शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांच्या देशा.

By admin | Updated: June 4, 2016 23:17 IST

अनाम अशा विविधतेने भारत देश नटलेला असला, तरी त्यातली साम्यस्थळेही थोडीथोडकी नाहीत.

- मकरंद जोशी
 
अनाम अशा विविधतेने
भारत देश नटलेला असला, 
तरी त्यातली साम्यस्थळेही थोडीथोडकी नाहीत.
उभ्या-आडव्या पसरलेल्या 
भारतात सर्वत्न आढळणारी 
गोष्ट म्हणजे मंदिरे. 
पण त्यातही किती वैविध्य!
हिंदू, बौद्ध, जैन अशा वेगवेगळ्या धर्माच्या या मंदिरांतील रचना, विविधता आणि शैलीतील 
प्रयोग उठून दिसतात. 
भारतीय संस्कृतीचं ते वैभव आहे.
 
आपल्या भारत देशाचे वर्णन परदेशी पर्यटकांसाठी कधी राजे-राजवाडय़ांचा देश, तर कधी वाघ-सिंहांचा देश असे केले जाते. त्यातच मग सण-उत्सवांच्या देशापासून ते देव-देवतांच्या देशापर्यंत वेगवेगळी बिरु दे जोडली जातात. आता उत्तरेपासून दक्षिणोपर्यंत सुमारे बत्तीसशे किलोमीटर्स आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत सुमारे एकोणतीसशे किलोमीटर्स पसरलेल्या देशात जे नैसर्गिक, सांस्कृतिक, प्रादेशिक वैविध्य आढळते त्यामुळे त्याचे वर्णन अनेक प्रकारे करता येणं स्वाभाविकच आहे. पण या विविधतेतील साम्यस्थळे कमी नाहीत. त्यातलं एक म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते आसाम अशा उभ्या-आडव्या भारतात सर्वत्र आढळणारी मंदिरे. बरं ही मंदिरेसुद्धा एकाच धर्माची नाहीत. हिंदू, बौद्ध, जैन अशी सगळ्या धर्मांची असल्याने त्यांच्या रचनेतील विविधता आणि शैलीतील प्रयोग उठून दिसतात. 
या मंदिरांनी भारताच्या धार्मिक परंपरेबरोबरच कला परंपरेत आणि सांस्कृतिक परंपरेतही मोलाची भर घातलेली आहे. काश्मिरातल्या श्रीनगरमधील शंकराचार्य मंदिरापासून ते दक्षिण भारतातील मदुराईच्या मीनाक्षी मंदिरापर्यंत आणि महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरापासून ते ओरिसातील कोणार्कच्या सूर्यमंदिरापर्यंत भारताच्या प्रत्येक राज्यात आढळणा:या मंदिराला जसे पुराणकथेचं दैवी वलय लाभलेलं आहे, त्याचप्रमाणो मानवी कलाकौशल्याचे तोरणही लाभलेलं आहे. माउंट अबू येथील संगमरवरात उभारलेल्या दिलवाडा मंदिरांमधील नाजूक कोरीवकाम काय किंवा मध्य प्रदेशातली खजुराहोची सँड स्टोनमध्ये घडवलेली शिल्पांकित मंदिरे काय, या मंदिरांना भेट दिल्यावर पर्यटकांच्या मनात सर्वात आधी आदर दाटतो तो ह्या कलाकृती घडवणा:या कलाकारांविषयीचा. अनेकदा होतं काय की एखाद्या मंदिराला भेट द्यायची म्हटल्यावर जाणा:यांच्या मनात आधीपासूनच त्या मंदिरातील दैवताबद्दलच्या भक्तिभावाची गर्दी झालेली असते. त्यामुळे त्या मंदिराच्या बांधणीतील सौंदर्य, स्थापत्यामधील विशेष याकडे फारसे लक्ष जात नाही. वस्तुत: आपले पूर्वज निव्वळ धार्मिक नव्हते, तर कलांचा रसास्वाद घेणारे रसिक होते. त्यामुळे मंदिराच्या माध्यमातून शिल्पकलेपासून ते संगीत-नृत्यकलेपर्यंत विविध कलांना प्रोत्साहन देण्याकडे त्यांचा कल होता. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणा:या आपल्या महाराष्ट्रात मंदिरांची कमी नाही. पण सगळ्या प्रसिद्ध मंदिरांपेक्षा जरासं दुर्लक्षित राहिलेलं आणि अप्रतिम कलाकुसरीनं नटलेलं मंदिर म्हणजे लोणार येथील दैत्यसुदन मंदिर. लोणारच्या पुराणकथेनुसार या स्थानी श्री विष्णूंनी लवणासुराचा वध केला होता, त्यामुळे इथे विष्णू मंदिर आहे. लोणार गावाच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर शिखरविरहित आहे, कारण साधारणपणो दोनशे- अडीचशे वर्षे हे मंदिर जमिनीखाली गाडले गेलेले होते. पंधराव्या, सोळाव्या शतकात निजामाच्या राजवटीत मंदिरांचा विध्वंस होऊ लागला तेव्हा गावक:यांनीच हे मंदिर मातीखाली गाडले. 
