झुंडवादाला माणसे कशी चिकटतात? की चिकटतात ती साधी माणसे नसून त्या वादाने ग्रासलेली
विचारशून्य व विवेकशून्यांची गोळाबेरीज असते? - ‘तुम्ही फक्त इशारा करा. पुढचे सारे आम्ही पाहतो’ अशी निस्सीम श्रद्धा आपल्या मठाधिपतीला ऐकवून हिंसाचारासाठी बाहेर पडणा:यांपुढे कायदा नसतो, व्यवस्था नसतात, समाज वा त्याचे स्वास्थ्यही नसते. झुंडींना आणि अतिरेक्यांना देश, धर्म, कायदा, समाज वा व्यवस्था यातले काहीएक नसते. त्यांच्यावर स्वार झालेला खूनच त्यांचा प्रवास व कृती निश्चित करतो. ती होत असताना आपल्या आयुष्याला असलेल्या सगळ्याच संदर्भाचा त्यांना विसर पडतो.
- सुरेश द्वादशीवार
सुडाची लक्ष्ये निश्चित असतात. तो उगवायला निमित्तेच तेवढी लागत असतात. गांधीजींच्या खुनानंतर मराठी ब्राह्मणांची घरे जाळत निघालेल्यांचे गांधीप्रेम मोठे होते की ब्राrाणद्वेष अधिक टोकाचा होता? इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतर दिल्लीत झालेल्या शिखांच्या हत्त्याकांडाचा निषेध करायला जे पक्ष आणि संघटना पुढे झाल्या त्या गुजरातेतील मुसलमानांच्या कत्तलीच्या वेळी गप्प का राहिल्या? या प्रश्नांचे उत्तर सोपे आहे. यातली नेतृत्वावरची निष्ठा वा प्रेम गौण आणि ज्यांच्यावर राग धरला आहे त्यांच्याविषयीचा द्वेष मोठा असतो.
स्वातंत्र्याच्या लढय़ात जे पक्ष आणि ज्या संघटना सहभागी झाल्या नाहीत, उलट त्या लढय़ाची ज्या टवाळी करताना दिसल्या त्यांचे स्वातंत्र्यप्रेम स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच का उसळून आले? आणीबाणीच्या निषेधासाठी ज्यांनी तुरुंगवास सहन केला वा ती अंमलात आणण्यासाठी ज्यांना तुरुंगात डांबले गेले ते नंतरच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे न राहता ती बाजू घेणा:यांचा विरोध करताना कसे दिसले? अशांपैकी कोणालाही तेव्हा तुम्ही काय करीत होता हा प्रश्न विचारण्यात अर्थ नसतो. प्रत्येक प्रसंग व आव्हान त्याची किंमत वेळच्यावेळी मागत असते. स्वार्थ आणि सुरक्षितता बाजूला सारून त्यावेळी जे खंबीरपणो उभे राहिले तेच स्वातंत्र्याचे खरे योद्धे असतात. ज्यांची उसळी यातल्या त्यांना ‘उचित’ वाटलेल्या वेळी वर येते त्यांचे स्वातंत्र्यप्रेम तपासून पहायचे असते. त्यांना ‘निवडक’ प्रसंगीच स्वातंत्र्य आणि समतेसारखी मूल्ये का आठवत असतात? माणसे व व्यक्तीच त्यांना हव्या त्यावेळी अशा स्वार्थी, घमेंडी, आक्रमक आणि हिंसक होतात असे नाही. समाजही तसेच वागत असतात. मग ते धर्मामुळे संघटित झालेले असो, जातींमुळे संघटित झालेले असो वा विचारांमुळे. विली ब्रॅण्ड हे जर्मनीचे चॅन्सेलर (पंतप्रधान) असताना त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला गेला. तो स्वीकारल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलेला प्रश्न होता, ‘तुमच्या देशात अनेक तत्त्वज्ञ जन्माला आले, ज्ञानग्रंथांची निर्मिती झाली, विचारी व विवेकशीलांचा देश म्हणून तुमचा देश जगात ओळखला जातो, अशा या देशात हिटलर कसा जन्माला आला?’ त्यावर उत्तर देताना ब्रॅण्ड म्हणाले, ‘जर्मनीच्या इतिहासातले ते तमोयुग होते. माणसे एकेकटीच वेडी होतात असे नाही. सारा समाजच्या समाजही एखादेवेळी वेडसर होऊन आपला विवेक विसरतो. जर्मनीच्या इतिहासातला हिटलरचा काळ असा होता.’ ज्यू धर्मीयांवरचा जर्मनांचा राग त्यांच्यातल्या काहींनी पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या शत्रूंना गुप्तपणो मदत केली याविषयीचा असला तरी ते कारण तात्कालिक होते. ज्यूंवरचा त्यांचा राग पूर्वापार होता. ज्यूंना रस्त्यात पकडून जिवंत जाळण्याचे पोग्रोम त्या देशात नियमितपणो होत. सा:या युरोपातच पोग्रोमचा हा व्यवहार रोमच्या धर्मा™ोनुसार चालत होता. ल्यूथर मार्टिन हा जर्मनीत जन्माला आलेला प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक पोपला आणि रोमच्या धर्मसत्तेला विरोध करणारा असला तरी तोही कट्टर ज्यूद्वेष्टा होता. तात्पर्य, समाज संतापला वा हिंसक झाला की त्याचे जुने राग असे उफाळून येतात आणि त्याचे ‘ठरलेले’ वैरी त्याला बळी पडतात. माणसांना असते तशी समाजांनाही मानसोपचारांची गरज असते असे त्याचमुळे म्हटले जाते.
प्लेटो हा ग्रीक तत्त्वज्ञ तर समाज नावाची बाब विवेकी असूच शकत नाही असे म्हणायचा. रस्त्याने घोषणा देत जाणारे लोकांचे मोर्चे आपल्यासारखेच त्यानेही पाहिले होते. त्यातल्या कोणा एकाला बाजूला काढून ‘तू एकटाच अशा घोषणा देत रस्त्याने जा’ असे म्हटले तर तो जाणार नाही. कारण एकटय़ाने केलेली अशी कृती वेडेपणाच्या सदरात जमा होते. तीच समुदायाने केली की पराक्रमाची ठरते. माणसांचे असतात तसे समाजाचेही काही स्वार्थाचे व काही श्रद्धेचे विषय असतात. कोणता स्वार्थ केव्हा चुचकारायचा आणि कोणत्या श्रद्धेला कधी डिवचायचे याचे शा राजकारणातील मुरब्बी माणसांना अवगत असते. सुभाषबाबूंविषयीची कागदपत्रे केव्हा उघड करायची, शाीजींचा देह ताश्कंदमध्येच कसा निळा पडला होता हे पन्नास वर्षानी त्यांच्या चिरंजीवांकडून कसे जाहीर करायचे, आंबेडकरांवर आपला हक्क सांगून ‘तुम्हीच त्यांना जातीत बंदिस्त केले’ हे त्यांच्याच अनुयायांना केव्हा ऐकवायचे आणि गांधी व नेहरू यांच्याविरुद्ध सततची कानाफुसी कशी करीत राहायची याविषयीचे ज्ञान ज्यांनी चांगले आत्मसात केले आहे त्यांची ओळख आपल्याला पटणो अवघड नाही. निवडणूक आली की धर्म जागर करायचा आणि एरवी धर्माला बासनात बांधून ठेवायचे ही क्लृप्ती कोणाला जमते? स्वातंत्र्याच्या लढय़ाची आठवण कुणाला केव्हा होते? गांधी आणि टिळक कोणाला कधी आठवतात? ..हे सामान्य माणसांचे काम की त्यांच्यावर स्वार झालेल्या पुढा:यांचे आणि त्यांनी आपल्यासोबत वा स्वत:ला बांधून घेतलेल्या संस्था-संघटनांचे? मग एखाद्या पुढा:याचा सन्मान हा अख्ख्या महाराष्ट्राचा सन्मान होतो आणि एखाद्या पुढा:यावरची साधी टीकाही धर्मद्रोही बनविली जाते. यात सामान्य माणसांचा दोष किती आणि त्यांच्या मनोव्यापाराचा धंदा करणा:यांची किमया केवढी?
