शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
3
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
4
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
5
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
6
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
7
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
8
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
9
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
10
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
11
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
13
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
14
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
15
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
16
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
17
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
18
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
19
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
20
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई

रंग

By admin | Updated: September 26, 2015 14:10 IST

बंगल्याला रंग देण्याचा आमच्या घरी; आणि स्टुडिओ जिथे आहे त्या बिल्डिंगला रंग देण्याचा सोसायटीचा विचार चालू आहे.

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
बंगल्याला रंग देण्याचा आमच्या घरी; आणि स्टुडिओ जिथे आहे त्या बिल्डिंगला रंग देण्याचा सोसायटीचा विचार चालू आहे. आपल्या घराला रंग देण्याचा निर्णय आपला आपण केव्हाही घेऊ शकतो. त्यासाठी घरच्याघरी, घरातल्या मंडळींशी, बायकोशी, मुलांशी थोडीफार चर्चा करून, शेड वगैरे ठरवून सगळ्यांच्या वेळे-सोयीनुसार आपण ते रंगाचं प्रकरण ठरवू शकतो, त्यासाठी मीटिंग घ्यावी लागत नाही. सोसायटीच्या बिल्डिंगला रंग द्यायचा म्हणजे कॉमन गोष्ट. सोसायटीतल्या सगळ्यांच्या सल्ल्यानं करणं आलं. मग त्यासाठी आपापसात आधी थोडी चर्चा आणि मग रेग्युलर मीटिंगमध्ये ठराव इत्यादि तांत्रिक गोष्टी होऊन रंग द्यायचं पक्कं केलं जातं. मग एस्टीमेट वगैरे गोष्टी. रंगकाम करणा:या कंपनीकडनं टाय वगैरे लावून एखादा एक्ङिाक्युटिव्ह शेड, कॉम्बिनेशनचं कार्ड घेऊन अदबीनं येतो. कॉम्बिनेशन, क्वालिटी, फिनिशिंग, वेळ वगैरे गोष्टींवर चर्चा होते. निर्णय ठरतात आणि काम सुरू होतं. घरच्या कामासाठी मीटिंग वगळता बाकी सगळं थोडय़ाफार प्रमाणात असंच होतं. आता तर रंगनिर्मिती करणा:या कंपन्या तुम्हाला सल्लासुद्धा देतात. त्यांच्या आकर्षक अशा वेबसाइट्स असतात. ऑनलाइनही अनेक गोष्टी तुम्ही करू शकता. रंगांना हल्ली नुसतीच विशेष नावंच नव्हे तर कोड नंबरही असतात. वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सचे चार्ट असतात. तुमच्या कॉम्पीवर तुम्ही कलरस्कीम व्हच्यरुअली तयार करून व्हच्यरुअलीच घराला लावून बघूही शकता. क्षणार्धात त्यात हवे ते बदल करणं हे तुमच्या डाव्याउजव्या हाताच्या बटणाशी असतं. रंगांचे प्रत्यक्ष नमुनेही तुमच्या घरी पाठवले जातात. रंगांमधले तज्ज्ञ तुमच्या घरी येऊन तुमच्याशी चर्चा करतात. 
