- दुर्गसंवर्धन हा केवळ भावनेचा विषय नाही, ते स्वतंत्र शास्त्र आहे.
डॉ. राहुल मुंगीकर
अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजेच गेल्या 10-12 वर्षामध्ये किल्ले संरक्षण व संवर्धन करणारी अनेक मंडळी पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या किल्ल्यांवर काम करीत आहेत.
असे असले तरी किल्ल्य़ांची बांधकामे, त्यासंबंधीचे शास्त्र, किल्ल्यांची प्रत्यक्ष जागा, त्याचा आजूबाजूच्या परिसराशी असलेला संबंध, त्यावरची पाणी व्यवस्था अशा एक ना अनेक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच कोणत्याही किल्ल्याचे अथवा गडकोटाचे संवर्धन करण्यापूर्वी यातील मूळ शास्त्र समजून घेतले पाहिजे.
सह्याद्रीच्या पट्टय़ातील बहुतांश किल्ल्यांभोवती आजही जंगल मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे व त्यामुळे जमिनीत पाणी धरून ठेवण्याचे प्रमाणही त्या त्या भागांमध्ये चांगले आहे. अर्थात याचा थेट फायदा स्थानिक भागातील शेतीकरिता होत असतो, परंतु लोकांना याची कल्पना असतेच असे नाही.
जेव्हा आपण ‘जंगल’ असा उल्लेख करीत असतो तेव्हा त्याचा अर्थ केवळ उंच वृक्षराजी असा होत नाही. काही भागात केवळ खुरटय़ा वनस्पती, तर तर काही भागात केवळ गवत असते. याशिवाय अन्य काही प्रकारचे वृक्ष, लता, वेली, क्षुपे यांच्या एकत्रित समूहाचे जंगलही आढळते. या सर्व प्रकारच्या जंगलांचे विविध प्रकारचे फायदे आहेत. स्थानिक भागांमधील याची माहिती असणारी मंडळी परंपरेने या माहितीचा वापर करीत असतात.
काही जंगलांमध्ये औषधी वनस्पती मोठय़ा प्रमाणात आढळतात, तर काही जंगलांमधील गवत स्थानिक गायी-गुरांना चरण्यासाठी फारच पोषक असते. अन्य काही प्रकारच्या भागांत विविध प्रकारचे लाकूडविरहित वनोपज मिळत असते. खरेतर अशा वनस्पती किंवा गवताळ रानांमुळे एक विशिष्ट प्रकारचा नैसर्गिक अधिवास प्रत्येक किल्ल्यावर व त्याच्या आजूबाजूस तयार झालेला सहज दिसून येतो. या नैसर्गिक अधिवासाच्या आश्रयास विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, अनंत प्रकारचे कीटक, वन्य श्वापदे, विविध प्रकारचे सरपटे जीव नेहमीच येत असल्याचे दिसून येते.
अशा प्रकारच्या किल्ल्याच्या आश्रयास असलेल्या जैविक विविधतेकडे आपण क्वचितच पाहत असतो. या सर्व जैविक विविधतेचा थेट संबंध त्या त्या किल्ल्याच्या आजूबाजूस असलेल्या शेतीशी असतो. अनेक वेळा शेतांमध्ये पडणा:या किडीचे नियंत्रण करण्याचे निसर्गत: काम हे त्या-त्या भागातील असलेल्या पक्ष्यांमुळे होत असते. परंतु अशा नैसर्गिक संबंधाच्या साखळीची माहिती जवळपास कोणत्याच स्थानिक लोकांना नसते.
गड-कोटांच्या संवर्धनामध्ये या सर्व बाबींचा विचार होणो अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय अन्य काही गोष्टी अशा आहेत की ज्या केल्यामुळे प्रत्यक्ष दुर्गाचे संवर्धन होण्याऐवजी नुकसानच अधिक होत आहे. दुर्गाचे संवर्धन हे त्याच्या पुरातन शिल्पांमध्ये, त्याच्या इतिहासात तसेच त्याच्या भोवती असलेल्या जैवविविधतेत दडलेले आहे. आजच्या काळात हा नवा दृष्टिकोन आपल्याला दुर्गसंवर्धनाची नव्याने ओळख करून देऊ शकतो.