हे राजकारणातच घडते असे नाही. समाजकारणाच्या प्रत्येक क्षेत्रत ते होत असते. आपला विचार व आपली श्रद्धा जागतिक बनविणो आणि आपल्या मताला वैश्विक आयाम देण्याचा प्रयत्न करणो हा प्रतिभेचा विलास आहे. ज्या क्षेत्रत प्रतिभा दिमाखाने मिरविते त्या क्षेत्रतही हेच चालताना आपण पाहत असतो की नाही? एखादा लेखक वा कवी ठरवून मोठा करता येतो. तसे एखाद्याला ठरवून उपेक्षितही राखता येते. असे ठरवून मोठे केलेले व लहान राखलेले प्रतिभावंत आपल्या मराठी वाचकांनाही चांगले ठाऊक आहेत. पुढा:यांचे पक्ष असतात, धर्मगुरूंचे आश्रम असतात तसे साहित्यिकांचेही मठ असतात की नाही? मग त्यातल्या एकाने दुस:याला मोठे म्हणायचे आणि तिस:याची नालस्ती करायची. मठाधिपती जे करील त्याचे अनुकरण मग मठक:यांनीही करीत राहायचे. आपण आपल्या समाजाचे असे किती तुकडे केले आहेत? अशावेळी निर्माण होणारा प्रश्न, या मठकरी वा ङोंडेकरी लोकांची समजूत त्यांच्या झुंडी बनवायला कारण होते की त्यांचे निष्पाप अविवेकीपण?
मोर्चामधून जाणा:या, जयजयकार करणा:या किंवा मुर्दाबाद म्हणणा:या आणि तसे करताना गर्दीचा भाग बनलेल्या अनेकांना आपण हे कशासाठी, कुणासाठी वा कोणाविरुद्ध करीत आहोत याची अनेकदा साधी जाणीवही नसते. (अलीकडे अशा मोर्चासाठी माणसे भाडय़ाने आणली जातात. त्या बिचा:यांना तर आपल्यापुढे कोणता पुढारी आहे आणि त्याच्या हातात कोणता ङोंडा आहे याचीही साधी कल्पना नसते.) एका ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाला त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात प्रस्तुत लेखकाने विचारले होते, ‘तुम्ही स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेला, लाठीमार सहन केला आणि तरीही त्या आंदोलनात राहिलात. तुम्हाला स्वराज्य वा स्वातंत्र्य या गोष्टींचा अर्थ तेव्हा कळत होता काय?’ त्यावरचे त्यांचे प्रामाणिक उत्तर होते ‘नाही. तो गांधीबाबा म्हणाला की सत्याग्रह करायचा की आम्ही सत्याग्रही व्हायचो. तो म्हणाला तुरुंगात जा तर आम्ही तुरुंगात जायचो..’ यातली स्वातंत्र्य या मूल्याहून गांधीबाबांवरची निष्ठाच अशावेळी प्रबळ ठरत असते. गांधी वा टिळकांची तेजस्विता व मोठेपण वेगळे..
पण आताच्या अनेक बुवा-बाबा-बापूंनाही राजकारणातल्या पुढा:यांएवढीच ङोंडेक:यांची सोबत लाभत असते. ते तुरुंगात असले आणि त्यांच्यावर बलात्कारासारखे घृणास्पद गुन्हे असले तरी हे ङोंडेकरी त्यांना चिकटलेलेच असतात. ‘ते मोठे ईश्वरी पुरुष आहेत’ असे त्यांचे मोठेपण समजून न घेताच ते सांगतात आणि अमुक एका ‘श्री श्रींच्या चर्येवर अलौकिकाचे तेज आहे’ असे त्या तेजाची माहिती नसतानाही कमालीच्या श्रद्धेने सांगत सुटतात. कोणत्याही बाबा-बुवांचे हे श्रद्धाशील लोक राजकीय वा निमराजकीय संघटनांच्या अनुयायांएवढेच भाबडे, श्रद्धाळू, निदरेष आणि विचारशून्य असतात. श्रद्धेच्या सगळ्या व्यावसायिकांचा प्रयत्न, विचार संपविण्याचा आणि अनुयायांच्या मनात गुरू वा बाबाविषयी आंधळी श्रद्धा पेरण्याचाच असतो. ‘तुम्ही विचार करण्याचे कारण नाही. विचार करणारे तिकडे