शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल-कायदाचे भूत

By admin | Updated: September 13, 2014 14:55 IST

भारतीय उपखंडात दहशतवादी कारवाया वाढवणार असल्याचा अल कायदा संघटनेचा इशारा आताच समोर यावा, हा ठरवून केलेला प्रकार आहे. एका संघटनेला संपवण्यासाठी दुसरी संघटना उभी करण्याचा हा बड्या देशांचा जुनाच प्रकार असावा किंवा अंतर्गत अशांततेतून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केलेली ही पाकिस्तान सरकारचीच खेळी असू शकते.

 दत्तात्रय शेकटकर

 
दहशतवाद भारताचा पिच्छा सोडायला तयार नाही. तसा तो सोडणारही नाही. दहशतवाद्यांच्या रडारवर भारत यापुढील काळातही राहणार आहेच. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा एक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला. त्यामध्ये त्यांनी येणार्‍या काळात भारतीय उपखंडांमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्यावर जोर देणार असल्याचे सांगितले आहे. हा व्हिडीओ पाहताच भारतीय गुप्तहेर आणि सुरक्षा यंत्रणा सजग आणि सतर्क झाल्या आहेत; परंतु हा व्हिडीओ नेमका आत्ता अचानक प्रसारित करण्यामागे काय कारणे असू शकतात, यांचा शोध घ्यायला हवा.  
हा व्हिडीओ आत्ताच समोर आला, त्याची निश्‍चितपणे काही कारणे आहेत. सर्वांत पहिले कारण म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून अल कायदाचा जोर कमी होत चाललेला आहे. त्याच वेळी इसीस या दहशतवादी संघटनेचा प्रभाव विविध देशांमध्ये चांगलाच वाढतो आहे; किंबहुना ही संघटना आता अमेरिकेसाठी डोकेदुखी बनलेली आहे. इराक, सीरिया या देशांमध्ये त्यांचा प्रभाव वाढतो आहे. अमेरिकेने काही वर्षांपूर्वी तालिबानला फुगवले आणि नंतर तेच त्यांच्यावर उलटले. आता तीच परिस्थिती या दहशतवादी संघटनेच्या बाबतीत दिसून येत आहे. सीरियाविरुद्ध कारवाया करण्यासाठी अमेरिकेने तेथील दहशतवादाला प्रोत्साहन दिले; परंतु आता तेच त्यांच्यावर उलटले आहे. आता ते इतके मोठे झाले, की त्यांनी अमेरिकेपुढेच एक आव्हान उभे केले आहे. त्यामुळे पाश्‍चात्त्य देशांसह सौदी अरेबिया, बहारीन, कतार या कट्टर सुन्नी देशांना त्यांचा धोका मोठा आहे. त्यामुळे या नव्या दहशतवादी संघटनेचे वाढते महत्त्व लक्षात घेता पाकिस्तानसह अन्य देशांनी पुन्हा एकदा अल कायदाचे नवे भूत उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी अरब व आफ्रिकन देशांमध्ये अल कायदाचे असलेले महत्त्व कमी झाले आहे. हा व्हिडीओ अचानक येण्यामागील जी पूर्वपीठिका आहे, त्यातील हे एक प्रमुख कारण आहे. 
आणखी एक कारण म्हणजे पाकिस्तान हा देश स्वत: एका विचित्र कोंडीमध्ये सापडला आहे. त्यांची अंतर्गत स्थिती फारच वाईट आहे. तेथील लष्कर आणि नवाझ शरीफ यांच्यामध्ये सातत्याने तणाव निर्माण होत आहे. अशातच पाकिस्तानने खैबर पख्तुनख्वा या प्रदेशामध्ये लष्करी कारवाई करून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतही त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे लोकांचे लक्ष या सद्य परिस्थितीतून विचलीत करण्यासाठी हा व्हिडीओ प्रसारित केलेला असू शकतो; कारण भारत हा शत्रू आहे, या एकाच मुद्दय़ावर पाकिस्तानसारखे राष्ट्र त्यांचे जनमत वळवू शकते, याची तेथील शासकांना नेमकी कल्पना आहे.
हा व्हिडीओ पाकिस्तान सीमेवरील कुठल्या तरी भागात यापूर्वीच काढला गेलेला असावा. आत्ताची वेळ साधून प्रदर्शित केला असावा, अशी शंका येण्यास पुरेपूर वाव आहे. ओसामा बिन लादेनविषयी माहिती नाही, असे सांगत असताना तो पाकिस्तानमध्येच सापडला. तसेच आत्ताही होण्याची दाट शक्यता आहे. काश्मीर प्रश्नाचेही एक कारण त्यामागे असू शकते. यापुढे काश्मीर प्रश्नाची केवळ काश्मिरी लोकांशीच चर्चा केली जाईल, असे भारताने जाहीर केले आहे. पाकिस्तानच्या केंद्रस्थानी काश्मीर असल्याने भारताला वचक बसावा, या हेतूनेही दहशतवादी संघटनांनी हा व्हिडीओ आत्ताच जाणीवपूर्वक प्रदर्शित केलेला असावा. 