पुढे काळाच्या ओघात ही गोष्ट लोकांच्या स्मृतीतून पुसली गेली. नंतर मंदिराच्या ठिकाणी असलेल्या टेकडीची माती खोदताना मूर्ती आणि अवशेष सापडू लागले तेव्हा सन 1878 मध्ये उत्खनन करून हे मंदिर बाहेर काढण्यात आले. मंदिरावरील सजावट आणि शिल्पशैली यावरून मंदिराची निर्मिती तेराव्या शतकात झालेली असावी असा अंदाज बांधण्यात आला. हे मंदिर दूरवरून पाहताना कोणार्कच्या सूर्यमंदिराचा भास होतो. अनियमित ता:याच्या आकाराचे असलेले हे मंदिर चारही बाजूंनी सुरेख शिल्पांनी सजवलेलं आहे. जेव्हा आपण बाहेरून मंदिराला प्रदक्षिणा घालतो तेव्हा विष्णू लक्ष्मी शिल्प, गळ्यात मुंडमाळा धारण केलेला व चार हात असलेला तांडव करणारा शंकर, नृसिंह, धनुष्य आणि परशू धारण केलेला परशुराम याबरोबरच बाळाला कडेवर घेऊन दूध पाजणारी माता, मुष्टियुद्ध, हातात शस्त्र घेतलेले द्वारपाल, मैथुन युग्म अशी शिल्पेही पाहायला मिळतात. दैत्यसुदन मंदिर जेव्हा जमिनीतून बाहेर काढण्यात आले तेव्हा गाभा:यात मूर्ती नव्हती. मग पुराणकथेच्या संदर्भावरून स्वामी सच्चिताश्रम यांनी कल्पनाचित्र काढले. त्यानुसार नागपूरच्या भोसले राजेंनी मूर्ती घडवून पाठवून दिली. मात्र नंतर स्वातंत्र्यसंग्रामात निजामाच्या रझाकारांनी ह्या मूर्तीलाही भग्न केलं. लोणारमधील सरोवराच्या काठावर ही भग्नावस्थेतील मंदिरे पाहायला मिळतात. महाराष्ट्राचा शेजारी असलेला कर्नाटकही जबेलूर-हळेबिडच्या पुरातन मंदिरांपासून ते ऐहोळेच्या मंदिर समूहापर्यंत द्राविड शैलीतील मंदिरांनी कर्नाटकची कला संस्कृती आपल्याला थक्क करते. या मंदिरांमधील एक खास मंदिर म्हणजे हम्पीचे विठ्ठल मंदिर. विजयनगरच्या साम्राज्याचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या हम्पीमध्ये सुशोभित मंदिरांची आणि देखण्या शिल्पांची कमी नाही, पण त्या सगळ्यात विठ्ठल मंदिर तुमचं लक्ष वेधून घेतं. 15 व्या शतकातील हे मंदिर पाहताना आधी ते एकाच पाषाणात कोरलेलं असल्याचा भास होतो. प्रत्यक्षात ग्रॅनाइटच्या शिळा जोडून हे मंदिर बांधलेलं आहे. या शिळांचे जोडकाम त्यावरील कलाकुसरीत कौशल्याने लपवण्यात आले आहे. मंदिराच्या प्रांगणातला दगडी रथ त्याकाळातील कलाकारांच्या उत्कृष्ट कारागिरीचे अद्भुत दर्शन घडवतो. या रथाच्या पुढच्या बाजूला दोन भग्न गजशिल्प आहेत. रथाची चाके पानाफुलांच्या नक्षीने सजवलेली आहेत. ही चाके त्यांच्या अक्षाभोवती फिरवता येत असावीत अशा खुणा दिसतात. या मंदिराच्या महामंडपाच्या मध्यवर्ती भागात अप्रतिम कलाकुसरीने सजवलेले सोळा स्तंभ आहेत. तसेच या मंदिराच्या रंगमंडपामध्ये छप्पन्न सुरेल स्तंभ आहेत. या स्तंभांवर हलकासा आघात केल्यास त्यातून सा रे ग म असा ध्वनी निघतो.
.ही होती आपल्या भारतातल्या आवर्जून पाहायलाच हवीत अशा मंदिरांची झलक. भारतातल्या कोणत्याही राज्यात पर्यटनाला गेलात तर तिथल्या मंदिराला अवश्य भेट द्या आणि आपल्या कलापरंपरेचा आनंद घ्या.