शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

चिनी अस्त्रांना पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 06:05 IST

अख्ख्या जगावर पाळत ठेवताना चीनने अँप्सचे अस्त्र वापरत घराखरांत घुसखोरी केली. गुपचूप सगळी माहिती मिळवली.  जगभरात चिनी कंपन्या हाच उद्योग करताहेत. त्याचवेळी आपली माहिती मात्र पद्धतशीरपणे दडवली. चिनी अँप्सला भारतीय पर्याय शोधणे,  आपली माहिती सुरक्षित ठेवणे  संवेदनशील माहितीचा अँक्सेस बंद करणे हे उपाय आपल्याला तातडीने योजावे लागतील. 

ठळक मुद्देज्यामुळे आपल्याला धोका आहे, असे अँप्लिकेशन्स टाळून त्याला भारतीय पर्याय शोधणे, आपल्या देशाला, यंत्रणेला, आर्थिक व्यवस्थेला धोका होणार नाही याची काळजी घेणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. 

- सुनील माने

‘हुवावे’ ही चीनची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. यामध्ये चीनच्या लष्कराची म्हणजे  ‘पीपल्स रिपब्लिक आर्मी ऑफ चायनाची’ मोठी गुंतवणूक आहे. ही कंपनी ‘फाइव्ह जी’ सिस्टीम पुरवते. अमेरिकेने या कंपनीवर बंदी घातली आहे. आपणही या कंपनीला परवानगी नाकारलेली आहे. ब्रिटननेही यादृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. तिला काम दिल्यास त्या नेटवर्कमध्ये या कंपनीची अधिकृत भूमिका असेल. त्याद्वारे ही कंपनी संवेदनशील व गोपनीय माहिती गोळा करेल हा धोका ओळखून पावले उचलली गेली आहेत. या कंपनीने आपल्याकडे आपले मोबाइल फोन विकायची परवानगी मागितली होती. मात्र या कंपनीचे अनुभव लक्षात आल्यानंतर आपण तिला फोन विकायची परवानगी नाकारली. त्यानंतर या कंपनीने ‘हॉनर’ नावाने आपल्याकडे फोन विक्रीस सुरुवात केली. आपण लक्षात घेतले पाहिजे की, चीनमध्ये तयार होणार्‍या संगणक किंवा मोबाइलमध्ये विशिष्ट बदल करून ते आपली माहिती मिळवण्याचा प्रय} करतात. सरकारने आता त्यांच्या अँपवर बंदी घातली आहे. मात्र ते दुसर्‍या मार्गाने घुसण्याची शक्यता आहे. फोनमध्ये आपण अँप्लिकेशन डाऊनलोड केले तर त्यामध्ये काही गोष्टी सातत्याने विचारल्या जातात का याचा आपण विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ वारंवार तुमचं सध्याचं लोकेशन मागणं, वेगवेगळ्या मार्गाने वैयक्तिक माहिती मागणं. हे सगळे फोन आणि संगणक इनबिल्ट सॉफ्टवेअरसह येतात. त्यात अँप्स, ऑपरेटिंग सिस्टीम (फर्मवेअर) या सर्व गोष्टी येतात. तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा फोन किंवा संगणक सुरू करता त्यावेळी तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागते. यामुळे या माहितीची नोंद त्यांच्याकडे आपोआप होते. यामधून ज्यावेळी तुम्ही एखाद्या संवेदनशील माहितीची देवाण-घेवाण करता, त्यावेळी ही माहिती त्यांच्याकडे जात असते. बँका, संरक्षण संबंधित संस्था यांनी संवेदनशील माहितीबाबत सावध असले पाहिजे. लेनोव्हो ही चीनची कंपनी आहे, त्यांचे संगणक अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये आपण वापरत होतो. हे संगणक आपली माहिती एकत्रित करून सर्व्हरवरून त्यांच्या माहिती केंद्राकडे पाठवत होते असा संशय आहे. अमेरिका किंवा भारत यासारख्या देशांमध्ये लोकशाही मजबूत आहे. आपण कंपन्यांकडे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी मागणी करू शकतो, चौकशी करू शकतो. मात्र चीनमध्ये एकाधिकारशाही आहे. ते सांगतील तीच पूर्व दिशा असते. तेथील सगळ्या कंपन्यांना त्यांचं ऐकावे लागते. त्यामुळे आपोआप त्यांना माहिती मिळते. त्या माहितीचा कसा वापर करायचा, त्यासंबंधी काय व्यूहरचना करायची हे सर्वस्वी त्यांच्या हातात आहे. गुगल, गुगल मॅप, फेसबुक, व्हॉट्सअँप, ट्विटर जगभरामध्ये वापरलं जातं. मात्र चीनमध्ये ंही अँप्लिकेशन्स वापरली जात नाहीत. चीनमध्ये याला समांतर त्यांची स्वत:ची अँप्लिकेशन्स वापरली जातात. आपण ज्या प्रमाणे बंदी घातली त्याप्रमाणे त्यांनी अशा अँप्लिकेशन्सला खूप अगोदरच बंदी घातली आहे. त्यांनी सांगितलेलीच अँप्लिकेशन्स नागरिकांना वापरावी लागतात. त्यामुळे आपली जशी माहिती आपोआप त्यांना मिळाली, तशी चीनमधील माहिती बाहेरच्या देशांना प्राप्त झाली नाही. दुर्दैवाने आपल्या देशात अशी अँप्लिकेशन्स बनवलेली नाहीत जी चीनप्रमाणे इतक्या मोठय़ा प्रमाणावर वापरली जातील.