमुखाने प्रतिकार करण्याइतकीही एकी माध्यम प्रतिनिधींमध्ये राहिलेली नाही. शारीरिक हल्ल्यापेक्षाही मल्ल्यांनी केलेला अपमान अधिक जिव्हारी लागणारा होता. ती जखम कदाचित भरुन निघेलही, पण व्रण मात्र कायमच राहील.

 
 
दिनकर रायकर
 
सदाचारी आणि अभिमानी माणसाला अपकीर्तीचा डंख अन्य कोणत्याही दूषणापेक्षा जास्त जिव्हारी लागतो. ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ अशी ओळख बनलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी लंडनमधून भारतीय पत्रकारांविषयी केलेले ट्विट हा असाच एक डंख होता.  Let media bosses not forget help, favours, accommodation that I have provided over several years which are documented. Now lies to gain TRP? - ‘इतकी वर्षे मी केलेले उपकार पत्रकारांनी विसरू नयेत. तुम्हाला केलेली मदत, दिलेल्या सुखसोयी या सगळ्यांचा लेखी पुरावा माङयाकडे आहे. तरीही आता टीआरपीसाठी माध्यमे खोटे बोलत आहेत. एकदा का प्रसारमाध्यमांनी शिकार करण्यास सुरुवात केली की ते अशा आगीत ओढतात, जिथे सत्य आणि पुरावे जळतात आणि फक्त राख शिल्लक राहते..’ मीडिया ट्रायलविषयी मल्ल्या यांनी हे असे आगखाऊ भाष्य केले. 
सकाळी सकाळी ते अनेक चॅनल्सवर आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झाल्यानंतर माङया मनात पहिला विचार आला, तो यावर उमटू शकणा:या संभाव्य प्रतिक्रियेचा. माध्यमांना आणि थेट संपादकांना मिंधे ठरविणा:या या वक्तव्यावर निषेधाची तीव्र प्रतिक्रिया उमटेल असे मला वाटत होते. पण तो दिवस मावळला आणि माझा पुरता भ्रमनिरास झाला. तो दिवस सरताना मनात दोन मुद्दे घर करून राहिले. एक, चिंतेचा आणि दुसरा, आत्मपरीक्षणाचा. मल्ल्यांनी इतका सरसकट आरोप केल्यानंतर देशभरातील पत्रकार, निदान प्रमुख संपादक खवळून उठतील आणि मल्ल्यांना जाब विचारतील, हा अंदाज फोल ठरला. मला खरोखर वाटत होते की कोणीतरी, ‘‘तुम्ही ‘उपकृत’ केलेल्या पत्रकारांची नावे तपशिलासह जाहीर कराच’’, असे आव्हान मल्ल्यांना देईल. दुर्दैवाने यातील काहीच घडले नाही. पत्रकारांची इभ्रत मातीत मिळाली. आणि मल्ल्यांची झाकली मूठ सव्वा लाखाची (हा आकडा छोटा वाटेलही, पण तो म्हणीच्या अर्थाने घ्यावा) ठरली.  
हे असे का घडले? या वास्तवाची कारणमीमांसा करताना पत्रकारितेच्या विश्वासार्हतेकडे मागे वळून बघावे लागते. ज्या माणसाने बँकांचे, पर्यायाने तुमच्या- आमच्यासारख्या सामान्यांचे कोटय़वधी रुपये बुडविले, त्या माणसाने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अशी लाथ मारावी याला काय म्हणावे? ही वेळ का आली? याला पत्रकार स्वत: किती प्रमाणात जबाबदार आहेत, असे प्रश्न माङया मनाभोवती फेर धरून नाचत राहिले. एक काळ असा होता, की पत्रकार हा पत्रकर्ता म्हणून म्हणजेच तो संपादक असलेल्या वृत्तपत्रच्या नावानिशी ओळखला जायचा. त्याला मिंधा करण्याची ना कोणाची शामत होती, ना त्याला उपकृत केल्याची भाषा करण्याची हिंमत होती. काळाच्या ओघात पत्रकारितेतील हे ‘कर्ते’ मावळतीला क्षितिजापलीकडे गेले आणि पत्रकारांबरोबर व्यवहार करणा:यांचाही every man has his own price या विन्स्टन चर्चिल यांच्या वचनावर विश्वास बसू लागला. हा निराशावादी सूर नाही. विकले न जाणारे पत्रकार आजही खूप आहेत. पण विकले जाणा:यांची संख्या इतकी वाढली की त्या अनुभवातून पत्रकारितेच्या अवनतीचे जणू सार्वत्रिकीकरण झाले. या अवमूल्यनाचे उदाहरण जाहीरपणो चर्चेत आले तर त्याची चिकित्सा स्वत: माध्यमांनी निर्लेपपणो करण्याचे टाळले. पण यातून समाजाचा पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा तितका बदललाच. वेळोवेळी प्रसंगोपात सामान्य माणसाची याबद्दलची मते दृढ होत गेली.