दिल्लीत, नागपुरात, कोलकात्यात वा मातोश्रीत बसले आहेत. ते विचार करतात. तुम्ही फक्त कृती तेवढी करायची’ हे त्यांच्या मनावर बिंबविले जाते. त्यातून संघटनांचे म्हणविणारे अनुयायी छापाच्या गणपतीसारखे तयार होतात. मग ते कोणाच्याही अंगावर सोडता येतात. मागाहून आणले जातात वा हव्या त्या हिंसाचारासाठी सामोरे केले जातात. पकडले गेले तरी ते त्यांच्या चिथावणीखोर पुढा:यांची वा बुवाबाबांची नावे जाहीर न करण्याएवढे निष्ठावंत राहतात. अशांच्या अंधश्रद्धांच्या बळावरच काही संस्था व संघटना वाढतात. तशीही स्वतंत्र विचार करणा:यांची संख्या समाजात थोडीच असते. श्रद्धा ठेवणो हे डोक्याला फारसा ताप न देणारे सोपे प्रकरण असते. ती ठेवणा:यांना कुणीतरी पुढे होणारे आणि दिलासा देणारेच लागत असतात. मग ती दैवते असतील नाहीतर बुवा-बाबा, पुढारी असतील, नाहीतर एखादा घोषणाबाज..
सध्या आपल्याच देशात नव्हे तर मध्य आशियासह सा:या विकसनशील जगात धर्माधता वाढीला लागली आहे. भारत हाही त्या अतिरेकात अडकलेला देश आहे. तालिबान, अल कायदा आणि इसिस या मुस्लीम जगतातील एकाहून एक मोठय़ा व कडव्या धर्माधांच्या संघटना आहेत आणि त्यांनी इराक, सिरिया, अफगाणिस्तान व पाकिस्तानसारखे देश धर्मश्रद्धेच्या नावाने बेचिराख करण्याचा विडा उचलला आहे. भारतात सनातन संस्था, श्रीरामसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांसारख्या हिंदूंमधील कर्मठांच्या संस्था आणि मजलिश वा जैशसारख्या मुसलमानांच्या संघटनांनीही तशाच हालचाली येथे सुरू केल्या आहेत. यातली कोणतीही संघटना आपल्या धर्मातील बहुसंख्य लोकांचे प्रतिनिधित्व करणारी नाही. तालिबानांचा प्रभाव असलेला प्रदेश पाकिस्तानच्या उत्तर टोकावर आणि पाक व अफगाणिस्तानच्या सीमावर्ती क्षेत्रत आहे. या तालिबानांनी आजवर मुसलमानांखेरीज आणखी इतर कोणाच्या हत्त्या केल्या नाहीत. अल कायदाचा इतिहास आणि वर्तमानही स्वधर्मीयांच्याच कत्तलीचा अधिक आहे. इसीसने खिलाफत या 192क् च्या दशकात केमाल पाशाने मोडीत काढलेल्या संस्थेची पुनस्र्थापना करून सारे जग तिच्या नियंत्रणात आणण्याची प्रतिज्ञा केली आहे. आपल्याच देशवासीयांची व धर्मबांधवांची हत्त्या करण्यात व त्यांना देशोधडीला लावण्यात ती या संघटनांत सर्वात पुढे आहे. वास्तव हे की कोणताही सामान्य हिंदू जसा मनुस्मृती वा वेद वाचून आपले दैनंदिन व्यवहार करीत नाही, तसा कोणता मुसलमानही कुराण वा हदीसची वचने वाचून आपले आयुष्य निर्धारित करीत नाही. अन्न, व, निवारा, आरोग्य व सामाजिक सन्मान एवढी साधी व सामान्य अपेक्षा घेऊन ही माणसे जगत असतात. ािश्चन, ज्यू वा पारशी हेही असेच असतात. समूहाच्या सीमेवर आले की त्यांना ते सारे आठवते. मात्र जे आठवते ते धर्मग्रंथातून न आठवता त्यांच्या पुरोहितांनी सांगितले व रुजविले तेच व तेवढेच आठवते. माणसे सामूहिक झाली की विचार गमावतात आणि जास्तीची श्रद्धावान होतात. एकेकटी असताना त्यांच्यात दिसणारा विवेक मग लोप पावतो. नेमक्या याच एका बाबीवर सगळ्या जातिधर्म पंथांच्या पुढा:यांचे राजकारण उभे होत असते.
