शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
3
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
4
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
5
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
6
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
7
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
8
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
9
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
10
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
11
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
12
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
13
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
14
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
15
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
16
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
17
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
18
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
19
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
20
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई

रुचकर

By admin | Updated: June 10, 2016 16:20 IST

घरातल्या बायकांचे कौतुक करण्याची दुसरी सोपी पद्धत आपल्याला माहीत नसते म्हणून आपण पटकन फार विचार न करता त्यांच्या स्वयंपाकाचे कोडकौतुक करून मोकळे होतो

सचिन कुंडलकर
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
 
स्वयंपाक सकाळच्या साखरझोपेतच सुरू होतो. 
‘आज काय करायचेय?’ याचा विचार करत लोळत पडावे लागते. 
मग घरात जे नाही ते बाजारहाट करून आणावे लागते. 
मंडईत जाऊन भाज्या विकत घेण्यासारखे दुसरे सुख नसते.
स्वयंपाक या सगळ्यातून सुरू होतो. 
शेवटी ओटय़ावर तो फक्त आकार घेतो. 
जेवायला साधी चार-पाच माणसे येणार असली, तरी सकाळपासून जी मनात खेळगाडी सुरू होते 
त्याला स्वयंपाकाचा आनंद घेणे म्हणतात.
 