‘पेंटर’ या नावानं चित्रंची मी एक मालिकाच केली होती. रंगारी, त्यांचे कपडे, डाग, ओघळ, त्यांच्या रंगाच्या त्या बादल्या, डबे, स्टेनरच्या छोटय़ा डब्या, पुंगळ्या, टय़ूबा, कंटेनर्स, डबडी-डुबडी, ब्रशेस, रोलर, दो:या-सुतळ्या, पट्टय़ा, खडू, शिडय़ा, बांबू अशा गोष्टींनी भरलेलं पेंटरमंडळींचं एक वेगळंच विश्व आहे. या विश्वाकडे मी नेहमीच कुतूहलानं पाहतो. रंग देण्याचा तो सगळा कार्यक्रमही मला फार आवडत आलाय, लहानपणापासून. 
लहानपणी तर या सगळ्याचं फार फार आकर्षण, जरा जास्तच. ही पेंटरमंडळी मला फार जवळची वाटत. आजही वाटतात. तेव्हा तर मला त्यांच्यात सामील व्हावं असंही वाटायचं. डोक्याला फडकं गुंडाळून, मुद्दामहून फाटके कपडे घालून, हातात ब्रश नि रंगाचे डबे घेऊन, शिडी-घोडय़ावर चढून भिंती रंगवण्याचा मोह आवरता यायचाच नाही! पोलीस कॉलनीत असताना काही वेळेला सरकारकडून घराला रंग ‘फ्री’ लावून मिळायचा, पण तो फक्त दारांना (तेसुद्धा दर्शनी भागातल्या), खिडक्यांना, छज्ज्यांना आणि व्हरांडय़ाच्या भिंतींना! सरकारी, ठरलेल्या शेड्स. दरवाजांना विशिष्ट प्रकारचा ग्रे! शेडचं नावही अगदी स्पष्ट आठवतंय : स्टील ग्रे. आजही इतर कुठल्याही कारणास्तव ‘ग्रे’ हा शब्द कानावर पडला की पाठोपाठ प्रतिध्वनी ऐकू येतो : स्टील ग्रे!
गोदरेजच्या कपाटांसाठी हा स्टील ग्रे तर भलताच लोकप्रिय होता. गोदरेजचं कपाट म्हणजे लोखंडाचं कपाट. घरात लोखंडाचं कपाट असणं ही चांगल्या इंटिरियर डेकोरेशनची त्या काळातली व्याख्याच होती. भले ते कपाट गोदरेज कंपनीचं नसेना का! गोदरेजचं कपाट लोकप्रिय झाल्यानंतर त्यापाठोपाठ पुण्याच्या सातारा रोडला तशा प्रकारची लोखंडी कपाटं तयार करणारे लोकल मॅन्युफॅक्चरर खूप निघाले आणि तसल्या कपाटांची बाजीराव रोडवरच्या फर्निचरच्या दुकानांतनं चलती सुरू झाली. लोकप्रिय रंग : स्टील ग्रे!! उपयुक्तता म्हणाल तर, ती या कपाटांची भरपूरच होती. सगळ्या कुटुंबाचे ठेवणीतले आणि वापरातले सगळे कपडे बसतील, एवढी प्रचंड जागा. घराघरातल्या वडीलमाणसांचे ऑफिसला वगैरे जाण्याचे कपडे ठेवण्यासाठी हँगर्सची विशेष सोय. त्यातल्या एका हँगरला आईवडिलांच्या लग्नातला वर्षानुवर्षं लटकलेला तो वुलनचा वगैरे किमती सूट! (फक्त लग्नाच्या एकाच दिवशी वापरलेला!!) आईच्या पैठणीसाठी वगैरे स्पेशल कप्पा! मुख्य आणि सर्वात आकर्षक आणि महान भीतिदायक गोष्ट आणि सोय म्हणजे तिजोरी. उघडता-उघडता नाकीनव आणणारी. त्या तिजोरीच्या किल्ल्या कपाटातच, सर्वात उंच कप्प्यातल्या सर्वात खोल कोप:यात कागदाखाली लपवून ठेवलेल्या. माङया लहानपणी एकदा तरी ती तिजोरी कुणी उघडल्याचं निदान माङया आठवणीत तरी नाही. 
तर असा हा स्टील ग्रे. बिल्डिंगला बाहेरून देण्याचा रंगसुद्धा ठरलेला, मघाशी मी म्हटलं तसं. शेड सरकारी. बहुतेकदा बदामी किंवा पिवळ्या मातीसारखी. सरकारी रंग देऊन झाला, की बिल्डिंग चकाचक दिसे. मग घरातला, आतला रंग ओशाळवाणा दिसे. त्याचा परिणाम म्हणून मग घरात आत रंग देण्याची कल्पना घरातल्या कुणाकडनं तरी पुढे मांडली जाई. बहुतेकदा हा प्रस्ताव वडिलांकडनंच येई. कारण मुख्य प्रश्न खर्चाचा. आता प्रस्तावही तेच देणार आणि खर्चही तेच करणार; असं असल्यावर अडचण कोणाला? प्रस्ताव लगेचच मंजूर व्हायचा. सुट्टय़ाबिट्टय़ा शनिवार-रविवार बघून दिवस पक्का ठरायचा नि सामानाची हलवाहलव, ओढाओढी, सरकवासरकवी आणि बांधाबांध सुरू! आत्तासारखं एक्ङिाक्युटिव्ह, शेडकार्ड वगैरे भानगडी काही नाहीत. अॅक्रेलिक