झुंडवादाला - मग तो राष्ट्राच्या नावाने उभा झाला असो (यालाच फॅसिझम म्हणतात) वा जातिधर्माच्या - माणसे कशी चिकटतात? की चिकटतात ती साधी माणसे नसून त्या वादाने ग्रासलेली विचारशून्य व विवेकशून्यांची गोळाबेरीज असते? ‘तुम्ही फक्त इशारा करा. पुढचे सारे आम्ही पाहतो. तुमचे नावही पुढे येऊ देणार नाही.’ अशी निस्सीम श्रद्धा आपल्या मठाधिपतीला ऐकवून हिंसाचारासाठी बाहेर पडणा:यांपुढे कायदा नसतो, व्यवस्था नसतात, समाज वा त्याचे स्वास्थ्यही नसते. त्यांना दिसत असते त्यांच्या गुरूंची मूक प्रसन्नता व कधी असलाच तर एकांतातला आशीर्वाद. ही माणसे मरायलाही सज्ज असतात. त्यांच्या लेखी या ‘क्षुद्र’ साधक जीवनाहून त्यांनी श्रद्धेने स्वीकारलेले ‘ध्येय’ वा ‘भक्तिपात्र’च श्रेष्ठ असते. ‘दोघांचा जीव घेतला आहे, आता गोदेत स्नान करून येतो’ असे म्हणणा:याची मानसिकता धर्माच्या श्रद्धेखातर अंगाला बॉम्ब बांधून निघणा:या व त्यातच स्वत:ही बळी पडणा:या मध्य आशियाई मुला-मुलींहून किंवा राजीव गांधींची हत्त्या करायला आलेल्या नलिनीहून वेगळी नसते. आणि ज्यांना कायद्याचे भय नाही त्यांच्यापुढे न्यायालये तरी कितीशी भीतीदायक वा आदरणीय असतात? वास्तव हे की झुंडींना आणि अतिरेक्यांना देश, धर्म, कायदा, समाज वा व्यवस्था यातले काहीएक नसते. त्यांच्यावर स्वार झालेला खूनच त्यांचा प्रवास व कृती निश्चित करतो. ती होत असताना आपल्या आयुष्याला असलेल्या सगळ्याच संदर्भाचा त्यांना विसर पडतो.
झुंडशाहीवर शिक्षण हा उपाय ठरतो असे म्हटले जाते. पण अतिशय प्रगत व शिक्षित समाजातही झुंडशाहीचा ज्वर दिसला आहे. कु क्लक्स क्लॅनसारख्या काळ्या अमेरिकनांची हत्त्या करणा:या संघटना अमेरिकेत होत्या व त्यांची वंशावळ अजून तेथे आहे. श्रीलंकेने आपल्या यादवीच्या काळात दिसेल तो तामिळी आपला शत्रू ठरवून त्याला मारले. या प्रकाराची चौकशी आता संयुक्त राष्ट्र संघाकडून होत आहे. मारायची माणसे अशी आगाऊ ठरली की मग त्यासाठी निमित्तेही शोधली जातात. दादरीच्या अहमद इकलाखच्या घरात गोमांस आहे अशी अफवा पसरून त्याला मारणारा जमाव अशा खोटय़ा निमित्तांनी पेटविता येतो. अशी निमित्ते शोधायला बुद्धीच लागते असे नाही. इतिहासात धर्माच्या नावावर लढाया होत तेव्हा स्वधर्माचा नसलेला प्रत्येकच जण शत्रू व वध्य ठरायचा. आताच्या कायदा व सुव्यवस्थेच्या नावाने चालणा:या समाजात असे घाऊक शत्रू व वध्य निमित्ते करून शोधले जातात. काही वर्षापूर्वी ओडिशा या एकाच राज्यात 12क्क् चर्चेस अशा झुंडींनी जाळली. कर्नाटकात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या पूजागृहांची संख्या 6क्क् वर होती. बिहार आणि उत्तर प्रदेशात अशी जळितकांडे नित्याची आहेत आणि आता दिल्लीही त्यापासून मुक्त राहिली नाही. आपण पाकिस्तानला नावे ठेवायची, इराक आणि सिरियामधील कर्मठांनी केलेल्या हत्त्याकांडांची चर्चा करायची आणि आपल्या अंगणात व परसदारात काय चालते याबाबत मौन पाळायचे यात आपल्याही विवेकाचा बळी पडत असतोच की नाही?
