शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

भटक्याचे बि-हाड पाठीवर.

By admin | Updated: May 21, 2016 14:00 IST

पाठीवर मोठाल्या सॅक, हातात मॅप किंवा गाइडबुक, अंगात थ्री फोर्थ आणि टी शर्ट किंवा हाफ कुडता घातलेले फिरंगी पर्यटक गोवा, मनाली, दिल्लीसारख्या ठिकाणी हमखास दिसतात. कमी खर्चात किंवा स्वस्तात जास्तीत जास्त भटकंती करणारे हे भटके प्रवासी म्हणजे ‘बॅकपॅकर्स’! जगभरात हा ट्रेंड मोठय़ा प्रमाणात रूढ असला तरी आपल्याकडे मात्र तो सह्याद्रीमधील भटकंती किंवा हिमालयीन मोहिमांपुरताच मर्यादित आहे.

मकरंद जोशी
 
खीकी अर्ध्याहून तुमान - तिला जिथे जिथे म्हणून खिसे करता येणं शक्य आहे तिथे तिथे खिसे -प्रत्येक खिशात काही ना काही कोंबलेलं. कंबरेच्या पट्टय़ाला शिटी, दोरी, चाकू, उजव्या खिशात चमचे, डाव्या खिशात बॅटरी, खाकी शर्टच्या उजव्या खिशात डायरी, मागल्या खिशात पत्त्यांचा कॅट, गळ्यात पाण्याची पिशवी, दुस:या खांद्यावरून बॉक्स कॅमे:याचा पट्टा, पाठीवरच्या हॅवरसॅकमध्ये सतरंजी, हातात वळकटी, पायात ब्राऊन कॅनव्हासचे बूट, गळ्यात मफलर.. ’ हे वर्णन आहे पु.लं.च्या बटाटय़ाच्या चाळीतल्या भ्रमण मंडळातील कोचरेकर मास्तरांचे.
आता पु.लं.नी कोचरेकरांचे जे अर्कचित्र रेखाटले आहे, त्यातील अतिशयोक्ती सोडून दिली तर बरचसं वर्णन हे चक्क आजच्या काळातल्या बॅकपॅकर्सशी अगदी मिळतं जुळतं आहे. आता ‘बॅकपॅकर्स’ म्हणजे नेमके कोण? तर भारतातल्या दिल्ली, आग्रा, जयपूर, मनाली, त्रिवेंद्रम, गोवा अशा पर्यटन स्थळांवर तुम्ही नेहमी पाठीवर मोठाल्या सॅक घेतलेले, हातात मॅप किंवा गाइड बुक घेऊन अंगात थ्री फोर्थ आणि टी शर्ट किंवा हाफ कुडता घातलेले फिरंगी पर्यटक नक्की पाहिलेले असतील, हे म्हणजे ‘बॅकपॅकर्स’. 
पाठीवर सॅक अडकवून स्वतंत्रपणो देश-विदेशात शक्यतो स्वस्तात भटकंती करणा:या  पर्यटकांना बॅकपॅकर्स म्हटलं जातं. आता या वर्णनावरून लक्षात आलं असेलच की बॅकपॅकर्स हे सर्वसाधारणपणो तरु ण वयोगटातले असतात, ज्यांना मनमुराद भटकंती करायची असते. वेगळी संस्कृती, अनोखा निसर्ग बघायचा असतो. वेगवेगळे अनुभव घ्यायचे असतात. पण त्यांचा खिसा गरम नसल्याने ते हा सर्व पर्यटनानुभव शक्य तितक्या स्वस्तात बसवण्याचा प्रयत्न करणारे असतात. साहजिकच या बॅकपॅकर्समध्ये जास्त भरणा असतो तो महाविद्यालयीन तरुण-तरु णींचा किंवा ज्यांचे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे अशा युवक- युवतींचा. या प्रकाराचा उगम मानला जातो तो थेट 17व्या शतकात. इटलीमधल्या नेपल्सच्या कोर्टात मॅजिस्ट्रेट असलेल्या जिओव्हानी फ्रान्सिस्को जेमिली कारेरी याला जगातला पहिला बॅकपॅकर मानले जाते. या भटक्याने पाच वर्षे जगपर्यटन केलं आणि साउथ अमेरिकेपासून ते आशियापर्यंत अनेक देश पालथे घातले. त्यावेळी सुटसुटीत प्रवास करायचा म्हणून त्याने बॅकपॅकर्सची शैली अंगीकारली. आधुनिक काळात अशा प्रकारे सोबत फारसे सामानसुमान न घेता, मुक्त व स्वच्छंदपणो मन चाहेल तिकडे सैर करण्याची पद्धत सुरू झाली ती 6क्-7क् च्या दशकातील हिप्पी ग्रुप्समधून. 
प्रस्थापितांविरु द्ध बंडखोरी म्हणून सगळ्या सोफॅस्टिकेटेड गोष्टी, संकेत, नियम नाकारणा:या हिप्पींनी प्रवासाला जायचं म्हणजे सुटकेस घेऊन, त्यात चांगले कपडे भरून, टूथपेस्ट आणि शेव्हिंग किटसह प्रसाधने घेऊन निघायचे या रूढ पद्धतीला नाकारलं आणि  पाठीवर सॅक भरून ही मंडळी निघाली जगपर्यटनाला. मात्र  हिप्पी चळवळ मादक पदार्थांच्या विळख्यात अडकली आणि बॅकपॅकर्सकडे त्याच नजरेनं पाहिलं जाऊ लागलं.
पुढे नव्वदच्या दशकामध्ये लो कॉस्ट एअर लाइन्सचा उदय झाला आणि  बॅकपॅकर्सना नवी टवटवी आली. मुळात या प्रकारची पर्यटन शैली निवडण्यामागे खिशात पैसे कमी असणं हा मुख्य भाग असल्याने, हे सगळे बॅकपॅकर्स ‘गरजा कमी करा’ या मूलमंत्रचा वापर करताना दिसतात. पाठीवरच्या सॅकमध्ये महिनाभराचे सामान भरायचे किंवा खरंतर सॅकमध्ये जितके सामान राहील त्यावर महिनाभर गुजारणा करायचा हाच तर यांचा फंडा असतो. सर्वसाधारणपणो तीस लिटर ते साठ लिटरच्या बॅकपॅक्स वापरल्या जातात. त्यामध्ये दोन किंवा तीन थ्री फोर्थ्स, एखादी जीन्स, चार-पाच टी-शर्ट्स आणि अंडरगार्मेंट्स इतके कपडे आरामात मावतात.
अर्थात या सॅकमध्ये कपडे कसे भरायचे याचेपण एक शास्त्र आहे. या विषयातले अनुभवी पर्यटक सांगतात की बॅकपॅकमध्ये कपडय़ांच्या घडय़ा घालून ते ठेवण्यापेक्षा त्यांचे रोल करून, म्हणजे गुंडाळी करून ते ठेवावेत म्हणजे कमी जागेत जास्त कपडे मावतात. शिवाय ही बॅकपॅक भरताना, आपल्याला प्रवासात कोणत्या वस्तू आधी लागतील, कोणत्या वस्तू जास्त वेळा लागतील याचा अंदाज घेऊन त्या क्र माने भराव्यात. अर्थात हा अंदाज काहीवेळा चुकतोच, म्हणजे टॉर्च लागणार नाही म्हणून सॅकच्या तळाला ठेवावा आणि अचानक लाइट जावेत, मग जी शोधाशोध सुरू होते विचारू नका. पण हीच तर प्रवासाची गंमत असते. 
परदेशी विशेषत: युरोप आणि अमेरिकेतील बॅकपॅकर्सची पहिली पसंती असते ती साउथ ईस्ट एशिया म्हणजे थायलंड, मलेशिया किंवा भारताला. कारण या देशांमध्ये त्यांच्या बजेटमध्ये चांगली हॉटेल्स मिळू शकतात. बदलत्या काळाबरोबर पाठीवर बॅकपॅक आणि हातात आयपॅड, आयफोन, लॅपटॉप अशी आधुनिक साधने घेऊन फिरणा:यांची नवी जमात उदयाला आली आहे, त्यांना ‘फ्लॅशपॅकर्स’ किंवा ‘पॉशपॅकर्स’ म्हटलं जातं.  
परदेशातल्या अनेक पद्धतींचे सकारण-अकारण अनुकरण करणा:या आपल्या मंडळींनी या बॅकपॅकिंगचे अनुकरण मात्र केवळ सह्याद्रीमधील भटकंती किंवा हिमालयातील मोहिमांपुरतेच मर्यादित ठेवले आहे. प्रत्यक्षात जर नीट प्लॅनिंग केलं, योग्य ती काळजी घेतली तर आपल्या देशांतर्गत अशा प्रकारे मुक्तपणो फिरण्याचा अनुभव नक्की आनंददायी होऊ शकतो. मग चला, भटक्याचे बि:हाड पाठीवर घेऊन भटकंतीचा मुक्त व मोकळा आनंद घ्यायला.   
 