चांगला स्वयंपाक करणारी माणसे खूपच मोजकी असतात. इतर काही न सुचून आपण प्रेम व्यक्त करण्यासाठी घरच्या एखाद्या बाईचे स्वयंपाकासाठी कौतुक करतो ते केवळ सोय म्हणून. घरातल्या बायकांचे कौतुक करण्याची दुसरी सोपी पद्धत आपल्याला माहीत नसते म्हणून आपण पटकन फार विचार न करता त्यांच्या स्वयंपाकाचे कोडकौतुक करून मोकळे होतो. शिवाय आपल्याला एखादी चव सवयीची झालेली असते हासुद्धा त्या कौतुकामागचा एक भाग असतो. आपण नवे काहीतरी चाखून पाहिलेलेच नसते मग घरचे आणि सवयीचे जे काही असेल ते आवडत राहते हासुद्धा अनेक माणसांच्या बाबतीत घडणारा प्रकार असतो. खरं तर बहुतांशी घरातील गृहिणी अतिशय सामान्य आणि सरधोपट स्वयंपाक करतात, कारण भारतातील कुटुंबांमध्ये त्यांच्यावर स्वयंपाक करण्याची सक्ती तयार होते. त्यात आवडनिवड नसते. ज्याला आपण हाताला चव म्हणतो ती फार कमी माणसांच्याच हाताला असते आणि तसे रुचकर खाणो शोधून त्याचा आस्वाद घ्यायला तुम्हाला खाण्यापिण्याची आवड असावी लागते. हल्ली ती फार कमी लोकांना असते. ह्याचे कारण डाएट करण्याचे चुकीचे उगवलेले फॅड. त्याने पाककलेचे आणि खाद्यसंस्कृतीचे फार नुकसान केले आहे आणि अतिशय वेगवान जीवनशैली, ज्यामध्ये रोजचे जेवण कसे असावे ह्याचा आपण आनंदाने आणि चवीने विचार न करता जे काही बनेल किंवा जे काही दिसेल ते उचलून तोंडात कोंबून पोट भरून पळत असतो.
 वयाने ज्येष्ठ अनेक बायकांशी गप्पा मारताना त्या मला नेहमी म्हणतात की घरच्यांना माझे, माझ्या बुद्धीचे मोल कधी कळलेच नाही. नुसते स्वयंपाकात कौतुक करून घरच्यांनी मला त्या कौतुकात मारून टाकले. पण माङया हौशी वेगळ्याच होत्या. केवळ मी आई किंवा बायको आहे म्हणून माङो कौतुक स्वयंपाकात करणो ठरून गेले आहे. पण मला तसे नको होते.
माझी आई हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तिला स्वयंपाकाचा बाऊ केलेला खपत नाही. तिच्या बुद्धीला आणि हातापायांना खूप इतर कामे तिने लावून घेतली आहेत. त्यामुळे नाजूकसाजूक चविष्ट मोजका स्वयंपाक करण्यापेक्षा तिचा भर हा पटापट घाऊक स्वयंपाक करण्यावर असतो. पन्नास लोकांचा स्वयंपाक ती आरामात तासाभरात करून मोकळी होते आणि तिच्या कामांना निघून जाते. त्याविषयी कौतुकाने बोलत बसलेले तिला आवडत नाही.
ही झाली एक बाजू. दुसरी बाजू आहे ती अतिशय बिनडोक आणि सारासार विचारशून्य स्त्रीवादी बायकांची. ह्या बायकांनी अविचाराने भारतीय स्त्रीला गोंधळलेले आत्मभान देऊन हाती जे स्वत्व होते ते गमवून बसवण्याची वेळ आणली आहे. स्वयंपाकाचा उद्धार करून घरदार सोडून उंडारण्यात कसे आयुष्याचे समाधान आहे ह्याचा मूर्ख प्रसार करून ह्या अर्धशहाण्या स्त्रियांनी स्वयंपाक, घरकाम ह्या सगळ्याबद्दल जो अनादर पूर्वी पसरवला होता तो खूप हास्यास्पद होता. नशिबाने सध्या स्त्रीवादी बायका नामशेष होत आहेत किंवा त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेण्याचा एकोणीसशे ऐंशीच्या दशकाचा काळ आता संपला आहे असे दिसते. परिषदा घेऊन आरडाओरडा करत फिरले की समाज सुखी होत नाहीच आणि सुधारत तर त्याहून नाही. समाज आनंदी होतो ते आवडीचे काम केल्याने आणि करू दिल्याने. त्यामुळे तात्पर्य हे की, ज्याला जे आवडेल ते त्याने मोकळेपणाने करावे. आवडत असेल तर स्वयंपाक करावा किंवा करू नये. दोन्ही गोष्टीत विशेष काही नाही. पण खाण्यात मात्र खूप मज्जा आहे. त्यामुळे मस्त चांगलेचुंगले निवडून हौशीने आणि चवीने खात आयुष्य काढावे. मग ते खाणो स्त्रीने केलेले असो की पुरु षाने, घरचे असो की शेजारचे. 
साधे सोपे रु चकर जेवण करून घर निगुतीने चालवणा:या बाईला आपण आदर द्यायला शिकले पाहिजे आणि चहासुद्धा न करता येणा:या कुणा मुलीलासुद्धा समजून घेतले पाहिजे. ज्याने त्याने आपापल्या आवडीने वागले की सोपे होते आणि आपण घरात जेवायचे आहे की बाहेर हे ठरवता येते. ज्यांना साधी आमटी चांगली बनवता येत नाही अशा मुलींवर स्वयंपाकाची सक्ती करून घरात रटाळ जेवण्यापेक्षा बाहेर जेवलेले बरे. शरीराच्या सगळ्या भुकांच्या बाबतीत खरे तर हाच नियम आहे. आपण उगाच स्वत:ची स्वयंपाकघरे फार गांभीर्याने घेतो.  
