शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

हवाईगंड

By admin | Updated: January 3, 2015 15:19 IST

एक लेखक, ज्याच्या कादंबरीतला नायक परग्रहांवर जातो, पण तो स्वत: मात्र विमानात पायही ठेवत नाही. हॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री. नाईलाजाने विमानात बसलीच, तर जमिनीवर उतरेपर्यंत डोळेही उघडत नाही. हे असं का? आकाशात अधांतरी उडताना बेपत्ता होण्याची, जमिनीशी संपर्कच तुटण्याची वेडी भीती!

उडत्या विमानात पाय ठेवण्याच्या भीतीचा जागतिक ज्वर
 
 
अचानक बातमी येते - आकाशातून अमुक हजार फुटांवरून उडणारं अमुक कंपनीचं विमान बेपत्ता. एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क तुटून इतके तास झाले, विमानाचा पत्ता नाही.
जगभरात सर्वत्र वृत्तवाहिन्या कामाला लागतात. बातम्यांचा ओघ क्षणाक्षणाला वाढणारा ताण जगभरात पोचवत राहतो. मग संबंधित विमान कंपनी ट्रॉमा सेंटर उघडते. बेपत्ता विमानातले प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या नातेवाइकांची गर्दी, त्यांचे तणावातले - धाय मोकलून रडणारे चेहरे जगभरातल्या घराघरात पोचतात. 
- मग कळतं, संबंधित विमान अपघातग्रस्त होऊन महासागरात कोसळलं.
कधी कळतं, प्रवासाच्या वाटेवरल्या यादवीग्रस्त देशातल्या एका दहशतवादी संघटनेने आकाशातून उडणार्‍या विमानाचा जमिनीवरून वेध घेतील अशी क्षेपणास्त्रं उडवून उडतं विमान पाडून टाकलं. विमानातल्या प्रवाशांच्या अवयवांचे जळके तुकडे अमुक इथल्या भागात विखरून पडले आहेत.
हे तरी बरं. विमानातून प्रवास करणार्‍या आपल्या प्रिय माणसांचं नेमकं काय झालं, हे नातेवाइकांना कळतं तरी.
- एका बेपत्ता विमानाचा पत्ताच लागत नाही. अनेक दिवसांच्या शोधमोहिमांनंतरही ना ते विमान सापडतं, ना त्याचे अवशेष. ना समुद्राच्या तळाशी, ना आकाशात, ना जमिनीवर. बातम्या चालू राहतात, हळूहळू संपतात. उरतात ते आकाशातून अदृश्य झालेल्या प्रवाशांचे नातेवाईक. त्यांना रोज संध्याकाळी संबंधित विमानकंपनीकडून एक फोन येतो : अजून काही ठावठिकाणा लागलेला नाही. लागल्यास कळवू.
२0१४ सालातल्या या तीन घटना.
भारतापूरतं बोलायचं तर मध्यमवर्गासाठी (बराच काळ) इतका महाग की दुष्प्राप्यच असलेल्या हवाई प्रवासाबद्दलच्या औत्सुक्याची जागा भीतीने घ्यावी अशाच!
आकाशातून उडत्या विमानांची धडकी भरावी अशी प्रतिमा जगभरात निर्माण करणारी अलिकडच्या काळातली पहिली घटना म्हणजे अमेरिकेवरचा ९/११ चा हल्ला.
उडतं विमान थेट एका उत्तुंग गगनचुंबी इमारतीला धडकवलं जातानाची लाइव्ह प्रतिमा तेव्हा जिवंत असलेल्या कोणाही माणसाच्या मनावरून कधीही पुसली जाणं शक्य नाही. ९/११ नंतर सुरू झालेल्या एका विषयाच्या चर्चेला २0१४ सालातल्या घटनांनी नवं भयावह वळण दिलं आहे : हवाईगंड.
- आकाशातून उडणार्‍या विमानातून (अधांतरी) हवाई प्रवास करण्याची भीती! खरंतर उडत्या विमानात बसण्याची भीती वाटणं ही स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया म्हणता येईल अशीच भावना आहे. एकूणच प्रवास हा अनिश्‍चितांनी भरलेलाच असायचा. त्यातून विमान प्रवास जरा जास्त. विमानं ढगातून जाताना गदागदा हलली की काळजाचे ठोके चुकण्याचा, टेक-ऑफ आणि लॅन्डिंगच्या वेळी देवाचं नाव घेण्याचा अनुभव अगदी पट्टीच्या प्रवाशांनाही येतो. विमानात काम करणारे कर्मचारी अचानक लगबगीनं येजा करू लागले, आपसात कुजबुजू लागले की प्रवासी धास्तावतात. हल्ली तर जरा खुट्ट झालं तरी विमान पडणार, पाडलं जाणार अशा शंकेची पाल चुकचुकते.
विमान व्यवसायात काम करणारी माणसं, विमान प्रवाशांच्या मन:स्थितीचा अभ्यास करणारे लोक म्हणतात की, अशी भीती वाटणं स्वाभाविक आहे. 
 