शिक्षण व त्यातही विवेकाचा विस्तार करणारे शिक्षण कुठे दिले जाते? माहिती देणारे आणि विवेकाची वाढ करणारे शिक्षण यात सॉक्रेटिसपासून आपल्या विनोबांर्पयत सा:यांनीच वेगळेपण दर्शविले. आपले शिक्षण ‘ज्ञानी’ घडविते की ‘शिष्य’? शिष्य व अनुयायी घडविणा:या शिक्षण नावाच्या संस्कारांवर सध्या मोठा भर दिला जात आहे. शिक्षणमंत्र्यांपासून कुलगुरूंर्पयत आणि कलाव्यवहारातील मार्गदर्शकांपासून शालेय शिक्षणातील धडे निश्चित करण्यार्पयत शिक्षणाचे असे संस्कारीकरण सध्या होत आहे. यातून स्वतंत्र विचाराची विवेकी माणसे न घडता छापाचे गणपती तयार होत असतात. सध्याच्या राजकारणाची गरजही तीच आहे.
स्वतंत्र विचार, वेगळा विचार व विरोधी विचार दडपणो व नाहिसा करणो हा शिक्षणाचा मध्ययुगीन हेतू आहे. ‘स्वतंत्र विचार करणारी ी चेटकीण असते आणि प्रत्येक चेटकीण ही वध्य असते’ असे चौथ्या शतकातच रोमने जाहीर केले. आताही शिक्षणाचा व सगळ्या ज्ञानमाध्यमांचा हेतू स्वतंत्र विचारांची कोंडी करणो हाच राहणार असेल तर वर्तमानात होऊ घातलेले आपले शिक्षण या मध्ययुगीन कथानकापासून वेगळे असणार नाही. सत्तेला नेहमी ‘होयबा’ लागतात. तिला अडचणीचे प्रश्न विचारणारे नको असतात. अडचणीचे प्रश्न विचारणा:यांना धर्मसत्ता ‘पाखंडी’ ठरविते आणि राजसत्ता ‘देशाचे शत्रू’ म्हणते.
खरेतर या सा:याला इतिहासाच्या साक्षीचे पाठबळ आणि वर्तमानातल्या घटनांचा आधार आहे. हा संघर्ष सनातन म्हणावा असा राहून चालत आला आहे.. एक गोष्ट मात्र खरी, यातला बंधक बनविणा:यांचा व सनातन्यांचा वर्ग नेहमीच पराभूत होत राहिलेला इतिहासाने पाहिला आहे. स्वातंत्र्याचे एक पाऊल पुढे टाकायचे व त्याभोवती सुरक्षितता उभी झाली की त्याचे पुढचे पाऊल टाकायचे अशीच जगाच्या स्वातंत्र्याची वाटचाल राहिली आहे. यातले पुढचे प्रत्येक पाऊल हा नवतेचा व स्वातंत्र्याचा विषय ठरला, तर सुरक्षा उभारण्याचा काळ हा सनातन्यांना त्यांचा तेवढय़ापुरता वरचष्मा वाटला असल्याचा काळ ठरला.