अँप्सद्वारे त्यांनी आपल्या घरात घुसून आपली सगळ्या प्रकारची माहिती मिळवली. यावर उपाय एवढाच की ज्यांनी ही अँप्स डाऊनलोड केली आहेत ती सजगपणे हटवणे. त्यांना विविध करणास्तव अजाणतेपणाने पुरवलेली माहिती  वगळून टाकावी. चीनमधील काही कंपन्या सीसीटीव्ही कॅमेरे उत्पादित करतात. यातीलच प्रमुख कंपनी ‘हिकव्हीजन’ ही आहे. या कंपनीचे कॅमेरे आपल्याकडे आणि जगभरात वापरले जातात. त्याचप्रमाणे ‘दाहूआ’ नावाची जगातील दुसर्‍या क्रमांकाची सीसीटीव्ही कॅमेरे बनवणारी कंपनी आहे. या कॅमेर्‍यांद्वारे चोरून तुमच्यावर सतत पाळत ठेवली जाते, तुमच्या कार्यालयामध्ये आणि तुम्ही जेथे हे कॅमेरे लावले आहेत तेथील माहिती चीनच्या माहिती केंद्राला पुरवली जाते, असा संशय आहे. जरी कॅमेरा सेटिंगमध्ये तुम्ही ऑडियो सिस्टीम बंद केली असली तरी आवाज काढून घेऊन माहिती जमा करण्याचे काम या कॅमेराद्वारे केले जाते, असा गंभीर आरोप या कंपन्यांवर गेल्या वर्षी एका अग्रगण्य इंग्रजी नियतकालिकामध्ये करण्यात आला आहे. बर्‍याचवेळा माहितीचे क्लोनिंग करून आर्थिक फसवणूक केली जाते. स्पॅमवेअर, मालवेअर आणि रॅन्सम वेअर पाठवून माहिती काढून नवीन पद्धतीने खंडणी उकळणार्‍यांचा सामना करावा लागू शकतो. समजा आपली एखादी कंपनी किंवा व्यवस्था आहे. त्याचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आपण एखादे अँप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर वापरतो. त्याद्वारे ते आपल्या व्यवस्थेमध्ये शिरून बिघाड घडवून आणू शकतात. व्हायरसद्वारे एखाद्या कंपनीची सर्व माहिती (डेटा) बंद पाडून, ती पुन्हा सुरू करण्यासाठी खंडणीची मागणी केली जाऊ शकते. तुम्ही जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण करत नाहीत तोपर्यंत ते तुमच्याच कंपनीच्या महत्त्वाच्या माहितीचा अँक्सेस तुम्हाला देत नाहीत. हा डेटाच आता कंपन्यांचा मुख्य भाग असतो. त्यामुळे कंपन्यांचे कामकाजच ठप्प होऊ शकते. चीनच्या या व्यवस्थेमुळे आपल्यासमोर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याला खंबीरपणे तोंड देताना, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगळी व्यूव्हरचना आखावी लागेल.इंटरनेट वापरताना आपण प्रत्येक पातळीवर सजग असले पाहिजे. आपले बँकेचे व्यवहार, काही महत्त्वाचे संदेश पाठवताना, पासवर्ड टाइप करताना आपण की-पॅडचा वापर करतो. त्यावेळी टिक-टॉक किंवा इतर तत्सम चिनी अँप पासवर्ड किंवा यूझरनेम कॉपी करू शकतात. त्यामुळे हे अँप्लिकेशन्स फोनमध्ये वापरताना समजून घेणे आणि व्यवहार करताना काळजी घेणे आत्यंतिक गरजेचे आहे. चायनीज अँपमध्ये युव्ही स्कॅन आणि व्ही स्कॅन नावाचे अँप्लिकेशन्स आपण भारतात सर्रास वापरले. ही अँप्लिकेशन्स आपले डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी त्यांनी आपल्याकडे पाठवली होती. लोकांनी हे अँप्लिकेशन्स वापरले आणि आपल्या कागदावरची माहिती आपल्याही नकळतपणे त्यांच्यापयर्ंत पोहोचली. असे अँप्लिकेशन्स टाळून त्याला भारतीय पर्याय शोधणे, आपल्या देशाला, यंत्रणेला, आर्थिक व्यवस्थेला धोका होणार नाही याची काळजी घेणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. ज्या कंपनीचे भारतात डेटा सेंटर आणि सर्व्हर नाही त्या सर्व कंपन्यांना संवेदनशील माहितीचा अँक्सेस देणे पूर्ण बंद करणे हा यानंतरचा प्रमुख उपाय आहे. आपल्याला सुरक्षित राहायचे असेल तर अधिक डोळसपणे या सर्वांकडे पहिले पाहिजे. (उत्तरार्ध)(लेखक वरिष्ठ पत्रकार, व्यूहरचनाकार तसेच काही कंपन्यांचे संचालक व आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.)

mane.sunil@gmail.com