 
- पण जगभरातल्या मानसतज्ज्ञांना आणि समाजवर्तन शास्त्रज्ञांना नव्याने अभ्यासाला लावणार्‍या हवाईगंडाचा संबंध आहे तो दहशतवादी कारवायांसाठी प्रवाशी विमानांना लक्ष्य करू पाहणार्‍या नव्या तंत्राचा.
१९९८ च्या आसपास आत्मघाती बॉम्बहल्ल्यांचं सत्र सुरू झालं आणि दहशतीची परिमाणंच बदलली. इस्त्रायलमध्ये पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी हे तंत्र विकसित केलं. अनेक प्रयोगांनी सिद्ध केलेल्या या तंत्रात विमानांचा उपयोग केला गेला तो ९/११च्या अमेरिकेवरच्या हल्ल्यात. पश्‍चिम आशियात इराक, तुर्कस्तान, इराण, पॅलेस्टाइन इत्यादि ठिकाणी दीर्घकाळ तणातणी आहे. तिथं विमानं पाडली जातात. विमानं धोका पत्करूनच उडत असतात. कॅनडात, अमेरिकेत, भारतात, युरोपातही अनेक वेळा विमानं काही तांत्रिक दोष आढळल्यानं उतरवावी लागतात. 
   - पण उडत्या विमानाचा आकाशात ताबा घेऊन दहशतीचं हत्त्यार म्हणून त्याचा वापर करण्याची नवी रीत उदयाला आल्यानंतरच्या जगात (पोस्ट ९/११ वर्ल्ड) विमान प्रवाशांच्या हवाई गंडाला नवं परिमाण मिळालं. व्यक्तिगत भीतीची भावना सामूहिक धास्तीमध्ये परिवर्तीत झाली.
रॉबर्ट बोर नावाचा एक प्रोफेसर गेली अनेक वर्षं हवाईगंडाचा अभ्यास करतो. त्यानं ओव्हरकम युअर फिअर ऑफ फ्लाइंग नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. असंख्य माणसांच्या मुलाखती घेऊन, आकडेवारी गोळा करून हवाईगंडाचा अभ्यास मांडला आहे. त्यांचं निरीक्षण म्हणतं की, न्यू यॉर्कचे जुळे मनोरे पडल्यानंतर अनेक अमेरिकन प्रवासी विमान प्रवास टाळू लागले. दहशतवादी हल्ले टाळण्यासाठी सर्व विमानतळांवर घेतली जाणारी जास्तीची खबरदारी, कुत्र्यांचा वावर, बंदूकधार्‍यांच्या फेर्‍या इत्यादि पाहताना प्रत्येक माणूस धास्तावला. टीव्हीवर सतत पाहिलेली ती जळत्या मनोर्‍यांची दृश्यं, वर्तमानपत्रांनी केलेली दहशतवाद्यांची वर्णनं, दुर्घटनाग्रस्त विमानांची भयानक चित्रं आणि दर्दभर्‍या कहाण्या इत्यादिंचा मारा यामुळे प्रवाशांच्या मनात एक भीती-गंड तयार झाला. बराच काळ विमान कंपन्यांना तोटा सहन करावा लागला. बोरांना वाटतं की ते स्वाभाविकच आहे. बोर म्हणतात की, गेल्या काही वर्षांतल्या एकूण वातावरणाचा भाग म्हणून एक हवाईगंड लोकांच्या मनात कायमचं घर करून बसलेला आहे. परंतु प्रवास टाळता येत नसल्यानं माणसं प्रवास थांबवत नाहीत, एवढंच.
- या वाढत्या हवाईगंडामध्ये माध्यमांचा हात मोठा आहे यावर मात्र सर्व अभ्यासकांचं एकमत दिसतं. जगाच्या कानाकोपर्‍यात घडलेली प्रत्येक घटना त्यामागच्या बारीकसारीक (मानवी) तपशिलासह घरोघरी पोचवण्याची शक्यता नव्या माध्यमविश्‍वात फारच मोठी, प्रबळ आणि नव्या तंत्रामुळे अधिक परिणामकारकही आहे. आता माध्यमं नुसत्या दुर्घटनांच्या बातम्याच नव्हेत, तर त्यात आप्त गमावलेल्या व्यक्तींच्या कहाण्याही शोधतात आणि व्यक्तिगत शोकाला आपसूक सामूहिक किनार येते.
उडत्या विमानांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाण्याच्या शक्यतेची भीती, या भीतीला येत चाललेलं सामूहिक स्वरूप हा येत्या काळातील एक मोठा सामाजिक गंड होऊन बसेल, असं समाजवर्तन शास्त्रज्ञांचे अभ्यास सांगतात.
भयंकर भीती
 