लोकशाही ही बहुमतशाही नाही. तसे ते बहुमतवाल्यांचेही राज्य नाही. ते कायद्याचे राज्य आहे आणि त्यातला कायदा अल्पसंख्याकांएवढाच बहुसंख्याकांनाही लागू होतो. बहुसंख्य वा अल्पसंख्य यात तो फरक करीत नाही. लोकशाहीचे हे स्वरूप ज्यांना मान्य नाही त्यांना कायद्यासकट लोकशाही व घटनाही मान्य नसते.. आम्ही सांगतो त्या अटींवर जगणार असाल तर येथे राहा, नाहीतर देश सोडा, ही भाषा कायद्याची नाही, घटनेची नाही आणि लोकशाहीची तर नाहीच नाही.. तरीही ‘गोमांस खाणा:यांनी हा देश सोडावा’ असे म्हणणारे मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री, देशाच्या जनतेत ‘रामजादे’ आणि ‘हरामजादे’ असा भेद करणारी निरांजना ही मंत्रीण, ‘मोदींना मत न देणा:यांना येथे राहता येणार नाही’ असे म्हणणारा गिरिराज सिंग हा मंत्री, ‘आमचे ऐका नाहीतर मार खायला तयार राहा’ अशी धमकी देणारा साक्षीबुवा हा खासदार ही सारी सत्तेतली माणसे आहेत, आणि सत्तेचे सर्वोच्च पदाधिकारी त्यांना सांभाळून घेत आहेत. गेल्या साठ वर्षात जे झाले नाही ते आम्ही करीत आहोत असे सांगणा:या राज्यकत्र्याना ‘तुम्ही जे वेगळे करीत आहात ते नेमके हे आहे’ असे आता स्पष्टपणो सांगितले पाहिजे. ‘तुम्ही लोकशाहीचे बहुमतशाहीत आणि बहुमतशाहीचे झुंडशाहीत रूपांतर करीत आहात’ हेही त्यांना बजावले पाहिजे. या देशाने वा त्याच्या घटनेने धर्मश्रद्धेला कधी विरोध केला नाही. त्याचा वा त्याच्या घटनेचा विरोध परधर्माच्या द्वेषाला राहिला आहे. 198क् व 9क् च्या दशकांपासून राजकारणाची बदललेली प्रकृती त्याला एकारलेली व परधर्मद्वेषी बनवीत नेत आहे. 2क्14 च्या निवडणुकीनंतर या बदलाची धार व त्याचे विषाक्तपण वाढले आहे. आमच्याविरुद्ध, आमच्या पक्षाविरुद्ध, नेत्याविरुद्ध वा विचाराविरुद्ध बोलेल तो एकाएकी धर्मद्रोही व देशद्रोही ठरविण्याची या राजकारणाची ही अवस्था अलीकडची आहे. ती सभ्यतेची, संयमाची वा विवेकाची नाही. ती उन्मादाची आहे आणि उन्माद हा झुंडशाहीचा प्राणवायू आहे. सध्याच्या राजकारणाची सारी भिस्त या शक्तीवर आहे.
वाद संपले, चर्चा संपल्या आणि संवाद इतिहासजमा झाले. आताचा भर कोण कोणावर मात करतो (व तीही शारीरिक मात करतो) यावर आहे. या प्रयत्नात अल्पसंख्य कमी भरणार व मार खाणार, तर बहुसंख्य वरचढ ठरून त्यांना वाकवीत राहणार. हा बहुसंख्याकांच्या झुंडशाहीचा प्रकार आहे. त्यात घटना शिल्लक राहणार नाही, लोकशाही राहणार नाही आणि मनुष्यधर्मही संपणार आहे..
कायदा हा यावरचा उपाय नव्हे. कायद्याला अशा झुंडी नमविता आल्या नाहीत. त्यामुळे त्या फारतर भूमिगत होऊन अधिक हिंस्र झाल्या. त्यावरचा खरा पण दीर्घकालीन उपाय सामाजिक मानसिकता बदलणो हा आहे.
अमेरिकेतली क्लॅन ही काळ्या अमेरिकनांना मारणारी संस्था तेथील बदललेल्या मानसिकतेमुळे दुबळी होऊन संपली आणि बराक ओबामा हा कृष्णवर्णीय अमेरिकन त्या देशाचा अध्यक्ष झाला. पाकिस्तानसारख्या धर्माध देशातही सगळ्या धर्माज्ञा बाजूला सारून बेनझीर भुट्टो ही ी त्या देशाची चार वेळा अध्यक्ष झाली. जगाच्या मानसिकतेने असे चमत्कार आणखीही घडविले आहेत.
गांधीजींची हत्त्या कोणा माथेफिरू माणसाने दिल्लीत केली. पण गांधी आज सा:या जगाचे जिवंत श्रद्धास्थान बनले आहेत. हा आशावाद व विश्वासच आपल्या लोकशाहीचा प्राणवायू ठरणार आहे.
(लेखक ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत.)
suresh.dwadashiwar@lokmat.com