साधारणत: कोणत्याही बुरुजाच्या बाहेर आलेले 4-5 फुटांचे झाड जर समूळ नष्ट केले तर बुरुजाच्या भिंतीचा तो भाग अशी साफसफाई केल्यानंतर केवळ 4-5 वर्षात पडलेला आढळला आहे. परंतु तेच जर झाड आहे तसेच ठेवले तर तो बुरूज तसाच राहतो मात्र त्यातल्या भेगा वाढत जातात. थोडक्यात, आपण प्रामाणिकपणो दुर्ग स्वच्छता करून दुर्गसंवर्धनाकरिता काम करीत असलो, तरी यामुळे प्रत्यक्षात या भिंतीचे वय एकदम कमी होऊन ती पडावयास सिद्ध होते. काम करणारी स्वयंसेवी मंडळी एकदाच काम करतात व याचे परिणाम त्यानंतर पुढे 3-4 वर्षामध्ये पाहावयास मिळतात.
आपले दुर्ग शतकानुशतके ऊन, वारा, पाऊस सहन करीत दिमाखात उभे आहेत, याचे कारण या गडकोटांच्या
बांधणीकरिता वापरण्यात आलेले वैशिष्टय़पूर्ण चुनामिश्रित ‘रसायन’! हे मिश्रण दीर्घ काळ टिकून राहते. सदर प्रकारचे मिश्रण कसे करावयाचे हे जरी आजमितीस माहीत झालेले असले तरी ते तयार करण्याचा खर्च महाप्रचंड आहे. तसेच ते वैशिष्टय़ पूर्णपणो वापरून गडांच्या भिंती उभ्या करणो इतके काही सहज शक्य नाही.
सिंधुदुर्ग किल्ल्याची मागच्या बाजूची भिंत 15-2क् वर्षापूर्वी पडली होती व पुरातन सर्वेक्षण विभागाने यात तातडीने लक्ष घालून ती पुन्हा उभी केली. याकरिता तज्ज्ञ मंडळींचीही मदत घेण्यात आली होती. परंतु इतका खर्च करूनदेखील या नव्याने बांधलेल्या भिंतीचे आयुष्य दहा वर्षापेक्षा जास्त राहू शकले नाही. अर्थात अन्य कारणोही त्याला कारणीभूत असली तरी यातून एक गोष्ट निश्चित लक्षात येते की, दुर्गसंवर्धनाकरिता जर पुन्हा बांधकाम करावयाचे असेल तर त्याला आजदेखील प्रचंड मर्यादा आहेत. उपलब्ध तंत्रज्ञान, या विषयातील ख:या अर्थाने तज्ज्ञ असलेल्या मंडळींचा अभाव, आर्थिक निधीची उपलब्धता तसेच अशा प्रकारची कामे हाती घेण्याकरिता उदासीनता या सगळ्याच बाबींचा समावेश यात होतो.
किल्ल्यांवरच्या जैवविविधतेचेही तेवढेच महत्त्व किल्ल्यांसाठी आहे. पूर्वीच्या काळी पश्चिम घाटातील किल्ले हे विविध औषधी वनस्पतींचे आगर होते. परंतु पुढे पुढे जसे त्याकडे दुर्लक्ष होत गेले तसतसे या जंगलांची तोडही मोठय़ा प्रमाणावर होत गेली. जंगलांचा किंवा गवताळ भागांचा थेट संबंध हा आजूबाजूच्या गावांबरोबर होता तो आजही आहे.