या अवमूल्यनाचे दृश्य परिणाम मला स्वत:ला 1990 च्या दशकात प्रकर्षाने जाणवले. मला आठवतंय 1995 नंतरच्या काळात ‘फार इस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्यू’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने मुंबईतील पत्रकारितेच्या भ्रष्टाचारावर कव्हर स्टोरी केली होती. तेव्हाही संपूर्ण भारतीय माध्यमांनी त्याकडे सोयीस्कर काणाडोळा केला. charity begins at home या वचनानुसार आम्ही त्याची बातमीरूपात दखल घेतली होती. लोकसत्तातील माङया नेतृत्वाखालील ब्यूरोतील एका सहका:याने त्याची सविस्तर बातमी केली आणि ती पहिल्या पानावर प्रसिद्धही झाली. त्यात वाचकाचा पत्रकारांविषयीचा आदर कमालीचा कमी होईल अशा प्रकारचे अनेक किस्से होते. प्रेस कॉन्स्फरन्समध्ये गेल्यावर ठेवलेली गिफ्टची अभिलाषा, वस्तू वा सेवांच्या रूपात मिळू शकणा:या मेहरबानीचा लाभ घेण्यासाठी अनेकजण करीत असलेली धडपडही ‘फार इस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्यू’च्या कव्हर स्टोरीत प्रतिबिंबित झाली होती. हे सर्व आठवण्याचे मुख्य कारण असे की, तेव्हाही मराठीत हा मजकूर साद्यंत प्रसिद्ध झाल्यानंतरही त्यावर आपल्या माध्यमांमध्ये प्रतिक्रियेचे पुसटसे तरंगही उमटले नव्हते. मल्ल्यांच्या ट्विटनंतरही त्याचीच पुनरावृत्ती झाली. खरे तर हा प्रश्न कोणा एका पत्रकारावर झालेल्या आरोपाचा नव्हता. सरसकट सर्वच पत्रकारांना मल्ल्यांच्या आरोपाच्या दाहक आगीने लपेटले होते. ती आग हा वणवा मानूून तो विझविण्याचा सामूहिक प्रयत्न होणो अपेक्षित होते, जे घडलेच नाही. 
अलीकडच्या काळात काही राजकारण्यांनीही पत्रकारांशी संवाद कमी केला. त्याची सुरुवात झाली ती शरद पवारांपासून.
पंतप्रधानपदाच्या पूर्ण पाच वर्षाच्या कारकिर्दीत पी. व्ही. नरसिंह राव माध्यमांना सामोरे गेलेच नाहीत. पत्रकारांशी वारंवार संवाद साधावा असेही त्यांना वाटले नाही. आणि तसे केल्याने त्यांचे काही बिघडलेही नाही. विद्वत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉ. मनमोहन सिंग या आणखी एका पंतप्रधानानेही नरसिंह रावांचीच पॉलिसी कमी अधिक प्रमाणात आचरणात आणली. पत्रकारांशी बोलण्यात काही अर्थ नाही, असे चांगल्या राजकारण्यांना वाटू लागल्याची बोच माध्यमांना खुपली नाही. त्याचे परिणाम आता आणखी प्रकर्षाने दिसू लागले आहेत. 
विकत मिळत नाही असे जगात काहीच नसते. त्यामुळे वेळ पडल्यास निर्णयापासून माणसार्पयत जे काही विकत घ्यावे लागेल ते विकत घ्या पण कामाच्या बाबतीत नाही हे उत्तर घेऊन माङयाकडे येऊ नका, हा धीरूभाई अंबानी यांनी दिलेला कानमंत्र पुढे रिलायन्सच्या यशाचे व्यावहारिक सूत्र बनला. त्याचवेळी वर्तमानपत्र किंवा एकूणच प्रसार माध्यमे हे मिशन राहिले नसून ते निव्वळ टुथपेस्ट किंवा साबणाप्रमाणो दैनंदिन वापराचे प्रॉडक्ट असल्याचा सिद्धांत पुढे आला. उतरणीला लागलेल्या पत्रकारांच्या स्वाभिमानाने त्याचा प्रतिकार म्हणावा तसा केला नाही. एकीकडे हा बदलता दृष्टिकोन आणि दुसरीकडे टू जी मधील नीरा राडियाच्या कथित भ्रष्टाचारी लाएझनिंग प्रकरणात इलेक्ट्रॉनिक मीडियातील बडय़ा पत्रकारांची नावे आल्याने जनमानसाच्या मनात पत्रकारितेच्या शुचितेविषयी शिल्लक असलेल्या उरल्यासुरल्या प्रतिमेलाही तडा गेला. 
या पाश्र्वभूमीवर मल्ल्यांनी केलेल्या विखारी आरोपांचा प्रतिवाद कसा होणार आणि कोण करणार? दु:खाची बाब इतकीच की, हा समस्त पत्रकारितेवर एका श्रीमंताने केलेला वार आहे याचे भान ठेवून एकदिलाने, एकमुखाने त्याचा प्रतिकार करण्याइतकी एकीही माध्यम प्रतिनिधींमध्ये राहिलेली नाही. शारीरिक हल्ल्यापेक्षाही मल्ल्यांनी केलेला अपमान अधिक जिव्हारी लागणारा होता. ती जखम काळाच्या ओघात भरून निघेलही; पण त्याचा व्रण कायम राहील. 
 