 
ज्या बॅकपॅकमध्ये सामान भरायचे आणि जी नेहमी पाठीवर घेऊन फिरायची तिची निवड करणं हेदेखील कौशल्याचं आणि थोडं अनुभवाचं काम असतं बरं का. एकतर तुम्ही कुठे म्हणजे कोणत्या हवामानात फिरणार आहात, दिवसातले किती तास ती सॅक तुमच्या पाठीवर राहणार आहे, कोणत्या वाहनाने म्हणजे विमान, रेल्वे, बस तुमचा प्रवास होणार आहे या सगळ्यावर तुमच्या बॅकपॅकची निवड अवलंबून असते. जे पट्टीचे फिरणारे आहेत ते सांगतात की, महागातले शूज घेताना किंवा भारी किमतीचं घडय़ाळ घेताना जसा चोखंदळपणा दाखवला जातो तसाच अगदी सॅक खरेदी करताना करायचा असतो. बघणा:यांसाठी तसा सॅकमध्ये काहीच फरक नसतो, पण हिमालयन मोहिमांसाठी वापरली जाणारी सॅक आणि शहरांमध्ये पर्यटनासाठी फिरताना वापरायची सॅक यात फरक असतो. त्या सॅकला इंटर्नल फ्रेम आहे का एक्सटर्नल फ्रेम आहे, ती टॉप लोडिंग आहे का तिला बाजूला आणि पुढे अनेक कप्पे आहेत, त्या कप्प्यांना झीप आहे का बेल्ट आहेत, त्या सॅकचे मुख्य पट्टे कसे आहेत, पूर्ण भरलेली सॅक उचलल्यावर तुमच्या पाठीवर किती वजन येतंय, का सगळा भार कमरेवर आहे अशा अनेक गोष्टींचा विचार करून बॅकपॅक निवडली जाते. 
 
makarandvj@gmail.com