गड-कोटांच्या खालच्या भागातल्या गावामधील पाणी उपलब्धता ही ह्या नैसर्गिक वृक्षराजीवर अवलंबून होती. यामुळे पाणी जमिनीत मुरण्याचे तसेच ते साठवून राहण्याचे प्रमाण लक्षणीय होते. तसेच गवताळ भागांमुळे जनावरांच्या चा:याचा प्रश्न सहज सुटत असे. त्यामुळेच किल्ले संवर्धनात या जंगलांचे तसेच गवताळ भागांचेही संवर्धन कसे करावे हेही समजून घेतले पाहिजे.
अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या वाटा दुरुस्त करताना वाटेतली झाडे, कारवीही तोडून वाटा साफ केल्या जातात. परंतु असे केल्यानंतर पावसाळ्यात अशा वाटा अधिकच बिकट होऊन जातात. ब:याच वेळा झाडे उपटण्याच्या नादात तेथील मातीही सुटी होऊन जाते व माती धरून ठेवणारी झाडे काढल्याने पावसाच्या तीव्रतेमुळे घसारा निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. तिकोनाच्या किल्ल्यावर अशा प्रकारच्या कामामुळे वाटेवरच घसारा तयार झाला आहे.
काही ठिकाणी उत्साही मंडळींकडून जैवविविधता संरक्षणाच्या प्रकल्पांकरिता किल्ल्यांवर वृक्षलागवड करण्याचा उपक्रम राबविला जातो. यामध्ये शहरांमध्ये झपाटय़ाने वाढणारी झाडे, बाहेर देशांतून आपल्याकडे स्थिरावलेल्या प्रजातींची लागवड केली जाते. खरेतर यामुळे जैवविविधतेला संरक्षणाऐवजी धोकाच उत्पन्न होत असतो. असा धोका केवळ किल्ल्यांवरच्या वनस्पतींना किंवा परिसंस्थेला असतो असे नव्हे, तर त्याचा मोठा परिणाम आजूबाजूच्या क्षेत्रवरही दिसू शकतो.
कोणत्याही गड-कोटावर वृक्षारोपण करण्यापूर्वी त्या-त्या भागातील मूळ देशी वृक्ष प्रजाती कोणत्या आहेत ते समजून घेतले पाहिजे. यातही केवळ देशी वृक्षप्रजाती आहे म्हणून निवड करणो पुरेसे नाही, तर त्या वनस्पती स्थानिक भागातल्या असणो गरजेचे आहे. याशिवाय वृक्षारोपण कोठे करावे यासाठीही काही बाबींचा विचार करणो आवश्यक आहे. अनेक वेळा किल्ल्यांवरच्या छोटय़ा छोटय़ा भागांमधील गवताळ ठिकाणी खड्डे घेतले जातात व तेथेच नवीन लागवड केली जाते. परिसंस्थेच्या दृष्टीने हे अत्यंत चुकीचे आहे. खरेतर असे गवताळ प्रदेश त्या भागातील पक्ष्यांसाठी महत्त्वाच्या जागा असतात. तेथे त्यांना मोठय़ा प्रमाणात कीटक, खाद्य उपलब्ध होत असते. अशा जागा कमी केल्याने त्याचा परिणाम थेट त्यांच्या संख्येवर व विविधतेवरच होण्याची शक्यता जास्त असते.
शिवाय जेव्हा आपण बाहेरील प्रजातींची लागवड करीत असतो तेव्हा अशा प्रजाती वेगाने वाढून स्थानिक प्रजातींच्या वाढीस प्रतिबंध करतात. या बाहेरच्या प्रजातींचा पक्ष्यांनाही थेट उपयोग होऊ शकत नाही. यामुळे स्थानिक जैवविविधतेस मात्र फार मोठी बाधा निर्माण होते.
भैरवगडच्या मागच्या भागात जेव्हा स्थानिक गावक:यांनी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड केली, त्यानंतर नव्याने झाडे उगविण्याच्याऐवजी रानमोडी या वनस्पतींनी सर्व तोडीचा परिसर व्यापून टाकला. या प्रजातीचा ना लाकूड म्हणून वापर होतो ना जळण्यासाठी उपयोग होतो, ना जनावरांना चारा म्हणून ते उपलब्ध होते.