त्या व्हिडीओमध्ये इंडियन सब कॉन्टीनेन्टल असा उल्लेख आहे. भारतामध्ये दहशतवादी कारवायांसाठी लक्ष केंद्रित करणार, असे त्यांनी म्हटले असले, तरी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की दहशतवादी संघटनांनी भारतात यापूर्वीपासूनच काम सुरू केलेले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या प्रसारित करण्यामागील कारण सर्वांचेच लक्ष विचलित करणे, हे असू शकते. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारतात काश्मीरमध्ये अल कायदाचे नेटवर्क पूर्वीपासून आहेच. सिमी, इंडियन मुजाहिद्दीन या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी कारवाया सुरूच ठेवलेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये नवीन असे काहीही नाही. या व्हिडीओचा एक अर्थ असा असू शकतो, की ज्या संघटना पूर्वीपासून कार्यरत आहेत, त्या संघटना यापुढील काळात अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत जोर कमी झालेल्या अल कायदाला नवसंजीवनी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले असू शकतात. 
बांगलादेशातून आपल्याकडे विविध कुरापती सुरू आहेतच. ब्रह्मदेशामध्ये रोहंगिया मुस्लिम हा नवा मुस्लिम गट तयार होत आहे. ब्रह्मदेशाच्या सीमा मलेशिया, इंडोनेशियाला लागून आहेत. त्यामुळे या सार्‍या भागांतील दहशतवादी संघटना एकत्र आल्या, तर मात्र भारतासह अनेक देशांसाठी तो निश्‍चितपणे धोका असणार आहे. असे झाले, तर ब्रह्मदेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत अशा सर्वच देशांमध्ये दहशतवादी कारवाया वाढून इंडोनेशिया ते इस्राईल यामध्ये दहशतवाद सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. अल कायदाचे प्रमुख शत्रू अमेरिका, भारत आणि इस्राईल हेच असल्याचे त्यांनी पूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळेच भारताला कायम सतर्क व सजग राहावे लागणार आहे. 
जुलै २0१३मध्ये असाच एक दहशतवादी व्हिडीओ प्रसारित झाला होता व त्याद्वारे भारतीय तरुणांनी ग्लोबल जिहादमध्ये यावे, असे आवाहन केले होते. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता ठाणे, हैदराबाद, केरळ, तमिळनाडू या भागांतील तरुणांना जिहादच्या नावाखाली दहशतवादासाठी बळी पाडले जात असल्याचे दिसून येत आहे. हा फार मोठा धोका आहे; कारण दहशतवादी संघटना आहेतच. पण, त्यांना मदत करणार्‍या यंत्रणा आहेत तरी कुठल्या?, या भारतीय तरुणांना व्हीसा देतो तरी कोण?, त्यांना इराकमध्ये न्यायला कोण गेले होते? या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नाहीत. याचाच अर्थ दहशतवादी कारवायांचे काम अतिशय गुप्तपणे सुरू आहे व ते आपल्या जवळ येऊन ठेपले आहे. या गेलेल्या तरुणांमधील २ टक्के तरुण जरी दहशतवादी बनले, तरी तो देशासाठी फार मोठा धोका ठरेल. यासाठीच भारताने तरुण पिढीकडे फार बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. दहशतवादी संघटनांना कधीही कमी लेखण्याची चूक करू नये. या संघटना वा त्यातील दहशतवादी संपले म्हणून दहशतवाद संपत नसतो. दहशतवादी मानसिकतेवर प्रहार गरजेचा असतो. तो आपण करायला हवा. धर्म, जात हे दहशतवादाला जोडणे चूक आहे. त्यातून एक चुकीचा संदेश समाजात जातो. दहशतवादाकडे वळलेल्या तरुणाचे सरासरी वय ७ वर्षांचे असते. तेव्हा या मार्गाकडे वळणार्‍या तरुणांचे प्रबोधन गरजेचे आहे. जिहाद नक्की कुणाविरुद्ध हेदेखील एकदा तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे. दहशतवादाचा सामना करत असताना अनावश्यक पावले मात्र उचलू नयेत. प्रत्यक्ष युद्ध हा दहशतवाद संपवण्याचा मार्ग नाही. काउंटर टेरेरिझमनेच दहशतवादाचा सामना करता येईल; परंतु त्यासाठी लढाई हवी, ती दहशतवादी मानसिकतेशी; कारण सार्‍याचे मूळ आहे ते तिथे. 
भारतावर दहशतवादी हल्ला झाला नाही, याचा अर्थ असा नाही, की दहशतवाद संपला. आपण यापुढील काळात कायमच सतर्क व सजग राहणे गरजेचे आहे. समाजात एकी असेल, तर अल कायदासारख्या कितीही दहशतवादी संघटना उभ्या राहिल्या, तरी काहीही वाईट करू शकत नाहीत; पण अल कायदाचे हे भूत उतरवायचे असेल, तर डोळे उघडून सगळीकडे सजगतेने पाहायला हवे आणि समाज म्हणून एकसंध व्हायला हवे. 
(लेखक नवृत्त लेफ्टनंट कर्नल असून, दहशतवाद व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे 
अभ्यासक आहेत.)