माझा मित्र अभिजित देशपांडे अतिशय उत्तम स्वयंपाकी आहे. आता व्यवसायाने तो फिल्म एडिटर झाला असला, तरी त्याने आपल्या हाताचे स्वयंपाकाचे वळण आणि चव अजिबातच जाऊ दिलेली नाही. आम्ही दोघेजण बसून फिल्म एडिट करताना सगळ्यात आधी फार आवडीने रोजचा ब्रेकफास्ट प्लान करतो. त्यामुळे आमचा कामाचा पुढचा दिवस फार चांगला जातो. एवढेच नाही तर महिन्यातून एकदा दोनदा वेळ काढून साग्रसंगीत स्वयंपाक करतो. जवळजवळ दहा-बारा वर्षे आमचा हा उपक्र म चालू आहे. आम्हाला हे करताना सिनेमाचे खूप काम आहे म्हणून स्वयंपाकाचे दडपण येत नाही. आम्ही स्वयंपाकाच्या तयारीचा बाऊ करीत नाही आणि बनवलेल्या जेवणाचे फोटो फेसबुकवर टाकत नाही. आम्ही दोघे जे असेल ते सगळे खातो. सगळे प्राणी, सगळ्या भाज्या, सगळ्या प्रकारचे, सर्व राज्यातले, सर्व देशातले स्वयंपाक आम्हाला आवडतात. एकदा मला खूप कमी वेळात एका छोटय़ा नाटकाचा ड्राफ्ट बनवून द्यायचा होता. माङो मुंबईत फक्त एका खोलीचे घर होते. मी टेबलापाशी लिहित बसलो आणि मला काही कळायच्या आत अभिजितने सुंदर मासे बनवायला घेतले. त्या स्वयंपाकाच्या वासानेच माङो मस्त लिखाण पूर्ण झाले. मधला एक मोठा काळ असा होता जेव्हा मला टीव्हीच्या शोजवर पाहून स्वयंपाक करण्याची चटक लागली होती. पण त्यात मोठा दोष हा की स्वयंपाकाची तयारी आणि नंतरची आवराआवर त्यात कधी दाखवत नाहीत. सगळे कापून चिरून ठेवलेले आणि आपण मेकअप करून उगाच ढवळल्यासारखे करायचे. त्यात मजा येईना. स्वयंपाक हा सकाळच्या साखरझोपेत सुरू होतो. आज काय करायचेय ह्याचा विचार करत लोळत पडावे लागते. मग घरात जे नाही ते बाजारहाट करून आणावे लागते. बाजारहाट करण्यासारखे दुसरे सुख नाही. मंडईत जाऊन भाज्या विकत घेण्यासारखे दुसरे सुख नसते. स्वयंपाक ह्या सगळ्यातून सुरू होतो. शेवटी ओटय़ावर तो फक्त आकार घेतो. जेवायला साधी चार-पाच माणसे येणार असली तरी सकाळपासून जी मनात खेळगाडी सुरू होते त्याला स्वयंपाकाचा आनंद घेणो म्हणतात. शाकाहार की मांसाहार असले फालतू विधिनिषेध मी लहानपणी प्रवासाला बाहेर पडलो तेव्हाच गळून पडले. मुकाटपणो समोर येईल ते खायची सवय लागली. तुमच्या घरी तुमचे सतत लाड करणा:या आणि चोवीस तास डोक्यावर पदर घेऊन स्वयंपाकघरात राबणा:या बायकांचा ताफा असला की तुमचे असे फालतू लाड होऊ शकतात. माङया आजूबाजूला मी इतक्या कामसू आणि घराबाहेर पडून कामे करणा:या स्त्रिया पाहिल्या आहेत की असले पाणचट शाकाहारी लाड मी स्वत:चे केले नाहीत. जिथे जाऊ तिथे लोक जे खातात ते चाखून पाहणो. 
लहानपणी मी मुंज करताना आईला बजावले होते की अंडी बंद करणार नाही. चिकनसुद्धा नाही. हे मान्य असेल तर हवे ते संस्कार मी स्वत:वर करून घेईन. त्या दिवसापुरते. एकटय़ा राहणा:या माणसाला सतत ह्या न त्या प्रकारे जगाशी जुळवून घ्यावे लागते. आणि खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी त्यातून तयार होत असतात. पूर्वजांनी सांगून ठेवलेले मी कधीच काही ऐकत नाही. मग मी काय खावे आणि प्यावे हे कुणी सांगायचा प्रश्न कधीच उद्भवला नाही.
मला सतत आपण जगात जे जे उत्तम आहे ते करून आणि चाखून बघण्याची इतकी प्रबळ हौस लहानपणापासून होती की इतर लोक जे खातात, वाचतात, कपडे घालतात, बघतात, ऐकतात ते सगळे आपण करून पाहायला हवे. माङया खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी ह्याच मध्यमवर्गीय मानसिकतेतून आणि सतत दुस:यासारखे जगू पाहण्याच्या न्यूनगंडामधून तयार झाल्या. तुम्ही खूप श्रीमंत किंवा खूप गरीब कुटुंबात जन्मलात की तुमचे सगळे खूप लहानपणीच ठरायला मदत होते. मध्यमवर्गीय घरात वाढलेली मुले सतत इकडे जाऊ की तिकडे जाऊ ह्या दोलायमान अवस्थेत असतात. त्या दोलायमान अवस्थेचा फार मोठा फायदा मला आयुष्यात अनेक ठिकाणी झाला. त्यामुळे परदेशी शिकायला गेल्यावर पहिल्या दिवशी समोर शिजवलेला लुसलुशीत ससा आला तो मी शांतपणो खाल्ला.