इमल्शन, पर्ल फिनिश, लस्टर वगैरे शब्द अजून कानावरून जायचे होते. ऑईल पेंट माहिती होता, कालांतरानं त्यात ऑईल बॉण्ड या आकर्षक शब्दाची भर पडली. रंगाच्या बाबतीत डिस्टेंपर हा आवडता प्रकार होता. त्याचं खरंतर शेडकार्डही असायचं, अगदीच नाही असं नाही, पण जेमतेमच. एका जाड कागदाच्या दोनतीन घडय़ा घातलेल्या मरतुकडय़ा फोल्डरमध्ये डिस्टेंपर रंगाच्या चारपाच शेडचे पट्टे ओढलेले. आत्तापर्यंत किमान दोनशे घरांतल्या लोकांनी तेचतेच तेचतेच शेडकार्ड हाताळलेलं असल्यानं त्यातल्या शेड मळकटलेल्या. शेड तरी कसल्या? हिरव्याच्या एकदोन, निळा पॉप्युलर म्हणून त्याच्या जरा जास्त, एक दोन गुलाबी आणि मातकट पिवळा, बास. खेळ खलास! फार ऑप्शनच नसायचे. तरीसुद्धा खूप घमासान चर्चा होऊन बहुतेकदा स्वयंपाकघरात पिवळसर आणि बाहेरच्या खोलीत निळा हे कॉम्बिनेशन ठरायचं. आमच्या घरी तर दोनच खोल्या होत्या. त्यामुळे तिस:या रंगाला काही चान्सच नव्हता. काही कॉलनींमध्ये व्हरांडय़ाची एक जास्तीची धरली तर अडीच खोल्या किंवा झोपण्याची खोली धरून जास्तीत जास्त तीन खोल्या असायच्या. मग झोपण्याच्या खोलीला गुलाबी रंग अपरिहार्यच! 
पेंटर हमखास मिळण्याची जागा म्हणजे बुधवार चौक. भल्या पहाटे नसले तरी सकाळी सकाळी हातात खुणोचा म्हणून ब्रश घेतलेले आणि तोंडात एक आणि कानावर एक अशी बिडी ठेवणारी माणसं बुधवार चौकात एका विशेष ठिकाणी गोळा झालेली असायची. वेशभूषेवरून आणि केशभूषेवरूनसुद्धा ओळख पटणं जड जायचं नाही. कानावर केस असलेला पेंटर दर्जेदार काम करतो अशी माझी त्या वेळेला समजूत होती. पेंटर धुंडाळायला गेलो की कानावर केस असलेल्या पेंटरचा मी मनोमन शोध घ्यायचो, त्याला पकडून घरी आणायचं, जागा दाखवायची आणि मुख्यत: त्याच्या सोयीच्या वेळेला काम सुरू करायचं. 
बहुतेकदा तीन माणसांची टीम असायची. खरडायला-घासायला एक, पल्टी वगैरे भरायला आणि चुना किंवा पहिला हात मारायला दुसरा आणि आपला हा जो मुख्य पेंटर असायचा, तो फायनल हाताला. सीलिंग हे ‘मारायचं’ असतं, ‘रंगवायचं’ नसतं. त्यामुळे सीलिंग मारायला हा मुख्य पेंटर. कानावर केस असलेला जसा भारी पेंटर, तसाच सीलिंग मारणारा तो भारी पेंटर अशी समजूत होती. पेंटरची घरातली एण्ट्री त्याच्या बिडीच्या धुरासह व्हायची. घरात आल्या आल्या तो आधी सीलिंगकडे नजर टाकायचा. आपल्या चांगल्या भिंती अचानक खरवडून बघायचा. आत्ताचा असलेला रंग फार म्हणजे फारच खराब झालेला असून, खरडायला कसा वेळ लागेल, सीलिंग कसं दोनतीनदा मारावं लागेल, खिडक्यांच्या दारांना आत्ता लावलेला सरकारी ग्रे कसा पुन्हा खरवडावा लागेल आणि सरकारी कॉण्ट्रॅक्टरच्या पेंटरनं कसा खराबच रंग लावला आहे याचं वर्णन करून जाता जाता सरकारवर यथेच्छ टीका करून (त्याच्या स्वत:च्या सबंध करिअरमध्ये एकही सरकारी कंत्रट न मिळाल्याचा सूड घेत) किती ब्रास काम होईल, याचा अगम्य हिशेब तोंडी सांगून ‘नंतर भानगड नको’ म्हणून तो हिशेब आपल्यालाच कागदावर लिहून घ्यायला सांगून पेंटर त्याची माणसं आणायला बाहेर पडायचा. ठरलेल्या दिवशी आपण आपलं सामानसुमान हलवून गुंडाळून ठेवून घरातली भांडीकुंडी, पाटताटवाटय़ा एकत्र गोळा करून, कमीतकमी जागेत ठेवून पेंटरची वाट बघत थांबलेलो. 
(क्र मश:, उर्वरित भाग पुढील अंकी)
 
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)
 
chandramohan.kulkarni@gmail.com