सध्या रानमोडीचे रान इतके वाढले आहे की त्यामुळे लोक अगदी वैतागून गेले आहेत. यामुळे अन्यही काही प्रश्न त्यांच्यासमोर नव्याने आले आहेत. यापैकी महत्त्वाचा म्हणजे त्यांना जळणासाठी फाटा आणायला आता अगदी दूर्पयत आत जावे लागते. तसेच जनावरांच्या चा:याचाही प्रश्न काही प्रमाणात उन्हाळ्यात भेडसावत असतो.
त्यामुळेच दुर्गसंवर्धन हा केवळ भावनेच्या पोटी करावयाचा विषय नाही, तर ते एक शास्त्र आहे. त्याप्रमाणो प्रत्येक दुर्गासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला पाहिजे.
गड-किल्ल्यांची भ्रमंती करणारे शेकडो तरुण महाराष्ट्रात आहेत परंतु त्यांना प्रत्यक्ष स्थानावर गेल्यावर किल्ल्यावरच्या वास्तूबद्दल, इतिहासाबद्दल तसेच त्यावरच्या असलेल्या वृक्षराजींबाबत सांगणारे कोणीही स्थानिक मिळत नाहीत. मिळाले तरी ते केवळ वाटाडय़ाचे काम करतात. एकंदरीतच ‘दुर्गदर्शन’ हा पर्यटनाच्या दृष्टीने उपेक्षित राहिलेला विषय आहे.
आपल्या गड-किल्ल्यांची सांगड पर्यटनासारख्या विषयाच्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या उपजीविकेशी घालता आली तर हे किल्ले सांभाळणा:यांची संपूर्ण फौजच महाराष्ट्रात उभी करता येऊ शकेल.
मात्र हे सर्व शक्य करावयाचे झाल्यास गडकिल्ल्यांच्या संदर्भातील सर्व विषयांची योग्य ती सांगड घालून स्थानिक लोकांची क्षमता वाढवणो आवश्यक आहे. यातूनच आपले गड-कोट पुन्हा तेवढय़ाच दिमाखाने आपल्या पराक्रमाच्या इतिहासाचा अंकुर फुलवतील. दुर्गसंवर्धनातून ग्रामसंवर्धनाकडे वळले तर अनेक गोष्टी साध्य होऊ शकतील. त्यास आता तरी सुरुवात झाली पाहिजे.
किल्ल्यांवरच्या टाक्या? - नव्हे, लपलेला इतिहास!
गड-किल्ल्यांवर भ्रमंती करणा:या मंडळींकडून उत्साहाच्या भरा अनेकदा किल्ल्यांवरच्या पाण्याच्या टाक्या साफ करण्याचा निर्णय घेतला जातो. यामध्ये सर्व गाळ अगदी उपसून काढला जातो व त्या ठिकाणापासून दूर नेऊन टाकला जातो. टाकी साफ झाल्यानंतर अगदी त्याच्या तळाशी असलेल्या फटींमधीलही गाळ काढण्याचा प्रयत्न केला जातो.