1990 च्या दशकातील एक प्रसंग. शरद पवार तेव्हा नुकतेच संरक्षणमंत्रिपद सोडून मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परतले होते. ही गोष्ट 1993 च्या मुंबईतील दंगलीनंतरची. त्यावेळी एका पत्रकार परिषदेत एका महिला वार्ताहराने पवारांना प्रश्न विचारला होता, तुमच्याकडचा अफाट पैसा तुम्ही कुठे ठेवता? त्यावर संयम न सोडता पवारांनी उत्तर दिल्यानंतर ती म्हणाली, मी भारतीय चलनाविषयी नव्हे, फॉरेन करन्सीविषयी विचारतेय.. हा अतर्क्य प्रश्न ऐकल्यावर पवारांचा संयम सुटला. परमेश्वराने तोंड आणि जीभ दिली आहे म्हणून तुम्ही काय वाटेल ते विचारणार का, असा उद्विग्न सवाल तेव्हा पवारांनी केला होता. त्यानंतरच्या काळात शरद पवारांसारख्या नेत्याने पत्रकारांशी असलेले संबंध जवळपास तोडून टाकले. फार अपवादात्मक प्रसंगी ते माध्यमांशी बोलू लागले. आजही क्वचित प्रसंगी ते इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होतात. पत्रकारांपासून चार हात दूर राहावे असे इतक्या मोठय़ा नेत्यांना वाटू लागणो हा पत्रकारांचा अप्रत्यक्ष पराभव आहे.
 
(चार दशकांहून अधिकच्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत.)
dinkar.raikar@lokmat.com