विमानप्रवास असो अगर अन्य काही, गंड नावाची गोष्ट फार गुंत्याची असते. तिची थेट कारणं ठरवणं कठीण असतं. जगभरातले अनेक सेलिब्रिटी आता उघडपणाने आपला हवाईगंड मान्य करू लागले आहेत. त्या यादीत अमेरिकन मान्यवर बहुसंख्य आहेत हा योगायोग मानता येणं कठीण आहे.
 
आयझ्ॉक असिमोव 
या लेखकानं आपल्या पुस्तकांमध्ये ग्रहांवर जाणार्‍या रॉकेट जहाजांची वर्णनं केली; पण स्वत: मात्र फक्त दोनदाच विमान प्रवास केला. 
 
लार्स फॉन ट्रायर
 हा डॅनिश दिग्दर्शक फक्त कारनंच प्रवास करतो. चित्रपटात अमेरिकेतली दृश्यं चित्रित करायची असली, तरी ती अमेरिकेत न करता डेन्मार्कमधेच चित्रित करतो, कारण त्याला विमानानं अमेरिकेत जायची इच्छा नसते. कान्स किंवा इतर चित्रपट महोत्सवांनाही तो अनेक तास कारनं प्रवास करून पोचतो.
 
वेस अँडरसन 
हा अमेरिकन दिग्दर्शक युरोपला बोटीतून जातो, त्यासाठी कितीही दिवस खर्च झाले तरी त्याला चालतात. 
 
डेविड वॉलेस 
हा अमेरिकन कादंबरीकार, कधीही विमानानं प्रवास करत नाही. दरवर्षी किती विमानं कोसळतात याचा हिशेब मांडून तो प्रवास धोक्याचाच आहे असं तो ठामपणानं मांडतो.
 
मेगन फॉक्स
ही लोकप्रिय अभिनेत्री विमानात पाय ठेवण्याच्या कल्पनेनेच माझ्या जिवाचं पाणी होतं असं म्हणते. टाळणं शक्यच नसेल, तरच ती विमानात बसते आणि प्रवास डोळे घट्ट मिटून करते.
 
 
(लेखक ख्यातनाम लेखक आणि मुक्त पत्रकार आहेत.)