शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
5
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
6
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
8
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
9
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
10
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
11
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
12
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
13
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
14
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
15
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
16
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
17
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
18
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
19
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
20
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग

सिनेमातले एलियन्स

By admin | Updated: August 1, 2015 16:17 IST

मानवाचे आणि परग्रहावरील प्राण्यांचे युद्ध होईल का, झालेच तर त्यामध्ये कोण जिंकेल, हे परग्रहवासीय दूरवरून आपल्यावर लक्ष ठेवून असतील का? - अशा असंख्य प्रश्नांनी अनेक कलाकृतींना जन्म दिला आहे.

परग्रहावरील जीवसृष्टीबद्दलचे माणसाचे कुतूहल अत्यंत जुने आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस उपलब्ध असणा:या माध्यमातून आपण व्यक्त होत गेलो. परग्रहावरील रहिवाशांच्या कल्पनेचा वापर सर्वात जास्त चित्रपटांमध्ये केला गेला असावा.  हॉलिवूडमध्ये ‘ट¦ेंटी मिलियन्स माईल्स ऑफ अर्थ’ या 1957 साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटापासून ‘ऑब्लिव्हीऑन’ र्पयतच्या चित्रपटांमध्ये याबाबत नवनव्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. मानवाचे आणि परग्रहावरील प्राण्यांचे युद्ध होईल का, झालेच तर त्यामध्ये कोण जिंकेल, हे मानव आपल्यावरती लक्ष ठेवून असतील का? - अशा असंख्य प्रश्नांवरती आपापल्या परीने काल्पनिक भाष्य करण्याचे काम या चित्रपटांनी केले आहे. कित्येक चित्रपटांनी उडत्या तबकडय़ा (यूएफओ) किंवा हे परग्रहवासी पृथ्वीवर भेटी दिल्यानंतर काही खुणा मागे सोडून जातात अशा प्रकारची मांडणी केली आहे. एलियन्स, एलियन्स व्हर्सेस प्रीडेटर, अवतार, साईन्स, इंडिपेण्डन्स डे, मेन इन ब्लॅक, डिस्ट्रिक्ट नाईन, वॉर आफ दी वर्ल्ड्स, प्रीडेटर, स्पेसीज अशा काही नावाजलेल्या चित्रपटांमध्ये अंतराळमानव संकल्पनेचा समावेश केलेला दिसून येतो. 
2क्क्2 साली आलेला साईन्स चित्रपट विशेष गाजला होता. परग्रहावरील प्राणी किंवा मनुष्य जेव्हा पृथ्वीवर उतरतात तेव्हा ते जाताना आपल्या काही खुणाही मागे ठेवून जातात असा समज आहे. शेतामध्ये अशाच प्रकारच्या खुणा केल्याच्या गोष्टीचा या कथानकामध्ये वापर करण्यात आला होता. परग्रहावरून येणारे रहिवासी तबकडीसदृश यानातून पृथ्वीवर उतरतात असेही मानण्यात येते. त्यामुळे या उडत्या तबकडय़ांचा चित्रपट, कार्टून्समध्ये भरपूर वापर केल्याचे दिसून येते. या तबकडय़ांचा उल्लेख यूएफओ (अनआयडेंटीफाईड फ्लायिंग ऑब्जेक्ट) असा केला जातो.
वरून आलेला पीके
 
परग्रहवासीयांबद्दल असणा:या आकर्षणाचे प्रतिबिंब गेल्या वर्षी पुन्हा एकदा ‘पीके’ चित्रपटाच्या निमित्ताने दिसून आले. परग्रहावरून आलेला माणूस. त्याच्या ग्रहावर कोणीच खोटे बोलत नाही. केवळ हात हातात घेऊन इथल्या माणसांची भाषा आत्मसात करणो अशा अद्भुत गोष्टी प्रेक्षकांना आकर्षित करणा:या ठरल्या. पृथ्वीवरल्या देव या संकल्पनेवर भाष्य करण्यासाठी या परग्रहवासीयाचा उपयोग केला गेला होता.
 
हृतिक रोशनला मदत करणा:या जादूची भूल
 
बॉलिवूडमध्येही ‘कोई मिल गया’सारख्या चित्रपटामध्ये वापरलेली एलियन ही संकल्पना भारतीय प्रेक्षकांना भावली होती. हृतिक रोशनला शारीरिक आणि मानसिक बळ देऊन मदत करणा:या जादूचे जबरदस्त स्वागत करण्यात आले होते. जादूच्या प्रतिमा लहान मुलांच्या खेळांमध्ये, कपडय़ांवर आणि वस्तूंवरही नंतर दिसल्या होत्या.