शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित मुले दत्तक घेण्याचा ‘भोर पॅटर्न’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 06:05 IST

संतोष हराळे यांनी याआधी दौंड तालुक्यात शौचालय दत्तक योजना सुरू केली होती. त्या योजनेत 52 हजार शौचालये बांधण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भोर येथे आल्यावर ‘कुपोषित मूल दत्तक योजने’ची संकल्पना त्यांच्या मनात रुजली.

ठळक मुद्देगतवर्षी तालुक्यातील 15 कुपोषित मुलांची संख्या यंदा फक्त 1 वर आली. यातून कुपोषणमुक्तीचा भोर तालुका पॅटर्न निर्माण झाला. 

संतोष हराळे  : भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ठिकाण : भोर तालुका (पुणे)

काय केले? कुपोषण ही आपल्या तालुक्यासाठी लाजिरवाणी बाब आहे, या भावनेतून भोर तालुक्याचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी एक कुपोषित मूल ‘दत्तक’ घेतले. महिन्यातून दोनदा संबंधित मुलाच्या घरी भेट देऊन त्याला पोषक आहार दिला. त्यानंतर पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांनीदेखील यात सहभाग घेतला. त्यामुळे गतवर्षी तालुक्यातील 15 कुपोषित मुलांची संख्या यंदा फक्त 1 वर आली. यातून कुपोषणमुक्तीचा भोर तालुका पॅटर्न निर्माण झाला आहे. 

काय घडले?भोर तालुक्यात सुरुवातीला अधिकार्‍यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर पंचायत समितीचे पदाधिकारीही त्यात सामील झाले. संतोष हराळे यांनी याआधी दौंड तालुक्यात शौचालय दत्तक योजना सुरू केली होती. त्या योजनेत 52 हजार शौचालये बांधण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भोर येथे आल्यावर ‘कुपोषित मूल दत्तक योजने’ची संकल्पना त्यांच्या मनात रुजली.

चांगुलपणाची साखळी !मी दोन मुलांना दत्तक घेतले. या मुलांसाठी खजूर, फळे, शेंगा, मनुके, चुरमुरे, फुटाणे, गूळ, बटाटा, सफरचंद, राजगिरा असे खाद्यपदार्थ घेऊन जायचो. महिन्यातून दोनदा या मुलांची आरोग्य तपासणी केली जायची. सुरुवातीला त्यांना कपडे घेऊन गेलो. त्यामुळे मुलं खूश होती. हळूहळू इतरांनाही माहिती मिळत गेली आणि पंचायत समितीमधील काही जणांनी इतर मुलांना दत्तक घेतलं. ही चांगुलपणाची साखळी आहे !!- संतोष हराळे

(मुलाखत आणि शब्दांकन : श्रीकिशन काळे, लोकमत, पुणे)

टॅग्स :Poshan Parikramaपोषण परिक्रमा