खरेतर किल्ल्यांवरच्या टाक्यांमधील वर्षानुवर्षे साठलेला गाळ हा पुरातन विभागासाठी अत्यंत मोठा पुरावा असतो. यामध्ये अनेक वेळा भांडय़ाचे व बांगडय़ांचे तुकडे, काही वस्तू, मातीची भांडी, नाणी अशा प्रकारच्या वस्तू मिळण्याचा संभव असतो. यामुळे किल्ल्यांवरचे त्या काळातील लोक, त्यांचे लोकजीवन, ते वापरत असलेल्या वस्तू, त्यावेळचे उपलब्ध असलेले तंत्रज्ञान, किल्ल्यावर असलेली वस्ती अशा प्रकारच्या अनेक बाबींची थेट माहिती होण्याचा पुरावाच ह्या टाक्यांमधील गाळामध्ये दडलेला असतो. तेव्हा अशा प्रकारचे काम हाती घेण्यापूर्वी किमान या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीस बोलावून, केवळ त्याच्याच मार्गदर्शनाने असे उत्खनन करणो आवश्यक आहे. याशिवाय किल्ल्यावरच्या टाक्या साफ करण्यातील अन्य धोका म्हणजे आपण जेव्हा कोणतीही टाकी अगदी व्यवस्थितपणो साफ करतो तेव्हा कदाचित काही फटी उघडय़ा केल्याने पाण्याची गळती होण्याचा संभव असतो. तेव्हा गाळ जरी काढायचा झाला तरी तो किती प्रमाणात काढावा याचा विचार आपण जरूर केला पाहिजे.
ंगडकोटांच्या बुरुजांची साफसफाई
1 बुरुजांवरील झाडे काढावयाची असल्यास ज्या फटी मोकळ्या होणार आहेत त्या पुन्हा दगडांना जोडणा:या मिश्रणाने तत्काळ भरल्या गेल्या पाहिजेत. नेहमीच्या बांधकामांना वापरणारे सीमेंट वापरले तर ते फार काळ टिकत नाही असा अनुभव आहे. यासाठी किमान चांगल्या प्रतीचे सीमेंट वापरता येईल का असे बघून मगच कामास सुरुवात करावी. यासाठी पुरातत्त्व खात्यातील मंडळी निश्चितच मार्गदर्शन करू शकतात.
2 जर आपणाकडे अशा प्रकारच्या सीमेंटची उपलब्धता असेल तरच त्याचा वापर करावा. झाडे काढल्यानंतरच्या सर्व भेगा बुजविणो अत्यंत आवश्यक आहे. जर या भेगांमधून पाण्याचा शिरकाव झाला तर अशा ठिकाणी पुन्हा झाडे वाढण्याचा संभव असतो.
3 काही वेळेस अगदी आतर्पयतच्या खोलवर असलेल्या भेगा बुजविता येत नाहीत, परंतु यासाठी सध्या काही मंडळींनी विशिष्ट प्रकारची आयुधे तयार केली आहेत. त्यामुळे हे करणो काही प्रमाणात शक्य होते.
4 गडकिल्ल्य़ांची एकदा अशा प्रकारची दुरुस्ती केली तर किमान पुढील तीन वर्षे तरी त्या भागाकडे लक्ष देणो व गरज पडल्यास पुन्हा भेगा बुजविण्यासाठी काम करणो गरजेचे आहे.
5 सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करीत असताना योग्य त्या विभागाची विशेषत: पुरातत्त्व खात्याची पूर्वपरवानगी घेणो अत्यंत आवश्यक आहे.
6 काही दगडांवर विशिष्ट प्रकारच्या खुणा असतात. दुर्दैवाने अशा प्रकारची कामे करीत असताना खुणा असलेले हे दगड लक्षात येतातच असे नाही. तेव्हा काम सुरू करण्यापूर्वी या विषयातील माहीतगार व्यक्तींची मदत घेऊन त्याप्रमाणो अशा दगडांचे जतन करावे.
7 शक्यतो अशी कामे केवळ उन्हाळ्यातच करण्याचा प्रयत्न करावा. कारण या काळात झाडे काही प्रमाणात वाढलेली असतात, तसेच ती लवकर सुटीही होऊ शकतात. याशिवाय उन्हाळ्यामध्ये भिंतीमधील उर्वरित भेगाही स्पष्ट दिसतात, जेणोकरून त्या बुजविणो सोपे जाऊ शकते. या कामात उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता हा मोठा अडचणीचा प्रश्न असतो. त्याचाही योग्य तो विचार करणो आवश्यक आहे.
(लेखक महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळात
वरिष्ठ संशोधक समंत्रक आहेत.)
rahumungi@gmail.com